Tag: जिल्हाधिकारी ऑन द स्पॉट

  • Collector inspected flood-affected areas । 🌊 वर्धा नदीच्या पूरस्थितीवर Collector यांची तातडीची पाहणी – प्रशासन सज्ज

    Collector inspected flood-affected areas

    Collector inspected flood-affected areas : चंद्रपूर, दि. 20 : जिल्ह्यात गत दोन – तीन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाच्या संततधारेमुळे जिल्ह्यातील नदी-नाले दुधडी भरून वाहत आहे. त्यातच इसापूर, पूस आणि लोअर वर्धा प्रकल्पातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सोडण्यात आल्यामुळे वर्धा नदीला पूर आला आहे. त्याचा फटका चंद्रपूर जिल्ह्यातील नदीकाठच्या गावांना बसला असून या पूरग्रस्त भागाची पाहणी करण्याकरीता जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी आज (दि.20) बामणी – राजूरा पुलाची तसेच शिवनी चोर (ता. चंद्रपूर) येथील पूरग्रस्त भागाला भेट देऊन पाहणी केली.

    व्हायरल व्हिडीओवरून कांग्रेसचा संताप

    बामणी – राजूरा पुलावरील वाहतूक मंगळवार मध्यरात्रीपासून बंद करण्यात आली होती. बुधवारी सकाळपासून पाण्याची पातळी पुलाच्या खाली गेली असली तरी मोठ्या वाहनांना वाहतुकीसाठी प्रतिबंध करावा. पुलाच्या दोन्ही बाजुला पोलिस बंदोबस्त तैनात ठेवावा. पाणी पातळी कमी झाल्यावरच वाहतूक सुरू करावी. कोणतीही अप्रिय घटना घडणार नाही, याची यंत्रणेने काळजी घ्यावी, अशा सुचना जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी दिल्या. Vinay Gauda flood inspection villages Chandrapur

    यावेळी जिल्हा पोलिस अधिक्षक मुम्मका सुदर्शन, बल्लारपूरचे नायब तहसीलदार श्री. साळवे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता वैभव जोशी, पोलिस निरीक्षक विपीन इंगळे आदी उपस्थित होते.

    शिवनी चोर परिसराला भेट : 

    जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी चंद्रपूर तालुक्यातील शिवनी चोर परिसरातील पूरग्रस्त भागाला भेट दिली. वर्धा नदीच्या बॅक वॉटरमुळे येथील परिसरातील पिके मोठ्या प्रमाणात पाण्याखाली आली आहेत. पूर ओसरल्यावर नुकसानग्रस्त शेतमालाचे पंचनामे अचूक पध्दतीने करावे. त्यासाठी उपविभागीय अधिका-यांनी योग्य नियोजन करावे. पंचनामे करण्यात आलेल्या शेतीची व शेतक-यांची यादी ग्रामपंचायतीमध्ये लावावी. तसेच पंचनामे करतांना संबंधित मालकाचे नाव व त्यांचा मोबाईल क्रमांक नोंदवावा, जेणेकरून नुकसान भरपाई देताना कोणतीही अडचण येणार नाही.

    यावेळी उपविभागीय अधिकारी संजय पवार, नायब तहसीलदार ओंकार ठाकरे, मंडळ अधिकारी प्रवीण वरभे, तलाठी दिनेश काकडे, शिवनी चोरचे सरपंच रविंद्र पहानपट्टे आदी उपस्थित होते.

  • vinay gowda flood inspection chandrapur । कापसाचे नुकसान, रस्ते बंद… पण जिल्हाधिकारी तत्पर!

    vinay gowda flood inspection chandrapur

    vinay gowda flood inspection chandrapur : चंद्रपूर, दि. 10 : जिल्ह्यात सुरू असलेल्या पावसाच्या संततधारेमुळे अनेक तालुक्यांमध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यातच जिल्ह्यातील काही तालक्यांना पुराचा चांगलाच तडाखा बसला असून जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी आज (दि.10) सावली आणि पोंभुर्णा तालुक्यातील पूरग्रस्त भागाला भेट देऊन बाधित क्षेत्राची पाहणी केली. district collector flood visit Chandrapur

    चंद्रपूर-नागपूर महामार्गाची दुरावस्था टोलवसुली थांबवा – खासदार धानोरकर

    यावेळी जिल्हाधिका-यांनी सावली तहसील कार्यालयात तालुका आपत्ती व्यवस्थापन समितीची बैठक घेतली. यावेळी जिल्हाधिकारी म्हणाले, आपत्तीला तात्काळ प्रतिसाद व आपत्तीनंतर पूर्व परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी उपाययोजना कराव्यात. सर्व अधिकाऱ्यांनी अलर्ट मोडवर राहून काम करावे. आपात्कालीन परिस्थितीत नागरिकांना राहण्याच्या सोयीकरिता गावातील शासकीय, निमशासकीय असलेल्या इमारती तसेच शाळा/ महाविद्यालये येथे आश्रय देण्याकरीता चांगली व्यवस्था करावी. पूरबाधित गावात धान्य आणि किराणाची कमतरता पडणार नाही, याबाबत दक्ष राहावे.

    पूर परिस्थितीत रस्ते बंद असल्यामुळे इतर ठिकाणांवरून तालुक्याच्या ठिकाणी शाळा, महाविदयालमध्ये येणा-या विद्यार्थ्यांना शाळेत न- येण्याबाबत मुख्यध्यापक/ प्राचार्य यांना सुचना द्याव्यात. तसेच बाधित गावात अधिकारी/ कर्मचा-यांची नियंत्रण अधिकारी म्हणून नेमणूक करावी. रस्त्यांवरील खड्या बाबत सार्वजनिक बांधकाम विभागाला सुद्धा त्यांनी सुचना दिल्या. collector vinay gowda flood area action

    पुढे जिल्हाधिकारी श्री. गौडा म्हणाले, पूर परिस्थिती दरम्यान शेती पीक, मनुष्यहानी, पशुहानी, घर, गोठा व वीज पडून झालेल्या नुकसानीचे तहसीलदार, गटविकास अधिकारी, तालुका कृषी अधिका-यांनी त्वरित पंचनामे करावे. तसेच जे पुल पाण्याखाली गेले आहेत, त्याठिकाणी पोलिस विभागाने तात्काळ बॅरीकेट लावावे व पोलिस कर्मचा-याची नेमणुक करून जिवीतहानी होणार नाही, याबाबत दक्षता घेण्यात यावी. पूर परिस्थितीत आपदा मित्र येथील कर्मचा-यांनी जिवीतहानी टाळण्याकरिता 24 तास सतर्क राहण्याच्या सूचना जिल्हाधिका-यांनी दिल्या. flood affected villages visited by collector Chandrapur

    यावेळी जिल्हाधिकारी श्री. गौडा यांनी सावली तालुक्यातील जिबगाव-सिर्सी- साखरी हरांबा व व्याहाड बुज- वैनगंगा नदी मार्गाची व पूर परिस्थिती बाधीत क्षेत्राची पाहाणी केली. तसेच जिबगांव येथील ग्रामस्थ, सरपंच यांच्याशी  संवाद सादला. पाहणीदरम्यान उपविभाग अधिकारी अजय चरडे, तहसीलदार प्रांजली चिरडे, गटविकास अधिकारी संजय नैताम, ठाणेदार श्री. पुल्लरवार, वैद्यकीय अधिकारी श्री. चौधरी, मुख्याधिकारी श्री. डोये यांच्यासह मंडळ अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक आदी उपस्थित होते.

    पोंभुर्णा तालुक्यात पूरग्रस्त भागाला भेट :

     वैनगंगा नदीच्या पाण्याच्या वाढत्या पातळीमुळे निर्माण झालेल्या पूर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी टोक गावास भेट दिली. या दौऱ्यात त्यांनी गावाची व आसपासच्या परिसराची पाहणी केली. यावेळी त्यांनी घाटकुळ दिशेने जाणाऱ्या पुलाचे निरीक्षण केले. सदर पुलावरून पुराचे पाणी वाहत असल्यामुळे रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. दौऱ्यादरम्यान त्यांनी ग्रामस्थांशी संवाद साधला. ग्रामस्थांनी कापूस व काही प्रमाणात सोयाबीन पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याचे निदर्शनास आणून दिले. याची गंभीर दखल घेत जिल्हाधिका-यांनी तात्काळ शेतीच्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश प्रशासनास दिले.

    टोक गाव वैनगंगा नदीच्या पुरामुळे पूर्णतः पाण्याने वेढले गेले असून पाणीपातळी आणखी वाढली तर गावात येणारा एकमेव रस्ताही बंद होण्याची शक्यता आहे. ही स्थिती लक्षात घेता प्रशासनाने पूर्वतयारी म्हणून कालच गावातील गरोदर माता यांना पोंभुर्णा ग्रामीण रुग्णालयात हलवले होते. तसेच संपूर्ण गावावर प्रशासनाने रात्रीभर लक्ष ठेवून आवश्यक उपाययोजना राबवल्या.