Tag: निषेध मोर्चा

  • Chandrapur protest July 3 । 💥 धर्मगुरूंविरोधात बोलणाऱ्या आमदाराविरुद्ध चंद्रपूर ख्रिश्चन समाज आक्रमक!

    Chandrapur protest July 3

    Chandrapur protest July 3 चंद्रपूर – राज्याच्या राजकारणात सत्ताधारी मंत्री असो कि आमदार सध्या ते विविध जातीधर्माबाबत बेताल वक्तव्य करत सुटले आहे, याचं प्रत्यक्ष उदाहरण म्हणजे भाजपचे जत विधानसभा मतदारसंघाचे आमदार गोपीचंद पडळकर, यांच्यावर कठोर कारवाई करीत आमदारकी रद्द करण्याची मागणी चंद्रपूर ख्रिश्चन समाजाच्या वतीने करण्यात आली आहे. याकरिता ३ जुलै रोजी चंद्रपुरात संत अँड्रयूज चर्च ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत निषेध मोर्चा काढण्यात येणार आहे. सदर निषेध मोर्च्याचे आयोजन चंद्रपूर जिल्हा पास्टर्स असोसिएशन तर्फे करण्यात येत आहे. Gopichand Padalkar controversial speech

    आयटीआय नंतर थेट नोकरी, ७० जणांना मिळाला रोजगार

    प्रकरण काय?

    सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यातील कुपवाड येथे ऋतुजा राजगे नावाच्या गर्भवती तरुणीने आत्महत्या केली. या प्रकरणात धर्मांतरासाठी सासरच्या लोकांनी छळ केल्याचा आरोप आहे. या घटनेच्या निषेधार्थ आयोजित मशाल मोर्चादरम्यान गोपीचंद पडळकर यांनी ख्रिश्चन धर्मगुरूंविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केले. त्यांनी “धर्मांतरासाठी गावात येणाऱ्या ख्रिश्चन पाद्रींना सैराट करा, आणि जो हे करेल त्याला मी स्वतः ११ लाखांचे बक्षीस देईन” असे विधान केले. या वक्तव्याने ख्रिश्चन समाजात संताप आणि भय निर्माण झाले असून, त्यांनी याला हिंसाचाराला चिथावणी देणारे वक्तव्य ठरवले आहे.

    सैराट गेम करा

    धर्मगुरूंना ठार मारणाऱ्याला, त्याचा सैराट गेम करणाऱ्यास अकरा लाख रुपयांचे बक्षीस त्यांनी सभेत जाहीर केले आहे. त्यांच्या या बेताल वक्तव्यामुळे धर्मगुरूंची समाजविघातक व्यक्तीकडून हत्या होऊ शकते. त्यामुळे धर्मगुरूंच्या जीवाचे काही बरे वाईट झाल्यास त्यास गोपीचंद पडळकर जबाबदार असतील. जनतेतून निवडून आलेला आमदारच अशी बेताल भाषणे करून ख्रिश्चन समाजाबद्दल गरळ ओकत असेल तर त्याला आमदारपदी राहण्याचा अजिबात अधिकार नाही. Christian protest Chandrapur 2025

    राज्यातील सत्ताधारी लोकप्रतिनिधी विविध समाजात तेढ निर्माण करीत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे, काही वाद झाला तर एका समाजाला टार्गेट करण्याचे काम या सत्ताधारी पक्षांकडून केल्या जात आहे, समाजाने विरोध दर्शविला तर माफी मागून प्रकरण शांत केल्या जाते मात्र सरकारतर्फे अश्या बेताल वक्तव्य करणाऱ्या लोक प्रतिनिधींवर कारवाई केल्या जात नाही. सध्या राज्यात आमदार गोपीचंद पडळकर यांच्या विरोधात ख्रिश्चन समाज एकजुटीला उभा झाला असून राज्यात आंदोलनाची शृंखला सुरु करण्यात आली असून या श्रुंखलेत चंद्रपुरातील ख्रिश्चन बांधवांतर्फे निषेध मोर्चा काढण्यात येणार आहे, या मोर्च्यात समाजातील बांधवानी मोठ्या संख्येत उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे.

  • Doctor transfer : डॉक्टरसाठी शेकडो नागरिकांनी काढला निषेध मोर्चा

    Doctor transfer : डॉक्टरसाठी शेकडो नागरिकांनी काढला निषेध मोर्चा

    doctor transfer गडचांदूर येथील डॉक्टर प्रवीण येरमे यांचा कार्यकाळ पूर्ण होण्यापूर्वी त्यांची अचानक बदली झाल्याने नागरिकांनी याविरोधात निषेध मोर्चा काढला.

    Doctor transfer गडचांदूर येथील ग्रामीण रुग्णालयात कार्यरत वैद्यकीय अधिकारी डॉक्टर प्रवीण येरमे यांची कार्यकाळ पूर्ण होण्यापूर्वी बदली केल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे, सामाजिक कार्याची जाणं ठेवणारे व प्रत्येक रुग्णाच्या मदतीला नेहमी तत्पर असणाऱ्या डॉक्टरांची अचानक बदली का केली म्हणून स्थानिक एससी, एसटी व ओबीसी बांधवांनी निषेध मोर्चा काढला.

    निषेध मोर्चा

    ही बदली राजकीय उद्देशातून करण्यात आल्याचा निषेधार्थ गडचांदूर शहरात आदिवासी समाजाकडून भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. या मोर्चात कोरपना, जिवती या तालुक्यातील मोठ्या संख्येने आदिवासी समाजतील पुरुष, महिला ,तरुण, लहान मुले सहभागी झाले होते. डॉ. प्रवीण येरमे यांची बदली तत्काळ रद्द करा अशी यावेळी मोर्चा द्वारे मागणी करण्यात आली.
    एखाद्या अधिकाऱ्याच्या बदली विरोधात मोर्चा निघण्याची पहिली वेळ असल्यामुळे हा मोर्चा गडचांदुर शहरात लक्षवेधी ठरला होता.

    अवश्य वाचा : ओयो बाबत चंद्रपूर मनसे आक्रमक, सर्व ओयो हॉटेल्सची चौकशी करा

    कोण आहे डॉक्टर प्रवीण येरमे?

    संघर्षमय जीवनाचा प्रवास करीत MBBS, MD पदवी घेऊन वैद्यकीय सेवेत रुजू झालेले प्रवीण येरमे यांना सामाजिक कार्याची चांगलीच जाण आहे, ज्या आदिवासी क्षेत्रात शासनाच्या वैद्यकीय सेवा देण्यासाठी अनेकजण नकार देतात त्या भागात डॉ येरमे स्वतः पोहचत त्यांनी वैद्यकीय सेवा दिली, अतिदुर्गम आदिवासी व दलित मागास समाजात डॉ येरमे यांनी आपल्या माध्यमातून जनजागृती करण्याचे काम केले आहे, वैद्यकीय सेवेचे महत्व व शिक्षणाचे काय महत्व आहे हे पटवून देण्याचे काम डॉ येरमे यांनी केले आहे, मात्र त्यांची अचानक पणे बदली करीत प्रशासनाने कुठेतरी राजकीय दबावाला बळी पडत वैद्यकीय सेवेपासून मागासलेल्या समाजाला पोरकं करण्याचे काम केले आहे.

  • विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचा शिवसेना ठाकरे गटाने केला निषेध

    विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचा शिवसेना ठाकरे गटाने केला निषेध

    News34 chandrapur

    चिमूर :- गुणवंत चटपकार

    विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी पक्षपाती धोरण अवलंबून चुकीचा निर्णय दिल्यामुळे शिवसेना चिमूर विधानसभा क्षेत्राच्या वतीने अतिरिक्त जिल्हाधिकारी कार्यालय वर मोर्चा काढून राहुल नार्वेकर याचा निषेध करण्यात आला.

     

    महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिनांक १० जानेवारी रोजी लोकशाहीचा अंत करू पाहणारा निकाल दिल्याने शिवसैनिकानमध्ये आक्रोश निर्माण झाला आणि आक्रोषाचे रूपांतर मोर्चात झाले. आज दिनांक १२ जाणेवारी रोजी शिवसेना उपजिल्हा प्रमुख प्रशांत कोल्हे यांच्या नेतृत्वात. महिला आघाडी जिल्हा प्रमुख नर्मदा बोरीकर, युवती सेना जिल्हा अधिकारी प्रतिभा मांडवकर, विधानसभा समन्वयक भाऊराव ठोंबरे, संघटक भाऊराव डांगे यांचे प्रमुख उपस्थितीत श्रीहरी बालाजी देवस्थान येथून राहुल नार्वेकर यांनी पक्षपाती निर्णय जाहीर केल्याने अतिरिक्त जिल्हाधिकारी कार्यालय पर्यंत निषेध मोर्चा काढण्यात आला.

     

    अतिरिक्त जिल्हाधिकारी कार्यालय समोर राहुल नार्वेकर यांच्या प्रतिमेला बेश्रमच्या फुलाचा हार टाकून. प्रतिमा जाळत निषेध व्यक्त केला. यावेळी महिला आघाडी जिल्हा प्रमुख नर्मदा बोरीकर. उपजिल्हा प्रमुख प्रशांत कोल्हे यांनी मोर्चाला संबोधित केले. तर आभार प्रदर्शन तालुका प्रमुख श्रीहरी सातपुते यांनी व्यक्त केले.

     

    यावेळी तानाजी सहारे, शहर प्रमुख नितीन लोणारे, सुनील हिंगनकर, वरोरा महिला आघाडी तालुका प्रमुख सरला मालोकर, वरोरा विधानसभा युवा अधिकारी अभिजित कुडे, किशोर उकुंडे, राजेंद्र जाधव, विनायक मुंगले, चिमूर तालुका अधिकारी शार्दुल पचारे. सहित शेकडो शिवसैनिक उपस्थित होते.

  • हिट अँड रन कायदा रद्द करा, चंद्रपुरात वाहन चालकांचा निषेध मोर्चा

    हिट अँड रन कायदा रद्द करा, चंद्रपुरात वाहन चालकांचा निषेध मोर्चा

    News34 chandrapur

    चंद्रपूर : पूर्वीच्या हिट ॲण्ड रन कायद्यात सुधारणा करून नवीन हिट ॲण्ड रन कायदा २०२३ गृहमंत्री अमित शहा यांनी आणला आहे. हा कायदा देशभरातील वाहनचालकांसाठी अन्यायकारक असून, लहानमोठ्या अपघातात वाहनचालक भरडले जाणार आहे.

     

    अनेकदा वाहनचालकांनी चुकी नसतानाही अपघात होतात. मात्र, अशावेळी मोठ्या वाहनचालकांना दोषी ठरविले जाते. नवीन कायद्यामध्ये मोठ्या शिक्षेची आणि दंडाची तरतूद करण्यात आल्याने हा कायदा रद्द यावा या मागणीसाठी अनैशा वाहन चालक कामगार संघटनेच्या वतीने शनिवार ३० डिसेंबर रोजी गांधी चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत निषेध रॅली काढली, या रॅलीत असंख्य वाहन चालक सहभागी झाले होते.

     

    यापूर्वी अपघातातील दोषींना शिक्षा देण्यासाठी विविध कलमे अस्तित्वात आहे. शिवाय मोटार वाहन कायदा अस्तित्वात आहे. असे असतानाही सुधारित हिट ॲण्ड रन कायद्यात नव्याने कलम ३०२ म्हणजे हत्येचे कलम समाविष्ट करण्यात आले आहे. नव्या कायद्यानुसार १० वर्ष कारावासाची शिक्षा, २ लाख ते १० लाख रुपयेपर्यंत दंड अशी तरतूद करून हा कायदा २० डिसेंबर २०२३ रोजी संसदेत पारीत करण्यात आला आहे.

     

    अनेक अपघात अचानक झालेले असतात. अशोवळी मोठ्या वाहनाचे वाहनचालक नाहक भरडले जातात. त्यामुळे हा कायदा रद्द करण्याची मागणी आंदोलनाच्या माध्यमातून करण्यात येणार असल्याचे उपरे यांनी सांगितले. देशाच्या अर्थव्यवस्थेत वाहनचालकांचा मोठा वाटा असताना त्यांच्यावर अन्यायकरणारे कायदे खपवून घेतले जाणार नाही, असा इशारा यावेळी देण्यात आला. या निषेध रॅलीत वाहनचालकांनी मोठ्या संख्येत सहभाग दर्शविला.

    New year 2024 ad
    अशोक जीवतोडे यांच्याकडून देशवासियांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा..