Tag: प्रतिभा धानोरकर

  • Pratibha Dhanorkar vs railway food policy । 🧾 फक्त ४ प्रकरणांवर दंड? धानोरकर म्हणतात – शेकडो प्रवासी लुटले जातात रोज!

    Pratibha Dhanorkar vs railway food policy

    Pratibha Dhanorkar vs railway food policy : चंद्रपूर: बल्लारशाह रेल्वे स्थानकावर खाद्यपदार्थांची छापील किमतीपेक्षा जास्त दराने विक्री होत असल्याचा मुद्दा खासदार प्रतिभा धानोरकर यांनी लोकसभेत उपस्थित केला. यावर रेल्वे मंत्रालयाने दिलेले उत्तर प्रवाशांची दिशाभूल करणारे आणि वास्तवापासून दूर असल्याचे खासदार धानोरकर यांनी म्हटले आहे. त्यांनी या गंभीर समस्येकडे अधिक गांभीर्याने पाहण्याचे आवाहन सरकारला केले आहे. overpricing of food at Ballarshah railway station

    चंद्रपूर जिल्हा प्रशासनाने केली इरई धरणातील पाण्याच्या पातळीची पाहणी

    खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या प्रश्नांना उत्तर देताना रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव (Railway Minister Ashwini Vaishnav) यांनी सांगितले की, रेल्वे स्थानकांवर मंजूर दरानुसार उच्च दर्जाचे आणि आरोग्यदायी अन्न उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न सुरू आहे. जास्त किंमत आकारल्याच्या 4 प्रकरणांमध्ये 35,500 रुपयांचा दंड आकारण्यात आल्याचेही त्यांनी नमूद केले. तसेच, FSSAI मंजूर वस्तू विकल्या जात असून, नियमित तपासणी केली जात असल्याचेही मंत्र्यांनी सांगितले.

    रेल्वे मंत्र्याचे कागदी घोडे

    मंत्र्यांच्या या उत्तरावर तीव्र आक्षेप नोंदवताना खासदार धानोरकर म्हणाल्या की, “रेल्वे मंत्रालय केवळ कागदी घोडे नाचवत आहे.” फक्त 4 प्रकरणांवर कारवाई करणे ही ‘हिमनगाची फक्त एक टीप’ आहे, प्रत्यक्षात शेकडो प्रवाशांना दररोज वाढीव दराने खाद्यपदार्थ खरेदी करावे लागतात. ‘नियमित आणि आकस्मिक तपासणी’ केवळ कागदावरच असून, ‘रेलमदद’ सारख्या तक्रार यंत्रणा कुचकामी असल्याचे त्यांनी म्हटले. बिलिंग, डिजिटल पेमेंट आणि आरपीएफ मोहिम हे केवळ दिखाव्याचे उपाय असून, प्रवाशांना अजूनही शुद्ध आणि परवडणारे भोजन मिळत नसल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले.

    खासदार प्रतिभा धानोरकर यांनी केवळ दंडात्मक कारवाई पुरेशी नसून, प्रभावी अंमलबजावणी आणि जबाबदार अधिकाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. प्रवाशांच्या आरोग्याशी आणि हक्काशी कोणतीही तडजोड खपवून घेतली जाणार नाही, असा इशारा त्यांनी दिला. या गंभीर आरोपांवर रेल्वे मंत्रालय कोणती पुढील पावले उचलते, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

  • Amrit Bharat Station Chandrapur news । रेल्वे केवळ प्रवासाचे नव्हे तर विकासाचेही साधन –  खासदार प्रतिभाताई धानोरकर

    Amrit Bharat Station Chandrapur news

    Amrit Bharat Station Chandrapur news : चंद्रपूर : अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत चंद्रपूर जिल्ह्यातील चांदाफोर्ट अमृत स्टेशनचे लोकार्पण आज देशाचे माननीय पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांच्या हस्ते व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून, खासदार प्रतिभाताई धानोरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत थाटामाटात संपन्न झाले. Chandafort station inauguration Narendra Modi

    चंद्रपुरात घरकुल धारकांना मोफत रेती वाटप सुरु

    आधुनिक सुविधांनी सज्ज असलेले हे स्टेशन चंद्रपूरच्या प्रगतीचा नवा अध्याय आहे. नागरिकांच्या सुरक्षित व सुलभ प्रवासासाठी उभारलेले हे अत्याधुनिक स्थानक चंद्रपूरकरांच्या स्वप्नांची पूर्ती करेल, यात शंका नाही. रेल्वे केवळ प्रवासाचे माध्यम नसून, हा जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाचा दुवा आहे, आणि हा दुवा आम्ही अधिक मजबूत करण्यासाठी कटिबद्ध आहोत असे मत खासदार प्रतिभाताई धानोरकर यांनी यावेळी व्यक्त केले. 

    या कार्यक्रमाला महाराष्ट्राचे महामहीम राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रिय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव, केंद्रिय विधी व न्याय मंत्री अर्जुन राम मेघवाल हे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उपस्थित होते. तसेच चंद्रपूरचे आमदार किशोर जोरगेवार, बिलासपूरचे सीई बी.व्ही.एस. सुब्रमण्यम, नागपूरचे सिनिअर डीएम एस. एन नामदेव, स्वातंत्र्य सेनानी डॉ. शेषराव इंगोले, काँग्रेस शहर अध्यक्ष रामू तिवारी, काँग्रेस अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष सोहेल शेख, काँग्रेस महिला जिल्हाध्यक्ष चंदाताई वैरागडे, कॉग्रेस ओबीसी जिल्हाध्यक्ष राहुल चौधरी, माजी नगरसेवक गोपाल अमृतकर, इंटक युवक काँग्रेस जिलाध्यक्ष प्रशांत भारती,  माजी नगरसेवक प्रसन्न शिरवार यांची उपस्थिती होती. 

    mp pratibha dhanorkar

    चांदाफोर्ट स्टेशनच्या पुनर्विकासातील पहिल्या टप्पयात एकूण अंदाजित खर्च

    १९.३ कोटी रुपयाची कामे करण्यात आली आहेत. यामध्ये नवीन स्टेशन इमारत: ३९६ चौ.मी. (एकूण क्षेत्र – ७९२ चौ.मी.), फिरणारे क्षेत्र ६०५० चौ.मी. (एकूण – ६९९५ चौ.मी.), प्लॅटफॉर्म निवारा ९६० चौ.मी. (एकूण – १८७९ चौ.मी.), प्लॅटफॉर्म पृष्ठभाग २००० चौ.मी. (एकूण – २५०० चौ.मी.), फूट ओव्हर ब्रिज (एफओबी) १२ मीटर रुंदीचा नवीन ब्रिज, सुगम प्रवेशासाठी नवीन बांधलेले रॅम्प आणि स्पर्शिक मार्ग (टॅक्टाइल पाथ) या अद्ययावत सुविधांमुळे चंद्रपूरकरांना अधिक सुरक्षित, सुलभ व आरामदायक रेल्वे प्रवासाचा अनुभव मिळेल. तसेच, जिल्ह्याच्या सामाजिक आणि आर्थिक विकासाला यातून बळ मिळेल, असा विश्वास खासदार प्रतिभाताई धानोरकर यांनी व्यक्त केला. 

  • Mp Pratibha Dhanorkar Janata Darbar highlights । जिवती तालुक्यातील प्रश्नांवर धडक कार्यवाही – जनता दरबारातील ठळक घडामोडी

    Mp Pratibha Dhanorkar Janata Darbar highlights

    Mp Pratibha Dhanorkar Janata Darbar highlights : चंद्रपूर: जिवती तालुक्यातील नागरिकांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी खासदार प्रतिभाताई धानोरकर यांनी आज, बुधवार दिनांक १४ मे २०२५ रोजी, पंचायत समिती जिवती येथे जनता दरबाराचे आयोजन केले होते. या दरबारात नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवत आपल्या समस्या मांडल्या आणि खासदार प्रतिभाताई धानोरकर यांनी अनेक समस्यांवर तातडीने तोडगा काढल्याने नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले. Jiwati taluka public meeting updates

    चंद्रपूर जिल्हा पुन्हा हादरला, ४ दिवसात ६ महिलांची वाघाने केली शिकार

    नागरिकांच्या समस्यांवर योग्य कारवाई करा

    सकाळी ११:०० वाजता सुरू झालेल्या या जनता दरबारात रस्ते, वनहक्क, अनियमित वीजपुरवठा, आरोग्य सेवा यांसारख्या विविध विषयांवर नागरिकांनी आपल्या समस्या मांडल्या. खासदार प्रतिभाताई धानोरकर यांनी प्रत्येक तक्रारदाराचे म्हणणे लक्षपूर्वक ऐकून घेतले आणि संबंधित अधिकाऱ्यांशी त्वरित संपर्क साधून योग्य कार्यवाही करण्याचे निर्देश दिले.

    विशेष बाब म्हणजे, अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या काही समस्यांवर जागेवरच तोडगा काढण्यात खासदार धानोरकर यांना यश आले. यामध्ये रस्ते दुरुस्तीच्या मागणीसाठी आलेल्या नागरिकांना सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांशी बोलून त्वरित कार्यवाही करण्याचे आश्वासन मिळाले. तसेच, वीजपुरवठ्यातील अडचणींबाबत महावितरणच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून तात्काळ दुरुस्ती करण्याचे आदेश देण्यात आले. आरोग्य सेवेतील समस्यांवरही तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश आरोग्य विभागाला देण्यात आले. public grievance redressal camp in rural areas

    याव्यतिरिक्त, पाणीटंचाई आणि आरोग्य तसेच महावितरण (MSEDCL) संबंधित समस्यांवर जिल्हाधिकाऱ्यांसोबत स्वतंत्र बैठक घेणार असल्याचे खासदार प्रतिभाताई धानोरकर यांनी सांगितले. तेलंगणा आणि महाराष्ट्राच्या सीमेवरील जिवती तालुक्यातील १२ गावांच्या सीमा प्रश्नावर केंद्र सरकारकडे पाठपुरावा करण्याचे आश्वासनही त्यांनी दिले.

    jiwati taluka public meeting updates
    जनता दरबारात नागरिकांची भव्य उपस्थिती

    या महत्त्वपूर्ण जनता दरबारात काँग्रेस जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार सुभाष धोटे, उपविभागीय अधिकारी माने, तहसीलदार रुपाली मोगरकर, माजी नगराध्यक्ष अरुण धोटे, माजी उपसभापती सुग्रीव गोतावडे, तालुका अध्यक्ष गणपत काळे, माजी नगराध्यक्ष डॉ. अंकुश गोतावळे, नंदाताई मुसने, आरिफ शेख, लक्ष्मीनारायण ढोलके, डॉ. चिंचोळे या मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती. Pratibha Dhanorkar public meeting 2025

    या यशस्वी जनता दरबाराबद्दल बोलताना खासदार प्रतिभाताई धानोरकर म्हणाल्या, “आज नागरिकांच्या समस्या ऐकून त्यावर तातडीने कार्यवाही करता आल्याचा मला खूप आनंद आहे. जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी मी नेहमी तत्पर राहीन.”

    या जनता दरबारात स्थानिक प्रशासनातील उच्च अधिकारी, पंचायत समिती सदस्य, विविध गावांतील सरपंच आणि मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. नागरिकांनी खासदार प्रतिभाताई धानोरकर यांच्या या थेट संवाद उपक्रमाचे कौतुक केले आणि आपल्या समस्या मांडण्यासाठी मिळालेल्या संधीबद्दल समाधान व्यक्त केले.