Chandrapur Manpa prabhag rachana objections : चंद्रपूर 16 सप्टेंबर – चंद्रपूर महानगरपालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीसाठी तयार करण्यात आलेल्या प्रारूप प्रभाग रचनेवर निर्धारित वेळेत 8 हरकती अर्ज चंद्रपूर मनपा प्रशासनास प्राप्त झाले आहेत.
महापालिकेच्या प्रभाग रचनेचे प्रारूप 3 सप्टेंबर रोजी जाहीर करण्यात आले होते. त्यावर हरकती.सूचना मागविण्यास सोमवार 15 सप्टेंबर दुपारी 3.00 वाजेपर्यंत वेळ देण्यात आला होता. या कालावधीत 12 सप्टेंबर पर्यंत 6 तर अखेरच्या दिवशी 2 असे एकुण 8 अर्ज मनपा प्रशासनास प्राप्त झाले.
१८ सप्टेंबर रोजी सुनावणी
18 सप्टेंबर रोजी मा.जिल्हाधिकारी यांच्या समक्ष जिल्हाधिकारी कार्यालयात या सर्व हरकतींवर सुनावणी प्रक्रिया घेतली जाणार आहे. सुनावणीदरम्यान अर्जदारांना आपले म्हणणे मांडण्याची संधी मिळणार असुन त्यानंतरच अंतिम प्रभाग रचना निश्चित होणार आहे.
आक्षेपांवर सुनावणी होणे, त्यानंतर प्रभागरचना अंतिम करून शासनाच्या नगरविकास विभागाकडे पाठविणे, नगरविकास विभागाकडून राज्य निवडणूक आयोगाच्या मंजुरीसाठी पाठविणे, निवडणूक आयोगाच्या अंतिम मंजुरीनंतर अंतिम प्रभागरचना प्रसिद्ध करणे, अशी संपूर्ण प्रक्रिया 13 ऑक्टोबरपर्यंत नियोजित आहे.
chandrapur zilla parishad draft notification : चंद्रपूर, दि. १५ : चंद्रपूर जिल्हा परिषद क्षेत्रातील निवडणूक विभागाची व त्याअंतर्गत पंचायत समित्यांमधील निर्वाचक गणाच्या प्रारुप प्रभाग बाबतीत निवडावयाची सभासद संख्या निश्चित केलेली आहे. त्यानुसार जि.प. निवडणूक विभाग 56 व पंचायत समिती निर्वाचक गणांची प्रभाग रचना 112 करण्यात आली आहे. ward wise zilla parishad seats chandrapur district
वरीलप्रमाणे निश्चित केलेल्या निवडणूक विभाग व निर्वाचक गण रचनेचे प्रारूप परिशिष्ट 5 (अ) व 5 (ब) मधील अधिसूचना व अनुसूची तयार करून ती शासन राजपत्रात, 14 जुलै 2025 रोजी जिल्हाधिकारी कार्यालय, तहसिल कार्यालय, जिल्हा परिषद कार्यालय, पंचायत समिती कार्यालयील सूचना फलक / संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. सदर प्रारूप प्रभाग रचनेवरील हरकती व सूचना 21 जुलै 2025 पर्यंत जिल्हाधिकारी /संबंधित तहसीलदार यांच्या कार्यालयात स्वीकारण्यात येणार आहे, असे उपजिल्हाधिकारी तथा उपजिल्हा निवडणूक अधिकारी यांनी कळविले आहे. zilla parishad election ward structure chandrapur
अशी आहे जिल्ह्यातील निवडायची सदस्य संख्या :
सन 2011 च्या जनगणनेनुसार ग्रामीण भागातील एकूण लोकसंख्या 14 लक्ष 23 हजार 349 आहे. अनुसूचित जातीची लोकसंख्या 1 लक्ष 98 हजार 28 असून अनुसूचित जमातीची लोकसंख्या 3 लक्ष 18 हजार 373 अशी आहे. जिल्ह्यातील जिल्हा परिषद निवडणूक विभाग 56 व पंचायत समिती निर्वाचक गणांची प्रभाग रचना 112 निश्चित करण्यात आली आहे.
यात चिमूर (जि.प. सदस्य संख्या -5, पंचायत समिती सदस्य संख्या – 10), नागभीड (जि.प. सदस्य संख्या -4, पंचायत समिती सदस्य संख्या – 8), ब्रम्हपुरी (जि.प. सदस्य संख्या -5, पंचायत समिती सदस्य संख्या – 10), सिंदेवाही (जि.प. सदस्य संख्या -4, पंचायत समिती सदस्य संख्या – 8), भद्रावती (जि.प. सदस्य संख्या -4, पंचायत समिती सदस्य संख्या – 8), वरोरा (जि.प. सदस्य संख्या -5, पंचायत समिती सदस्य संख्या – 10), चंद्रपूर (जि.प. सदस्य संख्या -5,
पंचायत समिती सदस्य संख्या – 10), मूल (जि.प. सदस्य संख्या -3, पंचायत समिती सदस्य संख्या – 6), सावली (जि.प. सदस्य संख्या -4, पंचायत समिती सदस्य संख्या – 8), पोंभुर्णा (जि.प. सदस्य संख्या -2, पंचायत समिती सदस्य संख्या – 4), गोंडपिपरी (जि.प. सदस्य संख्या -3, पंचायत समिती सदस्य संख्या – 6), बल्लारपूर (जि.प. सदस्य संख्या -2, पंचायत समिती सदस्य संख्या – 4), कोरपना (जि.प. सदस्य संख्या -4, पंचायत समिती सदस्य संख्या – 8), जिवती (जि.प. सदस्य संख्या -2, पंचायत समिती सदस्य संख्या – 4) आणि राजूरा (जि.प. सदस्य संख्या -4, पंचायत समिती सदस्य संख्या – 8) अशी आहे.
upcoming local body elections : चंद्रपूर 20 जून – आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाची तयारी सुरु झाली असुन प्रभाग रचना आदेश तसेच मतदार यादी अद्ययावतीकरण मोहिमेसंदर्भात राजकीय पक्षांची संयुक्त बैठक गुरुवार (19 जून) रोजी चंद्रपूर मनपा राणी हिराई सभागृहात घेण्यात आली.
आगामी निवडणुकांमध्ये वयाचे 18 वर्ष पूर्ण करणाऱ्या सर्व पात्र मतदारास मतदार यादीत आपले नाव नोंदविणे शक्य व्हावे,सर्व पात्र मतदारांना मतदान करता येऊन मतदानाचे प्रमाण वाढावे यादृष्टीने केल्या जाणाऱ्या उपाययोजनांवर चर्चा करण्यात आली. याप्रसंगी निवडणुक निर्णय अधिकारी 71 – चंद्रपूर विधानसभा क्षेत्र तथा उपविभागीय दंडाधिकारी संजय पवार, सहा. निवडणुक निर्णय अधिकारी 71 – चंद्रपूर विधानसभा क्षेत्र तथा तालुका दंडाधिकारी विजय पवार,मनपा आयुक्त विपीन पालीवाल,उपायुक्त मंगेश खवले, उपायुक्त संदीप चिद्रावार तसेच विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी व प्रतिनिधी उपस्थित होते.
आगामी निवडणुकीसाठी प्रशासनातर्फे तयारी पुर्ण केली जात आहे. या बैठकीत शासनाकडून निर्गमित प्रभाग रचना आदेशावर सविस्तर करण्यात आली. नव्याने प्रस्तावित प्रभागांची माहिती, मार्गदर्शन तसेच नागरिकांपर्यंत योग्य माहिती पोहोचवण्यासाठी नियोजन या विषयांवर चर्चा झाली. ward restructuring for local elections
विशेष मोहीम
प्रशासनामार्फत मतदार जनजागृती व्यापक प्रमाणात होणार असुन येत्या विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमानुसार मतदार यादीमध्ये नाव समाविष्ट करणे, मतदारांची नावे वगळणे, स्थानांतर करणे तसेच नावात दुरुस्ती करण्याची संधी मिळणार आहे. या विशेष मोहिमेमध्ये सर्वांनी सहभागी व्हावे व उपलब्ध संधीचा फायदा घेण्याचे आवाहन आयुक्त विपीन पालीवाल यांनी केले. voter list update
निवडणुक निर्णय अधिकारी संजय पवार यांनी सांगितले की, ‘मतदार यादी अद्ययावतीकरण ही लोकशाहीची मूलभूत प्रक्रिया आहे. सर्व पात्र नागरिकांनी आपली नोंदणी करून लोकशाही हक्क बजावणे आवश्यक आहे. या प्रक्रियेस जनजागृतीसाठी सर्व पक्षांनी सक्रीय सहभाग द्यावा.’ बैठकीदरम्यान सर्व राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनी पारदर्शक, सुसूत्र व शांततेपूर्ण निवडणूक प्रक्रियेसाठी प्रशासनास सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.