Tag: बल्लारपूर विधानसभा

  • Popular Now Abhilasha Gaoture : अपक्ष उमेदवार अभिलाषा गावतुरे यांच्या प्रचाराचा झंझावात

    Abhilasha Gaoture बल्लारपूर येथील मंगलमूर्ती लॉन मध्ये हजारो लोकांच्या उपस्थितीत प्रचार शुभारंभाची सभा उत्साहात संपन्न झाली.

    Abhilasha gaoture प्रचंड जनसमदायाच्या उपस्थितीमध्ये बल्लारपूर मूल बल्लारपूर विधानसभा क्षेत्राच्या लोकप्रिय उमेदवार डॉक्टर अभिलाषा ताई गावतुरे यांच्या प्रचारासाठी तालुक्यातील शहरी व ग्रामीण भागातील हजारोच्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

    गेल्या पंधरा वर्षापासून करीत असलेली निस्वार्थ समाजसेवा शैक्षणिक सामाजिक सांस्कृतिक आणि वैद्यकीय क्षेत्रात दिलेली निस्वार्थ सेवा यामुळे बल्लारपूर विधानसभा क्षेत्रात अभिलाषा ताई गवतुरे यांना प्रचंड जन समर्थन मिळत आहे. Abhilash gaoture

    चिचपल्ली येथे माकडाचा धुमाकूळ, 10 नागरिकांना घेतला चावा

    समाजातील विविध क्षेत्रातील विविध सामाजिक संघटना विविध राजकीय पक्षांचे नेते आणि पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांचे जोरदार समर्थन डॉक्टर अभिलाषा ताई गावकर यांना मिळत आहे. विविध राजकीय पक्षातील कार्यकर्ते आणि पदाधिकारी पक्षभेद बाजूला सरवण डॉक्टर अभिलाषा ताई गौतरे यांच्या पाठीमागे ठामपणे उभे आहेत बल्लारपूर येथे झालेल्या सभेमध्ये राष्ट्रीय कुणबी महासंघाचे जिल्हा सचिव श्री अतुल ठाकरे यांनी डॉक्टर विलासताई गौतरे यांना बिनशर्त पाठिंबा जाहीर केला. Abhilasha Gaoture

    चंद्रपूर शहरात युवकाकडे मिळाली बंदूक

    रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गवई गटाचे नीरज वाळके यांनी कुठल्याही पक्ष धोरणाची तमा न बाळगता फुले शाहू आंबेडकरी चळवळीतील प्रमाणात कार्य डॉक्टर म्हणून पाठिंबा जाहीर केला आणि प्रचार करण्यासाठी सज्ज झाले. जुना चे सरपंच विवेक शेंडे, कारव्याचे माजी पंचायत समिती सदस्य विनोद सीडाम, गोंडवाना गणतंत्र पार्टीचे गणपत नैताम, नथू पाटील वांढरे, अमन पसंत कमिटीचे ताहीर भाई हुसेन, अतिक भाई शेख, बशीर खान, शेख जाकीर, गणेश बुटले, गोवारी समाज संघटनेचे सतीश नेवारे, चिचपल्ली चे संतोष भाऊ तोडासे, सुनील बावणे, मानोराचे मोहन पवार, कोर्टी मक्त्याचे साईनाथ तायडे, कोटीचे रवींद्र भाऊ टोंगे, बामणीच्या तंजीला सय्यद मॅडम, करुणाताई शेगोकार, नाहीद हुसेन, तुळशीराम कंबलवार,
    विसापूरचे अशोक भाऊ चिताडे आणि राजूभाऊ लांडगे इत्यादी सर्व मान्यवर मंचावर उपस्थित होते.

    कोणत्याही पक्षाने अभिलाषा ताईंना तिकीट दिली नसेल तरी आम्ही जनतेने अभि लक्ष त्यांना तिकीट दिली आहे अशी घोषणा सर्व उपस्थित मान्यवरांनी केली आणि अभिलाषाताई गावतुरे यांना प्रचंड मताधिक्याने निवडून आणण्यासाठी तन-मन-धनाने सहकार्य करण्याची ग्वाही सुद्धा दिली. Abhilasha Gaoture


    ज्यावेळी डॉक्टर अभिलाषा ताई गावतुरे यांनी उमेदवार म्हणून बोलताना मुल बल्लारपूर विधानसभा क्षेत्रामध्ये गेल्या 30 वर्षांमध्ये विद्यमान पालकमंत्र्यांनी कुठलेही जनहिताचे काम केले नाही आणि विकासाच्या नावाखाली स्वतःच्या कंत्राटदारांना पोसण्यासाठी फक्त दगड धोंड्याच्या बिल्डिंग बनवण्याचं काम केलं. ना पालकमंत्र्यांचा इथल्या शाळांकडे लक्ष आहे ना येथील दवाखान्यांमध्ये सोयी सुविधा उपलब्ध आहेत ना कोणता नवीन उद्योग सुरू केला ना कुठल्या नवीन रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या उलट सुरू असलेल्या बामणी प्रोटीन सारख्या उद्योगाला सुद्धा बंद होण्यापासून ते रोखू शकले नाही असा आरोप त्यांनी केला. Abhilasha Gaoture

    शाळांमध्ये शिक्षक नाही म्हणून आम्ही आंदोलन करतो जिल्हा परिषद च्या शाळा सरकार बंद करत असताना आम्ही त्याविरुद्ध आवाज उचलतो विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी बस नाही म्हणून आम्ही आंदोलन करतो.

    आमच्या शेतकऱ्यांच्या आणि गुराख्यांचे जीव वाघांच्या हल्ल्यामध्ये जातात म्हणून आम्ही आवाज उचलतो पण पालकमंत्र्यांना आमच्या सर्वसामान्य माणसांच्या जीवाची अजिबात फिकीर नाही, आंबडीची सिंचन योजना गेल्या 30 वर्षात पूर्ण करू शकले नाही, शेतकऱ्यांच्या मामा तलावाच्या कामांमध्ये भ्रष्टाचार झाल्याने तलाव फुटले शेकडो लोक बेघर झाले आणि लाखोंच्या संपत्तीचे नुकसान झालं यासाठी आम्हाला लढावे लागते पण ज्यांना जनप्रतिनिधी म्हणून निवडून दिले असे जिल्ह्याचे पालकमंत्री याबाबत अक्षम्य उदासीनता बाळगतात आणि म्हणून या सर्वसामान्य जनतेच्या समस्या जर सोडवायचे असतील तर आम्हाला प्रचंड बहुमताने निवडून द्या असे आवाहन अभिलाषा ताई गावतुरे यांनी केले. Abhilasha Gaoture

    कार्यक्रमाचे संचालन रवी देवगडे विजय मुसळे यांनी केले तर प्रस्तावना भूमिपुत्र ब्रिगेडचे ताहीर भाई हुसेन यांनी केली.

  • Independent candidate Abhilasha Gaoture : विविध सामाजिक संघटनांचा अपक्ष उमेदवार अभिलाषा गावतुरे यांना पाठिंबा

    Independent candidate Abhilasha Gaoture बल्लारपूर विधानसभा क्षेत्र सध्या राज्यात चर्चेचा विषय बनलेला आहे. येथील सुपरिचित सामाजिक कार्यकर्त्या डॉ. अभिलाषा गावतुरे यांना काँग्रेसचे उमेदवारी निश्चित समजली जात असताना ऐनवेळी त्यांची उमेदवारी कापून मतदारसंघात काहीसे परिचित नसलेले संतोष रावत ह्यांना देण्यात आली. केवळ धनशक्ती च्या जोरावर रावत ह्यांना उमेदवारी देण्यात आली.


    Independent candidate Abhilasha Gaoture डॉ. अभिलाषा यांना उमेदवारी मिळावी अशी जनमाणसाची भावना असताना सुद्धा त्यांना उमेदवारी नाकारण्यात आली याचा रोष बल्लारपूर विधानसभा क्षेत्रातील जनतेकडून व्यक्त केला जात आहे.

    चंद्रपुरातील मायकल जवळ मिळाली बंदूक

    त्यामुळे सामाजिक व राजकीय क्षेत्रातील लोकांनीच पुढाकार घेऊन डॉ. अभिलाषा गावतुरे यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्यासाठी येथील मोठ्या हॉटेल मध्ये एक चिंतन बैठक बोलवण्यात आली. या बैठकीला ओबीसी, दलित,आदिवासी मतांवर प्रभाव पाडणाऱ्या सर्व सामाजिक संघटनांचे सुमारे चारशे हून अधिक प्रतिनिधी त्यांच्या समर्थनात या बैठकीला हजर होते. Independent candidate Abhilasha Gaoture

    सध्या डॉ. अभिलाषा गावतुरे या अपक्ष आमदार म्हणून बल्लारपुर विधानसभा क्षेत्रामध्ये निवडणूक लढवीत आहेत. एखाद्या अपक्ष उमेदवारीला सर्व स्थरातील समाजिक कार्यकर्त्यांनि एकजुटीने हजर असणे ही एक ऐतिहासिक घटना समजल्या जात आहे आणि त्यामुळे डॉ. अभिलाषा गावतुरे ह्यांचा विजय निश्चित समजल्या जात आहे.

    चिचपल्ली येथे माकडाचा धुमाकूळ

    विशेष म्हणजे काँग्रेसनी ज्यांना चंद्रपूर विधानसभेची उमेदवारी नाकारली असे अपक्ष उमेदवार राजूभाऊ झोडे हे सुद्धा या बैठकीला उपस्थित होते. मागील निवडणुकीत बल्लारपूर विधानसभेत त्यांनी चाळीस हजार मते घेतली होती. त्यामुळे त्यांची उपस्थिती व पाठिंबा हे डॉ.अभिलाषा साठी वरदान ठरणार यात काही शंका नाही. Independent candidate Abhilasha Gaoture


    मुल- बल्लारपूर क्षेत्राचे विद्यमान आमदार सुधीर मुनगंटीवार यांचा पराभव करण्याची क्षमता केवळ डॉ. अभिलाषा गावतुरे यांच्यात असूनही त्यांना उमेदवारी नाकारण्यात आली. आणी त्यामुळे संतोष रावत हे मंत्री सुधीर मुनगंटीवार ह्यांचे डमी उमेदवार असल्याचा स्पष्ट आरोप या बैठकीत ठेवण्यात आला. म्हणून डॉ. अभिलाषा गावतुरे या अपक्ष उमेदवाराच्या पाठीशी सर्व सामाजिक संघटनांनी ठामपणे उभे राहून सर्वसामान्य लोकांमध्ये जाऊन त्यांचा प्रसार प्रसार करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.


    या बैठकीला ज्येष्ठ पत्रकार व दलित मित्र डी. के. आरिकर, सत्यशोधक समाजाचे हिराचंद बोरकुटे, भीम आर्मी चे सुरेंद्रभाऊ रायपुरे, सोशल इज्युकेशन चे भास्कर मून, एडवोकेट प्रशांत सोनुले, प्रा.माधव गुरनुले, हेल्पिंग हँडस फाऊंडेशन चे अजय दुर्गे तसेच सुभाष रत्नपारखी,विशाल जुमनाके, बाबुराव ठाकरे ,बेलदार समाजाचे डॉक्टर राजू ताटेवार, जीवन उमरे,गिरीधर लांबट, अंकुश वाघमारे , गुलजार रायपूरे, ऋषी कोटनाके, कार्तिक बोरकर,हरिदास उराडे,शंकर बागेसर मुकुंदा आंबेकर, देविदास रामटेके, सुधाकर रामटेके, लोकेश्वर कोटरंगे, दशरथ पेंदोर, मुन्ना आवळे, डॉ. महेश भांडेकर, यशोधरा ताई पोतनवार व वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्टर्स, वकील तथा प्राध्यापक वर्ग मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.

  • Ballarpur Assembly : बल्लारपूर विधानसभेवर रोशन लाल यांची दावेदारी

    Ballarpur Assembly : बल्लारपूर विधानसभेवर रोशन लाल यांची दावेदारी

    Ballarpur Assembly आगामी विधानसभा निवडणूक जवळ येताच विविध पक्षातील उमेदवारांनी नागरिकांच्या समस्या ऐकणे सुरू करीत विधानसभा क्षेत्रात दौरे सुरू केले आहे, लोकसभा निवडणुकीत कांग्रेसला चंद्रपूर जिल्ह्यात घवघवीत यश मिळाल्यावर आता पक्षातूनचं स्पर्धा वाढलेली दिसत आहे, सध्या जिल्ह्यातील चंद्रपूर व बल्लारपूर विधानसभा क्षेत्रात कांग्रेस मध्ये संभाव्य उमेदवारांची लाट उसळताना दिसत आहे.

    राजकारण : रास्त धान्य दुकानदारांना न्याय द्या – खासदार प्रतिभा धानोरकर


    Ballarpur Assembly अश्यातच अनेक वर्षापासून महाविद्यालय काळातून राजकारणात उतरलेले NSUI चे माजी राष्ट्रीय सचिव रोशन लाल यांनी कांग्रेस पक्षातर्फे बल्लारपूर विधानसभा क्षेत्रात दावेदारी सादर केली आहे.
    त्यांनी प्रदेश कांग्रेस कार्यालयात विधानसभेसाठी अर्ज सादर केला आहे.

    कोण आहे रोशन लाल?


    पूर्वी कांग्रेस पक्षात गटबाजी नव्हती त्या काळात रोशन लाल यांनी NSUI या विद्यार्थी संघटनेत आपली पकड मजबूत केली.
    NSUI चे जिल्हा अध्यक्ष बनल्यावर त्यांनी महाविद्यालयीन निवडणूक लढवीत अनेकदा यश प्राप्त केले.
    रोशन लाल जिल्ह्यातील राजकारणासह प्रदेश कार्यकारिणीत गेले व त्यानंतर थेट NSUI चे राष्ट्रीय सचिव पदावर अंतर्गत निवडणुकीत यशाचा झेंडा रोवत विराजमान झाले.

    भारत जोडो यात्रा सुरू होण्यापूर्वी राहुल गांधी यांनी कन्याकुमारी ते जम्मू काश्मीर पर्यंत प्रवासात रोशन लाल यांची साथ घेतली.
    या दरम्यान कांग्रेस नेते व सध्याचे विरोधी पक्ष नेता राहुल गांधी यांचे ते निकटवर्तीय बनले.
    आज राष्ट्रीय कार्यक्रमात रोशन लाल हे राहुल गांधी यांच्या सोबत असतात.


    बल्लारपूर विधानसभेसाठी उमेदवार देत असताना वडेट्टीवार व धानोरकर गटाचे द्वंद्व युद्ध बघायला मिळणार मात्र प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी आधीच जाहीर केले की उमेदवारी ही दिल्ली मधून घोषित होणार त्यामुळे रोशन लाल यांच्या नावावर कांग्रेस उमेदवारीचा शिक्का मोर्तब होण्याची पूर्ण शक्यता वर्तवली जात आहे. रोशन लाल यांच्या दावेदारी ने इच्छुक उमेदवारांच्या भुवया उंचावल्या आहे.

    सध्या बल्लारपूर विधानसभा क्षेत्रात पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे वर्चस्व आहे मात्र लोकसभा निवडणुकीत बल्लारपूर विधानसभा क्षेत्रात कांग्रेसला मोठे मताधिक्य मिळाल्याने येणारी निवडणूक ही अत्यंत चुरशीची असणार हे मात्र खरे.

  • Political Transformation : पालकमंत्री मुनगंटीवार यांच्या विधानसभा क्षेत्रात शिवसेना ठाकरे गटाची धडाकेबाज एंट्री

    Political Transformation : पालकमंत्री मुनगंटीवार यांच्या विधानसभा क्षेत्रात शिवसेना ठाकरे गटाची धडाकेबाज एंट्री

    News34 chandrapur

    चंद्रपूर/बल्लारपूर – देशात लवकरच लोकसभा निवडणुकीची घोषणा होणार असून, यंदा भारतीय जनता पक्ष (भाजप) महाराष्ट्रातून अनेक मंत्री लोकसभेच्या रिंगणात उतरवण्याची शक्यता आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत केंद्रीय गृहमंत्री हंसराज अहिर यांचा काँग्रेसच्या बाळू धानोरकर यांच्याकडून पराभव झाला तेव्हा घटनांचे एक मनोरंजक वळण आले. मात्र, धानोरकर यांच्या दुर्दैवी निधनाने पक्ष आता मंत्री सुधीर मुनगंटीवार यांना लोकसभा लढवून चंद्रपूर लोकसभा जागा जिंकण्याची संधी देण्याचा विचार करू शकते. त्यामुळे विधानसभेचे काय होणार, असा प्रश्न निर्माण होतो. Assembly Election

     

    बल्लारपूर विधानसभा मतदारसंघात भाजपचा नवा उमेदवार येणार, की सुधीर मुनगंटीवार उमेदवार होणार? सध्या या चर्चा सुरू आहेत. दरम्यान, उद्धव ठाकरे यांच्या गटाचे जिल्हाप्रमुख संदीप गिऱ्हे यांनी आतापासूनच विधानसभेची तयारी सुरू केली आहे. बल्लारपूर विधानसभेच्या जागेवर शिवसेना दावा करू शकते, असा अंदाज आहे. नुकतेच ठाकरे गटाच्या जनसंपर्क कार्यालयाचे भव्य उद्घाटन बल्लारपूर येथे झाले. त्याच दिवशी भाजपने मराठी अभिनेत्री नेहा पेंडसेचा कार्यक्रम शहरात आयोजित केला होता. Chandrapur lok sabha

     

    नेहा पेंडसेच्या कार्यक्रमाला आणि शिवसेनेच्या जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटन सोहळ्यातील विरोधाभासी गर्दीने शिवसेनेची ताकद दाखवून दिली. लोकसभा निवडणुका जसजशा जवळ येत आहेत आणि महाराष्ट्रात राजकीय घडामोडी घडत आहेत, तसतसे पक्ष लोकसभा आणि विधानसभेच्या दोन्ही जागांसाठी कशी रणनीती आखतात आणि स्पर्धा करतात हे पाहणे मनोरंजक असेल. Bharatiy janata party

     

    राजकारणातील नवे पर्व, कोण आहेत संदीप गिर्हे?

    चंद्रपूर शहरातील रामनगर भागातील एका गरीब कुटुंबात जन्मलेल्या संदीप गिऱ्हे यांचे जीवन संघर्ष आणि चिकाटीने भरलेले आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या आदर्शाने प्रेरित होऊन त्यांनी लहान वयातच शाळेत असतानाच शिवसेना पक्षात प्रवेश केला. Sandeep girhe

     

    शाखाप्रमुख म्हणून त्यांच्या सुरुवातीच्या दिवसांपासून ते जिल्हा प्रमुख म्हणून त्यांच्या सध्याच्या पदापर्यंत, गिर्हे यांचा प्रवास आव्हानांनी भरलेला आहे. राज्यात राजकीय बदल होऊनही संदीप गिऱ्हे यांनी उद्धव ठाकरे आणि शिवसेना पक्षासोबत ठाम राहिले. आज त्यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेतील ठाकरे गटाने बल्लारपूर विधानसभा मतदारसंघात, तसेच संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्यात लक्षणीय बळ मिळविले आहे. Shiv sena

     

    गिऱ्हे यांच्या संघटन कौशल्याने प्रस्थापित राजकीय पक्षांना थक्क करून सोडले आहे. बल्लारपूर विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीच्या संभाव्य पाठिंब्याने संदीप गिऱ्हे यांना मोठा राजकीय परिवर्तन घडवून आणण्याची संधी आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत गिऱ्हे यांच्यासारखा तळागाळातील कार्यकर्ता दिग्गज नेत्यांना आव्हान देणारा पाहिल्यास नवल वाटणार नाही. शेवटी, बदल हा गोष्टींचा नैसर्गिक क्रम आहे. 2024 च्या विधानसभा निवडणुकीकडे लक्ष देता, चंद्रपूर जिल्ह्यात शिवसेनेला आमदार निवडून आणण्याची दाट शक्यता असल्याचे स्पष्ट होत आहे. Minister sudhir mungantiwar

     

    संदीप गिऱ्हे यांचे समर्पण आणि संघटनात्मक बांधणीसाठी धोरणात्मक दृष्टीकोन याने निःसंशयपणे या जिल्ह्यात पक्षाच्या वाढत्या प्रभावाला हातभार लावला आहे. शेवटी, संदीप गिऱ्हे यांचा चंद्रपूर जिल्ह्यातील राजकीय शक्ती म्हणून झालेला उदय हा त्यांच्या अटूट बांधिलकीचा आणि त्यांना मिळालेला पाठिंबा याचा पुरावा आहे. त्यांच्या सततच्या प्रयत्नांमुळे शिवसेना पक्ष आगामी निवडणुकीत मोठा प्रभाव पाडण्याच्या तयारीत आहे.

     

    चंद्रपूर जिल्ह्यात नव्या मतदारांची साथ शिवसेनेला मोठ्या प्रमाणात मिळत आहे, शिवसेना जनसंपर्क कार्यालयाच्या उदघाटन सोहळ्याला आलेला जनसमुदाय शिवसेनेची वाढती ताकद दाखवीत आहे, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सध्या राज्यात सत्ताधारी पक्षाविरोधात बेधडक वक्तव्य करीत आहे, त्यांनी सत्तेपुढे गुढघे टेकले नाही, आजही त्यांच्या सोबतीला निष्ठवंतांची फौज उभी आहे. आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीत ठाकरे पॅटर्न चालणार असा अंदाज राजकीय विचारवंतांनी वर्तविला आहे.

  • Shiv Sena : दुर्गापुरात शिवसेना जनसंपर्क कार्यालयाचे भव्य उदघाटन

    Shiv Sena : दुर्गापुरात शिवसेना जनसंपर्क कार्यालयाचे भव्य उदघाटन

    News34 chandrapur

    चंद्रपूर – 14 फेब्रुवारी रोजी दुर्गापुरात शिवसेनेच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. चंद्रपूर शिवसेना जिल्हाप्रमुख संदीप गिऱ्हे यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यालयाची स्थापना पक्षप्रमुख उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांचे कार्य आणि नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्यांचे निराकरण करण्याच्या उद्देशाने प्रत्येक भागात शिवसेनेचे कार्यालय असावे या मोठ्या उपक्रमाचा एक भाग आहे. Citizens

     

     

    शिवसेना पक्ष हा नागरिकांच्या कल्याणासाठी आणि त्यांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी सक्रियपणे कार्य करत आहे. विविध भागात जनसंपर्क कार्यालये स्थापन करून, नागरिकांना त्यांच्या समस्या मांडण्यासाठी आणि पक्षाकडून मदत मागण्यासाठी एक समर्पित जागा उपलब्ध करून देण्याचे पक्षाचे उद्दिष्ट आहे असे प्रतिपादन जिल्हाप्रमुख संदीप गिर्हे यांनी यावेळी केले. Public relations office

     

     

    दुर्गापूर पोलीस स्टेशनसमोर जनसंपर्क कार्यालय उदघाटन प्रसंगी युवासेना जिल्हाप्रमुख विक्रांत सहारे, माजी महानगरप्रमुख, प्रमोद पाटील व प्रा. शालीक फाले आणि परिसरातील असंख्य कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.

  • रस्त्याचे निकृष्ट काम बघून युवासेना जिल्हाप्रमुख संतापले

    रस्त्याचे निकृष्ट काम बघून युवासेना जिल्हाप्रमुख संतापले

    News34 chandrapur

    चंद्रपूर – बल्लारपूर विधानसभा क्षेत्रातील विसापूर, नांदगाव व माना या गावालगत सध्या रस्त्याच्या दुरुस्ती करण व डांबरीकरणाचे काम सुरू आहे, मात्र हे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे असून सदर काम तात्काळ थांबवा अशी मागणी शिंदे गटाचे युवासेना जिल्हाप्रमुख सुर्या अडबाले यांनी केली आहे.

     

    या मार्गावरून शेतकरी, शेतमंजूर रात्रदिवस ये जा करणाऱ्या कामगारांसाठी अत्यंत उपयुक्त असलेल्या रस्त्याचे विसापूर, नांदगाव पोडे ते माना गावापर्यत खडिकरण, मजबुतीकरण, डांबरीकरण असलेल्या रोड ला पुन्हा नव्याने 3 कोटी 50 लाख मंजूर करून त्या रोड वरती नवीन खडिकरण, मजबुतीकरण न करता सरळ त्या वरती गिट्टी टाकून फक्त डांबर टाकत रोड चे काम करत आहेत व अश्या पद्धतीने काही राजकारणी लोक, इंजिनिअर आणि ठेकेदार एकसंघमत करून शासनाचा 3 करोड 50 लाख निधी लंपास करत आहे हे काम लवकरात लवकर बंद करावे, सदर काम बघून युवासेना जिल्हाप्रमुख सुर्या अडबाले चांगलेच संतापले होते.

     

    या सर्व कामाची पालक मंत्री साहेबांनी चौकशी करावी असे पत्र सुद्धा आम्ही देणार आहोत व जे यामध्ये दोषी आढळतील त्यांच्या वरती कठोर कारवाही करण्यात यावी अशी मागणी सुर्या अडबाले यांनी केली आहे.

     

    यावेळी मनसे चे तालुका प्रमुख राज वर्मा मनसे चंद्रपूर, शहर उपप्रमुख कैलास जी वालकोडे, संतोष जी येमूरले मनसे शाखा अध्यक्ष प्रमोद जी निखाडे, प्रशांत पिंपळशेडे, शंकर उईके आदि गावकरी हजर होते.