Tag: प्रकल्पग्रस्त शेतकरी

  • compensation increase for coal mine farmers । ✅ “OBC आयोग पुढे सरसावलं! शेतकऱ्यांना न्याय मिळणार?”

    compensation increase for coal mine farmers

    compensation increase for coal mine farmers : चंद्रपूर : वेकोलि बल्लारपूर क्षेत्र अंतर्गत, बल्लारपूर नॉर्थ वेस्ट खुली खदान प्रकल्पातील मागास व अन्य प्रवर्गातील शेतकऱ्यांनी दि. 27 जुलै रोजी राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर यांची प्रत्यक्ष भेट घेवून या प्रकल्पासाठी मिळणारा प्रति एकर आर्थिक मोबदल्यामध्ये दरवाढ मिळवून देण्याविषयी चर्चा केली यावेळी भाजयुमोचे प्रदेश उपाध्यक्ष रघुवीर अहीर यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.

    जिल्हा भाजपा सचिव मधुकर नरड, पूर्व जिल्हाध्यक्ष किसान आघाडी राजु घरोटे, कोलगाव उपसरपंच पुरूषोत्तम लांडे यांचे नेतृत्वात शेकडो शेतकऱ्यांनी हंसराज अहीर यांना या आशयाचे निवेदन सादर केले. आर/आर पॉलिसी नुसार मिळणाऱ्या नोकरी सोबतच प्रति एकरी दरवाढ देण्याविषयी कोल इंडियाने तत्वतः मान्य केले असल्याने ही दरवाढ लवकरात लवकर मिळवून देवू असा निर्धार हंसराज अहीर यांनी उपस्थित शेतकऱ्यांसमोर व्यक्त केला.

    युवकाला अमानुष मारहाण, चंद्रपूर पोलिसांवर गंभीर आरोप

    अहीर यांनी प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना आश्वासित केले की, नोकरी व शेतीला दरवृध्दी प्राप्त करून घेणे हा आपला न्याय अधिकार आहे. सन 2012 मध्ये कोल इंडिया व राज्य शासनाच्या धोरणानुसार कोरडवाहू प्रति एकर जमिनीस रू. 8 लाख व सिंचीत प्रति एकर जमिनीकरिता रू. 10 लाख दरवाढ लागु करण्यात आली होती. farmer land compensation policy Maharashtra

    दरवाढ होणार

    परंतु, जमिनीचे विद्यमान बाजारमुल्य आणि आजचे सरकारी दराच्या तुलनेत वेकोलिद्वारा आजघडीला मिळणारे हे दर अत्यल्प असल्याची भुमिका कोल इंडियाचे अध्यक्ष श्री. पी. मल्लिकार्जूना प्रसाद यांच्या तसेच वेकोलि मुख्यालय, नागपुर यांचे वरिष्ठा प्रबंधनाच्या उपस्थितीत दि. 10 जुलै 2025 रोजी कोलकाता येथे झालेल्या बैठकीत राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाद्वारे दरवाढीचा हा मुद्दा आग्रही स्वरूपात मांडण्यात आला असल्याचे हंसराज अहीर यांनी उपस्थित शेतकऱ्यांना सांगितले. सदर दरवृध्दीबाबत कोल इंडिया प्रबंधनाने सकारात्मक भुमिका स्विकारत ओबीसी आयोगाद्वारे मांडण्यात आलेली भुमिका व्यावहारीक असल्याने ही मागणी तत्वतः मान्य केली असल्याचेही अहीर यांनी यावेळी सांगितले. farm land rate revision coal India project

    Somayya institute of technology

    हा निर्णय कोल इंडियाद्वारे लवकरात लवकर जाहीर व्हावा यासाठी आपण वारंवार पाठपुरावा करीत असल्याचे तसेच ज्या प्रकल्पांचे दर निश्चितीचे करारनामे झालेले नाही त्या प्रकल्पांना ही होणारी दरवाढ लागू राहण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे अहीर यांनी सांगितले. दर निश्चितीच्या करारनाम्यापुर्वी प्रकल्प धारकांनी द्यावयाच्या कौटूंबिक शपथपत्रात असलेला वर्ष 2012 च्या शासन धोरणानुसार, दर मान्य असल्याचा अनावश्यक उल्लेख वगळण्यासाठी वेकोलि प्रबंधनास सुचना व पाठपुरावा करणार असल्याचे सुध्दा अहीर यांनी सांगितले.

    शेकडो शेतकऱ्यांच्या जिवीताला निर्माण होणारा संभाव्य धोका लक्षात घेता, कोलगाव येथील उर्वरित 337 हेक्टर जमीन अधिग्रहण व गावाचे पुनर्वसन याविषयासाठी आपण शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहीलात तसेच या दरवृध्दीसाठी आमच्या पाठीशी उभे राहावे असा आशावाद उपस्थित शेतकऱ्यांनी अहीर यांचेशी संवाद साधतांना व्यक्त केला.

  • coal mining land acquisition dispute । चंद्रपुरात कोळसा प्रकल्पग्रस्तांचा एल्गार!

    coal mining land acquisition dispute

    coal mining land acquisition dispute : चंद्रपूर : भद्रावती तालुक्यातील बरांज (मो.) येथील कर्नाटक पॉवर कार्पोरेशन प्रा.लि. ओपन कास्ट माईन्स प्रकल्पग्रस्त शेतकरी व कामगारांवर होणाऱ्या अन्याया विरूध्द तसेच अरोबिंदो रियॉलिटी इन्फ्रास्ट्रक्चर प्रा.लिच्या टाकळी-जेना-बेलोरा कोळसा खाण प्रबंधनाकडून पुनर्वसन, भुमी अधिग्रहण व मोबदल्या विषयीचा प्रश्न प्रलंबित असतांना कोळसा उत्खननास परवानगी दिल्याच्या विरोधात जिल्हाधिकारी चंद्रपूर यांचे कार्यालयासमोर सुरू असलेल्या मागासवर्गीय व अन्य प्रकल्पग्रस्तांच्या न्याय मागण्यांसाठी दि. 15 जुलै 2025 रोजी पासून सुरू झालेल्या धरणे आंदोलनास भारतीय जनता पार्टी जिल्हा महानगरच्या पदाधिकाऱ्यांनी भेट देत या आंदोलनास पाठिंबा जाहिर केला व प्रकल्पग्रस्तांना त्वरीत न्याय देण्याची मागणी केली. aravindo reality coal project protest 2025

    सुधाकर अडबाले यांचा शिक्षकांच्या पेन्शन हक्कासाठी आक्रमक पवित्रा!

    भद्रावती तालुका सरपंच संघटनेचे अध्यक्ष प्रदीप महाकुलकर, रामा मत्ते, गोविंदा बिंजवे, विशाल दुधे, पांडुरंग सातपुते, संजय रॉय, दत्तात्रय गुंडावार, जाकिर शेख यांचेसह प्रकल्पग्रस्त शेतकरी, कामगार धरणे देत आहेत. सदर धरणे आंदोलन कार्यक्रम मंडपास भाजयुमोचे प्रदेश उपाध्यक्ष रघुवीर अहीर,

    भाजपा महानगर जिल्हाध्यक्ष सुभाष कासनगोट्टूवार, भाजप नेते प्रकाश देवतळे, नामदेव डाहुले व भद्रावती भाजपा तालुकाध्यक्ष अॅड. सुनिल नामोजवार यांनी दोन्ही कंपन्यांच्या कोळसा खाण प्रकल्पामुळे प्रभावित झालेल्या व वर्षानुवर्षे अन्याय सहन करणाऱ्या प्रकल्पग्रस्त शेतकरी, कामगार यांच्या न्याय मागण्यांची प्रशासनाने दखल घेवून न्याय द्यावा अशी भाषणाद्वारे मागणी केली.

    हंसराज अहिर प्रकल्पग्रस्तांच्या पाठीशी

    राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष तथा पूर्व केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी संबंधित प्रकल्पग्रस्तांचा हा विषय उचलून धरला असून या संबंधात आयोगाद्वारे सुनावणी, बैठका व चर्चा झाली आहे. मात्र, कंपनी प्रबंधन व प्रशासनाच्या ताठर भुमिकेमुळे प्रकल्पग्रस्तांवर अन्याय केला जात आहे. त्या पार्श्वभुमीवर हे धरणे आंदोलन होत असून न्याय मिळेपर्यंत संघर्षाची भुमिका घेऊ असा इशारा प्रकल्पग्रस्तांचे नेतृत्व करणाऱ्या प्रदीप महाकुलकर व अन्य पदाधिकाऱ्यांनी जिल्हा प्रशासन व दोन्ही कंपनीच्या प्रबंधनास दिला आहे. hansraj ahir on project affected people rights