Tag: प्रतिबंधित तंबाखू

  • tobacco smuggling news update । बाबुपेठ येथील युवकाकडून लाखोंचा तंबाखू जप्त

    tobacco smuggling news update

    tobacco smuggling news update : राजुरा – ५ जून रोजी राजुरा पोलीस स्टेशनच्या हद्दीत पोलिसांनी ५ लक्ष ९९ हजारांचा सुगंधित तंबाखू सहित एकाला अटक करण्यात आली आहे. याबाबत राजुरा पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली होती. police tobacco seizure

    आज ५ जून रोजी राजुरा पोलिसांनी संविधान चौकात नाकेबंदी केली होती, यादरम्यान ऑटो क्रमांक MH३४ D ६३३९ ला थांबवित त्याची झडती घेतली असता त्यामध्ये प्रतिबंधित सुगंधित तंबाखू ईगल हुक्का, होला हुक्का, विमल पान मसाला असा एकूण ५ लक्ष रुपयांच्या मालासहित गुन्ह्यात वापरलेला ऑटो एकूण किंमत ५ लक्ष ९९ हजार ३२६ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

    महिलांनो सावध व्हा- भद्रावतीमध्ये चैन स्नॅचिंग ची घटना

    यावेळी पोलिसांनी ऑटो चालक अविनाश आबाजी शेंडे राहणार बाबुपेठ चंद्रपूर याला ताब्यात घेतले आहे.आरोपीविरुद्ध अन्न व सुरक्षा मानके कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास राजुरा पोलीस करीत आहे.

    प्रशासनाचे दुर्लक्ष

    वर्ष २०१२ पासून राज्यात प्रतिबंधित असणारा सुगंधित तंबाखू चंद्रपूर जिल्ह्यात सर्रासपणे विकल्या जात आहे, चंद्रपूर शहरातील प्रत्येक चौकात खर्रा यामध्ये हा सुगंधित तंबाखू मिक्स करण्यात येतो. मात्र अन्न व औषध प्रशासन या माफियांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचे चित्र जिल्ह्यात आहे.

    सदरची यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक रीना जनबंधू, उपविभागीय पोलीस अधिकारी सुधाकर यादव यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक सुमित परतेकी यांच्या नेतृत्वात पोउपनि भीष्मराज सोरते, पोलीस कर्मचारी पांडुरंग हाके, विक्की निवार्ण, प्रभाकर कोराम, जुमनाके, महेश बोलगोडवार,अविनाश बांबोळे, शफिक शेख, आनंद मोरे व शरद राठोड यांनी केली.

  • Chandrapur police raid on banned tobacco । 🕵️‍♂️ तंबाखू माफियांचा पर्दाफाश – अन्न व औषध प्रशासन झोपेत, पोलिसांचं ‘एक्शन मोड’!

    Chandrapur police raid on banned tobacco

    Chandrapur police raid on banned tobacco : चंद्रपूर – राज्यात प्रतिबंधित असलेला सुगंधित तंबाखूचा व्यापार चंद्रपूर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात जोमात सुरु आहे, मात्र या अवैध व्यापारावर अन्न व औषध प्रशासन विभाग पूर्णतः अयशस्वी ठरलं आहे. सध्यातरी पोलीस यंत्रणा यावर कारवाई मोहीम राबवित असताना दिसत आहे. flavored tobacco

    ३ महिलांची शिकार करणारी वाघीण जेरबंद

    चंद्रपूर शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील जुनोना चौकात किराणा व्यवसायी ने आपल्या दुकानात प्रतिबंधित तंबाखू ठेवला आहे अशी गोपनीय माहिती पोलीस उपनिरीक्षक बच्छीरे यांना ९ मे रोजी मिळाली होती. माहितीच्या आधारे शहर पोलिसांनी धाड मारली असता यामध्ये प्रतिबंधित सुगंधित तंबाखूचा साठा आढळला.

    पुरवठादार वसीम झिमरी

    या कारवाईत शहर पोलिसांनी ईगल हुक्का शिशा तंबाखू असा एकूण २७ हजार ८४० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला, किराणा दुकान व्यवसायी ३२ वर्षीय नितेश मुकुंदा वाकडेची चौकशी केली असता त्याने हा माल तंबाखू पुरवठादार वसीम झिमरी यांचेकडून आणला असल्याचे सांगितले पोलिसांनी दोघांवर अन्न व सुरक्षा मानके कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल केले. hookah tobacco seized in Chandrapur

    सदरची कारवाई पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक रीना जनबंधू, उपविभागीय पोलीस अधिकारी सुधाकर यादव यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक प्रभावती एकुरके यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक बच्छीरे व गुन्हे शोध पथकाने केली.