Tag: देहव्यापार

  • illegal sex trade police action । चंद्रपूर शहरात घरातचं सुरु होता देहव्यापार, गुन्हे शाखेची धाड

    illegal sex trade police action

    illegal sex trade police action : चंद्रपूर – चंद्रपूर जिल्ह्यासह शहर आता गुन्हेगारीचे केंद्रबिंदू बनले आहे, अवैध दारू, बनावट दारू, गांजा, एमडी पावडर असे मादक पदार्थ जिल्ह्यात सहज उपलब्ध होत असून पोलीस विभागाच्या अटकेपासून अजूनही या गुन्हेगारी क्षेत्राचे मुख्य सूत्रधार लांब आहे. या पार्श्वभूमीवर स्थानिक गुन्हे शाखेने देह व्यापाराचा पर्दाफाश केला आहे.

    चंद्रपुरात संतापजनक घटना

    १९ ऑगस्ट रोजी स्थानिक गुन्हे शाखेला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे शहरातील मुक्ती नगर मच्छीनाला भागात एका इसमाच्या घरी पोलिसांनी धाड मारली, यावेळी घराची पाहणी केली असता तिथे एक महिला पोलिसांना आढळून आली, महिलेची विचारपूस केली असता तिच्याकडून इसम देह व्यापार करवून घेत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. Chandrapur crime branch prostitution bust

    पिटा अनव्ये गुन्हा दाखल

    ३१ वर्षीय अमर शशिकांत द्विवेदी हा स्वतःच्या आर्थिक फायद्याकरिता महिलेकडून देह व्यापार करवून घेत होता, सदर महिलेची सुटका करीत आरोपी अमर द्विवेदी वर रामनगर पोलीस स्टेशनमध्ये कलम ३,४,५,७ महिला व मुलींचे अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियम आणि पिटा अन्व्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास रामनगर पोलीस करीत आहे.

    सदरची कारवाई पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या नेतृत्वात सपोनि बलराम झाडोकार, पोउपनि संतोष निंभोरकर, पोउपनि सर्वेश बेलसरे, पोलीस कर्मचारी धनराज करकाडे, चेतन गज्जलवार, सुरेंद्र महतो, प्रफुल गारघाटे, सुमित बरडे, शशांक बदामवार, छाया निकोडे, अपर्णा मानकर, उषा लेडांगे, विजयमाला वाघमारे, निराशा तितरे व मिलिंद टेकाम यांनी केली.

  • minor girl rescued from sex trafficking । चंद्रपूरमध्ये अल्पवयीन मुलीला देहव्यापारात ढकलणाऱ्या महिलेवर पोलिसांची कारवाई

    minor girl rescued from sex trafficking

    minor girl rescued from sex trafficking : १७ वर्षाच्या मुलीला देह व्यापारात ढकलणाऱ्या महिलेला चंद्रपूर शहर पोलिसांनी १३ मे रोजी गौतम नगर परिसरातून अटक केली. आरोपी महिलेवर महिला व मुलींचे अनैतिक व्यापार प्रतिबंध कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. sex trafficking case Chandrapur 2025

    महावितरणचे चंद्रपुरातील बाबुपेठ मध्ये ब्लॅकआउट

    शहरात अल्पवयीन मुलीकडून देहव्यापार करवून घेत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली, माहितीच्या आधारे शार पोलिसांनी शोधमोहीम राबवित गौतमनगर, महाकाली वार्ड येथे अमीना नावाच्या महिलेची खोली शोधली असता त्याठिकाणी १७ वर्षाची अल्पवयीन मुलगी पोलिसांना आढळली.

    पोलिसांनी त्या महिलेची चौकशी केली असता तिने सांगितले कि अमीना नावाच्या महिलेच्या सांगण्यावरून देहव्यापार करते, पोलिसांनी तात्काळ अमीना सैय्यद या महिलेवर गुन्हा दाखल करीत अटक केली.

    सदरची यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक रीना जनबंधू, उपविभागीय पोलीस अधिकारी सुधाकर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रभावती एकुरके यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक संदीप बच्छीरे, पोलीस कर्मचारी भावना रामटेके, सचिन बोरकर, संतोष कणकम, संजय घोटे, कपूरचंद खैरवार, इम्रान खान, इर्शाद खान, दिलीप कुसराम, राजेश चिताडे, विक्रम मेश्राम, रुपेश पराते, सारिका गौरकार व दीपिका झिंगरे यांनी केली.