Tag: जिल्हा कारागृह

  • traffic diversion during religious events । 🚨 “6 वाजता शहर बंद!” – चंद्रपुरात वाहतूक मार्गात मोठा बदल!

    traffic diversion during religious events

    traffic diversion during religious events : चंद्रपूर, दि. 5 : चंद्रपूर शहरामध्ये जिल्हा कारागृह परिसरात पुज्य हजरत मखदुम शाहबुद्दिन शहा उर्फ गैबीशहा वली यांचा दर्गा आहे. मोहर्रमनिमित्त 5 व 6 जुलै रोजी कारागृहात पुर्व प्रथेप्रमाणे उर्स (यात्रा) भरते. सदर दिवशी चंद्रपुर जिल्हयातील सर्व समाजातील भाविक मोठ्या प्रमाणात समाधीच्या दर्शनासाठी येत असतात. त्याकरीता शहरामध्ये वाहतूक समस्या निर्माण होऊन रहदारीला अडथळा निर्माण होवू नये, म्हणून शहरातील 6 जुलै रोजी सायंकाळी 6 ते रात्री 11 वाजेपर्यंत वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आला आहे. chandrpur city traffic update today

    धरती आबा ग्राम उत्कर्ष अभियान, विकासाची नवी पाऊलवाट

    हे मार्ग राहतील पूर्णत: बंद

    1. अंचलेश्वर गेट छत्रपती शिवाजी महाराज चौक-गिरणार चौक, 2. सोमेश्वर मंदीर – गिरणार चौक, 3. सजंय लस्सी सेटर (एस.बी.आय बँक) गिरणार चौक हे शहरातील मार्ग सर्व प्रकारच्या वाहनांसाठी बंद ठेवण्यात येत आहे. तसेच सदरचे मार्ग हे नो -पार्कीग म्हणून घोषित करण्यात येत आहे.

    या पर्यायी मार्गाचा वापर करावा :

    1. अंचलेश्वर गेट पासून कोहिनूर तलाव – मिलन चौक -गांधी चौक, 2. सोमेश्वर मंदीर – मिलन चौक- गांधी चौक, 3. एस.बी.आय बँक (सजंय लस्सी सेटर) गोल बाजार – गांधी चौक, 4. एस.बी.आय बँक (सजंय लस्सी सेटर) कुबेर दवाखाना -अंचलेश्वर गेट या मार्गचा वापर करावा.


    सदर अधिसूचना 6 जुलै रोजीच्या सायंकाळी 6 वा. पासून रात्री 11 वाजेपर्यंत अंमलात राहील. तसेग सदर अधिसुचनेमध्ये वेळेनुसार बदल करण्यात येईल. या कालावधीत शक्यतो नागरिकांनी अत्यावश्यक कामाशिवाय शहरात येण्याचे टाळावे व वरील निर्देशांचे पालन करून पोलिस प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन पोलिस अधिक्षक मुम्मका सुदर्शन यांनी केले आहे.

  • vocational training for female prisoners । कारागृहात शिक्षेबरोबरच संधीही! महिला कैद्यांसाठी व्यावसायिक प्रशिक्षण सुरू

    vocational training for female prisoners

    vocational training for female prisoners : चंद्रपूर – कारागृह हे केवळ शिक्षा भोगण्याचे ठिकाण राहिलेले नसून, आता ते महिला कैद्यांच्या पुनर्वसनाचे केंद्र बनले आहे. श्री लक्ष्मी नृसिंह नागरी सहकारी पतसंस्था, बल्लारपूर यांनी चंद्रपूर जिल्हा कारागृहातील महिला कैद्यांसाठी मेहंदी, ब्युटी पार्लर, शिवणकाम आणि भरतकामाचे प्रशिक्षण सुरू केले आहे. या उपक्रमामुळे महिला कैद्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण झाला असून, त्यांचे जीवन उजळण्यास मदत मिळत आहे.

    आमदार करण देवतळे यांचा पॉवर प्रोजेक्ट

    या प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन तुरुंग अधीक्षक अनुप कुमार कुमारे यांच्या हस्ते झाले. या वेळी पतसंस्थेचे अध्यक्ष श्रीनिवास सुंचुवार, वरिष्ठ तुरुंगाधिकारी नागेश कांबळे, कारागृह शिक्षक संजीव हातवडे, तसेच प्रशिक्षिका कविता डेरकर आणि रीना पोर्टेट उपस्थित होत्या.

    श्री लक्ष्मी नृसिंह नागरी सहकारी पतसंस्था हे केवळ चंद्रपूर नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातील तुरुंगांमध्ये कैद्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी कार्यरत आहे. त्यांच्या प्रयत्नांमुळे महिला कैद्यांना सुटकेनंतर नवजीवन सुरू करण्यासाठी आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्याची संधी मिळते. beauty parlour courses in jail

    आमच्या जीवनात आशेचा किरण

    महिला कैद्यांनीही या उपक्रमाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. त्यांनी सांगितले की, “या प्रशिक्षणामुळे आमच्या अंधाऱ्या जीवनात आशेचा किरण निर्माण झाला आहे. सुटकेनंतर आम्ही हे कौशल्य वापरून आमच्या कुटुंबाचा आधार बनू, तसेच समाजातील इतर महिलांनाही स्वावलंबी बनवण्यासाठी प्रेरणा देऊ.”

    या कार्यक्रमाला महिला कैदी, तुरुंग कर्मचारी आणि इतर मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.