Tag: चांदा फोर्ट रेल्वे स्टेशन

  • chanda fort railway station upgrade । चांदा फोर्ट रेल्वे स्टेशन झाले हायटेक! 🤩

    chanda fort railway station upgrade

    चांदाफोर्ट स्थानकाचा ऐतिहासिक कायापालट हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टीचा परिणाम – आ. किशोर जोरगेवार

    chanda fort railway station upgrade : चंद्रपूर – चांदाफोर्ट स्थानकाचा झालेला कायापालट हा केवळ भौतिक स्वरूपातील बदल नाही, तर तो पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वाचे मूर्तस्वरूप आहे. त्यांच्या संकल्पशक्तीमुळे आणि केंद्र शासनाच्या सहकार्यामुळेच आज चंद्रपूरकरांना स्वच्छ, सुसज्ज आणि आधुनिक रेल्वे स्थानक अनुभवता येत आहे. चांदाफोर्ट स्थानकाचा ऐतिहासिक कायापालट हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टीचा परिणाम आहे. असे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले. Amrit Bharat Station scheme Chandrapur

    रेल्वे केवळ प्रवासाचे नाहीतर विकासाचे साधन – खासदार प्रतिभा धानोरकर

    अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत चांदाफोर्ट रेल्वे स्थानकाचा पुनर्विकास करण्यात आला आहे. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे या रेल्वे स्थानकाचे उद्घाटन संपन्न झाले. या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी खासदार प्रतिभा धानोरकर, स्वातंत्र्यसैनिक डॉ. शेषरावजी इंगोले, मुख्य अभियंता बी.व्ही.एस. सुब्रमण्यम, दामोदर मंत्री, पूनम तिवारी, प्रकाश देवतळे, सुभाष कासनगोट्टुवार, विठ्ठल डुकरे, रवी गुरनुले, देवानंद वाढई, मधुसूदन रुगंठा, प्रदीत किरमे, वंदना हातगावकर, मधुकर राहूत, सुदामा यादव, विश्वजित शाहा, नकुल वासमवार, विनोद अनंतवार, कार्तिक बोरेवार, राहुल मोहुर्ले, शेखर शेट्टी, सलीम शेख आदींची उपस्थिती होती.

    यावेळी पुढे बोलताना आ. जोरगेवार म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वात “अमृत भारत स्टेशन योजना” अंतर्गत देशातील १०३ नव्याने पुनर्विकसित रेल्वे स्थानकांचे लोकार्पण झाले, ही आपल्या सर्वांसाठी गौरवाची बाब आहे. चांदाफोर्ट स्थानकाचे या यादीत समावेश होणे हे आपल्यासाठी विशेष महत्त्वाचे आहे. चांदा फोर्ट स्थानक हे केवळ एक स्थानक नसून, हे या परिसराचा सर्वांगीण विकासाचे प्रवेशद्वार ठरेल. या स्थानकामुळे स्थानिक नागरिकांना आधुनिक, स्वच्छ, सुरक्षित आणि सुसज्ज सेवा मिळतील. आता हे स्थानक अधिक सुरक्षित आणि सुसज्ज सुविधांनी युक्त असेल. स्थानकातील प्रवाशांसाठी नवीन सुविधा, व्हीलचेअर ॲक्सेस, सुसज्ज प्रतीक्षा कक्ष, डिजिटल सिस्टीम्स, एलईडी डिस्प्ले, आधुनिक तिकीट व्यवस्था, स्वच्छतागृहे, आणि व्यावसायिक गरजांसाठी सुलभ मालवाहतूक व्यवस्थापन – या सर्व सुविधा मिळणार आहेत. Benefits of Amrit Bharat scheme in Chandrapur

    केंद्र शासनाच्या सहकार्याने, रेल्वे मंत्रालयाच्या माध्यमातून हे शक्य झाले

     स्थानकासह रस्ते, वीज, पाणी, शिक्षण आणि रोजगाराच्या संधी वाढवण्यासाठी अधिकाधिक योजना राबवण्याचा आमचा प्रयत्न राहील. तसेच या परिसरातील रस्ते, वीज, पाणी, आरोग्य, शिक्षण, आणि रोजगाराच्या संधी वाढवण्यासाठी आम्ही कटिबद्ध असल्याचे ते यावेळी म्हणाले. या कार्यक्रमाला रेल्वे प्रशासनाच्या अधिकाऱ्यांसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

  • Chanda fort station heritage design features । ‘अमृत भारत योजना’तून चांदाफोर्ट स्थानकाचा कायापालट – 116 वर्षांचा इतिहास पुन्हा उजळला!

    Chanda fort station heritage design features

    Chanda fort station heritage design features : चंद्रपूर : भारत सरकारने देशभरातील रेल्वे स्थानकांच्या पुनर्विकासासाठी हाती घेतलेल्या “अमृत भारत स्टेशन योजने” अंतर्गत 22 मे 2025 रोजी देशभरातील 103 स्थानकांचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे होणार आहे.

    या राष्ट्रीय कार्यक्रमात दक्षिण पूर्व मध्य रेल्वे, नागपूर मंडळ अंतर्गत येणाऱ्या देवाडी, डोंगरगड, नेताजी सुभाषचंद्र बोस इतवारी, चांदाफोर्ट व आमगाव या स्थानकांचा समावेश आहे.

    माझ्या बाळाचा जीव वाचवा, चंद्रपुरातील ४ महिन्याच्या बालकाला आहे उपचाराची गरज

    चांदाफोर्ट रेल्वे स्थानकाचा इतिहास व विकास:

    महाराष्ट्र राज्यातील चंद्रपूर जिल्ह्यातील चांदाफोर्ट रेल्वे स्थानक गोंदिया–नागभीड–बल्हारशाह या महत्त्वाच्या रेल्वेमार्गावर स्थित आहे. या स्थानकाची स्थापना इ.स. 1908 मध्ये झाली असून, 1999 मध्ये ब्रॉडगेजमध्ये रूपांतर व 2018 मध्ये विद्युतिकरण पूर्ण झाले आहे. हे स्थानक कृषिप्रधान भागात असून, प्रवाशांसाठी तसेच स्थानिक नागरिकांसाठी एक महत्त्वाचे केंद्र ठरले आहे. Amrit Bharat Scheme Chandafort station inauguration

    chanda fort

    अमृत भारत स्टेशन योजना अंतर्गत चांदाफोर्ट स्थानकाचा 19.3 कोटी रुपये खर्च करून पुनर्विकास करण्यात आला आहे. या योजनेचा उद्देश स्थानकाचा कायापालट करून ते आधुनिक, प्रवासी अनुकूल व सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध केंद्रात रूपांतरित करणे आहे.

    करण्यात आलेल्या प्रमुख सुधारणा व सुविधा:

    पार्किंग व सर्क्युलेशन क्षेत्राचा विस्तार, विशेषतः सण-उत्सव व गर्दीच्या वेळी उपयोगी, उंच मास्ट लाइट्स – उत्तम प्रकाश व्यवस्था व सुरक्षा, बाह्य स्वरूपाचे उन्नतीकरण – चांदाफोर्टच्या ऐतिहासिक स्थापत्यशैलीत, ‘खुर्दा पॅटर्न’नुसार पारंपरिक प्रवेशद्वार, लिफ्ट व एस्केलेटर (दुसऱ्या टप्प्यात) – सुलभ प्रवासासाठी, कोळसा उद्योग व गोंड संस्कृतीवर आधारित भित्तीचित्रे व सजावट, फ्लॅग माउंट व सजावटी ध्वज – राष्ट्रीय गौरवाचे प्रतीक, 12 CCTV कॅमेऱ्यांद्वारे वाढवलेली सुरक्षा व्यवस्था, ‘वन स्टेशन वन प्रॉडक्ट’ योजना – स्थानिक उत्पादकांना प्रोत्साहन इत्यादी. Chandafort station redevelopment cost and features

    स्थानकांची वैशिष्ट्ये :

    या स्थानकाच्या नव्या रचनेत चांदाफोर्ट किल्ल्याच्या स्थापत्यशैलीचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये झरोखे, बुर्ज, बलुआ दगडाची रंगसंगती व पारंपरिक सजावट यांचा समावेश असून, स्थानिक वारसा आणि आधुनिक तंत्रज्ञान यांचे उत्कृष्ट मिश्रण येथे पाहायला मिळते.

    Powered by myUpchar

    नागपूर मंडळाचे मंडळ रेल्वे व्यवस्थापक दीपक कुमार गुप्ता यांनी माहिती दिली की, चांदाफोर्ट रेल्वे स्थानकाचा हा कायापालट स्थानिक इतिहास, वारसा व आधुनिक सुविधा यांची सांगड घालणारा आहे. हा विकास केवळ रेल्वे विभागासाठी नव्हे, तर संपूर्ण चंद्रपूर जिल्हा व परिसरातील नागरिक व पर्यटकांसाठीही अभिमानाची बाब ठरेल.  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज या स्थानकाचे लोकार्पण होईल, तेव्हा चांदाफोर्ट रेल्वे स्थानक हे देशाच्या सांस्कृतिक वारशाचे व तांत्रिक प्रगतीचे प्रतीक म्हणून उभे राहील.