Tag: बीआरएस भूषण फुसे

  • Unused Agricultural Land : तर शेतकऱ्यांच्या जमिनी परत करा – भूषण फुसे

    Unused Agricultural Land : तर शेतकऱ्यांच्या जमिनी परत करा – भूषण फुसे

    News34 chandrapur

    गोंडपीपरी – 1980 मध्ये, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (MIDC) अंतर्गत औद्योगिक केंद्र स्थापन करण्याच्या उद्देशाने सरकारने गोंडपिपरी तालुक्यातील करंजी गावात 35 एकर शेतजमीन संपादित केली. मात्र, चार दशके उलटूनही औद्योगिक विकासाचे आश्वासन अद्याप प्रत्यक्षात आलेले नाही. आर्थिक विकासाला चालना देणे, रोजगाराच्या संधी निर्माण करणे आणि प्रदेशाचा सर्वांगीण विकास सुधारणे या उद्देशाने औद्योगिक उद्देशांसाठी शेतजमीन संपादन करणे ही एक सामान्य पद्धत आहे. Unused agriculture lang

     

    करंजी गावाच्या बाबतीत, जेव्हा त्यांची जमीन सरकारने संपादित केली तेव्हा स्थानिक समाजाच्या आशा-अपेक्षा जास्त होत्या. दुर्दैवाने, करंजी गावात उद्योग स्थापन करण्यात प्रगती नसल्यामुळे समाजाचा भ्रमनिरास आणि निराशा झाली आहे. एके काळी सुपीक असलेली शेतजमीन वापराविना पडून राहिली आणि औद्योगिकीकरणाचे संभाव्य फायदे अद्यापही मिळू शकले नाहीत. सरकार आणि संबंधित अधिकाऱ्यांनी या समस्येकडे लक्ष देणे आणि करंजी गावात उद्योगांना आकर्षित करण्यासाठी कृतीशील उपाययोजना करणे आवश्यक आहे. यामध्ये औद्योगिक विकास आराखड्याची पुनरावृत्ती करणे, उत्तम पायाभूत सुविधा प्रदान करणे, संभाव्य गुंतवणूकदारांना प्रोत्साहन देणे आणि नोकरशाही प्रक्रिया सुव्यवस्थित करणे यांचा समावेश असू शकतो. Government acquisition

     

     

    केवळ एकत्रित प्रयत्न आणि औद्योगिक विकासाच्या नव्या वचनबद्धतेमुळेच करंजी गाव आणि तेथील रहिवाशांना आर्थिक प्रगती आणि समृद्धीचे बहुप्रतिक्षित लाभ मिळू शकतात.

     

    तालुक्यात midc उद्योग सुरू व्हावा यासाठी BRS चे नेते भूषण फुसे यांनी सदर मागणीचे निवेदन तहसीलदार यांना दिले आहे, जर midc सुरू होत नसेल तर शेतकऱ्यांच्या जमिनी परत देण्याची मागणी फुसे यांनी केली आहे.

     

    महाराष्ट्र-तेलंगणा सीमेवरील आदिवासीबहुल गोंडपिपरी तालुक्यात उद्योगधंदे नाहीत, त्यामुळे बेरोजगारांची संख्या सातत्याने वाढत आहे.तहसीलमध्ये कोणताही उद्योग नसल्यामुळे येथील बेरोजगार आपल्या कुटुंबासह शेजारच्या राज्यात जातात. उन्हाळ्यात मिरची तोडायची.याशिवाय इतर बेरोजगार लोक मिळेल ते काम करायला तयार असतात. उद्योग नसलेल्या तहसीलमधील बेरोजगारांची दरवर्षी संख्या वाढली जात आहे.

     

    करंजी एमआयडीसी प्रकल्प व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अखिल तारशेट्टीवार म्हणाले की, गावात उद्योग आल्याने बेरोजगारांना रोजगार मिळेल या अपेक्षेने आम्ही आमच्या सुपीक जमिनी शासनाला दिल्या होत्या, मात्र आज ४ दशकानंतरही तेथे येथे उद्योगासाठी कोणतीही हालचाल नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना किमान पीक घेता यावे यासाठी सरकारने जमिनी परत कराव्यात.

     

    गोंडपिपरी तालुक्यातील तरुण बेरोजगार झाले असून, त्यांना रोजगारासाठी लवकरात लवकर करंजी एमआयडीसीमध्ये उद्योग सुरू करावा, अन्यथा आंदोलन करू.

    याबाबतचे निवेदन तहसीलदारांना देण्यात आले असून आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. ….भूषण फुसे, BRS नेते

     

    – आजपर्यंत एमआयडीसी करंजी तहसीलमध्ये उद्योगासाठी एकही अर्ज आलेला नाही. – शुभम तहसीलदार, गोंडपिपरी

  • Self Defense : मुलींना मिळणार निःशुल्क कराटे प्रशिक्षणाचे धडे

    Self Defense : मुलींना मिळणार निःशुल्क कराटे प्रशिक्षणाचे धडे

    Self Defense राजुरा – 6 फेब्रुवारी पासून भारत राष्ट्र समितीतर्फे राजुरा विधानसभा क्षेत्रात मिशन एक हात मदतीचा हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे.

    आजच्या परिस्थिती मध्ये मुलींनी स्वरक्षणाचे धडे घेण्याची गरज आहे, त्या निमित्ताने भारत राष्ट्र समितीचे नेते भूषण फुसे यांनी या उपक्रमात पुढाकार घेतला असून महाविद्यालयातील व शाळेतील मुलींना स्वरक्षणाचे म्हणजेच निःशुल्क कराटे प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

    14 ऑगस्टला अनुकंपा धारकांचे मनपा समोर आमरण उपोषण

    Self defense या उपक्रमाचे प्रशिक्षक सेऩसाई ब्लॅक बेल्ट फर्स्ट डॉन कुंदन पेंदोर सर आहेत. सध्या हा उपक्रम गोंडपीपरी मध्ये सुरू करण्यात आला असून लवकरच राजुरा विधानसभा क्षेत्रात सुरू करण्यात येणार आहे.

    देशात व राज्यात महिला असुरक्षित असल्याचे प्रमाण खूप जास्त आहे, त्याकरिता महिला व मुलींना आत्म रक्षणाचे धडे गिरविणे महत्वाचे आहे, ग्रामीण ते शहर हे प्रमाण सध्या सतत वाढत आहे, हे कुठेतरी थांबायला हवे, जोपर्यंत महिला स्वतःची रक्षा करण्याबाबत जागरूक होणार नाही तोपर्यंत विकृत मानसिकता वाली विक्रुती वाढत जाणार त्याकरिता महिलांनी सदर शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

    भारत राष्ट्र समितीने महिला व मुलींच्या हितासाठी घेतलेला निर्णय कौतुकास्पद आहे, त्यांनी आपले कार्य असेच निरंतर सुरू ठेवावे म्हणजेच गरजू मुलींना याचा लाभ नक्कीच मिळणार. न घाबरता महिला व मुलींनी समाजातील विकृतीचा धाडसपणे सामना करावा अशी इच्छा आयोजकांनी यावेळी व्यक्त केली आहे., करीता महिला व मुलींनी या निःशुल्क शिबिराचा लाभ घ्यायला हवा. असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

  • भूषण फुसे यांच्या या कार्याची राजुरा विधानसभेत होतेय चर्चा

    भूषण फुसे यांच्या या कार्याची राजुरा विधानसभेत होतेय चर्चा

    News 34 chandrapur

    चंद्रपूर – बीआरएसने एक घास आपुलकीचा हा उपक्रम सुरु केला आहे. राजुरा विधानसभातील प्रत्येक उपजिल्हा, ग्रामीण रुग्णालय, आरोग्य केंद्रात हा उपक्रम राबवीला जाणार आहे.रुग्णालयात आलेल्या रुग्णांचा नातेवाईकांना अल्पोहाराचे देण्यात येणार आहे.आज राजुरा येथील उप जिल्हा रुग्णालयात बीआरएसचे नेते भूषण फुसे यांच्या हस्ते या उपक्रमाला सुरवात झाली.

     

    उपचारासाठी आलेल्या रुग्णासोबत त्यांचे नातेवाईक येत असतात.रुग्ण बरे होईस्तोवर त्यांना थांबावे लागते. अश्यात त्यांची खाण्यापिण्याची मोठी गैरसोय होत असते.अश्यात बीआरएसने हाती घेतलेला उपक्रम आपुलकीचा ठरला आहे.राजुरा विधानसभा क्षेत्रात बीआरएस तर्फे एक घास आपुलकीचा हा उपक्रम सुरु करण्यात आला आहे.

     

    आज राजुरा येथील उप जिल्हा रुग्णालयात या उपक्रमाची सुरवात झाली. यावेळी नेते भूषण फुसे,ज्योतीताई नळे, अनुसूर्याताई नूती, राकेश चीलकुलवार, धनंजय बोर्डे, महेंद्र ठाकूर, सुभाष हजारे उपस्थित होते.

  • वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा – बीआरएस नेते भूषण फुसे

    वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा – बीआरएस नेते भूषण फुसे

    News34 chandrapur

    चंद्रपूर – शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी BRS पक्षाचे नेते भूषण फुसे यांच्या नेतृत्वात 12 डिसेंबर ला जिवती ते विधानभवन नागपूर ला बैलबंडी मोर्चा काढण्यात येणार आहे, याबाबत 8 डिसेंम्बर ला आयोजित पत्रकार परिषदेत फुसे यांनी सविस्तर माहिती दिली.

     

    चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकरी आज अडचणीत आला आहे, आज असंख्य समस्यांना शेतकरी सामोरे जात आहे, मात्र त्यांना न्याय देण्याऐवजी शासन त्यांच्यावर अन्याय करीत आहे, या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी व सरकारला जागे करण्यासाठी भूषण फुसे BRS पक्षाच्या माध्यमातून हा मोर्चा काढत आहे.

     

    शेतकऱ्यांच्या मागण्या काय?

     

    चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सरसकट शेतजमिनीचे पट्टे देण्यात यावे, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदतीचे पॅकेज तात्काळ घोषित करून देण्यात यावे, कर्ज माफ करीत सातबारा कोरा करावा, शेतीच्या पिकांचे नुकसान करणाऱ्या रान डुक्करांची नसबंदी करण्यात यावी, धुमाकूळ घालणाऱ्या वाघाचा बंदोबस्त करण्यात यावा, स्थानिक भूमिपुत्र बेरोजगारांना उद्योगधंद्यात रोजगार देण्यात यावा, चंद्रपूर जिल्ह्यात सुरू असलेले अवैध धंदे बंद करण्यात यावे, प्रकल्पग्रस्तांना न्याय द्यावा, राजुरा व गोंडपीपरी तालुक्यात सुरू असलेले जुगाराचा अड्डे बंद करावे अश्या विविध मागण्यांसाठी बैलबंडी मोर्चा जिवती तालुक्यातून थेट विधानभवनावर 16 डिसेंम्बरला धडकणार आहे.

     

    मोर्च्यांचे नियोजन काय?

     

    12 डिसेंम्बरला सकाळी 9 वाजता शेतकरी आपल्या बैलबंडी सह जिवती येथून प्रारंभ करतील त्यानंतर गडचांदूर, राजुरा, बल्लारपूर, चंद्रपूर, भद्रावती, वरोरा, खांबाडा, जाम, बुट्टीबोरी नंतर 16 डिसेंबर ला मोर्चा विधानभवनावर धडकणार.

     

    वनमंत्र्यांनी राजीनामा द्यावा – भूषण फुसे

     

    माननीय नागपूर उच्च न्यायालयाने रानटी डुक्कर मारण्याच्या जीआर विरुद्ध निकाल दिला. या निकाला विरुद्ध वनमंत्री साहेब सर्वोच्च न्यायालयात का नाही गेले.

    रान डुकरांमुळे उभ्या शेतीचे नुकसान होत आहे, याबद्दल वनमंत्री काही ठोस भूमिका का घेत नाही? जिल्ह्यातील वाघांची संख्या वाढत आहे त्याला नियंत्रण करण्यात व वन प्राण्यांचे नियोजन करण्यात वनमंत्री अपयशी ठरले आहेत. देशाचे पंतप्रधान जर आफ्रिकेतून चिता आणू शकतात तर चंद्रपूर जिल्ह्यातील वाघांचे स्थलांतरण व पुनर्वसन का होऊ शकत नाही. जिल्ह्यातील निर्दोष, निष्पा शेतकऱ्यांचा, गुराख्यांचा व नागरिकांचा जीव जातोय याबद्दल काहीच वाटत नाही का? वनमंत्री सुधीर मुनगंटीवार हे सर्व प्रश्न हाताळण्यास अपयशी ठरल्याने त्यांनी तात्काळ आपल्या पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी भूषण फुसे यांनी केली आहे.

  • चंद्रपूर जिल्ह्यातील या नेत्याची तत्परता बघून दिव्यांग बांधवांच्या चेहऱ्यावर हसू फुलले

    चंद्रपूर जिल्ह्यातील या नेत्याची तत्परता बघून दिव्यांग बांधवांच्या चेहऱ्यावर हसू फुलले

    News34 chandrapur

    चंद्रपूर – चंद्रपूर जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर असलेला जिवती तालुका आज ही मागास आहे. अनेक समस्यांचे तालुका माहेरघर झाला आहे. अनेक गावात जायला पक्के रस्ते नाही. अश्यात आज जिवती शहरात महाराष्ट्र शासन द्वारे दिव्यांग बंधू-भगिनींसाठी कॅम्पचे आयोजन करण्यात आले होते.

     

    काही बांधवाना वाहनांची अडचण होती. अश्यावेळी बीआरएसचे नेते भूषण फुसे यांनी स्वतःच्या वाहनाने भुरी येसापूर गावला जाऊन तिथल्या दिव्यांग बांधवाला आणि त्याच्या आईला घेऊन कॅम्पमध्ये सहभाग घेतला. त्याचे कागदपत्र घेऊन संबंधित अधिकाऱ्यांना भेटून त्याला योजनेचा लाभ मिळवून देण्याचा प्रयत्न केला. तसेच अनेक दिव्यांग बंधूंना कागदपत्र पूर्तता करून त्यांची मदत केली.

     

    तालुक्याच्या समस्येवर वेळोवेळी आंदोलन….

     

    जिवती तालुक्यात अनेक समस्या उभ्या आहेत. या समस्याना घेऊन भूषण फुसे यांनी वेळोवेळी आंदोलन केले.जिवती शहरात निघालेल्या बीआरएसच्या मोर्च्यात मोठी गर्दी होती. फुसे यांची सक्रियता बघता राजकीय वर्तुळात त्यांची चर्चा आहे.

  • आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाची प्रशासनाकडून थट्टा

    आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाची प्रशासनाकडून थट्टा

    News34 chandrapur

    चंद्रपूर – बळीराजाला जगाचा पोशिंदा म्हटलं जातं.या राजाला सरकारने अक्षरशः वाऱ्यावर सोडले आहे.आत्महत्याग्रस्त कुटुंबाला साधं राशन कार्ड काढण्यासाठी कार्यालयाचा शंभर चकरा माराव्या लागल्यात. हा प्रकार चंद्रपूर जिल्हात घडला. हा प्रकार लक्ष्यात येताच बीआरएसचे नेते भूषण फुसे यांनी कुटुंबाची भेट घेतली. त्यांना राशन कार्ड मिळवून दिले. घरच्या कर्ता पुरुष गेल्यावर कुटुंबाची वाताहात होते. ही वाताहत येथील लोकप्रतिनिधीना दिसू नये ही मोठी शोकांतिका आहे.

     

    जिल्ह्यातील सर्व आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या परिवारास आर्थिक मदत द्यावी, सर्व शासकीय योजना व पीक नुकसानीचे अनुदान देण्याची कारवाई तत्काळ करण्यात यावी, अशी मागणी बीआरएसचे नेते भूषण फुसे यांनी केली होती.तसे त्यांनी निवेदन जिल्हाधिकारी दिले आहे. आत्महत्याग्रस्त कुटुंबाकडे सरकार आणि प्रशासनाचे अक्षरश दुर्लक्ष झाले आहे.

     

    राजुरा विधानसभा क्षेत्रात येणाऱ्या चिंचोली येथील महादेव लोंढे यांनी कर्ज बाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केली होती. या कुटुंबाकडे सादर राशन कार्डही नव्हतं. राशन कार्ड काढण्यासाठी लागणारी सर्व कागदपत्राची पूर्तता त्यांच्या कुटुंबांनी केली. मात्र तरीही कार्ड मिळवण्यासाठी त्यांनी मोठी पायापिट केली. तरीही त्यांना कार्ड मिळालं नव्हतं. त्यांनी बीआरएसचे नेते भूषण फुसे यांची भेट घेत आपली व्यथा मांडली. फुसे यांनी पाठपुरावा करून त्यांना राशन कार्ड मिळवून दिल.

     

    जिल्ह्यात मागीलवर्षी अतिवृष्टीमुळे, यावर्षी अवकाळी पावसामुळे शेतातील पीक हातात न आल्याने बँकेच्या व इतर सावकारांच्या कर्जाला कंटाळून अनेक शेतकऱ्यांना आत्महत्येचा मार्ग पत्करावा लागत आहे. परंतु, शेतकऱ्यांच्या आत्महत्येनंतर त्यांचा परिवार उघड्यावर पडला आहे. तालुकास्तरावरून आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाला आवश्यक मदत पुरविण्यात दिरंगाई करण्यात येत आहे. दप्तर दिरंगाईमुळे यांची कागदपत्रे पुढे पाठविली जात नाही. यामुळे त्या परिवाराला असंख्य हालअपेष्टा सहन कराव्या लागतात.

     

    दरम्यान शेतकऱ्यानी आत्महत्या केल्यानंतर त्या कुटुंबाचा कर्ता पुरुष गेल्याने कुटुंब निराधार होते. त्यामुळे निराधार योजना आणि इतर उपजीविकेच्या व मदतीच्या योजना तत्काळ राबवायला पाहिजे. जिल्ह्यात कुठेही शेतकरी आत्महत्या प्रकरण घडले, त्याची त्वरित चौकशी करून त्या कुटुंबाला तत्काळ शासकीय मदत पुरवावी. त्यावर असलेले कर्ज व त्याची कारवाई करावी आणि त्या कुटुंबाला शासकीय योजनांचा लाभ त्वरित देण्यात यावा, अशी मागणी फुसे यांनी यावेळी केली.