Tag: पालकमंत्री अशोक उईके

  • Chimur Kranti 16 August 1942 । चिमूर क्रांती दिन 16 ऑगस्ट : 83 वर्षांपूर्वीची धाडसी क्रांती, पालकमंत्र्यांकडून शहिदांना अभिवादन

    Chimur Kranti 16 August 1942

    Chimur Kranti 16 August 1942 : चंद्रपूर, दि. 16 : 16 ऑगस्ट 1942 रोजी झालेल्या चिमूर क्रांती दिनानिमित्त आज राज्याचे आदिवासी विकास विभागाचे मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. अशोक उईके यांनी शहिदांना श्रध्दांजली वाहिली. यावेळी त्यांनी चिमूर येथील हुतात्मा स्मारक आणि किल्ला परिसरातील शहीद स्मारक तसेच राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले आणि शहीद बालाजी रायपूरकर यांच्या पुतळ्याला पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले. यावेळी चिमूर विधानसभा क्षेत्राचे आमदार कीर्तिकुमार उर्फ बंटी भांगडीया, माजी खासदार अशोक नेते उपस्थित होते.

    यावेळी प्रभारी जिल्हाधिकारी डॉ. नितीन व्यवहारे, मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह, जिल्हा पोलिस अधिक्षक मुम्मका सुदर्शन, चिमूरचे अतिरिक्त जिल्हाधिकारी संतोष थिटे, उपविभागीय अधिकारी किशोर घाडगे, तहसीलदार श्रीधर माने, नगर परिषद मुख्याधिकारी अर्चना वंजारी यांनी सुध्दा शहीद स्मारकाला अभिवादन केले.

    पहिला पगार शाळेला, इंजिनिअर हर्षिताचे होत आहे सर्वत्र कौतुक

    त्यानंतर नगर परिषदेच्या सभागृहात पार पडलेल्या आढावा बैठकीत पालकमंत्री डॉ. उईके म्हणाले, 16 ऑगस्ट 1942 रोजीचा चिमूर क्रांतीचा लढा जगाच्या इतिहासात अजरामर ठरला आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वतीने येथे शहिदांना श्रध्दांजली अर्पण करून सर्व शहिदांसमोर आपण नतमस्तक झालो. बंटीभाऊ सारखा कर्तव्यदक्ष आमदार या क्षेत्राला लाभला आहे. चिमूर विधानसभा क्षेत्राच्या 100 टक्के मागण्या पूर्ण करण्यात येईल. चिमूरचा कृती विकास आराखडा त्वरीत मंजूर करून निधी उपलब्ध करून देऊ. historic Chimur revolt part of Quit India Movement

    मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांचे विशेष लक्ष चिमूरकडे आहे. त्यामुळे चिमुरच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही. चिमूर येथे भगवान बिरसा मुंडा सामाजिक सभागृहासाठी त्वरीत जागा उपलब्ध करून द्या, पाहिजे तेवढा निधी या सभागृहासाठी देण्यात येईल. तसेच मुक्ताई पर्यटन क्षेत्राचा विकास करण्यासाठीसुध्दा निधी दिला जाईल, असे पालकमंत्री डॉ. उईके यांनी सांगितले.

    आमदार कीर्तिकुमार भांगडिया म्हणाले, 16 ऑगस्ट 1942 रोजी सर्वात पहिला तिरंगा चिमूरमध्ये फडकला. चिमूरच्या पुर्वजांनी आपल्या गावचा इतिहास लिहिला आहे. आपल्या शहिदांनी देशासाठी दिलेल्या बलिदानाची आजच्या तरुणांना जाणीव व्हावी, यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. स्वातंत्र्यासाठी अनेक लढे, आंदोलने उभारण्यात आले. त्यामुळे हे स्वातंत्र टिकविणे आपली सर्वांची जबाबदारी आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चिमूरला भरभरून दिले आहे. येथे अतिरिक्त जिल्हाधिकारी कार्यालय आणले आहे. जेव्हा राज्यात नवीन जिल्ह्यांची निर्मिती होईल, तेव्हा सर्वात प्रथम चिमूर जिल्हा तयार करण्याचा शब्द मुख्यमंत्र्यांनी दिला आहे. Chimur three-day independence August 1942

    पुढे ते म्हणाले, चिमूर विधानसभा क्षेत्रात नगर परिषदेच्या इमारती, नागभीड येथील उपजिल्हा रुग्णालय बांधण्यात आले आहे. तसेच कानपा-चिमूर-वरोरा रेल्वेलाईन मंजूर झाली असून नगरोत्थान मधून चिमूर करीता 125 कोटी, नागभीड करीता 70 कोटी आणि भिसी करीता 40 कोटी देण्यात आले आहेत. चिमूरच्या उर्वरीत विकास कामांसाठी जिल्हा नियोजन समितीतून निधी देण्यात यावा, अशी मागणी आमदार कीतिकुमार भांगडिया यांनी पालकमंत्र्यांकडे केली. कार्यक्रमाचे संचालन राजू देवतळे यांनी तर आभार मुख्याधिकारी अर्चना वंजारी यांनी मानले. Chimur Kranti 16 August 1942

    स्वातंत्र संग्राम सैनिकांच्या कुटुंबियांची घरी जाऊन भेट

    : यावेळी पालकमंत्री डॉ. अशोक उईके, आमदार किर्तीकुमार भांगडिया आणि माजी खासदार अशोक नेते यांच्यासह वरिष्ठ अधिका-यांनी स्वातंत्र संग्राम सैनिकांच्या घरी भेट दिली. चिमूर येथील डोंगरवार चौकातील कमलाबाई माधव कटाने (वय 85) आणि सुलोचनाबाई महादेव मिसार (वय 83) या स्वातंत्र संग्राम सैनिक कुटुंबातील सदस्यांची पालकमंत्र्यांनी आस्थेने विचारपूस करून सन्मान केला. 

    हुतात्मा स्मारक ते किल्ला परिसर पदयात्रा : 

    मुख्य मार्गावरील हुतात्मा स्मारक येथे स्मारकाला अभिवादन केल्यानंतर दीड ते दोन किलोमीटरवर असलेल्या किल्ला परिसरापर्यंत पदयात्रा काढण्यात आली. ‘भारत माता की जय’, ‘वंदे मातरम्’, ‘राष्ट्रसंत तुकडोजी महाराज की जय’, ‘शहीद बालाजी रायपुरकर अमर रहे’, ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर की जय’ अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला.

  • quality education initiative 10 crore fund । १० कोटींचा निधी! बाबुपेठ शाळेला गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी नवा आयाम 🚀

    quality education initiative 10 crore fund

    quality education initiative 10 crore fund : चंद्रपूर, दि. 16 : शहरातील बाबुपेठ येथे चंद्रपूर महानगर पालिकेतर्फे चालविण्यात येणा-या पी.एम. श्री. सावित्रीबाई फुले उच्च माध्य. व प्राथ. शाळेत विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्वक शिक्षण मिळत असल्याने येथे शाळा प्रवेशाचा ओढा दिवसेंदिवस वाढतच आहे. सजग पालक आपल्या पाल्यांना या शाळेत प्रवेशित करीत असून शाळेच्या पायाभूत सुविधा आणि गुणवत्तापूर्वक शिक्षणामध्ये वाढ होण्यासाठी 10 कोटी रुपयांचा निधी दिला जाईल, अशी ग्वाही राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. अशोक उईके यांनी दिली.

    सॉफ्टवेअर इंजिनिअरने पहिला पगार दिला शाळेला

    ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत बाबुपेठ येथील पीएम श्री शाळेत आयोजित तिरंगा रॅलीमध्ये ते बोलत होते. यावेळी मंचावर आमदार किशोर जोरगेवार, प्रभारी जिल्हाधिकारी डॉ. नितीन व्यवहारे, मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह, जिल्हा पोलिस अधिक्षक मुम्मका सुदर्शन, मनपा आयुक्त विपीन पालीवाल, अतिरिक्त आयुक्त चंदन पाटील, उपायुक्त संदीप चिद्यावार, शाळेचे मुख्याध्यापक श्री. नीत आदी उपस्थित होते. Babupeth PM Smt Savitribai Phule school fund

    खनिज विकास निधीतून १० कोटी रुपये देणार

    पालकांनी विश्वास दर्शवून आपल्या पाल्यांना या शाळेत प्रवेश दिला आहे, असे सांगून पालकमंत्री डॉ. उईके म्हणाले, विद्यार्थ्यांना आणखी गुणवत्तापूर्वक शिक्षण आणि सुसंस्कृत नागरिक घडविण्याची जबाबदारी येथील शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचा-यांवर आहे. आपला विद्यार्थी कसा पुढे जााईल, त्याच्यातील सुप्त कलागुणांना कसे विकसीत करता येईल, हेच शिक्षकांचे ध्येय असायला पाहिजे. तसेच विद्यार्थ्यांच्या चेह-यावर नेहमी हास्य राहिले पाहिजे. या शाळेचा विस्तार दिवसेंदिवस वाढत असून येथे वर्गखोल्या, फर्निचर, आधुनिक लॅब, डीजीटलायझेशन, क्रीडांगण आदींसाठी खनीज विकास निधीतून 10 कोटी रुपये त्वरीत देऊ. त्यासाठी या महिन्याअखेर कृती आराखडा सादर करावा. पुढील महिन्यात प्रस्ताव मंजूर करून निधी उपलब्ध करून दिला जाईल, असेही पालकमंत्री डॉ. उईके यांनी आश्वस्त केले.

    आमदार किशोर जोरगेवार म्हणाले, बाबुपेठ परिसरात सामान्य कष्टकरी वर्गाचे वास्तव्य आहे. महानगर पालिकेच्या वतीने अतिशय सुंदर आणि गुणवत्तापूर्वक शाळा चालविली जात आहे. 1100 विद्यार्थी असलेल्या या शाळेसाठी 36 वर्गखोल्यांची आवश्यकता आहे. मात्र सद्यस्थितीत 20 वर्गखोल्या असून शाळेसाठी निधी उपलब्ध करून द्यावा, तसेच मनपाच्या वतीने चालविण्यात येणा-या दोन शाळांचासुध्दा याच धर्तीवर विकास करावा, अशी मागणी आमदार किशोर जोरगेवार यांनी केली. राज्य शासनाच्या सुचनेनुसार ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत तिरंगा रॅलीचा अतिशय चांगला उपक्रम शाळेने आयोजित केला, त्यामुळे चंद्रपूर महानगरपालिका, सर्व अधिकारी आणि शिक्षक अभिनंदनास पात्र आहे, असेही त्यांनी सांगितले. new classrooms and labs funded by 10 crore

    प्रास्ताविकात आयुक्त विपीन पालिवाल म्हणाले, आपल्याला स्वातंत्र किसे मिळाले, आपल्या पुर्वजांनी ब्रिटीशांविरुध्द कसा लढा दिला, सोबतच हुतात्म्यांचे बलिदान आदी बाबींची माहिती जनतेला मिळावी, यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘हर घर तिरंगा’ हे अभियान सुरू केले आहे. या अंतर्गत शाळेमध्ये रांगोळी, चित्रकला, पत्रलेखन, राखी स्पर्धा घेण्यात आल्या. यावर्षी चंद्रपूर महापालिकेच्या वतीने 10 हजार झेंड्यांचे वितरण करण्यात आले आहे. 2012 मध्ये शाळेत केवळ 70 विद्यार्थी होते आज ही संख्या  1100 वर पोहचली आहे. शाळेत केवळ संख्यात्मक वाढ नाही तर गुणात्मक शिक्षणावर भर देण्यात येतो, असेही त्यांनी सांगितले. education infrastructure

    यावेळी मान्यवरांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून तिरंगा रॅलीला रवाना करण्यात आले. ‘भारत माता की जय, वंदे मातरम्’ अशा घोषणा देत विद्यार्थ्यांची तिरंगा रॅली बाबुपेठ परिसरातून काढण्यात आली.

  • immediate panchanama for flood damage । अतिवृष्टीचा फटका बसलेल्यांसाठी मोठी बातमी!

    immediate panchanama for flood damage

    immediate panchanama for flood damage : चंद्रपूर, दि. 10 : गत काही दिवसांपासून चंद्रपूर जिल्ह्यातील विविध भागांमध्ये सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. मोठ्या प्रमाणावर नागरिकांची घरे, शेती पिके व जनावरांची गोठे क्षतिग्रस्त झाली असून जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करावे, असे निर्देश राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. अशोक ऊईके यांनी प्रशासनाला दिले आहे. तत्पुर्वी जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांच्याकडून जिल्ह्यातील पूर परिस्थितीची माहिती पालकमंत्र्यांनी जाणून घेतली. flood-affected talukas in Chandrapur district

    पीओपी गणेश मूर्ती विकल्यास फसवणुकीचा गुन्हा दाखल होणार

    जिल्हाधिकारी यांच्यासोबत झालेल्या चर्चेनुसार, अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीसंदर्भात जिल्हा प्रशासन व संबंधित विभागांनी अलर्ट मोडवर राहावे. अतिवृष्टीमुळे घरांचे, शेतातील पिकांचे, जे नुकसान झाले आहे, त्याचे तात्काळ आणि अचूक पंचनामे करण्यात यावेत. जेणेकरून नुकसानग्रस्त नागरिकांना वेळेवर मदत मिळू शकेल.  पूरग्रस्त भागांत सुरक्षितता सुनिश्चित करावी. धोक्याच्या भागात राहणाऱ्या नागरिकांना व त्यांच्यासोबतच्या पशुधनाला सुरक्षित स्थळी हलविण्यात यावे.

    वार रूम ची स्थापना करा

    पूर परिस्थितीत उद्भवणाऱ्या बाबींवर लक्ष ठेवण्यासाठी जिल्हा स्तरावर ‘वार रूम’ ची स्थापना करावी. या कक्षामार्फत सतत परिस्थितीचा आढावा घेऊन आवश्यक उपाययोजना कराव्यात. जिल्ह्यातील आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्ष 24×7 कार्यरत ठेवून त्यामार्फत मदत व बचाव कार्याचे समन्वय साधावे. पुराच्या संभाव्य धोक्यांबाबत नागरिकांना वेळोवेळी सतर्कतेचे इशारे आणि माहिती देणारी यंत्रणा अखंडीत कार्यरत ठेवावी.

    पुढे पालकमंत्री डॉ. उईके म्हणाले, बचाव कार्यासाठी नौका, जेसीबी, पंपसेट, बचाव पथक यांची तत्परता ठेवण्यात यावी. पूर पस्थितीमुळे प्रभावित नागरिकांसाठी अन्नधान्य, पिण्याचे पाणी व जीवनावश्यक औषधांचा साठा तयार ठेवण्यात यावा. आरोग्य विभागामार्फत आपत्कालीन परिस्थितीत रुग्णवाहिका सेवा व आरोग्य सुविधा तत्पर ठेवाव्यात. संभाव्य रोगराईचा धोका लक्षात घेता प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात, अशा सुचना पालकमंत्री डॉ. अशोक उईके यांनी जिल्हा प्रशासनाला दिल्या. crop damage compensation due to flood

    जिल्हातील पावसामुळे सर्वाधिक फटका ब्रम्हपुरी तालूक्याला बसला असून ब्रम्हपुरी तालुक्यासह चंद्रपूर, गोंडपिपरी, नागभीड व सावली व इतर तालुक्यांमध्येही जनजीवन विस्कळीत झाले आहे. जिल्हा प्रशासनाने वरील सर्व उपाययोजना युद्धपातळीवर अमलात आणाव्यात. तसेच नागरिकांनी देखील स्थानिक प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन पालकमंत्री डॉ. उईके यांनी केले.

  • ashok uike tribal welfare strategy review । धरती आबा ते पीएम जनमन – पालकमंत्री डॉ. अशोक उईके यांची धोरणं आदिवासी समाजाला देणार नवा उजाळा!

    ashok uike tribal welfare strategy review

    ashok uike tribal welfare strategy review : चंद्रपूर, दि. 6 : राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. अशोक उईके यांनी शनिवारी, जिल्ह्यातील आदिवासी विकास विभागाचा आढावा घेतला. तसेच राज्य शासनाने सुरू केलेल्या 100 दिवस प्रशासकीय सुधारणा मोहिमेत उत्कृष्ट कामगिरी करणा-या अधिका-यांचासुध्दा सन्मान केला. tribal welfare schemes review by guardian minister

    जिल्हाधिकारी गौडा यांची विविध प्रकल्पाना भेट

    नियोजन भवन येथे पार पडलेल्या या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी., मनपा आयुक्त विपीन पालिवाल, अतिरिक्त पोलिस अधिक्षक ईश्वर कातकाडे, उपसंचालक आनंद रेड्डी, उपवनसंरक्षक श्वेता बोड्डू, प्रकल्प अधिकारी विकास राचेलवार, श्री. लाटकर आदी उपस्थित होते.


    यावेळी पालकमंत्री डॉ. श्री. उईके म्हणाले, आदिम जमातीला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पी.एम. जनमन आणि धरती आबा ग्राम उत्कर्ष अभियान सुरू केले आहे. या अंतर्गत विविध शासकीय विभागामार्फत आदिवासींना एकत्रितपणे योजनांचा लाभ देण्यात येत आहे. यात घरकुल, वनपट्टे, मतदान ओळखपत्र, आधार कार्ड, आयुष्मान कार्ड, रेशन कार्ड, विद्युत जोडणी, जात प्रमाणपत्र, जॉब कार्ड, राष्ट्रीयत्व व अधिवास प्रमाणपत्र, सातबारा, पीएम किसान, उत्पन्न दाखला, जनधन खाते आदींचा समावेश आहे.

    धरती आबा अभियान प्रत्येक घरापर्यंत पोहोचवा

    चंद्रपूर जिल्ह्यात 18 टक्के लोकसंख्या आदिवासींची असून दोन प्रकल्प कार्यालय आहेत. जिल्हाधिका-यांच्या मार्गदर्शनात चंद्रपूरची टीम मन लावून काम करीत आहे. धरती आबा ग्राम उत्कर्ष अभियानाच्या माध्यमातून 17 विभागाच्या 25 सेवा देण्यात येत आहे. धरती आबा अभियान प्रत्येक घरापर्यंत पोहचले पाहिजे. (dharti aba gram utkarsh abhiyan scheme details) यापुढेही आदिवासी समाजाला काय अपेक्षित आहे, त्यानुसारच योजना राबविली जाईल. आदिवासींना लाभ खरच मिळाला की नाही, याची प्रकल्प अधिका-यांनी शहानिशा करावी. योजनेमध्ये गैरप्रकार होऊ देऊ नका, गरजवंतांना योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी सुक्ष्म नियेाजन करावे.


    प्रास्ताविकात प्रकल्प अधिकारी विकास राचेलवार म्हणाले, प्रधानमंत्री जनजातीय आदिवासी न्याय महाअभियान अंतर्गत 12360 लाभार्थ्यांना योजनांचा लाभ देण्यात आला आहे. या अभियानात जिल्ह्यातील 167 गावांचा समावेश असून चंद्रपूर प्रकल्प कार्यालय अंतर्गत 115 गावे तर चिमूर प्रकल्प कार्यालयअंतर्गत 52 गावांचा समावेश आहे. आतापर्यंत एकूण 87 गावांमध्ये धरती आबा ग्राम उत्कर्ष अभियानाचे शिबीर घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

    उत्कृष्ट कामगिरी करणा-या अधिका-यांचा सन्मान

    : राज्य शासनाच्या 100 दिवस प्रशासकीय सुधारणा मोहिमेत उत्कृष्ट कार्य करून राज्यात अव्वल स्थान प्राप्त करणारे चंद्रपूरचे जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांचा पालकमंत्री डॉ. अशोक उईके यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सोबतच नागपूर विभागात जिल्ह्यातील 19 शासकीय कार्यालयांनी सर्वोत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल संबंधित अधिका-यांचा प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला. यात प्रथम क्रमांक प्राप्त करणारे जिल्हा ग्रंथालय अधिकारी रत्नाकर नलावडे, सा.बां. उपअभियंता (मूल) राजेश चव्हाण, उपविभागीय कृषी अधिकारी (नागभीड) प्रफुल गव्हारे, तहसीलदार (नागभीड) प्रताप वाघमारे, तालुका वैद्यकीय अधिकारी (नागभीड) डॉ. विनोद मडावी, पशुधन विकास अधिकारी (वरोरा) डॉ. सतिश अघडते. (awards to best performing officers in 100 day reform drive)


    द्वितीय क्रमांक प्राप्त करणारे इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या सहायक संचालक आशा कवाडे, जिल्हा अधिक्षक भुमी अभिलेख भुषण मोहिते, उपविभागीय अधिकारी (ब्रम्हपूरी) पर्वणी पाटील, महावितरण उपअभियंता (मुल) चंदन चौरसिया, उपजिल्हा रुग्णालय (ब्रम्हपूरी) डॉ. प्रितम खंडाळे, तालुका कृषी अधिकारी (कोरपना) गोविंद ठाकूर, बालसंरक्षण अधिकारी (मूल) आर्यन लोणारे, नगर परिषद मुख्याधिकारी (नागभीड) राहुल कंकाळ यांचा समावेश होता.

  • dharti aaba janbhagidari abhiyan । 🏞️ 167 गावांचा समावेश! चंद्रपूरमध्ये ‘धरती आबा’मुळे आदिवासी समाजाच्या विकासाला नवा वेग!

    dharti aaba janbhagidari abhiyan

    dharti aaba janbhagidari abhiyan : चंद्रपूर, दि. 5 : जल, जंगल, जमीन मुक्तीसाठी ज्यांनी वर्षानुवर्षे लढा दिला, अशा आदिवासींचा सन्मान करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी धरती आबा ग्राम उत्कर्ष अभियान आणि पी.एम. जनमन योजना सुरू केल्या आहेत. आदिवासी बांधवांना ग्रामस्तरावरच योजनांचा लाभ तसेच विविध प्रमाणपत्र उपलब्ध व्हावे, हा मुख्य उद्देश ठेवून चंद्रपूर मध्येही हे अभियान राबविण्यात येत आहे. त्यामुळे शेवटच्या घटकापर्यंत या अभियानाचा लाभ पोहोचविण्यासाठी लोकचळवळ म्हणून काम करावे, असे प्रतिपादन राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. अशोक उईके यांनी केले. PM Janman Yojana benefits and details

    माजी मंत्री आमदार मुनगंटीवार यांची पोलीस स्टेशनमध्ये तक्रार


    एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, चंद्रपूरद्वारे प्रियदर्शिनी सभागृह येथे धरती आबा जनभागीदारी अभियानाचा शुभारंभ करताना ते बोलत होते. यावेळी मंचावर खासदार डॉ. नामदेव किरसान, आमदार किशोर जोरगेवार (MLA Kishor Jorgewar), जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. महापालिका आयुक्त विपीन पालीवाल, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी गिरीश धायगुडे, प्रकल्प अधिकारी विकास राचेलवार, श्री. लाटकर आदी उपस्थित होते.


    भगवान बिरसा मुंडा (Bhagwan Birsa Munda) यांच्या 150 व्या जयंती वर्षानिमित्त धरती आबा जनभागिदारी अभियानाचा प्रारंभ करण्यात आला आहे, असे सांगून मंत्री डॉ. उईके म्हणाले, या अभियानाच्या लाभापासून कोणीही वंचित राहता कामा नये. धरती आबा अभियानाचा लाभ प्रत्येकाला मिळावा, यासाठी गावागावात जनजागृती करून यात लोकसहभाग वाढवावा. केवळ प्रशासनावर अवलंबून न राहता, आदिवासी समाजासाठी काम करणाऱ्या इतर नागरिकांनीही हे अभियान यशस्वी करावे.


    या अभियानांतर्गत 17 विभागाच्या 25 योजनांद्वारे सेवा देण्यात येते. विशेष म्हणजे आदिवासी समाजामध्ये येणाऱ्या 45 पैकी 42 जातींसाठी भरती आबा योजना आहे. आपल्या गावातील कोणीही या योजनांपासून वंचित राहणार नाही, असा संकल्प करावा. चंद्रपूर जिल्ह्यातील 167 गावांचा धरती आबा अभियानमध्ये समावेश आहे. आदिवासी संस्कृतीमुळेच आपली ओळख निर्माण झाली आहे, याअनुषंगाने धरती अबा अभियानाकडे पहावे. आदिवासी सांस्कृतिक सभागृहासाठी जागा उपलब्ध असल्यास विभागाद्वारे त्वरित निधी देण्यात येईल. तसेच धरती आबा ग्राम उत्कर्ष अभियानात चंद्रपूर जिल्हा राज्यात अव्वल ठरावा, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. government schemes for tribal communities


    यावेळी खासदार डॉ. किरसान म्हणाले, आदिवासींच्या बाबतीत प्रशासन लोकाभिमुख व्हावे, आदिवासींना योजनांचा लाभ वेळेवर मिळावा, हा या अभियानाचा उद्देश आहे. केवळ ठराविक कालावधीसाठीच नव्हे तर हे अभियान वर्षभर राबवावे.

    आदिवासी बांधवांच्या हिताचे अनेक निर्णय – आमदार किशोर जोरगेवार

    चंद्रपूर हे ऐतिहासिक आणि सांस्कृतिक शहर आहे. आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके हे या जिल्ह्याचे पालकमंत्री असून आदिवासींच्या हिताचे अनेक निर्णय त्यांनी घेतले आहे, असे आमदार किशोर जोरगेवार म्हणाले. आदिवासी बांधव हा शक्तिशाली असून जयसेवा म्हणताना समाजाची सेवासुद्धा अपेक्षित आहे. जिल्हा प्रशासनाने या कार्यक्रमाचे अतिशय चांगले नियोजन केले असून आदिवासी बांधव समाजाच्या मुख्य प्रवाहात येण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. शहरात राणी हिराईचा पुतळा व आदिवासी सांस्कृतिक सभागृहाचे भव्यदिव्य निर्माण व्हावे, अशी मागणी त्यांनी केली.

    अभियानात आदिवासी बांधवांनी सहभागी व्हावे – जिल्हाधिकारी विनय गौडा

    धरती आबा ग्राम उत्कर्ष अभियानांतर्गत योजनांचा लाभ ग्रामस्तरावरच देण्यासाठी शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. या योजनेमध्ये जिल्ह्यातील 167 गावांचा समावेश आहे. योजनांच्या लाभापासून कोणताही लाभार्थी वंचित राहू नये, यासाठी प्रशासन एकजुटीने काम करत आहे. सर्व आदिवासी बांधवांनी या अभियानात सहभागी व्हावे व हे अभियान यशस्वी करावे, असे आवाहन जिल्हाधिका-यांनी केले.

    लाभार्थ्यांना विविध प्रकारचे प्रमाणपत्र वाटप

    यावेळी आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके यांच्या हस्ते वनहक्क पट्टा प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. यात गोदाबाई कुमरे, पार्वता किन्नाके, धर्मराव तोडासे, दिवाकर मडावी, पुरुषोत्तम गेडाम आदींचा समावेश होता. शबरी घरकुल अंतर्गत निमकर पंधरे, मिलिंद शेडमाके, राकेश मडावी, मारुती कुळमेथे येथे यांना प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. तसेच जातवैधता प्रमाणपत्र श्रेयस पेंदोर, सोमांश कुमरे, मोहित चांदेकर, नाविन्य तळेकर, तन्वी गेडाम, श्रुती वरठी, शिवानी गेडाम यांना तर अमर गेडाम यांना वाहन खरेदी कर्ज वाटप प्रमाणपत्र देण्यात आले. certificates and entitlements for tribals

    certificates and entitlements for tribals


    तत्पूर्वी मान्यवरांनी येथे लागलेल्या विविध स्टॉलची पाहणी केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रकल्प अधिकारी विकास राचेलवार यांनी तर संचालन सपना पिंपळकर यांनी केले. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

  • Chandrapur district administration new vehicles । 📸 आपत्कालीन व्यवस्थेसाठी चंद्रपूर तयार! प्रशासनाच्या ताफ्यात नवे ‘बोलेरो’ वाहन

    Chandrapur district administration new vehicles

    Chandrapur district administration new vehicles : चंद्रपूर (२१ जून २०२५ ) – महसूल विभागांतर्गत क्षेत्रीय स्तरावर गतिमान प्रशासन तथा आपत्कालीन व्यवस्थेचे बळकटीकरण करण्यासाठी राज्य शासनाने जिल्हा प्रशासनाला सहा वाहने उपलब्ध करून दिली आहेत. या वाहनांचे लोकार्पण राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. अशोक उईके यांच्या हस्ते करण्यात आले.

    चंद्रपुरात योगा चा महासंगम


    नियोजन भवन येथे आयोजित या कार्यक्रमाला आमदार किशोर जोरगेवार, मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह, पोलिस अधिक्षक मुमक्का सुदर्शन, अतिरिक्त जिल्हाधिकारी नितीन व्यवहारे, निवासी उपजिल्हाधिकारी दगडू कुंभार, उपविभागीय अधिकारी संजय पवार, अजय चरडे, रविंद्र माने, तहसीलदार विजय पवार, प्रकल्प अधिकारी विकास राचेलवार, जिल्हा नियोजन अधिकारी संजय कडू, सुभाष कासनगोट्टूवार आदी उपस्थित होते.

    यांना मिळणार नवे वाहन

    जिल्हाधिकारी यांच्या अधिनस्त असलेल्या क्षेत्रीय कार्यालयातील अधिकारी, उपविभागीय अधिकारी व तहसीलदारांना, त्यांच्या जुन्या निर्लेखित वाहनांच्या बदली स्वरुपात नवीन वाहने खरेदी करण्यास शासनाने मंजुरी दिली होती. त्यानुसार एकूण सहा महिंद्रा बोलेरो न्युओ या वाहनांची खरेदी करून सदर वाहने जिल्हाधिकारी कार्यालयाला प्राप्त झाली आहेत. ही वाहने चंद्रपूर, गोंडपिपरी, मुल, वरोरा येथील उपविभागीय अधिकारी तथा राजुरा आणि कोरपना येथील तहसीलदारांना देण्यात येणार आहे.

  • district planning committee fund allocation । निधीचं राजकारण नको, विकास हाच मुख्य उद्देश – पालकमंत्री उईके

    district planning committee fund allocation

    district planning committee fund allocation : चंद्रपूर : जिल्हा नियोजन समितीचा निधी हा विकासाच्या कामासाठी उपयोगात आणला जातो. या निधीचे वितरण करताना जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊनच वाटप करण्यात येईल. तसेच जिल्ह्याशी संबंधित सर्व महत्त्वाच्या मुद्यांवर सर्व लोकप्रतिनिधींना घेऊन मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेण्यात येईल, जेणेकरून जिल्ह्यातील सर्व प्रश्न तातडीने मार्गी लागावे, असे राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. अशोक उईके यांनी सांगितले. district fund distribution transparency meeting

    चंद्रपुरात धावत्या दुचाकीवर कोसळले झाड, दुचाकीस्वाराचा मृत्यू

    नियोजन भवन येथे जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत ते बोलत होते. बैठकीला खासदार सर्वश्री प्रतिभा धानोरकर, डॉ. नामदेव किरसान, आमदार तथा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, आमदार सर्वश्री सुधाकर अडवाले, अभिजीत वंजारी, किशोर जोरगेवार, कीर्तीकुमार भांगडीया, करण देवतळे, देवराव भोंगळे, जिल्हाधिकारी विनय गौडा, मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंग, पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, जिल्हा नियोजनअधिकारी संजय कडू तसेच इतर विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

    आरोग्य हा अतिशय महत्वाचा विषय

    सन 2024 – 25 मध्ये सर्वसाधारण योजनेचे 456 कोटी, आदिवासी उपयोजनेचे 103 कोटी, अनुसूचित जाती उपयोजनेचे 75 कोटी असे एकूण 634 कोटी 42 लक्ष निधी विकास कामांवर खर्च करण्यात आला आहे, असे सांगून पालकमंत्री डॉ. अशोक उईके म्हणाले, आरोग्य हा अतिशय महत्त्वाचा विषय असून जिल्ह्यातील सर्व प्राथमिक केंद्र व उपकेंद्रासाठी निधी दिला जाईल. तसेच अद्यावत सोयी सुविधा या केंद्रामधून देण्यात येईल. त्यासाठी विशेष प्रस्ताव पाठवावा. जिल्ह्यातील अंगणवाड्यांचे बांधकाम आवर्जून पूर्ण करावे. नगरपालिका व नगरपंचायत क्षेत्रातील अंगणवाड्यांना सुद्धा निधी देण्यात येईल.

    ग्रामीण भागातील नागरिक योजनांपासून वंचित राहू नये, त्यासाठी जिल्ह्याचा एक चांगला प्रस्ताव तयार करावा. सर्व तालुका स्तरावर क्रीडा विकासासाठी आणि व्यायामशाळांसाठी वाढीव निधीचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे. कर्मवीर मा.सां. कन्नमवार शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासह ग्रामीण भागात औषधींसाठी निधीची कमतरता पडू देणार नाही. planning committee meeting inscriptions 2025

    शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून मृतदेह मोफत घरी नेण्यासाठी शववाहिकांची संख्या वाढवावी. जिल्ह्यातील ‘ब’ आणि ‘क’ दर्जाच्या तीर्थक्षेत्रांना सुध्दा निधी देण्यात येईल. सर्व लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊनच या निधीचे वाटप करण्यात येईल, अशी ग्वाही पालकमंत्री डॉ. अशोक उईके यांनी दिली. तसेच आजच्या बैठकीला जे अधिकारी गैरहजर असतील, त्यांना कारणे दाखवा नोटीस देण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. यावेळी खासदार आणि आमदारांनीसुद्धा आपापल्या सूचना मांडल्या.

    राजशिष्टाचारानुसारच विकासकामांचे लोकार्पण व्हावे

    शासनाच्या निधीतून विकासकामांचे लोकार्पण होत असतांना ते राजशिष्टाचारानुसारच व्हावे. लोकप्रतिनिधींची नावे कोनशिलेवर टाकावी. असे निर्देश पालकमंत्री डॉ अशोक उईके यांनी दिले. district planning committee fund allocation

    या विषयांवर झाली चर्चा : पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत कृषी, आरोग्य, वने, पर्यटन, शिक्षण, अवकाळी पावसाने नुकसान झालेले पंचनामे, कृषी पंप जोडणी, जिल्हा परिषद, पोलीस विभाग व इतर सर्व विषयांचा विस्तृत आढावा घेण्यात आला. तसेच 1 फेब्रुवारी 2025 रोजी संपन्न झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीचे इतिवृत्त कायम करणे व इतिवृत्तावरील अनुपालनास मान्यता प्रदान करणे, जिल्हा वार्षिक योजना सन 2024 -25 अंतर्गत खर्चास मान्यता देणे, सन 2025 -26 अंतर्गत खर्चाचा आढावा यावेळी घेण्यात आला.

  • irai river widening and deepening update । चंद्रपूरसाठी दिलासादायक पाऊल – इरई नदी खोलीकरणाची कामे जोमात

    irai river widening and deepening update

    irai river widening and deepening update : चंद्रपूर – चंद्रपूर शहराची जीवनवाहिनी असलेल्या इरई नदीच्या खोलीकरणाचे काम सर्वांच्या सहकार्याने हाती घेण्यात आले आहे. या कामाच्या प्रगतीची पाहणी करण्याकरिता राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. अशोक उईके यांनी प्रत्यक्ष खोलीकरण होत असलेल्या ठिकाणी भेट दिली. यावेळी जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी., महानगरपालिका आयुक्त विपिन पालीवाल,  उपविभागीय अधिकारी संजय पवार, तहसीलदार विजय पवार तसेच संबंधित यंत्रणेचे अधिकारी उपस्थित होते. Chandrapur river cleaning and development

    चंद्रप्रकाशात होणार ताडोबा अंधारी व्याघ्रप्रकल्पात प्राणिगणना

    400 ब्रास गाळ मोफत वाटप

    चंद्रपूर शहराला 9 कि.मी. समांतर वाहणा-या इरई नदीच्या खोलीकरणाच्या कामाचा शुभारंभ 25 एप्रिल 2025 रोजी करण्यात आला, असे सांगून पालकमंत्री डॉ. उईके म्हणाले, जिल्हा प्रशासनाने इरई नदीच्या खोलीकरण कामाचे योग्य नियोजन केले असले तरी कामाची गती वाढविणे आवश्यक आहे. चालू महिन्याअखेर पर्यंत सर्व नियोजित काम पूर्ण करावे. तसेच नदीतील गाळ शेतकऱ्यांना विनामूल्य देण्यात येत आहे. आतापर्यंत 400 ब्रास गाळ मोफत वाटप करण्यात आला असून अर्ज केलेल्या सर्व शेतकऱ्यांना गाळ प्राधान्याने द्यावा, अशा सूचना त्यांनी केल्या. River deepening projects in Chandrapur

    7500 ब्रास गाळ काढण्यात आला

    पहिल्या टप्प्यात राम सेतु ते चौरळा पूल दरम्यान अमुजमेंट पार्क जवळ व महर्षी शाळेमागे  सध्या काम सुरू आहे. आतापर्यंत अमुजमेंट पार्क जवळ 350 मीटर व महर्षी शाळेमागे 120 मीटर एकूण असे एकूण 470 मीटर अंतरावरचे खोलीकरण करण्यात आले आहे. सद्यस्थितीत कामावर 8 पोकलेन मशीन, 13 हायवा/ टिप्पर, 20 ट्रॅक्टर, 1 जे.सी.बी कार्यरत असून नदी पात्रातून आतापर्यंत 7500 ब्रास गाळ काढण्यात आला आहे. शेतकऱ्यांना 400 ब्रास गाळ  वाटप करण्यात आले आहे.

    chandrapur river cleaning and development

    चंद्रपूर शहर ते इरई – वर्धा नदी संगमापर्यंतच्या 17 कि.मी. लांबीत इरई नदी पात्रातील वाढलेली झाडेझुडपे, गाळ काढून नदी पात्राचे खोलीकरण व रुंदीकरण करण्यात येणार आहे. त्यामुळे नदी पात्राची पूर वहन क्षमता वाढण्यास मदत होईल व शहराला दरवर्षी पडणारा पुराचा वेढा कमी होईल.  तीन टप्प्यात खोलीकरण करण्यात येणार असून पहिला टप्पा रामसेतू ते चौराळा पुल, दुसरा टप्पा माना टेकडी (लालपेठ कॉलरी) आणि तिसरा टप्पा इरई ते वर्धा नदी संगमापर्यंतचा आहे.

  • school enrollment process । डॉ. अशोक उईके यांचा पुढाकार: जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये दर्जेदार शिक्षणाची ग्वाही

    school enrollment process

    school enrollment process : चंद्रपूर – विद्यार्थी हा केंद्रबिंदू मानून विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देणे हे शिक्षकांचे कर्तव्य आहे. स्पर्धेच्या या युगात आपला विद्यार्थी कसा समोर जाईल, याचा गांभिर्याने विचार करून शिक्षकांनी अध्यापनाचे कार्य करावे. आजच्या युगात इंग्रजी शाळांचे प्रस्त वाढले असतांना, जिल्हा परिषदेच्या शाळेतसुध्दा विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण आणि उज्वल भविष्य मिळू शकते, असा विश्वास पालकांना देऊन विद्यार्थ्यांची पटसंख्या वाढविण्यासाठी सर्व शिक्षकांनी संकल्प करावा, अशा सूचना राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. अशोक उईके यांनी दिल्या.

    प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना मिळाला न्याय, खासदार धानोरकर यांचा पाठपुरावा

    जिल्हाधिकारी कार्यालयात शिक्षण विभागाचा आढावा घेताना ते बोलत होते. बैठकीला जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी., मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंग, शिक्षणाधिकारी (प्राथ.) अश्विनी सोनवणे, राजेश पाताळे (माध्य.), अधिष्ठाता डॉ. मिलिंद कांबळे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. महादेव चिंचोळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अशोक कटारे तसेच इतर अधिकारी उपस्थित होते. school enrollment process

    शाळेतील मूलभूत सुविधांसाठी शासन निधीची कमतरता पडू देणार नाही, असे सांगून पालकमंत्री डॉ. उईके म्हणाले, जि.प. शाळांतील विद्यार्थी पटसंख्या का कमी होत आहे, याची कारणमिमांसा होणे आवश्यक आहे. या कारणांचा शोध घेऊन शिक्षण विभागाने पाऊले टाकावीत. पटसंख्या वाढविण्यासाठी शिक्षकांनी प्रयत्न करावे. त्यांच्या पाल्यांची गुणवत्ता आणि उज्वल भविष्य आम्ही घडू शकतो, असा विश्वास पालकांना द्या. शैक्षणिक क्षेत्रात असलेल्या ‘असर’ आणि ‘नॅस’ या उपक्रमांचा आधार घेऊन शिक्षण विभागाने प्रयत्न करावे. importance of quality education

    शाळेमध्ये शिक्षकांची समिती तयार करून अध्यापनाकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. त्यासाठी शिक्षकांची शिक्षकांकडूनच पडताळणी करा. नवनवीन संशोधन करा. आगामी शैक्षणिक क्षेत्रात शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे अतिशय चांगल्या पद्धतीने स्वागत होण्यासाठी आतापासून नियोजन करा. शैक्षणिक उपक्रमांतर्गत दर 15 दिवसांनी पालकांच्या उपस्थितीत दर्जेदार चावडी वाचन उपक्रम राबवा. ज्या शाळांमध्ये इंटरनेट कनेक्शन आणि विद्युत पुरवठा वारंवार खंडित होतो, त्यासाठी जिल्हा नियोजन समिती मधून निधी देण्यात येईल. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शाळेत येण्याजाण्याचा त्रास होऊ नये, यासाठी मानव विकास अंतर्गत बसेसचे योग्य नियोजन करा. public school improvement strategies

    गाव स्तरावरील शाळांना भेटी द्या : शिक्षण विभागाच्या सर्व अधिकाऱ्यांनी गाव स्तरावरील शाळांमध्ये भेटी देऊन नियमितपणे आढावा घ्यावा. ज्या शाळांमध्ये सीसीटीव्ही लावण्यात आले आहे, ते खरंच सुरू आहेत का, शाळेतील तक्रार पेटींचा उपयोग होतो का, याची पडताळणी करावी. सुवर्ण महोत्सवी शिष्यवृत्ती योजनांची माहिती विद्यार्थ्यांच्या पालकांपर्यंत पोहोचवा, अशा सुचना पालकमंत्री डॉ. उईके यांनी दिल्या. parent-teacher engagement programs

    मानव विकास अंतर्गत 7445 विद्यार्थीनींना सायकलचे वाटप : चंद्रपूर जिल्ह्यात सर्व व्यवस्थापनाच्या एकूण 2461 शाळा असून यापैकी 1549 शाळा जिल्हा परिषदेच्या आहेत. जिल्ह्यात एकूण विद्यार्थी संख्या 3 लक्ष 61 हजार 687 आहे. सखी सावित्री समिती, विद्यार्थी सुरक्षा समिती आणि तक्रार पेटी उपलब्ध असलेल्या शाळांची संख्या 2461 आहे. 475 शाळांमध्ये सीसीटीव्ही लावण्यात आले असून जिल्हा परिषदेच्या 549 शाळांमध्ये सीसीटीव्ही उपलब्ध करून देण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. तसेच जिल्ह्यात अपार आयडीचे काम 87 टक्के पूर्ण झाले आहे. मानव विकास अंतर्गत ग्रामीण भागातील 7445 मुलींना सायकलचे वाटप करण्यात आल्याची माहिती शिक्षण विभागाने बैठकीत दिली.