Tag: चंद्रपूर भाजप

  • BJP political stunt water supply । अमृत योजना अपूर्ण, भाजपचा नवा शो सुरु – काँग्रेसचा सडेतोड हल्लाबोल!

    BJP political stunt water supply

    BJP political stunt water supply : चंद्रपूर | केंद्रात व राज्यात भाजपची सत्ता असून, चंद्रपूर महापालिकेत देखील त्याच पक्षाचे महापौर होते. त्यांच्या कार्यकाळात अमृत पाणीपुरवठा योजनेचा प्रारंभ करण्यात आला. मात्र या योजनेची अंमलबजावणी ढिसाळ झाली असून, पावसाळ्याचे कारण पुढे करून भाजपचे आमदार आणि महानगराध्यक्ष आता अमृत योजनेचे काम तात्पुरते थांबवण्यासाठी निवेदन देत आहेत, यासारखे दुर्दैव नाही, अशी टीका काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष रितेश (रामू) तिवारी यांनी  केली आहे. BJP failure in urban development

    विजेच्या धक्क्याने मुलाचा मृत्यू, महावितरणचा हलगर्जीपणा

    चंद्रपूर महानगरपालिकेमार्फत २०१७ मध्ये अमृत पाणीपुरवठा योजनेचा कार्यादेश देण्यात आला होता. २०१९ पर्यंत ही कामे पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र आज 8 वर्षे लोटून देखील अनेक भागांमध्ये पाइपलाइनचे काम अपूर्ण आहे. घराघरांत पाणी पोहोचलेले नाही. जलमापकांची व्यवस्था कोलमडली आहे. दुसरीकडे, शहरातील अनेक रस्त्यांचे खोदकाम करून ते तस्सेच सोडल्यामुळे नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.सत्ताधारी भाजपने कंत्राटदारांशी संगनमत करून अमृत योजनेचे काम उशिरा, हलगर्जीपणे आणि बेफिकिरीने केले. काम अपूर्ण असूनही योजनेची तारीफ केली जात आहे. मात्र, त्यांना जनतेच्या तहानेची जाणीव नाही,” असा हल्लाबोल रितेश तिवारी यांनी केला. AMRUT scheme implementation issues

    आमदार अपक्ष असताना फक्त घोषणा आणि आता


    चंद्रपूरचे आमदार अपक्ष असताना मोठमोठ्या घोषणा करीत होते. भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर आता तेच काम लांबणीवर टाकण्यात रस दाखवत आहेत. भाजप मनपा प्रशासकांच्या माध्यमातून स्वतःची कामे करून घेत असून, नागरिकांच्या कामांकडे दुर्लक्ष केले जात आहे.

    भाजप आमदार किशोर जोरगेवार यांच्या सूचनेनुसार, भाजपच्या शिष्टमंडळाने मनपा आयुक्तांना निवेदन देऊन पावसाळ्यापूर्वी सुरू असलेले काम तात्पुरते थांबवण्याची मागणी केली आहे. भाजपने यासाठी रस्त्यांची खराब अवस्था आणि पावसामुळे होणाऱ्या अडचणीचे कारण दिले आहे.  हे निव्वळ राजकीय स्टंट असून अपयश झाकण्यासाठी भाजप हे नाट्य रचत आहे. ज्यांच्या सत्ताकाळात ही योजना सुरू झाली आणि कामे रखडली, त्याच भाजप आमदार आणि पदाधिकाऱ्यांना आता काम थांबवावे लागते, यासारखे दुर्दैव नाही.

    प्रसिद्धीसाठी निवेदन

    चंद्रपूर शहरात अमृत योजनेमुळे रस्त्यांची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे. जलवाहिनी आणि मलनिस्सारणाच्या कामांमुळे अपघातांची शक्यता वाढली आहे. तरीही भाजपचे नेते केवळ निवेदन देत आहेत, हे केवळ प्रसिद्धीसाठी नौटंकी करीत असल्याचा आरोप रितेश तिवारी यांनी केला आहे. यापुढे नागरिकांना वेठीस धरण्याचा प्रकार झाला तर काँग्रेस आंदोलन करण्यास मागेपुढे बघणार नाही, असा इशाराही रितेश तिवारी यांनी दिला आहे.

  • Sankalp te Siddhi event BJP Chandrapur । मोदी सरकारच्या योजनेचा मेगा रोडमॅप, चंद्रपूरमध्ये ‘संकल्प ते सिद्धी’ कार्यक्रम

    Sankalp te Siddhi event BJP Chandrapur

    Sankalp te Siddhi event BJP Chandrapur : चंद्रपूर – चंद्रपूर : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारच्या अकरा वर्षांच्या यशस्वी कारभारानिमित्त ‘संकल्प ते सिद्धी’ या उपक्रमांतर्गत आमदार किशोर जोरगेवार यांच्या सुचणे नुसार भारतीय  जनता पक्षाच्या वतीने चंद्रपूर येथे विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. ही कार्यशाळा आमदार किशोर जोरगेवार यांच्या जनसंपर्क कार्यालयात पार पडली.

    चंद्रपूर शहरात जबरी चोरी

    या कार्यशाळेमध्ये केंद्र सरकारच्या विविध जनकल्याणकारी योजनांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. तसेच पक्षाच्या संघटनात्मक बांधणीबाबत मार्गदर्शन करण्यात आले. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणुकीची रणनीती ठरवण्यासाठीही या कार्यशाळेत महत्त्वपूर्ण चर्चा झाली. BJP election planning meeting Chandrapur under Modi

    कार्यशाळेचे उद्घाटन भाजप महानगर अध्यक्ष सुभाष कासनगोट्टूवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माजी शहर अध्यक्ष दशरथसिंह ठाकूर, प्रदेश कार्यकारिणीचे विशेष निमंत्रित सदस्य तुषार सोम,माजी नगरसेवक संजय कचर्लावार, रवि आसवानी, अॅड. सुरेश तालेवार, मंडळ अध्यक्ष दिनकर सोमलकर, रवी लोणकर, संदीप आगलावे, पुरुषोत्तम सहारे, सचिन कोतपल्लीवार, अरुण तिखे, माजी नगरसेवक प्रदीप किरमे, बंटी चौधरी, माजी नगरसेविका पुष्पा उराडे, शीतल कुळमेथे, रवी गुरनूले, संगीता खांडेकर, 

    कल्पना बबूलकर, पुरुषोत्तम राऊत, विनोद शेरकी, प्रमोद शास्त्रकार, प्रलय सरकार, चंदन पाल, राकेश बोमनवार, शीतल ईटनकर, मंजुष्री कासनगोट्टूवार, प्रज्ञा बोरगमवार, मधुकर राउत, शालू कंनोजवार, धनराज कोवे, अमीन शेख, युवा मोर्चाचे यश बांगळे, अ‍ॅड. हरीश मंचलावार, सुभाष अदमाने यांच्यासह पक्षाचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. Sankalp te Siddhi social welfare scheme discussion event

    ११ वर्षातील यशस्वी योजना

    कार्यशाळेत मोदी सरकारच्या गेल्या अकरा वर्षांतील यशस्वी योजनांचा उल्लेख करण्यात आल्या. विशेषतः गरीब कल्याण अन्न योजना, पंतप्रधान आवास योजना, उज्ज्वला योजना, जल जीवन मिशन, प्रधानमंत्री जनधन योजना आणि आयुष्मान भारत योजना या योजना प्रभावीपणे राबवून जनतेच्या जीवनात आमूलाग्र बदल घडवून आणल्याचे यावेळी नमूद करण्यात आले.या कार्यशाळेत चंद्रपूर शहरातील कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. सर्व उपस्थित पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी जनतेपर्यंत केंद्र सरकारच्या कामगिरीची माहिती पोहोचवण्याचा आणि आगामी निवडणुकांसाठी सज्ज राहण्याचा निर्धार व्यक्त केला.

  • Kishor Jorgewar supports caste census initiative । किशोर जोरगेवार: जातीय जनगणना समाजातील वंचित घटकांना न्याय देईल

    Kishor Jorgewar supports caste census initiative

    पडोली आणि घुग्घूस मध्ये लाडू वाटपाने जल्लोष; मोदी सरकारच्या निर्णयाचे स्वागत

    Kishor Jorgewar supports caste census initiative : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने घेतलेला जातीय जनगणनेचा ऐतिहासिक निर्णय हा समाजातील प्रत्येक घटकाला न्याय देणारा, सर्वसमावेशक विकासाला चालना देणारा आणि सामाजिक समतोल प्रस्थापित करणारा आहे, असे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले. या ऐतिहासिक निर्णयाचे स्वागत करण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या वतीने पडोली आणि घुग्घूस येथे लाडू वाटप करून जल्लोष साजरा करण्यात आला. यावेळी आमदार किशोर जोरगेवार बोलत होते. BJP celebrates caste census decision in Chandrapur

    रेल्वे अतिक्रमण धारकांना दिलासा मिळणार

    या कार्यक्रमाला भारतीय जनता पक्षाचे माजी शहराध्यक्ष दशरथ ठाकूर, नेते नामदेव डाहुळे, प्रकाश देवतळे, संजय तिवारी, नीता चौधरी, इमरान खान, राकेश पिंपळकर, दयानंद नागरकर, आशिष मासिरकर, आशिष वाढई, सुभाष पिंपळकर, विजय आगरे, अजय कार्लेकर, रमेश बुच्चे, रमाकांत बलकी, सुरेश पिदुरकर, डॉ. दशरथ झाडे, दुर्गा बावणे, मीना मानुसमारे, रजनी ढुंगणे, ममता मोरे, शितल कोटा, नकुल वासमवार, कोसारा गावचे माजी सरपंच गुड्डू सिंग, उषा आगदारी, सुचिता लुटे, अनिल बाम, श्याम आगदारी, महेश डोंगरे, निरीक्षण तांड्रा, संतोष नुने, जय मिश्रा आदींची प्रमुख उपस्थिती होती. Caste census celebration in Padoli and Ghugghus

    bjp leaders distribute sweets for caste census approval

    बोलताना आमदार किशोर जोरगेवार म्हणाले, जातीय जनगणनेच्या माध्यमातून समाजाच्या प्रत्येक घटकाला ओळख मिळणार असून त्यांच्या अडचणी व गरजा समजून घेऊन योजनांची आखणी करता येणार आहे. आजवर अनेक सरकारांनी जातीवर आधारित आकडेवारीची मागणी फक्त घोषणा आणि आश्वासनांपुरती मर्यादित ठेवली. मात्र केंद्रातील भाजप सरकारने प्रत्यक्षात हे पाऊल उचलून समाजातील वंचित, शोषित घटकांना विकासाच्या प्रवाहात आणण्याची दिशा स्पष्ट केली असल्याचे ते यावेळी म्हणाले.यावेळी ‘मोदी सरकार जिंदाबाद’, ‘सामाजिक न्यायाचा विजय असो’ अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला.कार्यक्रमात नागरिकांना लाडू वाटप करून निर्णयाचे स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाला भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते व स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

  • Cultural Festival : मूल येथे झाडीपट्टी सांस्कृतिक महामहोत्सव

    Cultural Festival : मूल येथे झाडीपट्टी सांस्कृतिक महामहोत्सव

    News34 chandrapur

    गुरू गुरनुले

    मूल – महाराष्ट्र राज्याच्या सांस्कृतिक विभागाच्या अंतर्गत सांस्कृतिक कार्य महासंचालनालय मुंबई व जिल्हा प्रशासन चंद्रपूर यांच्या वतीने महाराष्ट्र राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य, मत्स्य व्यवसाय मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या नेतृत्वात व चंद्रपूर जिल्हा भाजपा अध्यक्ष हरीश शर्मा यांच्या मार्गदर्शनात मूल येथे दिनांक १८,१९ व २० फेब्रुवारीला झाडीपट्टी सांस्कृतिक महामहोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

     

     

    या तीन दिवसात विविध सांस्कृतिक कार्यक्रमाची मांदीयाळी रंगणार आहे. झाडीपट्टीतील चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा व गोंदिया जिल्ह्यातील झाडीपट्टी कलाकार यात भाग घेणार आहेत. विकास पुरुष नाम. सुधीर मुनगंटीवार यांच्या सुयोग्य नेतृत्वात व मार्गदर्शनात हा झाडीपट्टी महा महोत्सव पार पडणार आहे.

     

     

    झाडीपट्टीतील जेष्ठ कलावंत पद्मश्री डॉ.परशुराम खुणे यांच्या मार्गदर्शनात व नाट्य कलावंत सदानंद बोरकर, देवेंद्र दोडके,मुकेश गेडाम, शेखर डोंगरे, अनिरुद्ध वनकर, युवराज प्रधान, युवराज गोंगले,अरविंद झाडे यांच्या सहकार्याने विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी कला रसिकांना मिळणार आहे. तीन दिवस चालणाऱ्या या झाडीपट्टी महामहोत्सवात नाटक, दंडार, खडीगंमत, रेला नृत्य,आदिवासी नृत्य, कीर्तन, भुलाबाईची गाणी, रोवण्याची गाणी, महादेवाची गाणी, डहाका, संबळ, सुमधुर सुगम संगीत आदी कार्यक्रम या महोत्सवात सादर केले जाणार आहेत.

     

    दिनांक 19 फेब्रुवारीला शिवजयंतीच्या पर्वावर मूल शहरातून सांस्कृतिक महोत्सवानिमित्त रॅलीचे आयोजन केले आहे. या रॅलीत नाम. सुधीर मुनगंटीवार,सिने कलावंत, सिने अभिनेत्री आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या रॅलीत विविध नेत्रदीपक देखावा सादर केल्या जाणार आहेत. तीन दिवस चालणारे या सांस्कृतिक महोत्सवाचा नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन मूल येथील झाडीपट्टी सांस्कृतिक महामहोत्सव समितीने केले आहे.

  • तीन राज्यातील अभुतपूर्व विजयाचा चंद्रपुरात भाजपा कार्यकर्त्यांद्वारा जल्लोष

    तीन राज्यातील अभुतपूर्व विजयाचा चंद्रपुरात भाजपा कार्यकर्त्यांद्वारा जल्लोष

    News34 chandrapur

    चंद्रपूर – प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींचे कणखर नेतृत्व, देशभरात विकासाचा झंझावात, ‘सबका साथ, सबका विकास व सबका विश्वास’ हे धोरण यशस्वीपणे राबविल्या गेल्याने भाजपाला मध्यप्रदेश, राजस्थान व छत्तीसगड या राज्यांमध्ये निर्विवाद बहूमत प्राप्त झाल्याने चंद्रपूर महानगरात भाजपा कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतिषबाजी करीत विजयाचा जल्लोष साजरा केला. नागरीकांना मिठाई वाटून आनंद व्यक्त केला.

     

    भाजपाचे ज्येष्ठ नेते प्रमोद कडू, युवा नेते रघुवीर अहीर, यांच्या नेतृत्वात दि. 03 डिसेंबर 2023 रोजी कस्तुरबा चौक (गिरणार) येथे साजरा झालेल्या या विजयोत्सवात ब्रिजभुषण पाझारे, राजेंद्र अडपेवार, गिरीष अणे, सुरेश भाकरे, विनोद शेरकी, गणेश गेडाम, राजेंद्र खांडेकर, राहुल घोटेकर, सविता कांबळे, पुष्पाताई उराडे, चंद्रकला सोयाम, रेणुकाताई घोडेस्वार, शेख जुम्मन रिजवी, अरविंद कोलणकर, राजू येले, रवी चहारे, ललित गुलानी, सय्यद चाँद, स्वप्नील मुन, विशाल गिरी, स्वप्निल कांबळे, मोनिषा महातव, चेतन शर्मा, प्रविण चुनारकर, अवलेश यादव यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये शेकडो भाजप कार्यकर्त्यांनी या विजयोत्सवात सहभाग घेतला.

     

    या प्रसंगी भाजप कार्यकर्त्यांनी ‘प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जिंदाबाद’ चे नारे देवून तीन राज्य केवल झॉंकी है, लोकसभा अब बाकी है । असे नारे देवून परिसर दणाणून सोडला.

  • चंद्रपूर वैद्यकीय महाविद्यालयास औषधांसाठी निधी द्या – ब्रिजभूषण पाझारे

    News34 chandrapur

    चंद्रपूर : चंद्रपूरातील वैद्यकीय महाविद्यालयात महिनाभरापासून औषधांचा साठा संपला आहे. त्यामुळे रुग्णांची मोठी गैरसोय होत आहे. वातावरणामुळे शहरासह ग्रामीण भागातील रुग्णांची संख्या वाढली आहे.

     

    ग्रामीण भागातील गोरगरीब रुग्ण, दारिद्र्यरेषेखालील नागरिकांची उपचार घेण्यासाठी वैद्यकीय महाविद्यालयात गर्दी असते. मात्र, औषधांचा तुटवडा असल्यानं बाहेरून औषधांची खरेदी करावी लागत असल्याने आर्थिक झळ बसत आहे.

     

    गोरगरिबांचा आधार असलेल्या वैद्यकीय महाविद्यालयात मागील काही महिन्यापासून औषधांचा तुटवडा निर्माण झाला आहे. येथे अवघड शस्त्रक्रिया, तसेच चांगले उपचार दिले जातात, अशी या वैद्यकीय महाविद्यालयाची ओळख आहे. रुग्णालय अधिक उत्तम बनवण्यासाठी कोट्यवधी रुपयांची निधी शासनाने मंजूर केला आहे. परंतु औषधासाठीचा निधी शासनाने वाढवून दिला नसल्याचे चित्र आहे.

     

    परिणामी रुग्णासाठी लागणारे औषध बाहेरून खरेदी करावे लागत आहेत. तरी याकडे तत्काळ लक्ष वेधून वैद्यकीय महाविद्यालयास औषधांकरिता निधी उपलब्ध करून देण्याकरिता महाराष्ट्र राज्याचे वने सांस्कृतिक कार्य व मत्स्व्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री मा.ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपा चंद्रपूर महानगरातील शिष्ट मंडळाकडून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.

    यावेळी चंद्रपूर जिल्हा महानगराचे महामंत्री श्री ब्रिजभूषण पाझारे, श्री रमेश जी राजुरकर विधानसभा प्रमुख वरोरा भाजयुमो अध्यक्ष श्री. विशाल निंबाळकर, महानगराचे मन की बात प्रमुख श्री. डॉ. दिपक भट्टाचार्य, श्री. पोद्दार, श्री. सतीश तायडे प्रामुख्याने उपस्थित होते.