Tag: देवाभाऊ जनकल्याण सेवा सप्ताह

  • Kishor Jorgewar Charitable initiative । किशोर जोरगेवार यांच्या सेवाभावी उपक्रमातून 35 रुग्णांना नवी दृष्टी 👓✨

    Kishor Jorgewar Charitable initiative

    Kishor Jorgewar Charitable initiative : चंद्रपूर – आमदार किशोर जोरगेवार यांच्या पुढाकारातून आयोजित देवाभाऊ जनकल्याण सेवा सप्ताहात घेण्यात आलेल्या आरोग्य शिबिराच्या माध्यमातून सेवाग्राम येथील कस्तुरबा रुग्णालयात ३५ रुग्णांवर मोतीबिंदूची यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. आज या सर्व रुग्णांना आमदार किशोर जोरगेवार यांच्या जनसंपर्क कार्यालयात नि:शुल्क चष्म्यांचे वाटप करण्यात आले. यावेळी आमदार जोरगेवार यांनी सर्व रुग्णांची भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची व तेथील व्यवस्थेबाबत विचारपूस केली. Devabhau Janakalyan Seva Saptah free eye checkup camp

    चंद्रपूर मनपाने जप्त केले २८० किलो प्लास्टिक

    राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आमदार किशोर जोरगेवार यांच्या पुढाकारातून देवाभाऊ जनकल्याण सेवा सप्ताहच्या माध्यमातून विविध सेवाभावी उपक्रम राबविण्यात आले. समाजातील सर्वसामान्य घटकांना मदतीचा हात देण्यासाठी हाती घेतलेल्या या उपक्रमांना नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

    ३५ रुग्णांवर मोतीबिंदूची यशस्वी शस्त्रक्रिया

    या सेवा सप्ताहात आरोग्य हा महत्त्वाचा घटक मानून भव्य आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिरादरम्यान मोठ्या संख्येने नागरिकांनी तपासणी करून घेतली. विशेषतः डोळ्यांच्या तपासणीत अनेक ज्येष्ठ नागरिकांना मोतीबिंदूची समस्या असल्याचे निदर्शनास आले. त्यानुसार या रुग्णांच्या मोफत शस्त्रक्रियेसाठी सेवाग्राम येथील कस्तुरबा रुग्णालयात तातडीने व्यवस्था करण्यात आली. या अंतर्गत ३५ रुग्णांवर मोतीबिंदूची यशस्वी शस्त्रक्रिया पार पडली. Free spectacles distribution Devabhau Janakalyan Seva Saptah

    बुधवारी या सर्व रुग्णांना आमदार किशोर जोरगेवार यांच्या जनसंपर्क कार्यालयात चष्म्यांचे मोफत वितरण करण्यात आले. यावेळी आमदार जोरगेवार यांनी स्वतः रुग्णांची भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली.

    मोतीबिंदूच्या आजारामुळे अनेक ज्येष्ठ नागरिकांना दैनंदिन जीवनात अडचणींना सामोरे जावे लागते. योग्य वेळी उपचार न झाल्यास दृष्टी गमावण्याची वेळ येते. मात्र, अशा शिबिरांमुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना नवी दृष्टी मिळते. सेवाभावी कार्यातून समाजातील दुर्बल घटकांना आधार मिळवून देणे हेच खरे जनसेवेचे आणि मानवसेवेचे ध्येय असल्याचे यावेळी आमदार किशोर जोरगेवार म्हणाले. यावेळी भारतीय जनता पार्टीचे नेते प्रकाश देवतळे, युवा मोर्चा अध्यक्ष मयूर हेपट, मंडळ अध्यक्ष सुभाष आदमाने, देवा कुंटा यांच्यासह भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती. 

  • Devabhau Jan Kalyan Seva Saptah Chandrapur । फडणवीसांचा वाढदिवस ठरला सेवाभावाचा सण! चंद्रपूरमध्ये 63 उपक्रमांची बहार!

    Devabhau Jan Kalyan Seva Saptah Chandrapur

    Devabhau Jan Kalyan Seva Saptah Chandrapur : चंद्रपूर – नागरिकांना थेट लाभ मिळेल असे सामाजिक उपक्रम आपण देवाभाऊ जनकल्याण सेवा सप्ताहात आयोजित केले आहेत. आज तब्बल ६३ सामाजिक, धार्मिक, आरोग्यविषयक आणि शैक्षणिक उपक्रम राबवून आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस साजरा केला आहे. युवकांसाठी रोजगार मेळावा, वक्तृत्व स्पर्धा यांसारखे उपक्रमदेखील यामध्ये समाविष्ट होते. हा केवळ एक आठवडा न राहता, कधी न संपणारी सामाजिक उपक्रमांची मालिका  ठरावी, असे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी यावेळी केले.

    मुख्यमंत्री सहायता निधी ठरतंय गरजू रुग्णांचा आधार

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित ‘जनकल्याण सेवा सप्ताहा’च्या निमित्ताने चंद्रपूर शहरात आज ६३ विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. शहर व परिसरातील विविध भागांमध्ये सामाजिक, धार्मिक, आरोग्यविषयक आणि शैक्षणिक स्वरूपाचे कार्यक्रम पार पडले. या उपक्रमांमुळे शहरात उत्सवाचे आणि सेवा भावनेचे वातावरण अनुभवायला मिळाले. Devendra Fadnavis birthday social service week 2025

    सेवा सप्ताहांतर्गत रक्तदान शिबिरांचे ६ कार्यक्रम, २२ ठिकाणी महाआरती, १७ योग शिबिरे, ६ वृक्षारोपण कार्यक्रम, ३ नोटबुक वाटप, २ फळवाटप उपक्रम, तसेच वक्तृत्व स्पर्धा, रोजगार मेळावा व इतर उपक्रम असे एकूण ६३ कार्यक्रम विविध भागांत आयोजित करण्यात आले. Empowering youth through Devabhau Seva Saptah Chandrapur

    विविध धार्मिक स्थळी महाआरती

    रक्तदान शिबिरांमध्ये शहरातील प्रतिष्ठित संस्था आणि स्वयंसेवी कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त सहभाग दिसून आला. माता महाकाली मंदिर, वढा येथील विठ्ठल-रुक्मिणी मंदिर, पंचशील चौक, महादेव मंदिर, जय हिंद चौक, शिवाजी नगर, दुर्गा मंदिर, खंडोबा मंदिर, माता मंदिर अशा विविध धार्मिक स्थळांवर महाआरतीचे कार्यक्रम पार पडले. सकाळी व सायंकाळी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहून सहभागी झाले.

    योग शिबिरांना महिलांचा विशेष प्रतिसाद मिळाला. सकाळी ७ वाजल्यापासून शहरातील विविध ठिकाणी शिबिरांना सुरुवात झाली. प्रशिक्षित योग शिक्षकांनी आरोग्यविषयक मार्गदर्शन केले. वॉर्डनिहाय महिला योग शिबिरे ही वैशिष्ट्यपूर्ण बाब ठरली.

    सरदार पटेल हायस्कूल येथे आयोजित वक्तृत्व स्पर्धेत विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. शहरातील विविध झोपडपट्ट्या, शाळा, वसाहती व वॉर्डांमध्ये नोटबुक व फळ वाटपाचे उपक्रम पार पडले.

    या उपक्रमांपैकी अनेक कार्यक्रमांचे उद्घाटन आमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बोलताना त्यांनी सांगितले, आज संपूर्ण चंद्रपूर मतदारसंघात ६३ ठिकाणी एकाच दिवशी विविध उपक्रम राबवले गेले. रक्तदान, योग शिबिरे, महाआरती, फळवाटप, वक्तृत्व स्पर्धा, रोजगार मेळावा – ही केवळ कार्यक्रमांची यादी नाही, तर समाजासाठी आणि नागरिकांसाठी आपली कृतिशील बांधिलकी व्यक्त करण्याची संधी असल्याचे ते म्हणाले. सर्व कार्यक्रमांच्या यशस्वी आयोजनासाठी भारतीय जनता पक्षाच्या सर्व विभागांनी परिश्रम घेतले, असेही त्यांनी नमूद केले.

    रोजगार मेळाव्यात दीड हजार युवकांची नोंदणी

    देवाभाऊ जनकल्याण सेवा सप्ताह निमित्त सरदार पटेल विद्यालयात रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये नागपूर आणि चंद्रपूर येथील एकूण १७ कंपन्यांनी सहभाग घेतला. या मेळाव्यात सुमारे १५०० युवकांनी नोंदणी केली असून, अनेकांना रोजगाराच्या संधी प्राप्त होणार आहेत.