local crime branch liquor bust
local crime branch liquor bust : बल्लारपूर – १ जुलै रॉजी चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेने दीड लाख रुपयांच्या दारूसहीत २३ लक्ष ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. सदर अवैध दारू हि चंद्रपुरवरून दारूबंदी जिल्हा गडचिरोली मध्ये जात असल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी या प्रकरणी एका आरोपीला अटक केली असून एकजण फरार झाला आहे.
चंद्रपुरात गुंतवणुकीच्या नावावर मोठी फसवणूक
दारूबंदी गडचिरोली जिल्ह्यात दारू पोहचविण्यासाठी अनेक दारू माफिया सततपणे कार्यरत असून त्यांचं नेटवर्क अनेक काळापासून सुरु आहे, चंद्रपूर पोलीस (chandrapur police) या नेटवर्कच्या मुसक्या आवळण्याचे काम करीत असून या श्रुंखलेत चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली आहे. how police crack liquor smuggling networks
चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर तालुक्यातून गडचिरोली जिल्ह्यात दारूची वाहतूक होणार असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती, माहितीच्या आधारे पोलिसांनी कळमना गावाजवळ नाकाबंदी केली, त्यावेळी स्कॉर्पियो वाहन क्रमांक MH३४CJ६५७६ आले असता पोलिसांनी सदर वाहन थांबवित त्याची झडती घेतली, त्या वाहनात देशी विदेशी दारूचा साठा आढळून आला.
तसेच सदर दारू वाहतूक यशस्वी होण्यासाठी पायलेटिंग करण्याकरिता चारचाकी वाहन टाटा अल्ट्रोज क्रमांक MH३४ CJ७३३७ चा चालक पोलिसांना बघून पळून गेला.
स्थानिक गुन्हे शाखेच्या कारवाईत जप्त करण्यात आलेला मुद्देमाल
देशी दारू रॉकेट संत्रा ३ हजार ८०० निपा किंमत १ लाख ३३ हजार, बिअर हेवर्डस ५०००च्या ७२ टिन किंमत ९ हजार ३६० व विदेशी दारू इम्पेरिअल ब्लु च्या ४८ निपा किंमत ८ हजार १६०, चारचाकी वाहन २ किंमत एकूण एकूण मुद्देमाल २३ लक्ष ५० हजार ५२० रुपये. सदर कारवाईत ३५ वर्षीय नितीन राजन कुंडे राहणार राजेंद्रप्रसाद वॉर्ड बल्लारपूर याला अटक करण्यात आली असून सिद्धार्थ उर्फ बापू भास्कर रंगारी राहणार कारवा रोड रवींद्रनगर वार्ड बल्लारपूर याचा शोध घेणे सुरु आहे.
सदरची यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा अमोल काचोरे यांच्या नेतृत्वात सपोनि दीपक कांक्रेडवार, पोलीस कर्मचारी स्वामीदास चालेकर, किशोर वैरागडे, अजय बागेसार, प्रमोद कोटनाके, गोपीनाथ नरोटे व शेखर माथनकर यांनी केली.