Tag: चंद्रपूर महाकाली महोत्सव

  • Mata Mahakali Festival 2025 । आमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते महाकाली महोत्सव मंडप पूजन

    Mata Mahakali Festival 2025

    Mata Mahakali Festival 2025 : चंद्रपूर १८ सप्टेंबर २०२५ – २७ सप्टेंबरपासून सुरू होत असलेल्या श्री माता महाकाली महोत्सवानिमित्त आज श्री माता महाकाली महोत्सव समितीचे अध्यक्ष तथा आमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते मंडप पूजन करण्यात आले. माता महाकाली पटांगणात आयोजित या महोत्सवात पाच दिवस विविध धार्मिक, सांस्कृतिक व पारंपरिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

    दिल्लीमध्ये राहुल गांधींची पत्रकार परिषद आणि खळबळ चंद्रपुरात

    या मंडप पूजन कार्यक्रमाला श्री माता महाकाली महोत्सवाचे उपाध्यक्ष सुनील महाकाले, सचिव अजय जैस्वाल, सहसचिव बलराम डोडानी, विश्वस्त मिलिंद गंपावार, संजय बुरघाटे, अजय वैरागडे, राजू शास्त्रकार, भारतीय जनता पार्टी महानगराध्यक्ष सुभाष कासनगोट्टूवार, दशरथ ठाकूर, तुषार सोम, सविता दंडारे, प्रदीप किरमे, अरुण तिखे, वंदना तिखे, दुर्गा वैरागडे, विमल काटकर, नीलिमा वणकर, चंद्रशेखर देशमुख, दिगंबर चिमुरकर, कल्पना शिंदे, ताहीर हुसैन, प्रवीण कुलटे आदीची उपस्थित होते.

    ३० सप्टेंबरला नगर प्रदक्षिणा व पालखी

    दरवर्षीप्रमाणे यंदाही शारदीय नवरात्रात श्री माता महाकाली महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. पाच दिवस चालणाऱ्या या महोत्सवाला २७ सप्टेंबरपासून सुरुवात होणार असून ३० सप्टेंबरला नगर प्रदक्षिणा व पालखी काढण्यात येणार आहे. महोत्सवाची तयारी उत्साहात सुरू असून आज मंदिर परिसरात विधीवतरीत्या मंडप पूजन करण्यात आले. Mahakali festival schedule and programs

    शारदीय नवरात्राच्या पावन पर्वावर आयोजित श्री माता महाकाली महोत्सव हा श्रद्धा, भक्ती आणि उत्साहाचा संगम ठरणार आहे. यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी विविध विभागांच्या अधिकाऱ्यांसह पाहणी करून येथील व्यवस्थेचा आढावा घेतला. दरवर्षी प्रशासनाकडून महोत्सवाला मोठे सहकार्य मिळत असते. यंदाही महोत्सव समितीसोबत समन्वय साधून उत्तम नियोजन करावे, अशा सूचना आमदार किशोर जोरगेवार यांनी दिल्या. Chandrapur religious events 2025

    यावेळी प्रभारी आयुक्त डॉ. विद्या गायकवाड, अति. आयुक्त चंदन पाटील, अति. पोलीस अधीक्षक ईश्वर कातकाडे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुधाकर यादव, शहर पोलीस निरीक्षक निशिकांत रामटेके, सहायक आयुक्त शुभांगी सूर्यवंशी, सहायक आयुक्त संतोष गर्गेलवार, शहर अभियंता रवींद्र हजारे, मुख्य स्वच्छता अधिकारी डॉ. अमोल शेळके, उपअभियंता (यांत्रिकी) रवींद्र कळंबे, उपअभियंता (विद्युत विभाग) प्रगती भुरे, सहायक अभियंता (स्थापत्य विभाग) आशिष भारती, सहायक अभियंता (स्थापत्य विभाग) वैष्णवी रिठे, सहायक अभियंता (स्थापत्य विभाग) अतुल भसारकर आदी अधिकारी उपस्थित होते.

  • भक्तीच्या जनसागरात चंद्रपूर महाकाली महोत्सवाचे समापन

    News34 chandrapur

    चंद्रपूर – श्री महाकाली माता महोत्सव समितीच्या वतीने आयोजित पाच दिवसीय श्री माता महाकाली महोत्सवाचा समारोप झाला आहे. यावेळी निघालेल्या माता महाकालीच्या पालखी दर्शनासाठी मार्गावर भक्तीचा महासागर उसळला होता. या नगरप्रदक्षिनेत सादर करण्यात आलेल्या विविध देखाव्यांनी चंद्रपूरकरांचे लक्ष वेधून घेतले.

     

    सायंकाळी पाच वाजता महाकाली मंदिर जवळून नगरप्रदक्षिणा पालखीला सुरवात झाली. तत्पूर्वी चार दिवस महाकाली मंदिर जवळील पटांगणात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले, यात धार्मीक, सामाजिक, सांस्कृतीक कार्यक्रमांचा समावेश होता. सदर कार्यक्रम पाहण्यासाठीही मातेच्या भक्तांची मोठी गर्दी केली होती. या दरम्यान 9 हजार 999 कन्यांचे कन्यापूजन आणि कन्याभोजन करण्यात आले. तर 11 हजार 111 दिवे प्रज्वलीत करत परिसर लखलख करण्यात आला. नवरात्रो दरम्यान जन्मलेल्या कन्यांच्या पालकांना महोत्सव समीतीच्या वतीने चांदिचे नाणे देण्यात आले.

    23 आॅक्टोंबरला सायंकाळी पाच वाजता श्री माता महाकाली नगरप्रदक्षिणा पालखीला प्रारंभ झाला. या पालखी यात्रेत मंदिर अब बनने लगा है या गाण्याची सुप्रसिध्द गायीका ईशरत जॅहा यांच्या रोड शो ने शोभायोत रंगत भरली. सोबतच केदारनाथ धाम येथील झांज व डमरु पथक, पवनसुत हनुमान व वानरसेना, कानपूर येथील शिवतांडव व अघोरी नृत्य, उत्तर प्रदेश राज्यातील काली माता दृष्य, आदिवासी नृत्य, गंगा आरती, पालखीत तुतारी व अब्दारीचा समावेश, पालखीत पोतराजे नृत्य यांचा समावेश,चंद्रपूर शहरातील ८० वादकांचा जगदंब व अन्य ढोल ताशा व ध्वज पथकांचा समावेश, शहरातील बँड पथकांचा समावेश, पालखीत गायत्री मंदिर परिवारातील ५०० कलशधारी महिलांचा समावेश, पालखीत ५०० महिला व पुरुषांचे लेझीम पथक, डी. जे. धुमालचे विविध संच, शाळा, कॉलेज मधील विद्यार्थी- विद्याथ्र्याचे दृष्य समूह, डी. जे. चे विविध संच, महिला, पुरुषांचे दांडिया गरबा नृत्य समूह, १००९ महिला – पुरुषांचे योग नृत्य, १५१ मंडळांचे महिला – पुरुषांचे भजन समूह, नागपूर येथील विरांगण क्रीडा गृपच्या मुलांचे शस्त्र प्रात्यक्षिक, शहरातील अनेक सामाजिक संघटनांचा पालखीत सहभाग, शहरातील व्यायाम शाळांचा पालखीत सहभाग, छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर आधारित दृष्य समूह, चंद्रपूर जिल्ह्यातील देवी – देवतांच्या मंदिराचे दृष्य, श्री माता निर्मला परमेश्वरी भक्तांचा पालखीत समावेश,पारंपरिक खेळांचे पालखीत दृष्य, तेलगु समाजाचे बतुकम्मा दृष्य, पारंपारिक सण उत्सवांचे बोलके दृष्य, शहारातील तंट्या बिल व वाघोबांचा समावेश, मशाल पथक यांचा पालखीत समावेश, टांगता रोप मल्लखांब प्रात्यक्षिक समूह, स्थिर मल्लखांब प्रात्यक्षिक समूह, जोगदंड महाराज वारकरी शिक्षण संस्था, पंढरपूर यांचे १०८ वारकरी टाळ, मृदुंग, गर्जना समुह,स्वच्छता समूह यांचा पालखीत समावेश,बंगाली समाजातील महिलांद्वारा शंखनाद व पुरुषांद्वारा डंकनाद आदींचा समावेश होता.

    गंगा आरतीने वेधले लक्ष

    नगरप्रदक्षिणा यात्रेत वाराणसीहून सहभागी झालेल्या पंडीतांनी गंगा आरती केली. यावेळी करण्यात आलेल्या गंगा आरतीने भाविकांचे लक्ष वेधून घेतले. गंगा आरती पाहण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. यावेळी गंगा आरतीमुळे धार्मीक वातावरण निर्माण झाले.

    महोत्सवात लाभलेला लोकसहभाग उत्साह वाढविणारा – आ. किशोर जोरगेवार

    चंद्रपूरची आराध्य दैवत माता महाकालीचा जागर करण्यासाठी, महिला शक्तीला सन्मानित करण्यासाठी सोबतच चंद्रपूरातील पर्यटनाला चालना मिळावी या हेतुने आपण अयोजित केलेला श्री माता महाकाली महोत्सव चंद्रपूरकरांच्या प्रचंड प्रतिसादामूळे भव्यतेसह यशस्वी झाला आहे. महोत्सवाच्या या पाच दिवस आपण हजारोच्या संख्येने नोंदविलेला लक्षणीय सहभाग उत्साह वाढविणारा असल्याचे आमदार किशोर जोरगेवार यांनी म्हटले आहे.

     

    श्री महाकाली माता महोत्सव समितीच्या वितीने आयोजित श्री माता महाकाली महोत्सवाचे भव्य अशा नगरप्रदक्षिणा पालखीने समारोप करण्यात आला आहे. यावेळी सदर भावना आमदार किशोर जोरगेवार यांनी व्यक्त केली आहे. ते म्हणाले कि, मागच्या वर्षी प्रथम वर्ष होता. मात्र त्यावेळी चंद्रपूकरांच्या लाभलेल्या सहभामुळेच आपण दुस-या वर्षीही हे आयोजन भव्यतेसह करु शकलो. आपल्या सहभागाशिवाय हा महोत्सव शक्य नव्हता. पूढच्या वर्षीही हाच उत्साह घेऊन आपण हा महोत्सव आयोजित करु आता हि पंरपरा बनली असून दरवर्षी नवरात्रोमध्ये मातेची पालखी निघणार असा विश्वास त्यांनी यावेळी बोलुन दाखविला. या आयोजनासाठी सहकार्य करणा-या सर्व सेवाभावी संस्था, कार्यकर्ते, माता भक्तांचेही त्यांनी यावेळी आभार मानले.

    पाच दिवस चाललेल्या कार्यक्रमात निशा बोनगीरवार – पडगीलवार, जयश्री कापसे – गांवडे यांनी मंचाची व्यवस्था उत्तमरित्या सांभाडली तर अल्का ठाकरे, श्याम हेडाऊ, सुलक्षणा गायकवाड, ज्योती गावंडे, मृणालीनी खाडीलकर, रजनी पाॅल, सुमेधा श्रीरामे, स्वप्नील मेश्राम, धन्वरषा नागोसे, सरोज चांदेकर, एकता पित्तुलवार, अर्चना चौधरी, जगदीश नंदुरकर, प्रज्ञा जिवणकर, राजश्री मार्कंडेवार, श्री झा, मकसुद, धनंजय तावाडे आदींची संचालन केले.

  • चंद्रपुरातील माता महाकाली महोत्सवात 9 हजार 999 कन्यांचे कन्यापूजन आणि कन्याभोजन संपन्न

    News34 chandrapur

    चंद्रपूर – श्री महाकाली माता महोत्सव समितीच्या वतीने आयोजित श्री माता महाकाली महोत्सवात 9 हजार 999 कन्यांचे कन्यापूजन आणि कन्याभोजन कार्यक्रम पार पडला. यावेळी सर्व शक्तीरुपी कन्यांचे मान्यवरांच्या हस्ते कन्यांचे पूजन झाले. तर कार्यक्रमाच्या तिस-या दिवशी प्रसिध्द गायिका वैशाली सामंत यांच्या गीत गायनाच्या कार्यक्रमाने महोत्सवात रंगत भरली.

    श्री माता महाकाली महोत्सव धार्मिक व उत्साही वातावरणात पार पडत आहे. महोत्सवाच्या तिस-या दिवशी रात्री आठ वाजता प्रसिध्द गायिका वैशाली सामंत यांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यांच्या गायन कार्यक्रमाने महोत्सवात रंगत भरली. यावेळी महोत्सव समितीचे अध्यक्ष आमदार किशोर जोरगेवार, सचिव अजय जयस्वाल, सदस्य बलराम डोडाणी, मिलिंद गंपावार यांच्यासह ईतर पदाधिका-यांनी वैशाली सावंत यांना मातेची मुर्ती देत सन्मानीत केले. माता महाकाली महोत्सव हा नारीशक्तीचा जागर करण्यासाठी आयोजित करण्यात आलेला कार्यक्रम आहे. यात चंद्रपूरकरांचा लाभत असलेला सहभाग कौतुकास्पद आहे. दरवर्षी आपण हे आयोजन करणार असल्याचे यावेळी आमदार किशोर जोरगेवार म्हणाले.

    माता महाकाली महोत्सवात जिल्हाभरातील 9 हजार 999 कन्यांचे कन्यापूजन आणि भोजन कार्यक्रम घेण्यात आला. यात विविध शाळेतील विद्यार्थींनीही सहभाग घेतला. या कार्यक्रमासाठी महाकाली मंदिर परिसरात विशेष व्यवस्था करण्यात आली होती. यावेळी कन्यापूजनानंतर शक्तीरुपी कन्यांना महोत्सव समीतीच्या वतीने भेटवस्तू देण्यात आली. या आयोजनात सहकार्य करणा-या पालकांनाचेही समीतीच्या वतीने अभिनंदन करण्यात आले. काल महोत्सवाच्या तिस-या दिवशी विधानसभा विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार आणि मनसे राजु उभंरकर यांनी महोत्सवाला भेट देत शुभेच्छा दिल्यात यावेळी श्री महाकाली माता महोत्सव समितीच्या वतीने मातेची मुर्ती देत त्यांचा सत्कार करण्यात आला.

    चंद्रपूरच्या युवकांनी बनवलेली हायड्रोजन कार ठरतेय आकर्षण

    चंद्रपूरातील कौशल समोर यावे या हेतुने चंद्रपूर आणि यवतमाळ जिल्ह्यातील युवकांनी बनविलेली हायड्रोजन कार श्री माता महाकाली महोत्सव मध्ये ठेवण्यात आली आहे. आमदार किशोर जोरगेवार यांनी या कारची पाहणी करुन कार तयार करणा-या सर्व टिमचा सत्कार केला आहे.

    महोत्सवात आयोजित आरोग्य शिबिरात हजारो लोकांची तपासणी

    श्री माता महाकाली महोत्सव येथे डॉ. आसावरी देवतळे यांनी आरोग्य शिबिर आयोजित केले आहे. या शिबिराचा हजाराहुन अधिक नागरिकांनी लाभ घेतला आहे. यात तपासणी नंतर औषधोपचारही केल्या जात आहे.

    उद्या निघणार मातेची भव्य नगर प्रदक्षिणा पालखी यात्रा

    उद्या निघाणा-या नगर प्रदक्षिणा पालखी यात्रेने पाच दिवसीय महोत्सवाचा समारोप होणार आहे. हळदी कुंकुवाचा सडा टाकून पालखीचा मार्ग स्वच्छ केला जाणार आहे. या पालखी यात्रेत मंदिर अब बनने लगा है या गाण्याची सुप्रसिध्द गायीका ईशरत जॅहा यांचा रोड शो असणार आहे. सोबतच यात केदारनाथ धाम येथील झांज व डमरु पथक, पवनसुत हनुमान व वानरसेना, कानपूर येथील शिवतांडव व अघोरी नृत्य, उत्तर प्रदेश राज्यातील काली माता दृष्य, आदिवासी नृत्य, गंगा आरती, पालखीत तुतारी व अब्दारीचा समावेश, पालखीत पोतराजे नृत्य यांचा समावेश,चंद्रपूर शहरातील ८० वादकांचा जगदंब व अन्य ढोल ताशा व ध्वज पथकांचा समावेश, शहरातील बँड पथकांचा समावेश, पालखीत गायत्री मंदिर परिवारातील ५०० कलशधारी महिलांचा समावेश, पालखीत ५०० महिला व पुरुषांचे लेझीम पथक, डी. जे. धुमालचे विविध संच, शाळा, कॉलेज मधील विद्यार्थी- विद्याथ्र्याचे दृष्य समूह, डी. जे. चे विविध संच, महिला, पुरुषांचे दांडिया गरबा नृत्य समूह, १००९ महिला – पुरुषांचे योग नृत्य, १५१ मंडळांचे महिला – पुरुषांचे भजन समूह, नागपूर येथील विरांगण क्रीडा गृपच्या मुलांचे शस्त्र प्रात्यक्षिक, शहरातील अनेक सामाजिक संघटनांचा पालखीत सहभाग, शहरातील व्यायाम शाळांचा पालखीत सहभाग, छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर आधारित दृष्य समूह, चंद्रपूर जिल्ह्यातील देवी – देवतांच्या मंदिरांचे दृष्य, श्री माता निर्मला परमेश्वरी भक्तांचा पालखीत समावेश,पारंपरिक खेळांचे पालखीत दृष्य, तेलगु समाजाचे बतुकम्मा दृष्य, पारंपारिक सण उत्सवांचे बोलके दृष्य, शहारातील तंट्या बिल व वाघोबांचा समावेश, मशाल पथक यांचा पालखीत समावेश, टांगता रोप मल्लखांब प्रात्यक्षिक समूह, चंद्रपूर यांचा पालखीत समावेश, स्थिर मल्लखांब प्रात्यक्षिक समूह, जोगदंड महाराज वारकरी शिक्षण संस्था, पंढरपूर यांचे १०८ वारकरी टाळ, मृदुंग, गर्जना समुह,स्वच्छता समूह यांचा पालखीत समावेश,बंगाली समाजातील महिलांद्वारा शंखनाद व पुरुषांद्वारा डंकनाद आदींचा समावेश असणार आहे.

  • 151 कलावंताच्या गायन व नृत्यातून चंद्रपूरकरांना घडले ईश्वराच्या विविध रुपाचे दर्शन

    News34 chandrapur

    चंद्रपूर – श्री माता महाकाली महोत्सवाच्या दुस-या दिवशी रात्री आठ वाजता सारेगामा फेम निरंजन बोबडे यांचा गायन व नृत्य कार्यक्रम भक्तीमय वातावरणात पार पडला. यावेळी त्यांच्या 151 कलावतांनी सादर केलेल्या नृत्यातून चंद्रपूरकरांना ईश्वराच्या विविध रुपाचे दर्शन घडले.

     

    महोत्सवाच्या दुस-या दिवशी महाआरती आणि भजनाने महोत्सवला सुरवात झाली. त्यानंतर विविध धार्मिक, सामाजिक कार्यक्रम पार पडलेत. तर आज तिस-या दिवशी दुपारी 10 वाजता ग्रामगीता महिलोन्नती या विषयावर बाल किर्तनकार साक्षी अवतरे यांनी कीर्तन सादर केले. तर 11 वाजता प्रतिमा स्वरुप देवता या विषयावर स्तंभ लेखिका मुर्तीशास्त्र अभ्यासिका डॉ. रमा गोळवळकर यांचा व्याख्यान कार्यक्रम पार पडला. दुपारी 12. 30 वाजता विठ्ठल दिंडी तसेच चिंगारी हु मै या पथनाट्याचे सादरीकरण एकता बंडावार व त्यांच्या समुहाने सादर केले. दुपारी 2 वाजता लोकजागृती नाट्य मंचाच्या वतीने गोंडवाना के महायोध्दा शहीद विर बाबूराव शेडमाके यांच्या जीवनावर नाटक प्रस्तृत करण्यात आले. यावेळी शहीद विर बाबुराव शेडमाके यांचा शुर इतिहास दर्शविण्यात आला.

     

    तर काल शुक्रवारी कार्यक्रमाच्या दुस-या दिवशी सारेगामा फेम निरंजन बोबडे यांच्या समुहाने महोत्सवात भक्तीची रंगत भरली. त्यांचा कार्यक्रम पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. सायंकाळी आठ वाजता त्यांच्या कार्यक्रमाला नृत्य सादरीकरणाने सुरवात झाली. त्यांच्या 151 कलावतांच्या समुहाने विविध धार्मिक नृत्य सादर करत भक्तीमय वातावरण निर्माण केले. यावेळी निरंजन बोबडे व त्यांच्या समुहाचे श्री महाकाली माता समितीचे अध्यक्ष आमदार किशोर जोरगेवार आणि इतर पदाधिका-यांनी महाकाली मातेची मुर्ती भेट देत स्वागत केले.

     

    निरंजन बोबडे यांच्या कार्यक्रमामुळे महोत्सवात माता महाकालीच्या भक्तीचा जागर झाला असून त्यांनी सादर केलेल्या नृत्यातून ईश्वराच्या विविध रुपाचे दर्शन चंद्रपूकरांना घडले असल्याचे यावेळी आमदार किशोर जोरगेवार म्हणाले. यावेळी मातेच्या भक्तांना पालखीचे दर्शन घेता यावे यासाठी मातेची पालखी कार्यक्रम पंडालात फिरविण्यात आली. हजारो नागरिकांनी या कार्यक्रमाचा लाभ घेतला. सुमेधा श्रीरामे, सरोज चांदेकर, एकता पित्तुलवार, अर्चना चौधरी, मृणालिनी खाडीलकर, जगदीश नंदुरकर आदींनी या कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी उत्तमरित्या पार पाडली.

     

    उद्याचे कार्यक्रम..

    सकाळी 9 वाजता महाआरती आणि भजनाने महोत्सवाची सुरवात होणार आहे. सकाळी 11 वाजता महिला व उद्योजकता या विषयावर मार्गदर्शन कार्यक्रम घेण्यात येणार आहे. दुपारी 1 वाजता अॅड वर्षा जामदार या महिलांसाठी कायदेविषय मार्गदर्शन करणार आहेत. दुपारी 2 वाजता लखमापूर हनुमान मंदिरतर्फे सुंदरकांड करण्यात येणार आहे. 5 वाजता माता महाकालीची आरती होईल, सांयकाळी 6 वाजता लाखो युवकांचे प्रेरणास्थान महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध व्याख्याते युवा किर्तनकार सोपान दादा कनेरकर यांच्या किर्तन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तर रात्री 8 वाजता जगप्रसिध्द गायिका अनुराधा पौडवाल यांचा भक्तीमय संगीत कार्यक्रम पार पडणार आहे. या सर्व कार्यक्रमांचा मातेच्या भक्तांनी मोठ्या संख्येत उपस्थित राहत लाभ घ्यावा असे आवाहण श्री महाकाली माता समितीच्या वतीने करण्यात आले आहे.