Tag: जिल्हा सामान्य रुग्णालय

  • cataract free Maharashtra mission details । 💥 “मोतीबिंदू” संपवण्याची सुरुवात! महाराष्ट्रात ऐतिहासिक आरोग्य मोहीम

    cataract free Maharashtra mission details

    cataract free Maharashtra mission details : चंद्रपूर, दि. 12 : महाराष्ट्रातील नागरिकांचे नेत्रस्वास्थ सुधारण्यासाठी तसेच वाढत्या मोतीबिंदुची संख्या व सर्वसामान्य आणि गरीब जनतेपर्यंत सेवा पुरविण्याच्या उद्देशाने अंधत्व निर्मूलनाच्या दिशेने एक महत्वपूर्ण पाऊल म्हणून ‘मोतीबिंदू मुक्त महाराष्ट्र’ मोहीम राबविण्यात येणार आहे.

    मुख्यमंत्री यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधुन ‘मोतीबिंदु मुक्त महाराष्ट्र’ ही विशेष मोहीम जिल्हा सामान्य रुग्णालय व कर्मवीर मा.सां. कन्नमवार शासकीय वैद्यकीय महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येत आहे. ही मोहीम 22 जुलै ते 22 ऑगष्ट २०२५ या कालावधीत राबविली जाणार आहे. या मोहिमेमध्ये जिल्ह्यातील सर्व मोतीबिंदु रुग्णावर मोफत उपचार केले जाणार आहेत.

    चंद्रपूर जिल्हा परिषदेचा नाविन्यपूर्ण उपक्रम

    यासंदर्भात आज (दि.12) जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. महादेव चिंचोळे व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अशोक कटारे यांनी तालुका वैद्यकीय अधिकारी, रुग्णालयांचे वैद्यकीय अधिक्षक तसेच प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकिय अधिकारी यांची व्ही.सी. द्वारे सभा घेवून अधिनस्थ अंगणवाडी सेविका, आशा वर्कर, आरोग्य सेवक/सेविका, समुदाय आरोग्य अधिकारी, नेत्रचिकित्सा अधिकारी यांना सदर मोहिमेचे उद्दिष्ट, नियोजन व अंमलबजावणी करण्याबाबत निर्देश दिले.

    मोहिमेचे प्रमुख उद्दिष्टे : 

    मोतीबिंदुच्या रुग्णांचे वेळीच निदान करणे, गरजु रुग्णांवर मोफत शस्त्रक्रिया करणे, अंधत्व रोखणे व जनजागृती वाढविणे, ग्रामीण आणि दुर्गम भागातील नागरीकांपर्यंत सेवा पोहचविणे हे आहे.

    संपूर्ण जिल्हाभर या मोहिमेचे नियोजन करण्यात आले असून अंगणवाडी सेविका, आशा वर्कर, आरोग्य सेवक/सेविका यांच्यामार्फत गृहभेटी देवून मोतीबिंदुग्रस्त रुग्णांना शोधून त्यांच्यावर मोफत उपचार करण्यात येणार आहे. तरी जिल्ह्यातील सर्व मोतीबिंदुग्रस्त रुग्णांनी या मोहिमेचा लाभ घेऊन मोफत उपचार करून घ्यावे, असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक व जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी केले आहे.

  • dialysis machine in government hospital । चंद्रपूर जिल्हा सामान्य रुग्णालयातील डायलेसिस विभागातील विस्तारीत कक्षाचे उद्घाटन

    dialysis machine in government hospital

    dialysis machine in government hospital : चंद्रपूर – जिल्हा सामान्य रुग्णालय, चंद्रपुर येथे डायलेसिस विभागातील विस्तारीत कक्षाचे उद्घाटन राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. अशोक उईके यांच्या हस्ते व आमदार किशोर जोरगेवार यांच्या उपस्थितीत नुकतेच करण्यात आले.

    १२ जून रोजी बालकामगार विरोधी दिवस


    कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. महादेव चिंचोळे तर प्रमुख अतिथी म्हणून जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी., मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंग, मा.सां. कन्नमवार शास. वैद्य. महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. मिलिंद कांबळे, ताडोबा प्रकल्पाचे उपसंचालक (कोर) आनंद रेड्डी, अति. जिल्हा शल्य चिकित्सक भास्कर सोनारकर, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. हेमचंद कन्नाके आदी उपस्थित होते.

    free dialysis treatment in government hospital


    उद्घाटनप्रसंगी पालकमंत्री डॉ. अशोक उईके यांनी डायलेसिस विभागातील वैद्यकिय अधिकारी व कर्मचारी यांच्या कामाची प्रशंसा करून पुढेही अशाच प्रकारचे काम करीत राहावे. तसेच रुग्णालयात आलेल्या रुग्णांवर वेळेत आणि चांगले उपचार करावे, अशा सुचना त्यांनी दिल्या. free dialysis treatment in government hospital


    डायलेसिस विभागामध्ये मासिक 550 ते 600 डायलेसिस होतात. सन 2024-25 या वर्षात एकूण 6368 डायलेसिस करण्यात आले. यासाठी चंद्रपूर जिल्हा सामान्य रुग्णालयाने राज्यस्तरावर प्रथम क्रमांक प्राप्त केला. जिल्हा रुग्णालयामध्ये सुरुवातीला 9 डायलेसिस मशीन कार्यान्वित होत्या. रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे 20 ते 24 रुग्ण हे प्रतिक्षाधीन होते. रुग्ण हा आरोग्य सेवेपासून वंचित राहू नये, या उदे्शाने पालकमंत्री डॉ. अशोक उईके तसेच जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा नियोजन समितीमधून 4 नवीन डायलेसिस मशीन उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. डायलेसिस विभागाचे विस्तारीकरण झाल्यामुळे आता सर्व डायलेसिस रुग्णांना सेवा देता येईल व कोणत्याही रुग्णांना आर्थिक भुदंड बसणार नाही. dialysis facility in district hospital

    सध्या रुग्णालयात १३ डायलिसिस मशीन

    सामान्य रुग्णालयात सद्यस्थितीत 13 डायलेसिस मशीनद्वारे सेवा देण्यात येत असून प्रशिक्षित वैद्यकीय अधिकारी व नर्सिंग कर्मचारी येथे रुग्णांची सेवा बजावत आहेत. ही सेवा पूर्णपणे मोफत आहे. गरीब व गरजू रुग्णांना याचा मोठा लाभ होणार आहे. डायलेसिस विभाग हा जिल्ह्यातील आरोग्य सुविधांसाठी मैलाचा दगड ठरणार आहे. यामुळे अनेक रुग्णांना वेळेवर आणि योग्य उपचार मिळतील. तरी जास्तीत जास्त डायलेसिस रुग्णांनी या सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन आरोग्य प्रशासनाने केले आहे. dialysis machine in government hospital

    चार रुग्णवाहिकांचेही लोकार्पण


    : जिल्हा सामान्य रुग्णालयात नव्याने दाखल झालेल्या चार नवीन रुग्णवाहिकांचे लोकार्पण पालकमंत्री डॉ. अशोक उईके यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी खासदार प्रतिभा धानोरकर, खासदार डॉ. नामदेव किरसान, आमदार सर्वश्री किशोर जोरगेवार, किर्तीकुमार भांगडीया, देवराव भोंगळे, करण देवतेळे, जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. महादेव चिंचोळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अशोक कटारे आदी उपस्थित होते.

  • Chandrapur News : चोरीचे चारचाकी वाहन लपविण्याचे नवे ठिकाण

    Chandrapur News : चोरीचे चारचाकी वाहन लपविण्याचे नवे ठिकाण

    News34 chandrapur

    चंद्रपूर – शहरातील चारचाकी वाहन चोरांचा कारनामा ऐकून आपणही काही वेळासाठी चक्रावून जाणार, कारण त्या चोराने ग्रामीण भागातून चारचाकी वाहन चोरी करीत सदर वाहन चंद्रपूर जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या आवारात ठेवले, मात्र स्थानिक गुन्हे शाखेच्या सतर्कतेने त्याचा भांडाफोड झाला. Chandrapur news

     

    जिल्ह्यात चोरीच्या गुन्ह्यात छडा अनेक प्रयत्नांनंतर लागतो, असे काही गुन्हे जिल्ह्यात घडले होते मात्र ते उघडकीस न आल्याने पोलीस अधीक्षक परदेशी यांनी त्या गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे सोपविला. Local crime branch

     

    24 जानेवारीला गस्तीदरम्यान स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला गोपनीय माहिती मिळाली की एक इसम हा चारचाकी वाहन कमी किमतीमध्ये विकण्याकरिता ग्राहक शोधत आहे, दुचाकीवर फिरत असलेल्या त्या युवकाला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेत विचारपूस केली.

     

    26 वर्षीय वैभव डोंगरे, राहणार मोखाडा तालुका सावली असे त्या इसमाचे नाव होते, त्याने व मित्रांनी मिळून चारचाकी वाहन सावली पोलीस स्टेशनच्या हद्दीतून चोरले अशी कबुली दिली व कुणाला त्या वाहनाबाबत थांगपत्ता लागू नये यासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या आवारात वाहन पार्क करून ठेवले.

     

    चोरी केलेले वाहन टाटा अल्ट्राज क्रमांक Mh34 BV 1302 स्थानिक गुन्हे शाखेने जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या आवारातून जप्त केले, स्थानिक गुन्हे शाखेने गुन्ह्यात वापरलेली दुचाकी क्रमांक MH14EX 6646 व चारचाकी वाहन असा एकूण 3 लाख 60 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

     

    सदरची यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक परदेशी, अप्पर पोलीस अधीक्षक रिना जनबंधु यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक महेश कोंडावार, सपोनि बोबडे, गायकवाड, पोलीस कर्मचारी नितीन साळवे, प्रकाश बलकी, सुभाष गोहोकार, मिलिंद जांभुळे यांनी केली.

  • जिल्हा सामान्य रुग्णालयातील अव्यवस्थेवर आमदार किशोर जोरगेवारांचा संताप

    जिल्हा सामान्य रुग्णालयातील अव्यवस्थेवर आमदार किशोर जोरगेवारांचा संताप

    News34 chandrapur

    चंद्रपूर – शासकीय वैदयकीय महाविद्यालय येथील अनेक तक्रारी प्राप्त होत असतात. सोनोग्राफी करणे आवश्यक असलेल्या रुग्णांना सोनोग्राफीसाठी आठ ते पंधरा दिवस ताटकाळत ठेवणे योग्य नाही. हा गंभिर असुन हे प्रकार खपवून घेतले जाणार नाही. रुग्णांची सोनोग्राफी वेळीच करण्यासाठी तात्काळ उपाययोजना करा असे निर्देश आमदार किशोर जोरगेवार यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता मिलिंद कांबळे यांना दिले आहे.

     

    शुक्रवारी शासकीय वैद्यकीय रुग्णालय येथे आमदार किशोर जोरगेवार यांनी आढावा बैठकीचे आयोजन केले होते. या प्रसंगी येथील विविध समस्यांवर चर्चा करण्यात आली असुन यावर तात्काळ उपाययोजना करण्याचे निर्देश यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी संबधित अधिका-यांना दिले आहे. यावेळी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता मिलींद कांबळे, विभाग प्रमुख डाॅ. प्रशांत उईके, अतिरिक्त निवासी वैद्यकीय अधिकारी डाॅ. जिवने, समाजसेवा अधिक्षक उमेश आडे, यंग चांदा ब्रिगेडच्या बंगाली समाज महिला प्रमुख सविता दंढारे, आशा देशमुख, यंग चांदा ब्रिगेडच्या आरोग्य सेविका, वैशाली मेश्राम वंदना हजारे, एमआयएमचे अमान अहमद आदींची उपस्थिती होती.

     

    शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार घेण्यासाठी चंद्रपूर जिल्हासह लगतच्या जिल्ह्यातील रुग्ण येत असतात. त्यामुळे आरोग्य व्यवस्थेची मोठी जबाबदारी या रुग्णालयावर आहे. आपण अतिशय जबाबदारीच्या ठिकाणी आहात त्यामुळे आपण उत्तम सेवा देण्याचा प्रयत्न केला पाहिजे अशा सुचना यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी अधिका-यांना केल्या आहे. येणा-या रुग्णांशी रुग्णालयातील कर्मचा-यांची वागणूक योग्य नसल्याचे प्रकार वारंवार समोर येत आहे.

     

    आपल्यावरील कामाच्या ताणाची जाण आम्हाला आहे. मात्र आपण रुग्णांशी सौजण्यपुर्ण वागल पाहिजे, रुग्णालयात स्वच्छतेची विशेष काळजी आपण घेतली पाहीजे असे ते यावेळी म्हणाले. नियमीत स्वच्छ पिण्याच्या पाण्याची व्यवस्था येथे असली पाहिजे, वार्डातील लाईट व पंखे बंद असल्यास ते तात्काळ दुरुस्त करावे, रुग्णांचा येथे परिपुर्ण उपचार करावा, वैद्यकीय उपकरणे नादुरुस्त अवस्थेत असतील तर त्याची देखभाल दुरुस्ती तत्काळ करावी, उपकरणे बंद आहेत म्हणून रुग्णांना जाणिवपूर्वक बाहेरुन तपासणी करण्यास बाध्य करण्याचे प्रकार खपविले जाणार नाही असेही यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी बैठकीत अधिकार्यांना सांगितले आहे.

     

    डाॅक्टर वेळेत कर्तव्यावर हजर होत नाही. रात्रपाळीत डाॅक्टर उपस्थित नसते अशा तक्रारी प्राप्त झाल्या आहे. अशा प्रकाराला आळा घालण्यात यावा, रुग्णालयाच्या बाहेरुन औषधे विकत आणायला लावण्याचे प्रकार बंद करा, रुग्णालयात अनेक उपकरणांची कमी आहे.

     

    या संदर्भात तत्काळ वैद्यकीय शिक्षण विभागाकडे पत्रव्यवहार करण्यात यावा, रुग्णांना रक्त त्वरित उपलब्ध होईल यासाठी उपाययोजना करण्यात यावी, रक्तदात्यांच्या नावाची यादी येथे लावण्यात यावी अशा अनेक सुचना सदर बैठकीत आमदार किशोर जोरगेवार यांनी केल्या आहे. या बैठकीला संबधित डाॅक्टरासह यंग चांदा ब्रिगेडच्या पदाधिका-यांची उपस्थिती होती.