Tag: ताडोबा सफारी

  • Tadoba safari bus service 2025 | पर्यटकांसाठी आनंदाची बातमी – ताडोबा सफारीसाठी बससेवा उपलब्ध!

    Tadoba safari bus service 2025

    Tadoba safari bus service 2025 : चंद्रपूर – ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प भारतातील प्रसिद्ध व्याघ्र प्रकल्पापैकी एक असून जगभरातील व देशातील निसर्ग पर्यटक या वनाचा आणि वन्यजीवांचा आनंद उपभोगण्याकरिता या व्याघ्र प्रकल्प क्षेत्रामध्ये येतात.
    याच पार्श्वभूमीवर चंद्रपूर जिल्ह्यातील निसर्ग पर्यटकांना अल्प दरामध्ये या वनाचा आनंद घेण्याकरिता वर्ष २०२३ मध्ये क्रुझर सेवा सुरु करण्यात आली होती. पर्यटकांचा ओघ बघता मोहर्ली गेट मार्फत ४ व कोलारा गेट मार्फत ३ अशा एकूण ७ क्रुझर मार्फत कोर क्षेत्रात पर्यटन सेवेकरिता उपलब्ध करून देण्यात आले होते. Chandrapur to Moharli bus service

    अनोळखी इसमाकडून लिफ्ट घेताय? तर ही बातमी तुमच्यासाठी आहे


    सदर सेवेमार्फत स्थानिक जिल्ह्यातील निसर्ग पर्यटक, सामान्य नागरिक यांना ताडोबा सफारीचा आनंद मनमुराद मिळत आहे. वर्ष २०२३ ते वर्ष २०२५ पर्यत ५८००० निसर्ग पर्यटकांनी या क्रुझरद्वारे ताडोबा सफारीचा अनुभव घेतला आहे. सदर उपक्रमाच्या माध्यमातून वने व वन्यजीवाविषयी जनजागृती सुद्धा सामान्य नागरीकामध्ये होत आहे हे विशेष.

    ताडोबा साठी 40 सीटर बस


    सदर उपक्रमाची यशस्वीता बघता चंद्रपूर जिल्हातील पर्यटकांना चंद्रपूर ते मोहुर्ली येथे सकाळी व दुपार सफारी जाणे-येणे करण्यासाठी अडचण जात होती. ही बाब लक्ष्यात घेऊन ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या वतीने तसेच मा. आमदार श्री. किशोर जोरगेवार, विधानसभा सदस्य, चंद्रपूर यांच्या मार्गदर्शनाखाली क्रुझर पर्यटकांकरिता चंद्रपूर ते मोहर्ली ४० सीटर बस उपलब्ध करण्यात आली असून दिनांक १ जून २०२५ ला मा. आमदार श्री. किशोर जोरगेवार, विधानसभा सदस्य, चंद्रपूर यांच्या शुभहस्ते बससेवेचे उद्घाटन पार पडले. Tadoba safari from Chandrapur

    How to reach Moharli gate Tadoba


    सदर बसमार्फत सकाळच्या सफारीकरिता ४.३० वाजता व सफारी पूर्ण झाल्यानंतर सकाळी १० वाजता चंद्रपूर परत येणार त्याचप्रमाणे दुपारच्या सफारी करिता २ वाजता तर परत ७.३० वाजता चंद्रपूर ला पर्यटकांन सोडणार आहे. सदर बससेवा उपसंचालक (कोर) कार्यालय, ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प, रामबाग वनवसाहत, मुल रोड, चंद्रपूर येथून प्रस्थान करणार आहे.


    या महत्वपूर्ण प्रंसगी डॉ. जितेंद्र रामगावकर (भावसे) मुख्य वनसंरक्षक, चंद्रपूर वनवृत्त चंद्रपूर यांची प्रमुख उपस्थिती होती तसेच डॉ. प्रभू नाथ शुक्ल (भावसे) वन संरक्षक तथा क्षेत्र संचालक, ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प यांच्या मार्गदर्शनाखाली हा सोहळा संपन्न झाला. या वेळेस श्री. कुशाग्र पाठक, उपसंचालक बफर, श्री. विवेक नातू, सहायक वनसंरक्षक, कोर, श्री. अरुण गोंड, वनपरीक्षेत्र अधिकारी, मोहर्ली, श्री. संतोष थीपे, वन परिक्षेत्र अधिकारी, मोहर्ली बफर, श्रीमती. स्वाती महिसकर, वनपरिक्षेत्र अधिकारी, चंद्रपूर बफर तसेच सर्व वन कमर्चारी तसेच चंद्रपूर शहारातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

  • Chandrapur tourism tiger safari । चंद्रपूरच्या जंगलात वन्यजीवनाचं अद्वितीय दर्शन – टायगर सफारीचा आराखडा तयार

    Chandrapur tourism tiger safari

    टायगर सफारीने चंद्रपूरच्या पर्यटनाला नवी दिशा मिळणार – आ. किशोर जोरगेवार

    Chandrapur tourism tiger safari : चंद्रपूर – चंद्रपूर येथे १७१ हेक्टर जागेत टायगर सफारीसाठी २८६ कोटी रुपयांच्या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली आहे. त्यानुसार महाराष्ट्र वन विकास महामंडळाच्या अधिनस्त एफडीसीएम गोरवाडा झू लिमिटेडकडे आराखडा तयार करण्याचे काम सोपविण्यात आले असून, आमदार किशोर जोरगेवार यांनी नागपूर येथील वन विभागाच्या विश्रामगृहात एफडीसीएम गोरवाडा झू लिमिटेडच्या अधिकाऱ्यांसह बैठक घेऊन कामाचा आढावा घेतला आहे. या बैठकीला एफडीसीएम गोरवाडा झू लिमिटेडचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी शतनीक भागवत यांच्यासह संबंधित अधिकाऱ्यांची उपस्थिती होती. upcoming tiger safari projects

    चंद्रपूर पोलिसांचे आवाहन – या पोलिसांपासून सावध रहा


    चंद्रपूरमध्ये टायगर सफारी सुरू व्हावी, यासाठी आमदार किशोर जोरगेवार यांनी विशेष प्रयत्न केले आहेत. अनेक अधिवेशनांमध्ये आमदार जोरगेवार यांनी सदर मागणीवर सभागृहाचे लक्ष वेधले होते. परिणामी, या प्रकल्पाला मंजुरी मिळाली आहे. यासाठी २८६ कोटी रुपयांचा प्रस्ताव तयार करण्यात आला असून, महाराष्ट्र वन विकास महामंडळाने सदर कामाचा आराखडा तयार करण्याचे काम गोरवाडा झू लिमिटेड कडे दिले आहे. त्यांनी उत्कृष्ट आराखडा तयार केला आहे. tiger safari in Chandrapur

    चंद्रपूरच्या पर्यटनात मोठी वाढ होणार


    सदर बैठकीत या आराखड्याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. चंद्रपूरच्या टायगर सफारीत प्रत्येकी पाच हेक्टरमध्ये तीन झोन तयार करण्यात येणार असून, यात ‘ऑस्ट्रेलियन ट्रेल’, ‘साउथ अमेरिकन ट्रेल’ आणि ‘इंडियन ट्रेल’ असणार आहेत. पर्यटकांना पायवाटांवरून चालत प्राण्यांना पाहण्याचा अनुभव घेता येणार आहे. तर ४४ हेक्टरमध्ये पर्यटकांना वाहनातून सफारीचा अनुभव घेता येईल. २० एकरमध्ये चिल्ड्रन पार्क आणि पर्यटकांसाठी विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. हे एक भव्य पर्यटन क्षेत्र ठरेल आणि चंद्रपूरच्या पर्यटनात मोठी वाढ होईल, असा विश्वास आमदार किशोर जोरगेवार यांनी व्यक्त केला आहे.

    upcoming tiger safari projects


    या टायगर सफारी प्रकल्पामुळे रोजगाराच्या संधीही मोठ्या प्रमाणात निर्माण होणार आहेत. स्थानिक युवकांना मार्गदर्शक, संरक्षण कर्मचारी, सफारी वाहनचालक, प्राणी संग्रहालय अशा विविध भूमिका मिळतील. शिवाय, स्थानिक व्यवसायांना – हॉटेल, होम-स्टे, स्मृतिचिन्ह, खाद्यपदार्थ विक्री व्यवसायाला देखील चालना मिळेल. यामुळे चंद्रपूरच्या अर्थव्यवस्थेला आणि विकासाला गती मिळेल, असे आमदार जोरगेवार यांनी सांगितले.

    विदेशी प्राणी ठरणार आकर्षण..

    ऑस्ट्रेलियन ट्रेनमध्ये कांगारू, कॅसोवरी, वाला, लाफिंग कूकाबुरा आणि विविध रंगीबेरंगी पक्षी पर्यटकांना पाहता येणार आहेत. साऊथ अमेरिकन ट्रेलमध्ये जग्वार, कॅपुचिन माकड, स्पायडर माकड, कॅपीबारा, निळे व लाल मकाव असे विदेशी प्राणी पर्यटकांचे विशेष आकर्षण ठरणार आहेत.

  • Tadoba Safari Timing Change । उन्हाच्या झळांनी ताडोबा सफारीची वेळ बदलली; जाणून घ्या नवे वेळापत्रक

    Tadoba Safari Timing Change

    Tadoba Safari Timing Change : चंद्रपूर ताडोबा – 45 अंशापार गेलेल्या तापमानामुळे चंद्रपूर देशात हॉट ठरले आहे. येथील जन जीवन प्रभावित होत आहे. दिवसागणिक तापमानात वाढ होत असल्याने सर्वांनाच त्याचा फटका बसत आहे. वाढत्या तापमानापासून जिल्ह्यातील ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पलही सुटला नाही. प्रचंड वाढलेल्या तापमानामुळे पर्यटन सफारी प्रभावीत होऊ शकते त्यामुळे ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प व्यवस्थापानाने सफारीच्या वेळेत बदल करून पर्यटकांना दिलासा दिला आहे. Tadoba safari timing


    देशातच नव्हे तर जगात चंद्रपर जिल्ह्यातील ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प व्याघ्र दर्शनासाठी प्रसिध्द असे स्थळ आहे. त्यामुळे स्थानिक, देश विदेशातील पर्यटकांची येथे नेहमीच गर्दी असते. येथे सफारीकरीता बाहेरील पर्यटक मुक्कामी शुध्दा येतात. परंतु सध्या चंद्रपूरला उन्हाचा चांगलाच तडाखा बसला आहे. त्यापासून वन्यप्राणीही सुटले नाहीत.
    सध्या चंद्रपूर 45 अंशाच्या पार आहे. तर ब्रम्हपुरी 46 अंशाच्या घरात आहे. दरदिवशी तापमानात वाढ होत असल्याने जनजिवन प्रभावीत होत आहे.

    वाढत्या उन्हाच धोका लक्षात घेता जिल्हा प्रशासनाने चंद्रपूरला नैसर्गीक आपत्ती जिल्हा म्हणून घोषीत केले आहे. दरवर्षी उन्हाळ्यामध्ये ताडोबात पर्यटकांची गर्दी बघायला मिळते. परंतु यावेळचा कडक उन्हाळा ताडोबातील पर्यटकांकरीता कठीण जात आहे. त्यामुळे ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाने पर्यटकांच्या आरोग्याच्या दृष्टीने ताडोबातील दुपारच्या सफारीच्या वेळात बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. Tadoba temperature April

    प्रेमात अडथळा निर्माण, चंद्रपुरात झाली एकाची हत्या


    हा बदल 1 मे पासून करण्यात येणार होता, परंतु चंद्रपूरचे तापमान देशात हॉट ठरत आहे शिवाय तापमान 45 अंशाच्या पार गेल्याने गुरूवारपासूनच पर्यटन सफारीच्या वेळात बदल करण्यात आला आहे. सकाळची सफारी ही पूर्ववत वेळेतच सुरू आहे. परंतु दुपारी 2.30 ते 6.30 वाजता पर्यंत होणारी सफारी आता अर्धा तास उशिरा सुरू होणार आहे. म्हणजे 3.00 ते 7.00 वाजताची करण्यात आली आहे. ताडोबा व्यवस्थापनाने वेळेत बदल करण्याचा आदेश निर्गमित केला आहे.


    ताडोबाच्या कोअर व बफर झोनमध्ये विविध नावाने प्रसिध्द असे अनेक वाघ, वाघिणी आहेत. आपल्या रूबाबदार शैलीने ते पर्यटकांना आर्कषीत करतात. त्यामुळेच पर्यटक दरवर्षी ताडोबात पर्यटनांकरीता जावून वाघांचे दर्शन घेतात. ताडोबात वाघांची संख्या वाढल्याने आणि हमखास दर्शन होत असल्याने दरवर्षी उन्हाळ्यामध्ये पर्यटकांची चांगलीच गर्दी बघायला मिळते. स्थानिक, राज्यातीलच नाही तर देश विदेशाच्या कानाकोपऱ्यातून पर्यटक् ताडोबा येऊन आपली पर्यटकनाची हौस भागवितात. मात्र यावेळी एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापासूनच चंद्रपूर तापायला लागले आहे. सुर्य चांगलाच कोपत असल्याने 45 अंशाच्या पार पारा गेला आहे. safari changed due to heatwave

    अंगाची लाही लाही होत आहे. जन जीवन विस्कळीत होत आहे. याच जिल्ह्यातील ब्रम्हपुरीचे तापमानही देशात केंद्रस्थानी आले आहे. उन्हाचा सर्वांनाच फटका बसत आहे. शिवाय हवामान खात्याने उष्ण लहरींचा इशारा दिल्याने येथील जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यातील सर्व शाळांचे वेळापत्रकात बदले करून 7 वे 11 वाजता केले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना वाढत्या उष्णतेपासून दिलासा मिळाला.


    त्यापाठोपाठ ताडोबा व्यवस्थापनानेही वाढत्या उष्णतेमुळे दुपारच्या पर्यटन सफारीच्या वेळेत बदल करण्याचा निर्णय घेऊन सफारीची वेळ अर्धातास केली आहे. त्यामुळे पर्यटकांची उन्हापासून सुटका होणार आहे. अनेक पर्यटकांनी तर बुकींग रद्द करून चंद्रपूरातील उन्हापासून स्वत:ची सुटका करून घेतली आहे. काही पर्यटक् “कडक उन्हात नको रे बाबा पर्यटन सफारी‘ म्हणून ताडोबात सध्यातरी येण्याचे टाळत आहेत.

  • Mla Kishor Jorgewar : छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा, पूर संरक्षण भिंत, आमदार जोरगेवार यांनी वेधले सभागृहात लक्ष

    Mla Kishor Jorgewar : छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा, पूर संरक्षण भिंत, आमदार जोरगेवार यांनी वेधले सभागृहात लक्ष

    News34 chandrapur

    चंद्रपूर – छत्रपती शिवाजी महाराज यांचा 350 वा  राज्याभिषेक सोहळा राज्यभर साजरा केला जात आहे. मात्र हे होत असतांना छत्रपती महाराज यांचा अश्वारूढ पुताळा चंद्रपूर सह राज्यातील अनेक जिल्हात आजही नाही. त्यामुळे जिथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा नाही त्या ठिकाणी पूर्णाकृती अश्वारूढ पुतळा तयार करण्याचा निर्णय राज्य सरकारने घ्यावा अशी मागणी आमदार किशोर जोरगेवार यांनी अधिवेशनात केली आहे. Chhatrapati Shivaji Maharaj

     

    गुरुवारी अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या चौथ्या दिवशी अर्थसंकल्पाचा समर्थनार्थ  आमदार किशोर जोरगेवार सभागृहात बोलत होते. यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी चंद्रपूर मतदार संघातील विविध विषयांकडे सभागृहाचे लक्ष वेधले. यावेळी बोलताना ते म्हणाले कि, सुमारे 17 किलोमीटर लांबीचा परकोट असलेले चंद्रपूर हे पुरातन शहर आहे. येथे 500 वर्ष जून मंदिर असुन 2 हजार वर्ष जुनी माता महाकालीची मुर्ती येथे स्थापित आहे. मात्र पूरातत्व विभागाच्या जाचक अटिंमुळे मंदिराचा अपेक्षित असा विकास झालेला नाही. येथे चैत्र अश्विनी महिन्यात यात्रा भरते. देशभरातील भाविक येथे येतात त्यामुळे सदर यात्रा परिसराचा विकास करण्यात यावा अशी मागणी यावेळी बोलताना त्यांनी केली आहे.

     

    चंद्रपुरातील इरई नदीला वारंवार पूर येत असतो. त्यामुळे मोठे नुकसान या भागातील नागरिकांचे होत आहे. (flood protection wall)त्यामुळे येथे पुर संरक्षण भिंत बांधण्यासाठी निधीची तरतूद करण्यात यावी, विदर्भातील पंढरपूर असलेल्या वढा तिर्थ (vada tirtha funds) क्षेत्राला महाविकास आघाडी सरकारच्या वेळेस 25 कोटी रुपये देण्यात आले होते. मात्र ते मिळालेले नाही. त्यामुळे सदर निधी तात्काळ उपलब्ध करुन देण्यात यावा, जगात सर्वाधिक वाघांचा संरक्षण करणारा आमचा जिल्हा आहे. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारने येथे टायगर सफारीची घोषणा केली होती.

     

    171 हेक्टर जागेत 286 कोटी रुपये खर्च करत टायगर सफारी निर्माण होणार होती. चंद्रपूरच्या विकासाला चालणा मिळणार असलेल्या या घोषित टायगर सफारीचे काम तात्काळ सुरु करण्यात यावे अशी मागणही यावेळी बोलताना आमदार किशोर जोरगेवार यांनी केली आहे.   tiger safari project

     

    काळा राम मंदिराचा पर्यटनदृष्ट्या विकास करा

    नाशिकला काळाराम मंदिर आहे. त्याच प्रमाणे चंद्रपूरलाही प्राचीन  असे काळाराम मंदिर आहे. येथे जागाही उपलब्ध आहे. त्यामुळे या मंदिराच्या पर्यटनदृष्टा विकास करण्यासाठी 10 कोटी रुपयांचा निधी देण्यात यावा अशी मागणी यावेळी अधिवेशनात बोलतांना आमदार किशोर जोरगेवार यांनी केली आहे. mla kishor jorgewar

  • Tadoba Jungle Safari : ताडोबा जंगल सफारीचे पर्यटकांना मिळाले बोगस तिकीट

    Tadoba Jungle Safari : ताडोबा जंगल सफारीचे पर्यटकांना मिळाले बोगस तिकीट

    News34 chandrapur

    चंद्रपूर – राज्यात सर्वाधिक वाघांची संख्या असलेला जिल्हा म्हणून आज चंद्रपूरची ताडोबा अंधारी व्याघ्रप्रकल्पामुळे ओळख आहे, वर्ष 2023 मध्ये ताडोबा अंधारी व्याघ्रप्रकल्पात ठाकूर बंधूनी ऑनलाइन तिकीट विक्री च्या नावाने ताडोबा प्रशासनाची कोट्यवधी रुपयांनी फसवणूक केली होती, मात्र आता पुन्हा काही पर्यटकांची जंगल सफारी च्या नावाने फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. दुर्गापूर पोलिसांनी या प्रकरणात एका आरोपीला अटक केली आहे. Tadoba tiger project

     

    छत्रपती संभाजी नगर येथे राहणारे 54 वर्षीय मनीष बावसकर यांनी जून 2023 ला बावसकर कुटुंब व नातेवाईक असे एकूण 18 जणांसाठी ताडोबा सफारी केयुज कडुकर या इसमाकडून बुक केली होती. यासाठी 25 मार्च महिन्यात केयुज कडुकर यांच्या फोन पे वर बावसकर यांनी तब्बल 25 हजार 500 रुपये, 27 मार्च 3 हजार रुपये व 14 एप्रिलला 10 हजार 400 रुपये असे एकूण 38 हजार 900 रुपये पाठविले होते. Jungle safari

     

     

    काही अपरिहार्य कारणामुळे बावसकर हे ताडोबा सफारी साठी येऊ शकले नाही, बावसकर यांनी पुन्हा ताडोबा सफारीसाठी कडुकर यांच्यासोबत सम्पर्क साधला आधीचे पैसे कडुकर यांचेकडे जमा होते, त्यांनतर बावसकर यांनी नोव्हेंबर 2023 ला 5 हजार फोन पे द्वारे कडुकर यांना पाठवीत 27 जानेवारी 2024 ची ताडोबा बुकिंग कन्फर्म केली. Online booking

     

     

    27 जानेवारीला बावसकर कुटुंब हे सफारी साठी ताडोबा येथील मोहरली गेटजवळ आले असता त्यांनी वनविभागाच्या कर्मचाऱ्याला बुकिंग चे तिकीट दाखविले असता कर्मचाऱ्यांनी ते बोगस असल्याचे सांगितले, आपली फसवणूक झाली असे बावसकर यांच्या लक्षात आले, त्यांनी तात्काळ याबाबत दुर्गापूर पोलीस स्टेशन गाठत तक्रार दाखल केली.

     

     

    दुर्गापूर पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षक लता वाडीवे यांनी गुन्हा दाखल करीत तपास सुरू केला असता काही तासात आरोपी केयुज कडुकर ला अटक करण्यात आली.

     

    पोलीस तपासात कडुकर यांनी 6 जानेवारीला मुंबई येथील 58 वर्षीय राकेश वाजपेयी यांचीसुद्धा अश्याच प्रकारे फसवणूक केली होती, फिर्यादी बावसकर व वाजपेयी यांची कडुकर यांनी बुकिंग च्या नावाखाली तब्बल 66 हजार 400 रुपयांनी फसवणूक केली, पोलिसांनी आरोपी कडुकर यांच्यावर कलम 420, 66(ड) व माहिती तंत्रज्ञान कायदा 2000 अनव्ये गुन्हा दाखल केला.

     

    याबाबत वनविभाग सध्या काही बोलायला तयार नाही, मात्र आरोपी केयुज कडुकर यांचे 5 वर्षांपूर्वी ताडोबा येथे होम स्टे होते, मात्र त्यांच्या बोगस कामामुळे वनविभागाने कडुकर यांचे होम स्टे बंद केले होते, त्यांनतर सुद्धा सफारीसाठी आलेल्या पर्यटकांशी ओळखी करीत पुन्हा ताडोबा मध्ये यायचं असेल तर मला सम्पर्क करा मी सफारी बुकिंग करतो असे दर्शवायचा.

     

    सदरची यशस्वी कारवाई दुर्गापूर पोलीस निरीक्षक लता वाडीवे, पोलीस उपनिरीक्षक गिरीश मोहतुरे, पोलीस कर्मचारी खुशाल खेडेकर, योगेश शार्दूल, योगराज काळसरपे, प्रमोद डोंगरे, मनोहर जाधव यांनी केली.