Tag: पती पत्नीचा वाद

  • man takes poison after argument with wife । धक्कादायक वळण!, पत्नी माहेरी जाणार म्हणताच पतीचा टोकाचा निर्णय!

    man takes poison after argument with wife

    man takes poison after argument with wife : ब्रह्मपुरी : येथील गायत्री राइस मिलमध्ये काम करणाऱ्या प्रकाश ईश्वर मेश्राम (४०) या मजुराने विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. दारूच्या व्यसनामुळे पत्नीसोबत झालेल्या वादानंतर त्याने हे टोकाचे पाऊल उचलले. उपचारादरम्यान रविवारी पहाटे त्याचा मृत्यू झाला.

    प्रियकराने समाजमाध्यमावर शेअर केले खाजगी व्हिडीओ, पोलिसांनी केली अटक

    तू परत येऊ नको

    मालडोंगरी येथील रहिवासी असलेला प्रकाश मेश्राम हा दारूच्या व्यसनाच्या आहारी गेला होता. कामातून मिळणारे सगळे पैसे तो दारूवरच खर्च करत असे. रक्षाबंधनाच्या सणासाठी त्याची पत्नी कविता मेश्राम माहेरी जायला निघाली होती. तेव्हा, ‘तू माहेरी गेली तर परत येऊ नकोस,’ असे म्हणत प्रकाशने तिला धमकावले. या वादानंतर लगेचच प्रकाशने विष प्राशन केले.

    ही गोष्ट लक्षात येताच पत्नी कविताने शेजाऱ्यांच्या मदतीने त्याला रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.