Tag: जिल्हा परिषद चंद्रपूर

  • Chandrapur ZP president reserved for SC woman | 1962 पासूनचा इतिहास बदलणार, चंद्रपूर ZP अध्यक्षपदासाठी अनुसूचित जाती महिला वर्गाला आरक्षण

    Chandrapur ZP president reserved for SC woman

    Chandrapur ZP president reserved for SC woman : चंद्रपूर – वर्ष २०२२ नंतर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकाना मुहूर्त मिळाला नाही, नुकतेच सर्वोच्च न्यायालयात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या आरक्षणाचा विषय मार्गी लागल्यावर निवडणुकीची लगबग सुरु झाली. आज १२ सप्टेंबर रोजी राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर करण्यात आले. first SC woman chairperson for Zilla Parishad Chandrapur history

    पंजाब राज्यात अस्मानी संकट, चंद्रपुरातील मुस्लिम बांधवांचा मदतीचा हात

    चंद्रपूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाचे आरक्षण अनुसूचित जाती महिला म्हणून घोषित करण्यात आले, चंद्रपूर जिल्हा परिषद अध्यक्षपदावर वर्ष १९६२ पासून आतापर्यंत २४ अध्यक्ष विराजमान झाले आहे.

    वर्ष १९६२ ते वर्ष २०२२ पर्यंत हे होते अध्यक्ष

    • अब्दुल शफी कार्यकाळ – १२ ऑगस्ट १९६२ ते ११ ऑगस्ट १९६७, पुन्हा वर्ष १९६७ ते १३ सप्टेंबर १९७२
    • वामनराव गड्डमवार कार्यकाळ – १४ सप्टेंबर १९७२ ते २० जून १९७९
    • देवराव मुसळे कार्यकाळ – २१ जून १९७९ ते १० एप्रिल १९८०
    • सुभाष धोटे – ११ एप्रिल १९८० ते २४ एप्रिल १९८०
    • राजाभाऊ जोगी – २५ एप्रिल १९८० ते ११ ऑगस्ट १९८०
    • सुभाष धोटे – १२ ऑगस्ट १९८० ते १ सप्टेंबर १९८०
    • अरुण तुम्पल्लीवार २ सप्टेंबर १९८० ते २५ ऑगस्ट १९८२
    • प्रशासकीय कालावधी – २६ ऑगस्ट १९८२ ते २१ मार्च १९८२
    • उमाजी बगडे – २१ मार्च १९९२ ते १ डिसेम्बर १९९२
    • चंद्रकांत गोहोकार – २ डिसेम्बर १९९२ ते ३० डिसेम्बर १९९२
    • प्रकाश पाटील मारकवार – ३१ डिसेम्बर १९९२ ते २१ डिसेम्बर १९९५
    • दिगंबर गुरकुडे – २६ डिसेम्बर १९९५ ते ८ फेब्रुवारी १९९६
    • प्रकाश पाटील मारकवार – ९ फेब्रुवारी १९९६ ते २० मार्च १९९७
    • एम.के. परचाके – २१ मार्च १९९७ ते २० मार्च १९९८
    • पी.एस.गावंडे – २१ मार्च १९९८ ते २१ मार्च १९९९
    • सुधाकर कुंदोजवार – २१ मार्च १९९९ ते २० मार्च २००२
    • डॉ. निळकंठराव काळे – २१ मार्च २००२ ते १८ मार्च २००५
    • वैशाली वासाडे – १९ मार्च २००५ ते २० मार्च २००७
    • संतोषसिंह रावत – २१ मार्च २००७ ते २५ नोव्हेंबर २००९
    • सतीश वारजुरकर – २६ नोव्हेम्बर २००९ ते २० मार्च २०१२
    • संतोष कुमरे – २१ मार्च २०१२ ते २० सप्टेंबर २०१४
    • संध्याताई गुरनुले – २१ सप्टेंबर २०१४ ते २० मार्च २०१७
    • देवराव भोंगळे – २१ मार्च २०१७ ते ४ जानेवारी २०२०
    • संध्याताई गुरनुले – ५ जानेवारी २०२० ते २० मार्च २०२२

    वर्ष १९६२ ते वर्ष २०२२ या कालावधीत चंद्रपूर जिल्हा परिषदेत फक्त तीन वेळा महिला अध्यक्षपदी विराजमान होत्या, आता प्रथमचं अनुसूचित जाती महिला वर्गाला आरक्षण मिळाल्याने राजकीय हालचाली सुरु झाल्या आहे. सध्याचं पक्षीय वातावरण बघता जिल्हा परिषद निवडणुकीत चांगलीच चुरस बघायला मिळणार आहे. Chandrapur district council president reservation SC woman announced

  • Zilla Parishad Social Welfare Scheme । दिव्यांग व मागासवर्गीयांसाठी सोन्याची संधी!, झेरॉक्स मशीन ते ई-रिक्शा पर्यंत सर्व काही..

    Zilla Parishad Social Welfare Scheme

    Zilla Parishad Social Welfare Scheme : चंद्रपूर, दि. ०८ जुलै  : जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागामार्फत आर्थिक वर्ष २०२५-२६ करिता दिव्यांग व मागासवर्गीय नागरिकांसाठी वैयक्तिक लाभाच्या योजना राबविण्यात येणार आहेत. इच्छुक लाभार्थ्यांनी १५ जुलै २०२५ पर्यंत संबंधित ग्रामपंचायत किंवा पंचायत समितीमध्ये अर्ज सादर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

    कामाच्या ठिकाणी लैंगिक छळ, आता आलं शी बॉक्स पोर्टल

    दिव्यांगांसाठी ५ टक्के निधी अंतर्गत तीन चाकी सायकल, पांढरी काठी, श्रवणयंत्र, स्वयंचलित सायकल, कमोड चेअर, ई-रिक्शा व विवाहित जोडप्यांना प्रोत्साहनपर अनुदान या योजनांचा समावेश आहे. तर मागासवर्गीयांसाठी २० टक्के निधी अंतर्गत ९० टक्के अनुदानावर सबमर्सिबल पंप व ऑईल इंजिन, महिलांसाठी सोलर दिवे आणि लघुउद्योगासाठी ७५ टक्के अनुदानावर ई-रिक्शा, झेरॉक्स मशिन इत्यादींचा लाभ देता येणार आहे.

    डीबीटी प्रणाली राबवली जाणार

    या योजनांचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यांकडून आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करणे आवश्यक आहे. तसेच सर्व प्रकल्प डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर (DBT) प्रणालीद्वारे राबविले जाणार असल्याने लाभार्थ्यांच्या बँक खात्याची माहिती अद्ययावत असणे आवश्यक आहे.

    अधिक माहितीसाठी संबंधित ग्रामपंचायत, पंचायत समिती कार्यालय किंवा जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाशी संपर्क साधावा, असे कळविण्यात आले आहे.

  • Chandrapur Zilla Parishad sanitation review । चंद्रपूर जिल्हा परिषद स्वच्छता आढावा: प्रगती आणि आव्हाने

    Chandrapur Zilla Parishad sanitation review

    Chandrapur Zilla Parishad sanitation review : चंद्रपूर – स्वच्छ भारत मिशन ग्रामीण टप्पा – 2 अंतर्गत जिल्हा परिषद येथे सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापनाच्या कामाचा नुकताच पंचायत समिती स्तरावरी बीआरसी  व सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन सल्लागार यांचा आढावा घेण्यात आला असुन, चंद्रपुर जिल्हा हागणदारीमुक्त अधिक करण्यासाठी गावस्तरावरील सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापनाची कामे वेळेत पुर्ण होणे आवश्यक आहे. चंद्रपुर जिल्ह्यातील गावे हागणदारीमुक्त अधिक करण्यासाठी  सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापनाच्या कामास प्रथम प्राधान्य देवुन कामे करावे. असे निर्देश जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिह यांनी यत्रंणेला दिले. Swachh Bharat Mission Gramin Phase 2 Chandrapur

    चंद्रपूर शहरातील पाणी टंचाईवर तोडगा

              आढावासभेत स्वच्छ भारत मिशन ग्रामीण अंतर्गत राबविण्यात येत असलेल्या कामांचा आढावा घेण्यात आला. यामध्ये सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन, सार्वजनिक शौचालय, वैयक्तिक शौचालय नळजोडणी , पाणी गुणवत्ता बाबत आढावा घेण्यात आला.  सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापनाच्या कामाचे नियोजन करुन वेळेत पुर्ण करा, आवश्यक त्या लाभार्थ्यांना शौचालयाचा लाभ द्या,

    कामे लवकर पूर्ण करा

    वेळापत्रकानुसार गावातील पाण्याच्या स्त्रोतांची वेळेत तपासणी करा, डबल्यु क्यु या एमआयएस वर माहीती भरल्या वरच पाणी नमुने प्रयोग शाळेत स्विकारावे, 15 जुन 2025  पुर्वी सर्व पाणी नमुण्याच्या तपासण्या पुर्ण कराव्या, मे 2025अखेर चंद्रपुर जिल्ह्यतील सर्व नळपाणी पुरवठा योजणांचे पाणी नमुने तपासणी साठी प्रयोग शाळेत पाठवा.    योजनेची सर्व कामे वेळेत पुर्ण करा. अशा प्रकारच्या सुचना मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिह यांनी आढावा सभेत संबधीत यंत्रणेला दिले. Swachh Bharat Phase 2 implementation in Maharashtra

    swachh bharat mission gramin phase 2 chandrapur

    Powered by myUpchar

    यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी पांणी व स्वच्छता नूतन सावंत यांनी कार्यरत यंत्रणेतील सर्व कर्मचा-यांनी गुंणवत्ता पुर्ण कामे करुन जिल्ह्यातील गावे ओडीएफ़ मॉडेल कशी करता येईल. याबाबत आढाव्यात सुचना दिल्या.आढावा सभेस ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता प्रदिप बाराहाते ,जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्षाचे सर्व जिल्हा सल्लागार, पंचायत समितीस्तरावरील गट समन्वयक, समुह समन्वयक व सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन सल्लागार , भुजल सर्व्हेक्षण व विकास यंत्रणा प्रयोग शाळा चंद्रपुर यांच्या अधिनस्त असलेल्या जिल्हा व तालुकास्तरावरील प्रयोग शाळेचे कर्मचारी उपस्थित होते.

  • FTK Water testing awareness in villages । 1400 गावांत शुद्ध पाण्यासाठी चंद्रपूर जिल्हा प्रशासनाचा पुढाकार

    FTK Water testing awareness in villages

    FTK Water testing awareness in villages : चंद्रपुर – राज्य शासनाच्या निर्देशानुसार ग्रामिण भागातील पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोतांची रासायनिक व जैविक पाणी गुणवत्ता तपासणी करण्यासाठी दिनांक १२ मे ते ७ जून २०२५ या कालावधीत “क्षेत्रीय तपासणी संच (FTK)” संचा द्वारे पाणी गुणवत्ता तपासणी जनजागृती मोहीम जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. नागरिकांना सुरक्षित व स्वच्छ पिण्याचे पाणी मिळावे यासाठी जिल्ह्यातील 1400 गावांमध्ये ही मोहीम प्रभावीपणे राबविण्याचे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकीत सिंग यांनी केले आहे. Jal Jeevan Mission water quality monitoring

    चंद्रपुरात भव्य तिरंगा रॅली

                           एफ.टी.के. संचाद्वारे पाणी गुणवत्ता तपासणी जनजागृती मोहीम ही ग्रामपंचायत विभाग, महिला व बालकल्याण विभाग, आरोग्य विभाग, शिक्षण विभाग व पाणी पुरवठा विभागाच्या सहभागातून यशस्वी केली जाणार आहे. या मोहीमेच्या जिल्हास्तरीय शुभारंभ कार्यक्रमात मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकीत सिंग यांचे हस्ते शुभारंभ करण्यात आला. यावेळी  जल जीवन मिशनचे प्रकल्प प्रमुख नुतन सावंत ,जिल्हा आरोग्य अधिकारी अशोक कटारे, प्रकल्प संचालक जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा गीरीश धायगुडे , वरीष्ट भुवैज्ञानीक लीना बाराहाते, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक संजय धोटे, पाणी गुणवत्ता तज्ञ अंजली डाहुले तसेच जिल्हा पाणी व स्वच्छता विभागातील सल्लागार व कर्मचारी  जिल्हास्तरीय शुभारंभाला उपस्थीत होते.

    पाण्याचे नमुने तपासणी होणार

    जैविक क्षेत्रीय तपासणी (एफ.टी.के.) संचाद्वारे गावांमध्ये जनजागृती अभियान राबविण्यासाठी सुरु झालेल्या मोहिमेतंतर्गत गावात पाणी तपासणी करण्यासाठी निवड केलेल्या व संकेतस्थळावर नोंदविलेल्या पाच महिलांची पडताळणी करणे, महिलांच्या पाणी गुणवता विषयक एफ.टी.के. किट  प्रशिक्षणाच्या नोंदी घेणे घरगुती नळ, अंगणवाडी, शाळा यांची पाणी नमुणे तपासणी केली जाणार आहे. या मुळे पाणी  तपासणीत महिलांची भूमिका महत्वाची व निर्णयक ठरणार असुन ही मोहीम गट विकास अधिकारी, आरोग्य विभागातील कर्मचारी, ग्रामसेवक यांनी   गावा गावात चांगली राबवावी असे  प्रतीपादन मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकीत सिंग यांनी केले. Field Test Kit training for women in Maharashtra

    गावात आठवी ते दहावीमधील विद्यार्थ्यांना एफ. टी. के. किटव्दारे पाणी तपासणीचे प्रात्यक्षिक देणे, वर्ग ८ ते १० मधील विद्यार्थ्यांमार्फत शाळा, अंगणवाड्या, घरगुती नळ जोडण्यामधील पाणी नमुने तपासणी करणे, डब्यूक्यूएमआयएस (WQMIS) पोर्टलवर नोंदी घेणे, नळ पाणी पुरवठा योजना स्त्रोत, घरगुती नळ जोडण्या, शाळा, अंगणवाड्यांची पाणी गुणवता तपासणी करण्यासाठी रासायनिक व जैविक एफ.टी.के.किट  वाटप करणे, तसेच स्थानिकांना पाणी गुणवत्ता तपासणी व त्यापासून होणारे फायदे सांगितले जाणार असल्याचे प्रकल्प संचालक नुतन सावंत यांनी सांगीतले. Jal Jeevan Mission water quality monitoring

                          दिनांक १९ ते २३ मे २०२५ या कालावधीत जनजागृती मोहिमेचा तालुकास्तरीय शुभारंभ गट विकास अधिकारी यांचे हस्ते करण्यात येणार आहे तर दि. २ जून ते ७ जून २०२५ कालावधीत मोहिमेची ग्रामपंचायत स्तरावर प्रत्यक्ष अंमलबजावणी होईल. या मोहिमेदरम्यान जिल्हयात क्षेत्रीय तपासणी संच (एफ.टी.के.) द्वारे पाणी पाणी गुणवत्ता तपासणी आणि व्यापक जनजागृती करण्यात येणार असल्याचे  जल जीवन मिशन चे प्रकल्प संचालक नुतन सावंत  यानी सांगीतले .

  • school enrollment process । डॉ. अशोक उईके यांचा पुढाकार: जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये दर्जेदार शिक्षणाची ग्वाही

    school enrollment process

    school enrollment process : चंद्रपूर – विद्यार्थी हा केंद्रबिंदू मानून विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देणे हे शिक्षकांचे कर्तव्य आहे. स्पर्धेच्या या युगात आपला विद्यार्थी कसा समोर जाईल, याचा गांभिर्याने विचार करून शिक्षकांनी अध्यापनाचे कार्य करावे. आजच्या युगात इंग्रजी शाळांचे प्रस्त वाढले असतांना, जिल्हा परिषदेच्या शाळेतसुध्दा विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण आणि उज्वल भविष्य मिळू शकते, असा विश्वास पालकांना देऊन विद्यार्थ्यांची पटसंख्या वाढविण्यासाठी सर्व शिक्षकांनी संकल्प करावा, अशा सूचना राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. अशोक उईके यांनी दिल्या.

    प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना मिळाला न्याय, खासदार धानोरकर यांचा पाठपुरावा

    जिल्हाधिकारी कार्यालयात शिक्षण विभागाचा आढावा घेताना ते बोलत होते. बैठकीला जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी., मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंग, शिक्षणाधिकारी (प्राथ.) अश्विनी सोनवणे, राजेश पाताळे (माध्य.), अधिष्ठाता डॉ. मिलिंद कांबळे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. महादेव चिंचोळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अशोक कटारे तसेच इतर अधिकारी उपस्थित होते. school enrollment process

    शाळेतील मूलभूत सुविधांसाठी शासन निधीची कमतरता पडू देणार नाही, असे सांगून पालकमंत्री डॉ. उईके म्हणाले, जि.प. शाळांतील विद्यार्थी पटसंख्या का कमी होत आहे, याची कारणमिमांसा होणे आवश्यक आहे. या कारणांचा शोध घेऊन शिक्षण विभागाने पाऊले टाकावीत. पटसंख्या वाढविण्यासाठी शिक्षकांनी प्रयत्न करावे. त्यांच्या पाल्यांची गुणवत्ता आणि उज्वल भविष्य आम्ही घडू शकतो, असा विश्वास पालकांना द्या. शैक्षणिक क्षेत्रात असलेल्या ‘असर’ आणि ‘नॅस’ या उपक्रमांचा आधार घेऊन शिक्षण विभागाने प्रयत्न करावे. importance of quality education

    शाळेमध्ये शिक्षकांची समिती तयार करून अध्यापनाकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. त्यासाठी शिक्षकांची शिक्षकांकडूनच पडताळणी करा. नवनवीन संशोधन करा. आगामी शैक्षणिक क्षेत्रात शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे अतिशय चांगल्या पद्धतीने स्वागत होण्यासाठी आतापासून नियोजन करा. शैक्षणिक उपक्रमांतर्गत दर 15 दिवसांनी पालकांच्या उपस्थितीत दर्जेदार चावडी वाचन उपक्रम राबवा. ज्या शाळांमध्ये इंटरनेट कनेक्शन आणि विद्युत पुरवठा वारंवार खंडित होतो, त्यासाठी जिल्हा नियोजन समिती मधून निधी देण्यात येईल. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शाळेत येण्याजाण्याचा त्रास होऊ नये, यासाठी मानव विकास अंतर्गत बसेसचे योग्य नियोजन करा. public school improvement strategies

    गाव स्तरावरील शाळांना भेटी द्या : शिक्षण विभागाच्या सर्व अधिकाऱ्यांनी गाव स्तरावरील शाळांमध्ये भेटी देऊन नियमितपणे आढावा घ्यावा. ज्या शाळांमध्ये सीसीटीव्ही लावण्यात आले आहे, ते खरंच सुरू आहेत का, शाळेतील तक्रार पेटींचा उपयोग होतो का, याची पडताळणी करावी. सुवर्ण महोत्सवी शिष्यवृत्ती योजनांची माहिती विद्यार्थ्यांच्या पालकांपर्यंत पोहोचवा, अशा सुचना पालकमंत्री डॉ. उईके यांनी दिल्या. parent-teacher engagement programs

    मानव विकास अंतर्गत 7445 विद्यार्थीनींना सायकलचे वाटप : चंद्रपूर जिल्ह्यात सर्व व्यवस्थापनाच्या एकूण 2461 शाळा असून यापैकी 1549 शाळा जिल्हा परिषदेच्या आहेत. जिल्ह्यात एकूण विद्यार्थी संख्या 3 लक्ष 61 हजार 687 आहे. सखी सावित्री समिती, विद्यार्थी सुरक्षा समिती आणि तक्रार पेटी उपलब्ध असलेल्या शाळांची संख्या 2461 आहे. 475 शाळांमध्ये सीसीटीव्ही लावण्यात आले असून जिल्हा परिषदेच्या 549 शाळांमध्ये सीसीटीव्ही उपलब्ध करून देण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. तसेच जिल्ह्यात अपार आयडीचे काम 87 टक्के पूर्ण झाले आहे. मानव विकास अंतर्गत ग्रामीण भागातील 7445 मुलींना सायकलचे वाटप करण्यात आल्याची माहिती शिक्षण विभागाने बैठकीत दिली.

  • compost pit for village । 1 मे पासून चंद्रपुर जिल्ह्यात “कंपोस्ट खड्डा भरू, आपलं गाव स्वच्छ ठेवू !” मोहीमेची सुरुवात

    compost pit for village

    compost pit for village : चंद्रपुर : 24 एप्रिल 2025 ग्रामीण जनतेमध्ये स्वच्छते विषयक वर्तणुकीत बदल घडवून आणने, सेंद्रिय कचऱ्याचे व्यवस्थापन करून वैयक्तिक व सार्वजनिक स्वच्छतेचे महत्व पटवून देणे, घनकचरा व्यवस्थापनात सुधारणा व पर्यावरणपूरक उपाययोजना करण्यासाठी, कचरा कमी करणे, पुनर्वापर करण्याच्या उदेश्याने  दि. 01 मे ते 30 सप्टेंबर 2025 या कालावधीत “कंपोस्ट खड्डा भरू, आपलं गाव स्वच्छ ठेवू!” मोहीम चंद्रपुर जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. जिल्ह्यातील प्रत्येक गावात या मोहीमेची प्रभावी अंमलबजावणी करावी असे आवाहन चंद्रपुर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंग यांनी केले आहे. organic waste composting at home

    जननी शिशु सुरक्षा योजना संकटात?

              स्वच्छ भारत मिशन ग्रा. टप्पा 2 कार्यक्रमांतर्गत चंद्रपुर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पिलकित सिंग  यांचे मार्गदर्शनात व  उप मुख्य कार्यकारी अधिकारी (पाणी व स्वच्छता) नूतन सावंत यांचे नेतृत्वात घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापनाची अंमलबजावणी सुरू आहे. गावात निर्माण करण्यात आलेल्या नाडेपच्या माध्यमातून सेंद्रिय कचऱ्याचे व्यवस्थापन करून खत निर्मिती करण्याकरीता राज्याच्या पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे वतीने “कंपोस्ट खड्डा भरू, आपलं गाव स्वच्छ ठेवू !” मोहीम राबविण्याचे निर्देश दिले आहे. 

    दि. ०१ मे ते दि. ३० सप्टेंबर २०२५ असे एकूण १३८ दिवस पर्यंत ही मोहीम राबविण्यात येत आहे. घरगुती व सार्वजनिकस्तरावर वर्गीकरण केलेल्या ओल्या कचऱ्याचे  दि. २७ ते ३० एप्रिल २०२५ या कालावधीमध्ये संकलन करण्यात येईल.  दि. 29 ते 30 एप्रिल दरम्यान या मोहिमेची विविध माध्यमांचा वापर करीत प्रचार प्रसिध्दी होईल. eco friendly waste disposal methods

    महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून दि. ०१ मे २०२५ ला “कंपोस्ट खड्डा भरू, आपलं गाव स्वच्छ ठेवू!” या मोहिमेचा शुभारंभ होईल. यावेळी स्थानिकस्तरावर लोकप्रतिनिधी, अधिकारी , कर्मचारी यांची उपस्थिती राहिल. दि. ०१ मे ते दि. १० मे  या  कालावधीत गावातून संकलीत केलेला ओला कचरा नाडेप मध्ये कचरा भरण्यात येईल. त्यापासून खत निर्मितीनंतर 1 सप्टेंबर ते 15 सप्टेंबर 2025 पर्यंत नाडेप तयार झालेला खत उपसण्याची  प्रक्रिया होईल. सदर अभियाना राबविणेबाबत गट विकास अधिकारी, पंचायत समिती (सर्व) यांना निर्देश देण्यात आले आहे.

    अभियानाची पडताळणी :

    138 दिवसाच्या “कंपोस्ट खड्डा भरू, आपलं गाव स्वच्छ ठेवू !” या मोहिमेची पडताळणी जिल्हास्तरावरून उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पा व स्व), गटविकास अधिकरी, दोन विस्तार अधिकारी, जिल्हा सल्लागार, तालुकास्तरावरील समन्वयक व गट समन्वयक ओल्या कऱ्यापासून भरलेल्या नाडेप खड्डयाची पडताळणी करतील. eco friendly waste disposal methods

    प्रचार व प्रसिध्दी, समुदाय सहभाग व श्रमदान :

    जास्तीत जास्त गावामंध्ये ही मोहीम राबविण्यासाठी 1 मे पासून सुरू होणाऱ्या याअभियानाची प्रचार प्रसिध्दी स्थानिक वर्तमानपत्र व  समाज माध्यमां मध्ये करण्यात येईल. तसेच यशोगाथा प्रकाशित करून इतर गावांना प्रेरित करण्यात येणार आहे. अभियानाकरीता स्थानिक लोकप्रतिनिधी, संस्था, बचतगट महिला व शेतकरी गटांचा सहभाग घेऊन गावपातळीवर श्रमदान उपक्रम राबवून जनसहभाग घेतला जाणार आहे.

    अभियानाची सूचना व पुर्व तयारी :

    राज्यस्तरावरून मिळालेल्या निर्देशानुसार, गटविकास अधिकारी, पं.स. स्तरावर ग्राम पंचायत अधिकारी यांची कार्यशाळा, बैठक आयोजित करतील. त्यानंतर ग्राम पंचायत अधिकारी हे ग्रामस्थांना माहिती देतील. तसेच गावात दवंडी दिली जाणार आहे. ग्रामपंचायत कार्यालय, शाळा, अंगणवाडी, प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्रे, सोसायटी कार्यालय, तलाठी साज्जा कार्यालयाच्या सूचना फलकावर दि. २५ ते 26 एप्रिल या कालावधीत अभियानाची माहिती प्रसारित करण्यात येईल. compost pit for village

    या मोहिमेच्या माध्यमातून ग्रामस्तरावर नाडेपद्वारे खत निर्मिती होईल. घनकचरा व्यवस्थापनात सुधारणा व पर्यावरणपूरक उपाययोजना करण्यासाठी, कचरा कमी करणे, पुनर्वापर करणे, ज्यामुळे पर्यावरणावर होणारा नकारात्मक परिणाम कमी करता येईल. ग्रामपंचायत, बचत गट आणि युवकांचा सक्रिय सह‌भाग वाढविला जाणार आहे.  त्यामुळे चंद्रपुर जिल्ह्यामध्ये ही मोहीम प्रभावीपणे राबवावी असे आवाहन चंद्रपुर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंग यांनी केले आहे.

  • चंद्रपुरात एका आठवड्यात काढले 60 हजार 494 नागरिकांचे आयुष्यमान भारत कार्ड

    News34 chandrapur

    चंद्रपूर : आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेंतर्गत लाभार्थी व्यक्तीस प्रती कुटुंब प्रती वर्ष 5 लक्ष रुपयांचा आरोग्य विमा हा 1209 उपचार/शस्त्रक्रिया करता देण्यात येतो. या योजनेंतर्गत देशातील शासकीय आणि अंगीकृत खाजगी रुग्णालयांच्या माध्यमातून मोफत लाभ पुरविण्यात येत आहे. जिल्ह्यात आयुष्मान कार्ड काढण्याची मोहीम प्रभावीपणे राबविण्यात येत असून मागील सात दिवसांत तब्बल 60494 नागरिकांचे आयुष्मान कार्ड तर आतापर्यंत एकूण 4 लक्ष 6 हजार 239 जणांचे आयुष्मान कार्ड काढण्यात आले आहे.

     

    आपले सरकार सेवा केंद्राचे केंद्रचालक यांच्या विशेष सहभागाने आयुष्मान कार्ड काढण्याची मोहीम युध्दपातळीवर सुरू आहे. आरोग्य विभागामार्फतसुध्दा विशेष मोहिमेचे आयोजन करण्यात आले असून यात तालुका आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, समुदाय आरोग्य अधिकारी, आरोग्य सेवक, आरोग्य सहाय्यक, तालुका समुह संघटक, डाटा एंट्री ऑपरेटर आणि इतर कर्मचा-यांचा तसेच उमेद अंतर्गत बचत गटाचे सहकार्य आयुष्मान कार्ड काढण्याकरीता घेण्यात येत आहे. पात्र लाभार्थी हे मोबाईल ॲपच्या सहाय्याने स्वत:चे आयुष्मान कार्ड काढू शकतात. त्यामुळे त्यांनी सुध्दा या मोहिमेत आपला सहभाग नोंदविण्याचे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन यांनी केले आहे.

     

    आयुष्मान कार्ड स्वतः काढण्याची पद्धत :
    Weblink- https://beneficiary.nha.gov.in आणि मोबाईल मध्ये ‘Ayushman App’च्या सहाय्यतेने पात्र लाभार्थी स्वत:चे किंवा इतर पात्र लाभार्थी व्यक्तीचे ‘आयुष्मान कार्ड’ काढू शकतो. या करीता, लाभार्थी जवळ Android 9.0 version किंवा त्यापेक्षा अधिक version मोबाईल असणे आवशक आहे. सुरवातीला मोबाईल मध्ये Google Play Store मधून ‘Ayushman App’ download व Install करणे गरजेचे आहे. त्यानंतर Adhar Face Rd App Install करावे. ‘Ayushman App’ मध्ये “Beneficiary” लॉगीन पर्यायाची निवड करावी. Mobile OTP च्या सहाय्याने लॉगीन करावे. तदनंतर, Search पर्यायामध्ये नाव, आधार कार्ड क्रमांक आणि राशन कार्ड online ID(RCID) द्वारे पात्र लाभार्थी शोधता येते. यानंतर पात्र लाभार्थी यांची ई-केवायसी आधार कार्डशी संलग्न मोबाईल क्रमांकवर OTP किंवा फेस ऑथ (लाभार्थी यांचा मोबाईल द्वारे फोटो) च्या माध्यमातून पूर्ण करता येते. याबाबत अधिक माहिती करीता आपल्या नजीकच्या शासकीय रुग्णालय, आरोग्य केंद्र, ग्राम पंचायत, अंगीकृत खाजगी रुग्णालयातील आरोग्य मित्र यांचाशी संपर्क साधावा.

     

    आयुष्मान कार्ड कोण काढू शकते : आपले सरकार सेवा केंद्र, आशा स्वयंसेविका, योजनेच्या अंगिकृत रुग्णालयातील आरोग्य मित्र आणि स्वत: लाभार्थी.

     

    आयुष्मान कार्डचे लाभ : प्रति वर्ष प्रति कुटुंब 5 लक्ष रुपयांपर्यंत आरोग्य सुविधा मोफत, 1209 उपचार / शस्त्रक्रियांचा समावेश, देशातील अंगिकृत शासकीय आणि खाजगी रुग्णालयांचा समावेश

     

    चंद्रपूर जिल्ह्यातील अंगिकृत रुग्णालये :

     

    चंद्रपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, मूल, चिमूर, वरोरा आणि बल्लारपूर येथील उपजिल्हा रुग्णालय / ग्रामीण रुग्णालय, गाडेगोणे रुग्णालय, मूल रोड चंद्रपूर आणि मुसळे रुग्णालय, बसस्थानक मागे चंद्रपूर.

  • तहानलेल्या गावांना मिळणार पाणी..! सरपंच संघटनेच्या मागणीला यश

    News34 chandrapur गुरू गुरनुले

    मुल – मागील काही दिवसापासून बेंबाळ, गोवर्धन, नांदगाव, घोसरी, बाबराळा, नवेगाव भुजला, चकदुगाळा या गावातील प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेतील पाणीपुरवठा बंद असल्याने या गावातील नागरिकांना पाण्याचा प्रचंड त्रास सहन करावा लागला.

     

    परिसरातील नागरिक दूषित पाणी पिल्यामुळे आरोग्याचा धोका निर्माण झाला होता. याबाबत सरपंच संघटनेने मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री यांना निवेदन देऊन पाणीपुरवठा सुरू करण्यासंदर्भात सतत पाठपुरावा केला होता. याबाबत शासनाच्या बैठकीमध्येही सरपंच संघटनेच्या वतीने सहभागी होऊन चर्चा करण्यात आली होती.

     

    पाण्यासाठी गावातील जनतेचे हाल होत असल्याने प्रशासनानेही याची गंभीर दखल घेऊन पाणीपुरवठा बाबतचा निधी प्रशासकीय स्तरावरून उपलब्ध करून देऊन पाणी पुरवठा सुरू करण्याचा निर्णय घेतला. सततच्या केलेल्या पाठपुराव्यामुळे व प्रशासनाच्या सहकार्यामुळे ही योजना पुन्हा सुरू झाली त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण तयार होऊन नागरिकांनी सरपंच संघटनेचे व प्रशासनाचे आभार मानले.

     

    या यशाबद्दल बेंबाळचे सरपंच चांगदेव केमेकार, नांदगावच्या सरपंच हिमानीताई वाकुडकर, बाबराळाचे सरपंच धिरज गोहणे, नवेगाव भुजला सरपंच यशवंत खोब्रागडे, गोवर्धनचे सरपंच गोपिकाताई जाधव, चकदूगाळा सरपंच प्रीती ताई भांडेकर, घोसरीच्या सरपंच रोशनी लोढे यांचेही नागरिकांनी आभार मानले.