Tag: देशी पिस्टल

  • country made gun recovered by police । 🚔 गुन्हा घडण्याआधीच धडक कारवाई – देशी पिस्तूलसह आरोपी पकडला!

    country made gun recovered by police

    country made gun recovered by police : चंद्रपूर \ मूल – मूल पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने एका आरोपीजवळून देशी बनावटीची पिस्टल सहित दोन जिवंत काडतूस सहित १ लक्ष ३० हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

    ३० जून रोजी गुन्हे शोध पथक गस्तीवर असताना सायंकाळी ४ वाजेदरम्यान महाबीज केंद्रजवळ मूल ते ताडाला मार्गावर २६ वर्षीय गौरव नितीन नरुले राहणार वार्ड क्रमांक १२ मूल याला ताब्यात घेत त्याची झडती घेतली असता त्याचे जवळून देशी बनावटीचे लोखंडी पिस्टल, दोन जिवंत काडतूस व दोन मॅगझीन विनापरवाना आढळले.

    कुख्यात गुन्हेगाराला चंद्रपूर पोलिसांनी केले स्थानबद्ध

    पोलिसांनी गौरव नरुले ला ताब्यात घेत चौकशी केली असता तो भविष्यात गंभीर स्वरूपाचा गुन्हा करण्याच्या तयारीत होता अशी माहिती प्राप्त झाली. देशी पिस्टल, काडतूस व दुचाकी वाहन असा एकूण १ लक्ष ३० हजार रुपयांचा मुद्देमाल मूल पोलिसांनी जप्त केला. arrested with country made pistol and live bullets

    गुन्हा दाखल

    आरोपी गौरव नरुले वर कलम ३/२५, ७/२५ भारतीय शस्त्र अधिनियम १९५९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सपोनि अमितकुमार आत्राम करीत आहे.

    सदरची कारवाई सपोनि सुबोध वंजारी यांच्या नेतृत्वात सपोनि अमितकुमार आत्राम, पोउपनि भाऊराव बोरकर, जमीर खान पठाण, भोजराज मुंडरे, चिमाजी देवकते, नरेश कोडापे, पंकज बगडे व शंकर बोरसरे यांनी केली.