Tag: पंचायत समिती

  • viral video of government employee playing cards । 🚨 चंद्रपूरमध्ये शासकीय कर्मचाऱ्याचा पत्ते खेळतानाचा व्हिडिओ व्हायरल!

    viral video of government employee playing cards

    viral video of government employee playing cards : चंद्रपूर – सरकारी कार्यालयांमध्ये कामचुकारपणाचे प्रकार नवीन नाहीत. मात्र, चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती येथील पंचायत समिती कार्यालयातून समोर आलेला एक व्हिडिओ सध्या चांगलाच चर्चेत आहे. या व्हिडिओमध्ये एक कर्मचारी आपल्या कामाच्या वेळेत, सरकारी संगणकावर चक्क पत्ते खेळताना दिसत आहे. एका जागरूक नागरिकाने हा प्रकार आपल्या मोबाईलमध्ये कैद करून सोशल मीडियावर शेअर केला. त्यानंतर प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

    चंद्रपूर भाजपची कार्यकारणी जाहीर, निष्ठावंत नाराज

    नेमका प्रकार काय घडला?

    व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये भद्रावती येथील पंचायत समिती कार्यालयातील एक कर्मचारी आपल्या खुर्चीवर बसून आहे. त्याच्यासमोर असलेल्या सरकारी संगणकाच्या स्क्रीनवर पत्त्यांचा खेळ सुरू असल्याचे स्पष्ट दिसत आहे. हा कर्मचारी पूर्णपणे खेळात मग्न असल्याचे व्हिडिओमध्ये दिसते. एका तरुणाने हा व्हिडिओ चित्रित केला आणि तो सोशल मीडियावर अपलोड केला. हा व्हिडिओ वेगाने व्हायरल झाल्यानंतर नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. सरकारी कार्यालयात जनतेच्या कामाऐवजी असे प्रकार घडत असल्याने जनतेच्या मनात प्रशासनाबद्दल नाराजी आहे. government employee playing cards at work

    माजी कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांचा व्हिडिओ चर्चेत असतानाच…

    काही दिवसांपूर्वीच माजी कृषीमंत्री माणिकराव कोकाटे हे विधानभवनात आपल्या मोबाईलवर रमी खेळत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यावेळी त्यांच्यावर चौफेर टीका झाली होती. आता चंद्रपूरमध्येही असाच प्रकार समोर आल्याने शासकीय कर्मचाऱ्यांच्या कार्यशैलीवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. नागरिकांनी संबंधित कर्मचाऱ्यांवर तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे. या घटनेमुळे सरकारी कार्यालयातील कामाच्या वेळेत होणाऱ्या गैरवापराबद्दल गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. या घटनेची प्रशासनाने दखल घेऊन योग्य ती कारवाई करणे अपेक्षित आहे.

  • chandrapur zilla parishad draft notification । 🗳️ चंद्रपूर जिल्हा परिषद निवडणूक: प्रभागांची यादी झाली जाहीर – तुमचं नाव कुठे आहे?

    chandrapur zilla parishad draft notification

    chandrapur zilla parishad draft notification : चंद्रपूर, दि. १५ : चंद्रपूर जिल्हा परिषद क्षेत्रातील निवडणूक विभागाची व त्याअंतर्गत पंचायत समित्यांमधील निर्वाचक गणाच्या प्रारुप प्रभाग बाबतीत निवडावयाची सभासद संख्या निश्चित केलेली आहे. त्यानुसार जि.प. निवडणूक विभाग 56 व  पंचायत समिती निर्वाचक गणांची प्रभाग रचना 112 करण्यात आली आहे. ward wise zilla parishad seats chandrapur district

    सांडपाणी पाईपलाईन नंतर रस्त्यांची झपाट्याने दुरुस्ती

    वरीलप्रमाणे निश्चित केलेल्या निवडणूक विभाग व निर्वाचक गण रचनेचे प्रारूप परिशिष्ट 5 (अ) व 5 (ब) मधील अधिसूचना व अनुसूची तयार करून ती शासन राजपत्रात, 14 जुलै 2025 रोजी जिल्हाधिकारी कार्यालय, तहसिल कार्यालय, जिल्हा परिषद कार्यालय, पंचायत समिती कार्यालयील सूचना फलक / संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. सदर प्रारूप प्रभाग रचनेवरील हरकती व सूचना 21 जुलै 2025 पर्यंत जिल्हाधिकारी /संबंधित तहसीलदार यांच्या कार्यालयात स्वीकारण्यात येणार आहे, असे उपजिल्हाधिकारी तथा उपजिल्हा निवडणूक अधिकारी यांनी कळविले आहे. zilla parishad election ward structure chandrapur

    अशी आहे जिल्ह्यातील निवडायची सदस्य संख्या : 

    सन 2011 च्या जनगणनेनुसार ग्रामीण भागातील एकूण लोकसंख्या 14 लक्ष 23 हजार 349 आहे. अनुसूचित जातीची लोकसंख्या 1 लक्ष 98 हजार 28 असून अनुसूचित जमातीची लोकसंख्या 3 लक्ष 18 हजार 373 अशी आहे.  जिल्ह्यातील जिल्हा परिषद निवडणूक विभाग 56 व पंचायत समिती निर्वाचक गणांची प्रभाग रचना 112 निश्चित करण्यात आली आहे.

    यात चिमूर (जि.प. सदस्य संख्या -5, पंचायत समिती सदस्य संख्या – 10), नागभीड (जि.प. सदस्य संख्या -4, पंचायत समिती सदस्य संख्या – 8), ब्रम्हपुरी (जि.प. सदस्य संख्या -5, पंचायत समिती सदस्य संख्या – 10), सिंदेवाही (जि.प. सदस्य संख्या -4, पंचायत समिती सदस्य संख्या – 8), भद्रावती (जि.प. सदस्य संख्या -4, पंचायत समिती सदस्य संख्या – 8), वरोरा (जि.प. सदस्य संख्या -5, पंचायत समिती सदस्य संख्या – 10), चंद्रपूर (जि.प. सदस्य संख्या -5,

     पंचायत समिती सदस्य संख्या – 10), मूल (जि.प. सदस्य संख्या -3, पंचायत समिती सदस्य संख्या – 6), सावली (जि.प. सदस्य संख्या -4, पंचायत समिती सदस्य संख्या – 8), पोंभुर्णा (जि.प. सदस्य संख्या -2, पंचायत समिती सदस्य संख्या – 4), गोंडपिपरी (जि.प. सदस्य संख्या -3, पंचायत समिती सदस्य संख्या – 6), बल्लारपूर (जि.प. सदस्य संख्या -2, पंचायत समिती सदस्य संख्या – 4), कोरपना (जि.प. सदस्य संख्या -4, पंचायत समिती सदस्य संख्या – 8), जिवती (जि.प. सदस्य संख्या -2, पंचायत समिती सदस्य संख्या – 4) आणि राजूरा (जि.प. सदस्य संख्या -4, पंचायत समिती सदस्य संख्या – 8) अशी आहे.