Part of a dilapidated building collapsed
Part of a dilapidated building collapsed : चंद्रपूर 11 सप्टेंबर 2025 – चंद्रपुरातील जटपुरा गेट समोरील इमारतीचा एक भाग कोसळला, या घटनेत दूध विक्रेता महिला गंभीर जखमी झाली. सदर घटना पहाटे 5 वाजता घडली.
जन सुरक्षा विधेयकविरोधात महाविकास आघाडीचे निदर्शने
ऐतिहासिक जटपूरा गेट समोरील विनोद मेहता यांच्या मालकीच्या इमारतीचा वरचा भाग जीर्ण अवस्थेत आला होता, आज झालेल्या घटनेत 50 वर्षीय मनीषा लोखंडे या महिला गंभीर जखमी झाली असून त्यांच्या हाता-पायाला गंभीर दुखापत झाल्याची माहिती आहे. सदर इमारत ही 50 ते 60 वर्षे जुनी आहे.
माजी नगरसेविकेचा पाठपुरावा
याबाबत माजी नगरसेविका छबु वैरागडे यांनी सदर इमारतीच्या झालेल्या जीर्ण इमारतीची अवस्था बघता भविष्यात दुर्घटना होऊ नये यासाठी पालिकेद्वारे 4 नोटीस पाठविल्या होत्या मात्र मेहता यांनी त्यावर काहीच उत्तर दिलं नाही. घर मालकाच्या दुर्लक्षामुळे व पालिकेच्या उदासीनतेमुळे कामामुळे महिला जखमी झाली.
सदर इमारतिच्या तळमजल्यावर छोटं हॉटेल सुद्धा आहे, या घटनेमुळे त्या हॉटेलला धोका निर्माण झाला असून पालिकेचे कर्मचारी व अधिकारी यांनी सदर इमारतीची पाहणी केली असून त्यावर कारवाई करण्यात येणार आहे. चंद्रपूर शहरात अश्या अनेक जीर्ण इमारती असून भविष्यात त्यामुळे मोठी दुर्घटना घडणार ही शक्यता नाकारता येत नाही, त्यामुळे पालिकेने अश्या जीर्ण इमारती लवकरात लवकर जमीनदोस्त कराव्या अशी मागणी नागरिक करीत आहे.






