Tag: पाठपुराव्याला यश

  • Pombhurna MIDC project latest status । 💬 मुनगंटीवारांचा 15 वर्षांचा पाठपुरावा अखेर यशस्वी! पोंभूर्णा MIDC ची सुरुवात लवकरच

    Pombhurna MIDC project latest status

    Pombhurna MIDC project latest status : मुंबई, ३ जुलै : राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील पोंभूर्णा येथे एमआयडीसी होण्यासाठी २००९ पासून सातत्याने पाठपुरावा केला. पंधरा वर्षांच्या या संघर्षाला अखेर यश आले आहे. विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात उद्योग राज्यमंत्री इंद्रनीलजी नाईक यांनी पोंभूर्णा एमआयडीसी (pombhurna midc) वर्षभरात सुरू करण्याचे स्पष्ट आश्वासन आ. मुनगंटीवार यांना दिले.

    चंद्रपुरात निघाला भव्य निषेध मोर्चा

    या मुद्द्यावर अर्धा तास झालेल्या चर्चेत आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी  आतापर्यंतच्या पाठपुराव्याची आठवण करून दिली. एनओसी, नकाशा, नाहरकत प्रमाणपत्र, बैठकांचे इतिवृत्त आणि कालबाह्य प्रक्रियांमुळे हा प्रकल्प कसा लांबणीवर पडला, हे त्यांनी तपशीलवार मांडले. यावेळी आ. सुधीर मुनगंटीवार यांनी मंत्री महोदयांकडे चार ठोस मागण्या करत लक्ष वेधले. संबंधित अधिकाऱ्यांची एक बैठक तत्काळ घेणे, चंद्रपूर जिल्ह्यातच राज्य उद्योग मित्र नेमावा, मंत्री महोदयांनी चंद्रपूर दौरा करून प्रत्यक्ष पाहणी करावी, शेतकऱ्यांना मिळणाऱ्या मोबदल्यात वाढ करावी, या मागण्यांचा यामध्ये समावेश होता. Sudhir Mungantiwar efforts for MIDC project

    २ कोटी ३५ लाखांचा मोबदला

    उद्योग राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांनी यावेळी सकारात्मक भूमिका घेत पोंभूर्णा एमआयडीसीसाठी १०२.५० हेक्टर भूसंपादन प्रस्तावाला मान्यता मिळाल्याची माहिती दिली. या अंतर्गत ४२.५९ हेक्टर शेतकऱ्यांशी थेट खरेदी करून २ कोटी ३५ लाखांचा मोबदला दिला गेला आहे. उर्वरित जमिनींसाठी ३३/३ ची नोटीस जारी करण्यात आली आहे.  

    आ.सुधीर मुनगंटीवार यांनी केलेल्या मागण्याबाबत मंत्री नाईक म्हणाले, ‘यासंदर्भात अधिवेशन कालावधीतच बैठक आयोजित केली जाईल. चंद्रपूर येथे राज्य उद्योग मित्र नेमण्यात येईल. उर्वरित भूसंपादन प्रक्रिया ६० दिवसांत पूर्ण केली जाईल आणि अधिकाऱ्यांकडून दर आठवड्याला प्रगती अहवाल आमदार श्री. मुनगंटीवार (sudhir mungantiwar) यांना सादर केला जाईल. जमिनीच्या दरांसंदर्भात लवकरच बैठक घेण्यात येईल.’ यासोबतच पुढील महीन्यात मी स्वतः चंद्रपुरात  येतो, असे आश्वासनही राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांनी यावेळी दिले.

  • सावली, सिंदेवाही- लोनवाही नगरांच्या विकासासाठी दहा कोटींचा निधी मंजूर

    सावली, सिंदेवाही- लोनवाही नगरांच्या विकासासाठी दहा कोटींचा निधी मंजूर

    News34chandrapur

    ब्रह्मपुरी – ब्रह्मपुरी मतदार संघातील सिंदेवाही- लोनवाही व सावली या नगरांचा विकास साधने हेतू राज्याचे विरोधी पक्षनेते तथा ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्र आमदार विजय वडेट्टीवार यांनी राज्य शासनाकडे वेळोवेळी पाठपुरावा करून हातात परिश्रम घेत मागणी रेटून धरल्याने अखेर नगर विकास विभागाच्या वतीने दोन्ही शहरांना प्रत्येकी पाच कोटी असे दहा कोटी रुपये निधी वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत मंजूर करण्यात आली असून विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या प्रयत्नातून सिंदेवाही – लोनवाही व सावली शहरांच्या विकासात भर पडणार आहे.

     

    ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्रात मोडणाऱ्या सावली व सिंदेवाही – लोनवाही या शहरांमध्ये लोक वस्त्यांचे विस्तारीकरण दिवसांगानिक वाढतच असून अनेक प्रभागात विविध विकास कामे प्रलंबित आहेत. या दोन्ही तालुकास्तरावरील शहरांमध्ये पूर्वी ग्रामपंचायत असल्याने अपुऱ्या निधी अभावी विकास कामे होऊ शकली नाही. मात्र शासनाने तालुकास्तरावरील शहरातील ग्रामपंचायतचे रूपांतर नगरपंचायत मध्ये केल्याने नगर विकास विभागाचे विविध योजना मार्फत शहरांना निधी देण्यात येतो.

     

    यापैकीच एक असलेल्या वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत सदर दोन्ही शहराला विकास कामाकरिता निधी प्राप्त व्हावा याकरिता राज्याचे विरोधी पक्ष नेते तथा क्षेत्र आमदार विजय वडेट्टीवार यांनी शासनास वेळोवेळी पाठपुरावा करून विकास निधी मंजूर करण्यास भाग पाडले. याचे फलित म्हणून सावली व सिंदेवाही – लोनवाही या दोन्ही नगरपंचायतींना प्रत्येकी पाच कोटी असे एकूण दहा कोटी रुपयांचा निधी नुकताच मंजूर करण्यात आला असून लवकरच शहरातील विकास कामे सुरू होणार आहेत. मतदारसंघातील नागरिकांच्या अडचणी समस्या जाणून घेत आपल्या विकासाभिमुख शैलीतून क्षेत्र आमदार तथा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी आज पर्यंत शासन स्तरावरून कोट्यावधींचा निधी क्षेत्रासाठी उपलब्ध करून दिला हेही विशेष.