Tag: दुचाकी चोर

  • Chandrapur bike theft case । दुचाकी चोरांचा रामनगर पोलिसाना चकवा पण अखेर ठोकल्या बेड्या

    Chandrapur bike theft case

    Chandrapur bike theft case : चंद्रपुरात दुचाकी वाहन चोरी करणाऱ्या आरोपीना रामनगर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहे, आरोपीजवळून चोरी केलेल्या ३ दुचहकी वाहन असा एकूण ९० हजारांचा माल जप्त करीत २ आरोपीना अटक करण्यात आली आहे.

    इरई नदी खोलीकरण – शेतकऱ्यांना मोफत गाळ वाटप सुरु

    ३९ वर्षीय विशाल नानाजी लेडांगे राहणार जगन्नाथ बाबा नगर, चंद्रपूर व ४३ वर्षीय विनोद पात्रुजी शेंडे राहणार मित्र नगर चंद्रपूर असे आरोपीचे नाव आहे. दोन्ही आरोपी हे रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. Chandrapur Ramnagar police arrest vehicle thieves

    मागील काही दिवसांपासून चोरी होत असलेल्या दुचाकी वाहनांच्या प्रकरणाचा छडा लावण्यात यावा असे निर्देश पोलीस अधीक्षकांनी दिले होते. त्यानुसार रामनगर पोलिसांचे पथक याबाबत तपास करीत असताना सराईत दोन आरोपीना अटक करण्यात आली.

    आरोपींनी मूल व चंद्रपुरात दुचाकी चोरीचा गुन्हा केल्याची कबुली दिली आहे, हे दोन्ही आरोपी मागील काही महिन्यापासून पोलिसांना चकवा देत होते, मात्र पोलिसांनी न हरता आरोपीच्या सतत मागावर राहून त्यांचा ठावठिकाणा शोधत त्यांना अटक केली.

    सदरची यश्वी कारवाई पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक रीना जनबंधू, उपविभागीय पोलीस अधिकारी सुधाकर यादव यांच्या मार्गदर्शनात रामनगर पोलीस निरीक्षक आसिफराजा शेख यांच्या नेतृत्वात सहायक पोलीस निरीक्षक देवाजी नरोटे, हनुमान उगले, पोलीस कर्मचारी मनीषा मोरे, आनंद खरात, जितेंद्र आकरे, लालू यादव, पेतरस सिडाम, प्रशांत शेंद्रे, शरद कुडे, सचिन गुरनुले, रवीकुमार ढेंगळे, संदीप कामडी, हिरा गुप्ता, पंकज ठोंबरे, प्रफुल पुप्पलवार, ब्ल्यूटी साखरे यांनी केली.

  • Chandrapur Crime News :  MBA FINALचे शिक्षण घेणारा युवक निघाला दुचाकी चोर

    Chandrapur Crime News : MBA FINALचे शिक्षण घेणारा युवक निघाला दुचाकी चोर

    News34 chandrapur

    चंद्रपूर – आई-वडील दिवस रात्र काबाडकष्ट करीत मुलांना शिकवितात मात्र काही मुले शिक्षणासहित चुकीच्या वळणावर जातात, असाच एक उच्च शिक्षित तरुण स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात अडकला आहे, दुचाकी चोरी प्रकरणात MBA FINAL चे शिक्षण घेत असलेला उच्च शिक्षित आरोपीला अटक करण्यात आली आहे. Crime news

     

     

    जिल्ह्यात दुचाकी चोरी चे प्रकरण वाढत असल्याने पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांनी याबाबत स्थानिक गुन्हे शाखेला कारवाई बाबत निर्देश दिले.

     

     

    पोलीस निरीक्षक महेश कोंडावार यांनी पथक तयार करीत तपास सुरू केला, त्याच दरम्यान पोलीस कर्मचाऱ्यांची दुचाकी चोरी झाली होती.

     

     

    स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला गोपनीय माहिती मिळाली की जिल्हा क्रीडा संकुल चंद्रपूर येथे 25 वर्षीय तरुण विना कागदपत्रांची दुचाकी वाहन विक्री करण्यासाठी आला आहे.

     

     

    स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने त्या तरुणाला ताब्यात घेत विचारपूस केली असता सदर दुचाकी वाहन हे चोरी केले असल्याची त्याने कबुली दिली.

     

    25 वर्षीय आशिष रहांगडाले रा. अष्टभुजा चंद्रपूर असे दुचाकी चोराचे नाव आहे, सदर आरोपी हा नागपुरातील एका महाविद्यालयात अंतिम वर्षाचे शिक्षण घेत आहे.

    आरोपीला शेअर मार्केट चा छंद आहे, मात्र त्या छंदात त्याच्यावर लाखोंचे कर्ज झाले होते, म्हणून तो दुचाकी चोरी करायचा आणि त्याची विक्री करीत तो कर्ज फेडत होता.

     

     

    आरोपी रामनगर पोलीस स्टेशन हद्दीत 3 दुचाकी तर चामोर्शी पोलीस स्टेशन हद्दीत 1 दुचाकी चोरीचा गुन्हा दाखल आहे, स्थानिक गुन्हे शाखेने आरोपी जवळून ऍक्टिव्हा क्रमांक Mh34 BU7349, सिमेंट रंगांची एक्टिव्हा क्रमांक Mh29AG4781, काळ्या रंगाची स्पलेंडर क्रमांक Mh32S1335, एच एफ डीलक्स वाहन क्रमांक Mh34BJ5773 जप्त करण्यात आला असून एकूण 1 लाख 45 हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. आरोपीला रामनगर पोलिसांकडे सोपविण्यात आले असून पुढील तपास रामनगर पोलीस करीत आहे.

     

     

    विशेष बाब म्हणजे वर्ष 2023 मध्ये स्थानिक गुन्हे शाखेने तब्बल 51 दुचाकी वाहने जप्त केले.

    सदरची यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक रिना जनबंधु यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक महेश कोंडावार, पोलीस उपनिरीक्षक विनोद भुरले, पोलीस कर्मचारी संजय आतकुलवार, नागेश येलपुलवार व नितीन रायपुरे यांनी केली.

  • 3 जिल्ह्यातील दुचाकी चोर चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात

    News34 chandrapur

    चंद्रपूर – जिल्ह्यात होत असलेल्या दुचाकी चोरीवर अंकुश लावण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेने कंबर कसली आहे, 16 ऑक्टोबर रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे एका दुचाकी अट्टल चोराला ताब्यात घेतले, त्याची अधिक चौकशी केली असता दुचाकी चोरीचे मोठे घबाड उघडकीस आले.

     

    16 ऑक्टोबर ला स्थानिक गुन्हे शाखा दुसऱ्या गुन्ह्याचा तपास करीत असताना त्यांना गोपनीय माहिती मिळाली की एक इसम कमी किमतीमध्ये दुचाकी वाहन विकण्यासाठी बस स्टॅण्ड वर ग्राहक शोधत आहे. मात्र त्या वाहनांचे कागदपत्रे त्याच्याजवळ नव्हते, पोलिसांना संशय आला असता त्याला चौकशीसाठी ताब्यात घेतले.

     

    पारधीगुळा धोपटाला येथे राहणारा 28 वर्षीय प्रदीप संजय शेरकुरे असे त्या इसमाचे नाव, सदरचे दुचाकी वाहन प्रदीप ने वरोरा पोलीस स्टेशनच्या हद्दीतून चोरले असल्याची माहिती पोलिसांना मिळाली, प्रदीप कडून दुचाकी वाहन क्रमांक MH34BC5968 जप्त करण्यात आली.

    प्रदीप ने इतर काही गुन्हे केले का याबाबत सखोल चौकशी केली असता वरोरा, गडचांदूर, नागपूर व यवतमाळ जिल्ह्यातील दुचाकी व LED टीव्ही चोरी केले असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली.

     

    प्रदीप ने 7 मोटार सायकल व एक टीव्ही चोरी केली होती, आरोपिकडून तब्बल 2 लाख 80 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला, आरोपीला पुढील कारवाईसाठी वरोरा पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले.

     

    सदरची यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक रविंद्र परदेशी, अप्पर पोलीस अधीक्षक रिना जनबंधु यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक महेश कोंडावार यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक अतुल कावळे, पोलीस कर्मचारी अतुल डांगे, जमिर पठाण, नितेश महात्मे, प्रसाद धुळगळे, दिनेश अराडे व रुषभ बारसिंगे यांनी केली.