Tag: नाट्यकुंभ महावितरण

  • mahadiscom drama competition winners । चंद्रपूरच्या ‘रंग बावरी’ने मारली बाजी; महावितरण नाट्यकुंभात सहा प्रथम पुरस्कार!

    mahadiscom drama competition winners

    mahadiscom drama competition winners : चंद्रपूर, दि. 5 मे 2025: महावितरणच्या नागपूर प्रादेशिक आंतरपरिमंडलीय नाट्यस्पर्धेत चंद्रपूर परिमंडलाच्या ‘रंग बावरी’ या नाटकाने उत्कृष्ट अभिनयासह सर्वोत्कृष्ट नाटकाचा मान पटकावला. दोन दिवस रंगलेल्या या नाट्यकुंभ-2025 मध्ये ‘रंग बावरी’ने विविध गटांमध्ये तब्बल सहा प्रथम पुरस्कारावर आपली मोहोर उमटवली. अकोला परिमंडलाच्या ‘सिकॅरिअस’ या नाटकाने उपविजेतेपद मिळवले. mahadiscom natya spardha 2025 results

    ७ मे रोजी महावितरणचा लकी ड्रा

    या स्पर्धेतील विजेत्या कलाकारांना महावितरणचे संचालक (संचलन) अरविंद भादिकर आणि संचालक (प्रकल्प) प्रसाद रेशमे यांच्या हस्ते गौरविण्यात आले. नागपूर परिक्षेत्राचे प्रादेशिक संचालक परेश भागवत, मुख्य अभियंता सर्वश्री सुहास रंगारी, दिलीप दोडके, ज्ञानेश कुलकर्णी, राजेश नाईक आणि स्वागताध्यक्ष हरिश गजबे यांच्यासह नाट्य परिक्षक विनोद दुर्गेपुरोहित, जयदेव सोमनाथे, अँड. चैताली बोरकुटे यांसारखे मान्यवर उपस्थित होते. sicarius drama play review

    जय – पराजय हा स्पर्धेचा भाग

    या सोहळ्यात बोलताना संचालक अरविंद भादिकर यांनी नाट्य कलाकारांचे कौतुक केले आणि स्पर्धेनंतरही त्यांनी एकमेकांशी संवाद कायम ठेवण्याचे आवाहन केले. अपयश आले तरी निराश न होता प्रयत्न सुरू ठेवण्याचा संदेश त्यांनी दिला. संचालक प्रसाद रेशमे म्हणाले, “जय-पराजय हा स्पर्धेचा भाग असला तरी, कलाकारांनी आपली कला सादर करताना मिळवलेला आनंद आणि रसिकांना दिलेला आनंद हेच त्यांचे खरे पारितोषिक आहे.” स्पर्धेचे अध्यक्ष तथा प्रादेशिक संचालक परेश भागवत यांनी नाटकांच्या माध्यमातून केवळ आनंदच नव्हे, तर अनेक अनुभव मिळाल्याचे मत व्यक्त केले. chandrapur mahadiscom drama winner

    कर्मचाऱ्यांनी आपली कला जोपासली

    नाट्यकुंभ-2025 चे उद्घाटन महावितरणचे संचालक (मानव संसाधन) राजेंद्र पवार यांच्या शुभहस्ते झाले होते. यावेळी बोलतांना त्यांनी महावितरणमधील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या दैनंदिन कामातील या अनमोल अनुभवांना नाट्यकृतींच्या माध्यमातून समाजासमोर आणावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. महावितरण एक मोठा परिवार आहे आणि या कुटुंबातील सदस्यांमध्ये अनेक उत्कृष्ट कलागुण दडलेले आहेत. दैनंदिन कामाचा व्याप सांभाळूनही कर्मचाऱ्यांनी आपली कला जोपासली आहे, हे कौतुकास्पद आहे. ‘नाट्यकुंभ’ सारख्या स्पर्धांमुळे या कलाकारांना त्यांची प्रतिभा सादर करण्याची संधी मिळते. यासोबतच, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमध्ये सुसंवाद वाढतो आणि सांघिक भावना अधिक दृढ होते, असे मत त्यांनी व्यक्त केले. आपल्या भाषणातून राजेंद्र पवार यांनी विदर्भातील नाट्य परंपरेचाही विशेष उल्लेख केला. mahadiscom natya spardha 2025 results

    chandrapur mahadiscom drama winner

    चंद्रपूर परिमंडलाचे मुख्य अभियंता हरिश गजबे यांनी निर्मिती केलेल्या, श्रीपाद जोशी लिखित आणि संध्या चिवंडे दिग्दर्शित ‘रंग बावरी’ या नाटकाने रसिकांच्या मनाचा ठाव घेतला. तर, अकोला परिमंडलाचे मुख्य अभियंता राजेश नाईक निर्मित, डॉ. चंद्रकांत शिंदे लिखित आणि नितीन नांदुरकर दिग्दर्शित ‘सिकॅरिअस’ या सस्पेन्स थ्रिलर नाटकाने प्रेक्षकांना खिळवून ठेवले. नागपूर परिमंडलाचे मुख्य अभियंता दिलीप दोडके निर्मित, प्रदीप फाटक लिखित आणि हेमराज ढोके दिग्दर्शित ‘ये रे घना’ आणि गोंदिया परिमंडलाचे मुख्य अभियंता सुहास रंगारी निर्मित, अतुल साळवे लिखित व राजेंद्र गिरी दिग्दर्शित ‘दि ॲनॉनिमस’ या नाटकांनाही रसिकांचा चांगला प्रतिसाद लाभला.

    या नाट्यस्पर्धेसाठी अकोला, अमरावती, नागपूर, चंद्रपूर आणि गोंदिया परिमंडलातील वरिष्ठ अधिकारी आणि नाट्यप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

    नाट्यस्पर्धेचे विजेते

    स्पर्धेचा अंतिम निकाल:
    • सर्वोत्तम नाटक:
    o प्रथम: ‘रंग बावरी’ (चंद्रपूर परिमंडल)
    o द्वितीय: ‘सिकॅरिअस’ (अकोला परिमंडल)
    • दिग्दर्शन:
    o प्रथम: संध्या चिवंडे (‘रंग बावरी’)
    o द्वितीय: नितीन नांदुरकर (‘सिकॅरिअस’)
    • अभिनय (पुरुष):
    o प्रथम: गणेश राणे (रघुपती – ‘सिकॅरिअस’)
    o द्वितीय: सुमित खोरगडे (सुभाष – ‘ये रे घना’)
    • अभिनय (स्त्री):


    o प्रथम: रोहिणी ठाकरे (नेहा – ‘रंग बावरी’)
    o द्वितीय: स्नेहांजली तुंबडे (स्मिता – ‘ये रे घना’)
    • नेपथ्य:
    o प्रथम: रमेश सानप (‘रंग बावरी’)
    o द्वितीय: गजानन जैवाल (‘दि ॲनॉनिमस’)
    • प्रकाश योजना:
    o प्रथम: प्रकाश खांडेकर (‘रंग बावरी’)
    o द्वितीय: विवेकानंद वाध (‘सिकॅरिअस’)
    • पार्श्वसंगीत:
    o प्रथम: राकेश बोरोवार (‘रंग बावरी’)
    o द्वितीय: योगेश सोनुने (‘सिकॅरिअस’)
    • रंगभूषा-वेशभूषा:
    o प्रथम: पौर्णिमा कदम (‘सिकॅरिअस’)
    o द्वितीय: आनंद जैं (‘दि ॲनॉनिमस’)
    • उत्तेजनार्थ पारितोषिक:
    o सामली सायंकाळ (मेधना – ‘रंग बावरी’)
    o अमित पेढेकर (डॉ. विध्वंस – ‘ये रे घना’)
    o नावेद शेख (जरासंघ – ‘दि ॲनॉनिमस’)
    o संतोष पाटील (इन्स्पेक्टर कश्यप – ‘सिकॅरिअस’)

  • Msedcl Employee Theater Competition । नाट्यकुंभ २०२५: महावितरणच्या कर्मचाऱ्यांचा कलाविष्कार

    Msedcl Employee Theater Competition

    Msedcl Employee Theater Competition : चंद्रपूर – विदर्भापासून कोकणापर्यंत सव्वा तीन कोटी वीजग्राहकांना वर्षातील प्रत्येक दिवस व दिवसाच्या प्रत्येक मिनिटाला महावितरणकडून सेवा दिली जाते. या सेवेत चांगले किंवा वाईट असे बरेच नाट्यपूर्ण अनुभव अधिकारी व कर्मचाऱ्यांना येतात. या नाट्यपूर्ण अनुभवांना समाजासमोर मांडण्यासाठी नाट्यकृतींमध्ये स्थान मिळावे अशी अपेक्षा महावितरणचे संचालक (मानव संसाधन) श्री. राजेंद्र पवार यांनी केले. corporate drama festival

    चंद्रपूर व गडचिरोली विभागाचे ३६ कर्मचारी ठरले ‘गौरवशाली कामगार’

    महावितरणच्य ‘नाट्यकुंभ २०२५’ या नागपूर प्रादेशिकस्तरीय आंतरपरिमंडलीय नाट्यस्पर्धेचे उद्घाटन आज, दि. २ मे रोजी संचालक श्री. पवार यांच्याहस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि महावितरणच्या नागपूर परिक्षेत्राचे प्रादेशिक संचालक श्री परेश भागवत, मुख्य अभियंते सर्वश्री सुहास रंगारी, दिलीप दोडके, राजेश नाईक, नाट्यस्पर्धेचे स्वागताध्यक्ष श्री हरीश गजबे, परिक्षक श्री विनोद दुर्गेपुरोहित, श्री जयदेव सोमनाथे, अँड चैताली बोरकुटे आदी मान्यवर उपस्थित होते. internal drama competition

    महावितरण फार मोठा परिवार आहे. आपल्या परिवारात अनेकजणांकडे उत्तम कलागुण आहेत. महावितरणचे दैनंदिन काम सांभाळून त्यांनी हे कलागुण जपले आहेत. नाट्यस्पर्धेमुळे आपल्यातील कलाकारांना आपली क्षमता सादर करण्याची संधी मिळते. अशा स्पर्धांमुळे महावितरणमध्ये अधिकारी व कर्मचा-यांमध्ये सुसंवाद वाढतो, टीम स्पिरिट बळकट होते. असे सांगताना श्री पवार पुढे म्हणाले की, महावितरणचे काम अखंड चालणारे आहे. विदर्भापासून कोकणापर्यंत पसरलेल्या महाराष्ट्राच्या विशाल भूमीवरील कोट्यवधी ग्राहकांना महावितरण सेवा देते. employee cultural event

    वर्षातील प्रत्येक दिवस आणि दिवसाच्या प्रत्येक मिनिटाला आपण लोकाना सेवा देत असतो. आपल्या कामातही अनेक नाट्यपूर्ण अनुभव येतात. आपल्या कामात जनतेची सेवा करताना आलेल्या नाट्यपूर्ण अनुभवांनाही आपण समाजासमोर मांडले पाहिजे. असेही ते म्हणाले.

    विदर्भाला नाट्यकलेची खूप मोठी परंपरा आहे. कालिदासापासून ते महेश एलकुंचवारांपर्यंत नाट्‌यकलेला उतम योगदान देणारे अनेक नाटककार विदर्भाच्या भूमीत झाले आहेत. रामटेकला कालिदास, भंडारा जिल्ह्यात भवभूती, वाशीमला राजशेखर, अंभोऱ्याला मुकुंदराज, रिद्धपूरला चक्रधर स्वामी या साऱ्यांनी नाट्यपरंपरेला बळ देणारे लेखन केले आहे. मराठीतील दोन दिग्गज नाटककार श्रीपाद कृष्ण कोल्हटकर व राम गणेश गडकरी या दोघांचेही आयुष्याच्या उत्तरार्धातील वास्तव्य विदर्भात होते. internal drama competition

    स्वातंत्र्यपूर्व काळातील वीर वामनराव जोशी यांचे ‘रणदुंदुभी’ हे नाटक महाराष्ट्रभर गाजले होते. झाडीपट्टी हा पूर्व विदर्भातील लोकप्रिय नाट्य प्रकार आहे, भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर आणि गोंदिया जिल्ह्यातील झाडीप‌ट्टीला देखील सुमारे दीडशे वर्षांची दीर्घ परंपरा लाभली आहे. लोकसंस्कृतीचा भाग असलेली दंडार आणि नंतरची झाडीपट्टी हा विदर्भाचा अपूर्व ठेवा ठरला आहे. नागपूरच्या दलित रंगभूमीनेही उत्तम काम केले आहे. अशा या पूर्व विदर्भामध्ये समृद्ध नाट्य परंपरेच्या वातावरणात ही स्पर्धा होत असल्याचे त्यांनी सांगितले. msedcl employee theatre competition

    महावितरणचे काम है तांत्रिक स्वरुपाचे असते. पण केवळ तांत्रिक ज्ञान पुरत नाही. आपल्याला जनतेला थेट सेवा द्यायची असते. त्यामुळे लोकांशी व्यवहार करताना संभाषण कला उपयुक्त ठरते. काही वेळा काही अधिकारी संकट प्रसंगी नाट्यकलाही वापरतात. दररोज तांत्रिक कामे करतानाही आपले कलागुण जोपासणाऱ्या महावितरणच्या सर्व अधिकाऱ्यांना व कर्मचाऱ्यांना श्री पवार यांनी यावेळी शुभेच्छा दिल्या.

    internal drama competition

    आपल्या अध्यक्षीय भाषणात श्री परेश भागवत यांनी अशा स्पर्धांमुळे सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमध्ये संवाद वाढत असल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक हरीश गजबे यांनी केले.

    चंद्रपूर येथील प्रियदर्शनी इंदिरा गांधी सांस्कृतिक सभागृह, येथे आयोजीत करण्यात करण्यात आलेल्या या दोन दिवसीय नाट्य महोत्सवात महावितरणच्या चंद्रपूर, नागपूर, गोंदिया आणि अकोला परिमंडलांचे नाट्यसंघ सहभागी झाले आहेत. या स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ शनिवार, दि. ३ मे २०२५ रोजी सायंकाळी ५.३० वाजता महावितरणचे संचालक (संचालन) अरविंद भादिकर यांच्या शुभहस्ते पारितोषिक वितरण समारंभ पार पडेल. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नागपूर परिक्षेत्राचे प्रादेशिक संचालक परेश भागवत असतील. त्यावेळी संचालक (वाणिज्य) श्री योगेश गडकरी, संचालक (वित्त) श्री अनुदिप दिघे आणि संचालक (मानव संसाधन) श्री राजेण्द्र पवार, संचालक (प्रकल्प) श्री प्रसाद रेशमे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील. msedcl employee theatre competition

    या दोन दिवसीय नाट्य स्पर्धेत आज चंद्रपूर परिमंडलाने श्रीपाद जोशी लिखित ‘रंगबावरी’ तर नागपूर परिमंडलाने प्रदीप फाटक लिखित ‘ये रे घना’ चा नाट्यप्रयोग सादर केला, तर उद्या गोंदिया परिमंडल अतुल साळवे यांच्या ‘दि ॲनॉनीमस’ तर अकोला परिमंडल डॉ. चंद्रकांत शिंदे लिखित ‘सिकॅरिअस’ हे नाटक सादर करणार आहेत.