Tag: पूरग्रस्त भाग

  • sudhir mungantiwar flood relief visit । घर वाहून गेले… पण मदतीचा हात आला! मुनगंटीवारांचा दौरा

    sudhir mungantiwar flood relief visit

    sudhir mungantiwar flood relief visit : चंद्रपूर : राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यसाय मंत्री, आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी पोंभूर्णा तालुक्यातील जुनगाव व लगतच्या गावांमध्ये वैनगंगा नदीच्या पुरामुळे झालेल्या नुकसानीची गंभीर दखल घेत मदतीसाठी तातडीने पुढाकार घेतला आहे. या पार्श्वभूमीवर त्यांनी चंद्रपूर जिल्हाधिकाऱ्यांना तात्काळ पंचनामे करण्याचे निर्देश दिले आहेत.पुरामुळे अनेकांच्या घरांचे व शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, शासकीय मदत लवकरात लवकर पूरग्रस्त नागरिकांपर्यंत पोहोचावी यासाठी युद्धपातळीवर कार्यवाही करण्याच्या सूचनाही त्यांनी संबंधित विभागांना दिल्या आहेत.

    चंद्रपुरात पाणीपट्टी कराची वसुली वॉर्ड सखीच्या हातात

    आ. सुधीर मुनगंटीवार यांनी दिलेल्या निर्देशानुसार चंद्रपूर जिल्हाधिकारी आज (दि. १०) प्रत्यक्ष पोंभूर्णा तालुक्यातील जुनगाव व लगतच्या गावांमध्ये येथे भेट देऊन पुरग्रस्त भागाची पाहणी करणार आहेत.

    मदतीसाठी प्रयत्नशील

    या संकट काळात नुकसानग्रस्त नागरिकांना दिलासा देणे हे आपले नैतिक कर्तव्य असल्याचे सांगत, आ. मुनगंटीवार यांनी भाजप पदाधिकाऱ्यांना उद्या प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन नागरिकांना सर्वतोपरी सहकार्य करण्याच्या सूचना दिल्या आहेत. प्रशासनाशी समन्वय ठेवून मदतीसाठी प्रयत्नशील राहण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले. flood damage assessment instructions by Sudhir Mungantiwar

    दरम्यान, चालू पावसाळी अधिवेशन संपल्यानंतर आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार स्वतः जुनगाव येथे भेट देऊन पुरग्रस्त भागाची सविस्तर पाहणी करणार असून, नागरिकांच्या अडचणी समजून घेत त्या सोडवण्यासाठी संबंधित यंत्रणांकडून ठोस निर्णय घेतले जातील, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.

  • chandrapur news today : पूरग्रस्त भागात शिवसेना जिल्हाप्रमुख गिर्हे यांची मदत

    chandrapur news today : पूरग्रस्त भागात शिवसेना जिल्हाप्रमुख गिर्हे यांची मदत

    chandrapur news today : चंद्रपूर :- मागील आठ दिवसांपासून जिल्ह्यात संततधार पाऊस सुरू आहे. अतिवृष्टीमुळे शेत पिकांचे फार मोठे नुकसान झाले आहेत. अश्यातच अतिवृष्टीमुळे चिचपल्ली गावानजीक असलेले तलाव फुटल्याने चिचपल्ली व पिंपळखुट गावातील घराघरात पाणी शिरल्याने घरातील सामानाचे फार मोठे नुकसान झाले.तीन दिवस घरात पाणी घुसून असल्याने जनजीवन विस्कळित झाले होते.

    अवश्य वाचा : चंद्रपूर जिल्ह्यात घडली थरारक घटना

    Chandrapur news today अनाज,पाणी, कपडे इतकेच नव्हे अनेकांचे शैक्षणिक दस्तऐवज सुद्धा पुरात वाहून गेले.संकटाच्या घडीत पुरग्रस्तांच्या दुखात साथ देण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे चे जिल्हाप्रमुख संदिप गिऱ्हे यांनी माजी मुख्यमंत्री उध्दव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त दि.२७ जुलै शनिवारला पुरग्रस्त गाव चिचपल्ली व पिंपळखुट येथील नागरिकांना जीवन उपयोगी वस्तूंची किट व कुटुंबातील महिलेसाठी एक साडी भेट म्हणून देत त्यांच्या दुखात सहभागी झाले.

    अवश्य वाचा : चंद्रपूरचे जिल्हाधिकारी व सीईओ उतरले चिखलात

    अतिवृष्टीमुळे चिचपल्ली गावानजीकचा तलाव फुटला यात चिचपल्ली येथील ३०० तर पिंपळखुट येथील ११० घरात पाणी शिरले.यात घरातील संसार उपयोगी सामानाचे तसेच धान्य,शैक्षणिक दस्तऐवज पुरात वाहून गेले.काहींचे बकऱ्या व शेती उपयोगी वस्तूही वाहून गेले.यात फार मोठे नुकसान झाले.या संकटाच्या वेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे चे जिल्हाप्रमुख संदिप गिऱ्हे यांनी चिचपल्ली आणि पिंपळखुट येथील पूरपीडित कुटुंबीयांसोबत मोठ्या आस्थेने विचारपूस केली व दुःखात मी सोबत आहे असा विश्वास दिला.

    चिचपल्ली व पिंपळखुट येथील पूरपीडित कुटुंबीयांना जीवन उपयोगी वस्तूंची किट व महिलांसाठी साडी भेट म्हणून दिले.पुरग्रस्तांच्या मदतीला धावून येत आपल्यातला माणूस असल्याचा त्यांनी परिचय करून दिला.

    अवश्य वाचा : चंद्रपूर जिल्ह्यात पोलिसांचा धाक उरला नाही

    यावेळी उपजिल्हाप्रमुख सिकी यादव,शालिक फाले, विधानसभा प्रमुख प्रमोद पाटील,मधू मेश्राम,युवसेना जिल्हाप्रमुख विक्रांत सहारे,महिला आघाडीचे जिल्हा संघटीका कल्पना गारगोटे,विनय धोबे,कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती आशिष कावटवार,राहुल विरुटकर, मा.नगरसेवक सरफराज शेख, नागाळाचे उपसरपंच विनोद पिलरवार, पिंपळखुटचे सरपंच विनोद मेश्राम, बल्लरपूरचे माजी नगरसेवक अमित पाझारे,सागर राऊत,बब्बू पाठक,बाबा साहू,राहुल भोयर,राजू ठाकरे,सूरज घोगे, हेमराज बावने,प्रणित अहीरकर, सिकंदर शेख,गिरीश कटारे,वसीम भाई,सिकंदर शेख.शाबाज शेख, इलाजभाई, व आदी पदाधिकारी उपस्थित होते.

  • चंद्रपुरातील नागरिकांना महानगरपालिकेने केले महत्वाचे आवाहन

    News34 chandrapur

    चंद्रपूर  –  चंद्रपूर महानगरपालिकेच्या वतीने अनधिकृत ले आऊट वरील बांधकामावर कारवाई करण्यात आली असुन अनधिकृत रीतीने उभे करण्यात आलेले मार्कींगचे सिमेंट खांब तोडण्याची कारवाई मनपामार्फत करण्यात आली आहे.

     

    ठक्कर कॉलनी येथे ईरई नदी पात्राजवळ मौजा गोविंदपुर रीठ सर्वे नंबर ७३/१ असलेल्या भूखंडावर अनधिकृत ले आउट टाकुन प्लॉट विक्रीचा व्यवसाय सुरू केला असल्याची माहीती मनपा पथकास मिळाली होती. त्यानुसार पाहणी केली असता सदर भूखंड हा पूरग्रस्त भागात असल्याने यावर कुठल्याही स्वरूपाची खरेदी विक्री करता येत नाही. यासंबंधी महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियमाच्या कलम ५२अन्वये अनधिकृत बांधकाम करणाऱ्यास नोटीस देण्यात आली होती. मात्र नोटीस स्वीकारण्यास सदर बांधकामदाराने नकार दर्शविला होता त्यामुळे सदर कारवाई करण्यात आलेली आहे. सदर ले आऊटवर प्लॉटची विक्री करण्यास मार्कींग सुद्धा करण्यात आली होती.

     

    चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की  केवळ नोटरीच्या आधारे कुठल्याही स्वरूपाची खरेदी विक्रीची कारवाई करू नये भविष्यात यासंबंधी कुठल्याही संशय उद्भवल्यास याची जबाबदारी पुर्णपणे  विक्री करून देणार व विक्री करून घेणार यांची राहील. दुय्यम निबंधक कार्यालयातून नोंदणी होत असलेल्या भूखंडाचीच खरेदी अथवा विक्री करण्याचे आवाहन चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे करण्यात येत आहे.

    सदर कारवाई आयुक्त विपीन पालीवाल यांच्या मार्गदर्शनात सहायक आयुक्त सचिन माकोडे,सहायक नगररचनाकार सारिका शिरभाते, अतिक्रमण निर्मूलन अधिकारी संतोष गर्गेलवार तसेच अतिक्रमण पथकाद्वारे करण्यात आली. शहरात जिथेही अनधिकृत ले आऊट आहेत तिथे कारवाई सुरु राहणार असल्याने अनधिकृत ले आऊट वर कुठल्याही स्वरूपाचे बांधकाम आढळल्यास त्यावर तात्काळ कारवाई केली जाणार आहे. तसेच नागरिकांना शहरातील अनधिकृत ले आउट संबंधी माहिती असल्यास ती मनपास देण्याचे आवाहन मनपामार्फत करण्यात येत आहे.