Tag: तिप्पट बिल

  • smart electricity meter । चंद्रपूरकरांना स्मार्ट मीटरचा ‘करंट’, “स्मार्ट मीटर थांबवा, आमचे जुने मीटर लावा!”

    smart electricity meter

    smart electricity meter : चंद्रपूर – १२ हजार रुपये दंड बसणार, दंड चुकवायचा असेल तर आताच स्मार्ट मीटर लावून घ्या, हे वाक्य स्मार्ट मीटर लावण्याकरिता आलेल्या खासगी कर्मचाऱ्यांचे आहे, या भीतीपायी अनेकांनी स्मार्ट मीटर लावले मात्र महिना भरात वीज बिलात भरीव वाढ झाल्याने नागरिकांची एकच तारांबळ उडाली आहे. वाढीव वीज बिल पासून सुटका मिळावी व आमचे जुने वीजमीटर लावून देण्यात यावे अशी मागणी नागरिकांनी आम आदमी पक्षाचे युवा अध्यक्ष राजू कुडे यांच्याकडे केली.

    स्मार्ट मीटर विरोधात आप मैदानात

    राजू कुडे यांनी आप च्या पदाधिकाऱ्यांना सोबत घेत स्मार्ट मीटर लावणे बंद करीत वाढीव वीज बिल थांबविण्याची मागणी महावितरणकडे केली. मात्र सदर निर्णय हा वरिष्ठ पातळीवरुन झाला असल्याने याबाबत ऊर्जामंत्री स्वतः निर्णय घेऊ शकतात. त्यामुळे राजू कुडे यांनी राज्याचे आदिवासी मंत्री व चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. अशोक उईके यांच्याकडे स्मार्ट मीटर बाबत तक्रार करीत मीटर लावणे थांबवा व याबाबत आपण ऊर्जामंत्री यांच्याकडे सदर बाब पोहोचवा असे निवेदन कुडे यांनी पालकमंत्री उईके यांच्याजवळ दिले. smart meter installation

    जनतेची लूट

    शहरात जोरजबरदस्तीने सुरु असलेले स्मार्ट मीटर लावण्याचे काम तातडीने थांबविण्याची मागणी आम आदमी पार्टीने केली आहे. अनेक नागरिकांना नव्याने बसविण्यात आलेल्या स्मार्ट मीटरमुळे वीजबिल हे कुठे दुप्पट तर कुठे तीनपट वाढले असून गरीब जनतेची सरळसरळ लूट होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

    नागरिकांच्या तक्रारींनुसार, बसविण्यात आलेल्या स्मार्ट मीटरची सखोल चौकशी व ऑडिट करून वाढीव बिल कमी करण्यात यावे, तसेच चौकशी अहवाल येईपर्यंत नवीन मीटर बसविण्याचे काम थांबवावे, अशी विनंती आपचे युवा जिल्हाध्यक्ष राजू कुडे यांनी बाबूपेठ येथे तिरंगा यात्रेत आलेले पालकमंत्री अशोक उईके यांच्याकडे केली.

    या प्रसंगी आम आदमी पार्टीचे जयदेव देवगडे, मनीष राऊत, तसेच अनेक कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.