Tag: पक्ष प्रवेश

  • Aman Andhewar MNS grassroots leadership । अमन अंधेवारांच्या झंझावाती नेतृत्वाखाली 24 कार्यकर्त्यांचा मनसेत भव्य प्रवेश

    Aman Andhewar MNS grassroots leadership

    Aman Andhewar MNS grassroots leadership : चंद्रपूर | जिल्ह्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (मनसे) कार्यात नवसंजीवनी आणणारा एक भव्य आणि ऐतिहासिक पक्ष प्रवेश सोहळा काल साक्षीला आला. पक्ष प्रमुख राज ठाकरे यांच्या स्पष्ट, ठाम आणि जनतेच्या मनाला भिडणाऱ्या राजकारणावर विश्वास ठेवत तसेच मनसे कामगार सेना जिल्हा अध्यक्ष अमन अंधेवार यांच्या झंझावाती नेतृत्वावर आणि तडफदार कार्यशैलीवर प्रभावित होऊन तब्बल २४ कार्यकर्त्यांनी मनसेच्या ध्वजाखाली प्रवेश केला. हा प्रवेश सोहळा अंधेवार यांच्या चंद्रपूर कार्यालयात मोठ्या उत्साहात पार पडला, ज्यामध्ये मनसेचे पदाधिकारी, स्थानिक कार्यकर्ते आणि नागरिकांची मोठी उपस्थिती होती.

    सणासुदीला हॉटेल व्यावसायिकांसाठी मार्गदर्शक सूचना

    या पक्ष प्रवेशात विविध समाजघटक, व्यावसायिक, तरुण कार्यकर्ते, ग्रामीण भागातील नेते आणि स्थानिक पातळीवरील प्रभावी व्यक्ती एकत्र आले. यामध्ये प्रशांत जुलमे, विनोद गुप्ता, नाविन कोतले, करण चेतूलवार, संतोष सोयाम, सुधीर झाडे, गणेश सोनेकर, गणेश गोखरे, राकेश सल्लम, नितेश खनके, मयूर पावडे, नयन पेदोर, गौरव येकलवार, अशोक कातकर, श्रावण गडपल्ली, अरविंद पेंदाने, सुरज केवळ, राधाकृष्ण भोंगा, रोशन चव्हाण, संपूरणणंद चव्हाण, अभिजीत पांडे, अरविंद चंदनखेडे, ओम बावणे आणि राकेश गाडी या २४ कार्यकर्त्यांचा समावेश आहे. MNS Maharashtra organization strength

    या सर्वांनी मनसेच्या विचारधारेवर पूर्ण निष्ठा ठेवत, जिल्हा पातळीवर पक्षाची पकड अधिक मजबूत करण्याची प्रतिज्ञा घेतली. या प्रवेशामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील मनसेची संघटनात्मक ताकद केवळ वाढणार नाही, तर स्थानिक पातळीवरील राजकीय समीकरणांवरही त्याचा ठोस परिणाम होणार आहे. ग्रामीण आणि शहरी भागात मनसेचा झेंडा आता अधिक वेगाने फडकणार, अशी चर्चा कार्यकर्त्यांमध्ये रंगली आहे.

    अमन अंधेवार यांनी आपल्या भाषणात स्पष्ट केले की, “मनसे म्हणजे फक्त पक्ष नव्हे, तर महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची, स्थानिकांचा हक्क मिळवून देणारी आणि अन्यायाविरुद्ध लढणारी संघटना आहे. आज आमच्यात सामील झालेल्या कार्यकर्त्यांच्या पाठबळामुळे आमची ताकद अनेकपटीने वाढली आहे. येत्या काळात चंद्रपूर जिल्ह्यातील प्रत्येक गावात आणि प्रत्येक समाजघटकात मनसेचे अस्तित्व निर्माण करू.” mns adhikrut

    पक्ष प्रवेश कार्यक्रमात उपस्थित कार्यकर्त्यांनी एकमुखी घोषणा देत, स्थानिक प्रश्नांवर कठोर भूमिका घेण्याचा संकल्प केला. रोजगार, स्थानिकांना प्राधान्य, उद्योगात स्थानिकांचा सहभाग, भ्रष्टाचाराविरोधी भूमिका आणि प्रशासनाच्या निष्क्रियतेविरुद्ध लढा या मुद्द्यांवर मनसे ठामपणे उभी राहणार असल्याचे ठरविण्यात आले.

    कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण

    हा प्रवेश फक्त संख्येचा आकडा वाढवणारा नव्हे, तर तळागाळातील लोकांचा विश्वास जिंकणारा टप्पा असल्याचे स्पष्ट झाले. या कार्यक्रमात जुन्या आणि नव्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह, एकजूट आणि लढाऊ वृत्तीचे दर्शन घडले. स्थानिक राजकारणात बदलाची चाहूल लागल्याची भावना यानंतर स्पष्ट झाली आहे. मनसेच्या या झंझावाती प्रवेशामुळे चंद्रपूरच्या राजकीय पटावर नव्या समीकरणांची बीजे रोवली गेली असून, येत्या काळात त्याचा परिणाम निवडणुकीत ठळकपणे दिसेल, अशी शक्यता आहे. Aman Andhewar MNS grassroots leadership

    ही घटना केवळ पक्षासाठी नाही, तर जिल्ह्याच्या राजकीय इतिहासात महत्त्वाचा टप्पा ठरेल, याबद्दल शंका नाही. मनसेच्या झेंड्याखाली नव्या जोमाने आणि नव्या रक्ताने पुढील लढती अधिक तीव्र होतील, हे निश्चित.

  • aap chandrapur political updates today । 🚨नामवंत सामाजिक कार्यकर्ते ‘आप’मध्ये!

    aap chandrapur political updates today

    aap chandrapur political updates today : चंद्रपूर – बाबुपेठ परिसरातील प्रसिद्ध व्यावसायिक आणि सामाजिक क्षेत्रात सक्रिय असलेले श्री. राजूभाऊ तोडासे यांनी आज आम आदमी पार्टीमध्ये अधिकृत जाहीर प्रवेश केला.
    हा पक्ष प्रवेश आम आदमी पार्टीचे युवा जिल्हाध्यक्ष राजूभाऊ कुडे यांच्या नेतृत्वात तर वरिष्ठ नेते सुनील मुसळे, जिल्हाध्यक्ष मयूर राईकवार यांचा अध्यक्षतेखाली महानगर कार्यकारिणीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पार पडला.

    अमृत योजनेचे काम थांबवा

    श्री. तोडासे हे गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक कार्यात सक्रीय असून, त्यांनी नेहमीच जनतेच्या प्रश्नांसाठी आवाज उठवला आहे. त्यांच्या प्रवेशामुळे बाबुपेठ परिसरातील आम आदमी पार्टीच्या संघटनात्मक बळात मोठी भर पडेल, असा विश्वास पक्षाकडून व्यक्त करण्यात आला आहे. local leader joins aam aadmi party

    या प्रसंगी बोलताना श्री. तोडासे म्हणाले की,

    “आम आदमी पार्टी हा एकमेव पक्ष आहे जो सामान्य जनतेच्या हक्कांसाठी रस्त्यावर उतरतो. पारदर्शकता, जबाबदारी आणि जनसेवेच्या तत्वांवर चालणाऱ्या या पक्षात आता मी माझं योगदान देणारआहे.”

    या कार्यक्रमाला महानगर कार्यकारिणीतील शहर अध्यक्ष योगेश गोखरे, महिला अध्यक्ष तब्बसूम शेख, संघटन मंत्री संतोष बोपचे, अल्पसंख्यांक अध्यक्ष जावेद सय्यद, वाहतूक अध्यक्ष जयदेव देवगडे, जिल्हा विधी सल्लागार ऍड किशोर पुसलवार, माजी सैनिक सुनील सदभय्या, मनीष राऊत, संतोष दोरखंडे, सिकंदर सागोरे, बलराम केसकर, इत्यादी उपस्थित होते.

  • भाजपा कार्यकर्त्यांचा काॅंग्रेस पक्षात प्रवेश

    भाजपा कार्यकर्त्यांचा काॅंग्रेस पक्षात प्रवेश

    News34 chandrapur

    ब्रह्मपुरी – केंद्रातील मोदी सरकार केवळ धर्माच्या नावाखाली राजकारण करत आहे. विकास मात्र बाजूला अडगळीत पडला आहे. देशातील महागाईने उच्चांक गाठला आहे. त्यामुळे जनता त्रस्त झाली असुन भाजपाला सोडचिठ्ठी देत ब्रम्हपूरी तालुक्यातील चौगान येथील भाजपाच्या अनेक कार्यकर्त्यांनी काॅंग्रेस पक्षात प्रवेश केला आहे.

     

    विरोधी पक्षनेते विजयभाऊ वडेट्टीवार यांच्या विकासकामांवर व खंबीर नेतृत्वावर विश्वास ठेवून तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खेमराज तिडके यांच्या नेतृत्वाखाली चौगान येथील भाजपा कार्यकर्त्यांनी काॅंग्रेस पक्षात प्रवेश केला आहे.

     

    यावेळी पक्षप्रवेश कार्यक्रमाला तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खेमराज तिडके, बाजार समितीचे सभापती प्रभाकर सेलोकर, माजी जिल्हा परिषद सदस्य डॉ राजेश कांबळे, नगरपरिषदेचे गटनेता विलास विखार, चौगान ग्राम काॅंग्रेस कमेटीचे अध्यक्ष पंकज तिडके यांसह अन्य मान्यवर उपस्थित होते.

     

    यावेळी विरोधीपक्षनेते विजयभाऊ वडेट्टीवार यांनी सर्व नवप्रवेशित नागरिकांच्या गळ्यात काॅंग्रेस पक्षाचा दुप्पटा घालून पक्षात स्वागत करतांना ते म्हणाले की, पक्षप्रवेश केलेल्या सर्वांचे काॅंग्रेस पक्षात स्वागत असुन प्रत्येक नागरिकाच्या समस्या सोडविण्यासाठी आम्ही सदैव कटीबध्द असुन आपल्या समस्या, अडचणी माझ्या पर्यंत घेऊन यावे असेही त्यांनी यावेळी सांगितले.

     

    पक्ष प्रवेश केलेल्यांमध्ये गणेश प्रधान, भोजराज प्रधान, नंदु नवघडे, मन्साराम बुराडे, प्रभाकर मैंद, नरेश ठाकरे, भाऊराव भाकरे, उमेश बुराडे, प्रदीप सोंदरकर, कैलास बुराडे, गोपाल बुराडे, गायत्री बुराडे, नंदिनी ठाकरे, हेमलता सोंदरकर, माणिक अर्जुनकार, मनोहर मेश्राम, हिवराज भोगेवार, विजय सहारे, पुरुषोत्तम पिलारे, सविता भोगेवार, संजय मैंद, अविनाश चौधरी, ज्योत्स्ना बुरांडे, अनिता वाटकर यांसह अन्य नागरिकांचा समावेश आहे.

  • चंद्रपुरात आम आदमी पार्टीत युवकांचा पक्ष प्रवेश

    चंद्रपुरात आम आदमी पार्टीत युवकांचा पक्ष प्रवेश

    News34 chandrapur

    चंद्रपूर : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून चंद्रपूरमधील बाबुपेठ परिसरातील अनेक युवकांनी आज आम आदमी पार्टीत प्रवेश केला.

    यावेळी युवा जिल्हाध्यक्ष राजु कुडे उपस्थित होते. त्यांनी या युवकांना पक्षात स्वागत केले.

     

    यावेळी बोलताना जावेद सय्यद, माजी अध्यक्ष, बाबूपेठ मुस्लिम ईदगाह कब्रस्तान कमेटी म्हणाले, “देशात राजकारण हे मुख्यतः धर्म, जात-पातवर आधारित असते. दोन समाजात तेड निर्माण करून राजकारणी सत्तेसाठी कुठल्याही थराला जातात. परंतु आम आदमी पार्टीने कधीही सत्तेसाठी धर्माचा वापर केलेला नाही. आम आदमी पार्टी फक्त आणि फक्त विकासावर मत मागते आणि दिलेले शब्द पूर्ण करते.

     

    दिल्ली आणि पंजाब सरकारने आपल्या राज्यात मोहल्ला क्लिनिक, आरोग्य, शिक्षण, सामान्य जनतेला वीज बिलात सवलत इत्यादी विकासाची कामे करून सामान्य जनतेला दिलासा दिला आहे. अर्थात सत्तेत येऊन जे करायचे आहे तेच आम आदमी पार्टीने केले. यामुळे आप सोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे.

     

    यावेळी राजिक शेख, कोषाध्यक्ष, बाबूपेठ मुस्लिम ईदगाह कब्रस्तान कमेटी, फहीम शेख, आबिद सय्यद, मोहसीन सय्यद, जाकिर सय्यद (सर्व सदस्य, बाबूपेठ मुस्लिम ईदगाह कब्रस्तान कमेटी) तसेच रोहित मेश्राम, अमित बारबूनडे, राकेश दुर्योधन, केवल सिंह भोयर इत्यादींनी पक्ष प्रवेश केला.

     

    यावेळी राजु कुडे म्हणाले, “येणाऱ्या काळात चंद्रपूरमध्ये आम आदमी पक्षाचे मोठे संघटन आपल्याला पाहायला मिळेल.

  • चंद्रपुरातील युवा नेते महेंद्र ढूमणे यांचा असंख्य कार्यकर्त्यांसह आम आदमी पक्षात प्रवेश

    चंद्रपुरातील युवा नेते महेंद्र ढूमणे यांचा असंख्य कार्यकर्त्यांसह आम आदमी पक्षात प्रवेश

    News34 chandrapur

    चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील युवा नेते महेंद्र ढूमणे यांनी आज आम आदमी पक्षात प्रवेश केला. आम आदमी पक्षाचे जिल्हाध्यक्ष मयूर राईकवार यांच्या नेतृत्वाखाली शंकर सरदार यांच्या उपस्थितीत त्यांनी पक्षात प्रवेश केला.

     

    यावेळी बोलताना महेंद्र ढूमने म्हणाले की, आम आदमी पक्ष हा एकच पक्ष आहे जो खऱ्या अर्थाने जनतेच्या हितासाठी काम करतो. दिल्ली, पंजाब आणि गोवा या राज्यांमध्ये आम आदमी पक्षाने केलेल्या कामांमुळे मी प्रभावित झालो आहे. त्यामुळे मी आम आदमी पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे.

     

    आम आदमी पक्षाचे जिल्हाध्यक्ष मयूर राईकवार म्हणाले की, महेंद्र ढूमणे यांचे आम आदमी पक्षात स्वागत आहे. ते एक अनुभवी आणि कार्यक्षम आहेत. त्यांचा पक्षात प्रवेश आम आदमी पक्षाला अधिक मजबूत करेल.

     

    त्यांच्या सोबत तेजस तिगुटला,वैभव पेचे,निलेश गायकवाड, गौरव पोहाकार,नेहल चिवडे, साहिल हजारे, सुरज मोरे, पवन म्हस्के,भवानी सिवी,संदीप वर्मा,श्री जोशी, मयूर इंगळे,गोलू कनोजिया,भवानी बैस, शुभम इंगळे,मनीष इंगळे,सोनू चिवडे,साईराम बल्की, आशु केमेकर, सुजित वर्मा,सुरज कानोजिया,बबलू मानकर,  सन्नी गिल,प्रवीण काळे,कृष्णा तीगुटला,सागर काळे, नंदू झाडे, चेतन पत्रकार, उदय तांड्रा,चिंटू पोगला, मंगेश मुंजेवार,नागेश गायकवाड,कैलाश गायकवाड, दिपक बहुरिया,आकाश भगत,अमित पोटे, अंकुश तडेल, अक्षय सोयाम यांनी प्रवेश केला. या वेळेस आम आदमी पक्षाचे पदाधिकारी सुरज शाह,सुमित हस्तक,नितीन बावणे, गणेश आडे इत्यादी उपस्थित होते.

     

    महेंद्र ढूमणे यांनी चंद्रपूर जिल्ह्यात अनेक युवकांचे संगठन उभे केले आहेत. ते अनेक युवकांच्या हक्कांसाठी लढा देत असतात.