Tag: चंद्रपूर जिल्हा

  • heavy rainfall chandrapur । मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत, रस्ते बंद, शाळांवर संकट

    heavy rainfall chandrapur

    heavy rainfall chandrapur : चंद्रपूर – आठवडाभरानंतर चंद्रपूर जिल्ह्यात पावसाने जोरदार १३ ऑगस्ट रोजी जोरदार कमबॅक केले, रात्रीपासून सुरु झालेला मुसळधार पावसाने जिल्ह्यात अनेक ठिकाणी जनजीवन अस्तव्यस्त झाले होते. मागील २४ तासात चंद्रपूर जिल्ह्यात सरासरी १८.३ मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. जिल्ह्यातील राजुरा तालुक्यात अनेक मार्ग बंद झाले तर कोरपना तालुक्यात सुद्धा हीच परिस्थिती होती. जिल्ह्यात अनेक ठिकाणी पावसाचे पाणी घरात शिरले तर शाळेवर झाड कोसळल्याने विद्यार्थी किरकोळ जखमी झाले. यामध्ये कसलीही जीवितहानी झाली नाही.

    शाळेवर कोसळले झाड

    भद्रावती आयुध निर्मणी वसाहतीमध्ये शाळेचे वर्ग सुरू असताना शाळेच्या दोन इमारती मध्ये असलेल्या वृक्ष कोसळला त्याची एक फांदी वर्ग पाच च्या खोलीवर कोसळल्याने वर्गातील चार ते पाच विद्यार्थी किरकोळ जखमी झाल्याची घटना दिनांक 13 ला शहरातील आयुध निर्माण चांदा वसाहतीत घडली. किरकोळ जखमी झालेल्या विद्यार्थ्यांवर आयुध निर्माणी वसाहतीतील दवाखान्यात उपचार करण्यात आले. Chandrapur heavy rain August

    जुना वाद खेळ खल्लास, चंद्रपुरात युवकाची हत्या

    केंद्रीय विद्यालयाचे काही वर्ग वसाहतीतील टाईप थ्री सेक्टर फोर या भागातील बंद असलेल्या जिल्हा परिषद शाळेच्या इमारतीत घेण्यात येत आहे. सदर शाळेच्या दोन इमारतीच्या मध्ये एक मोठे झाड आहे. आज सकाळपासून पाऊस येत असल्याने हे जीर्ण झाड कोसळले व त्याची एक मोठी फांदी वर्ग पाच च्या खोलीवर कोसळली. यामुळे सिमेंट ऍसबेसटास टिनाचे शेड तुटून त्याचे तुकडे खाली पडल्याने चार ते पाच विद्यार्थ्यांना किरकोळ इजा झाली. मात्र सर्व विद्यार्थी आपापल्या वर्गात असल्याने मोठा अनर्थ टळला.

    वरोरा व परिसरात दडी मारलेल्या पावसाने आपली जोरदार हजेरी लावत जवळपास १२ ऑगस्ट चे रात्रौ आणि १३ ऑगस्ट ला दुपारी एक वाजेपर्यंत मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत केले.शहरातील पाणी वाहून नेणाऱ्या नाल्या ह्या पॅक केल्यामुळे वाहतुकीच्या रस्त्यांवर पाणी साचून अक्षरशः तलाव निर्माण झाले असल्याचे नागरिकांकडून बोलल्या जात आहे.त्यामुळे पूर्णतः जनजीवन विस्कळित झाले. heavy rainfall chandrapur


    शहरातील शुभम मंगल कार्यालय व कर्मवीर शाळा या मध्यंतरी रस्त्यांवर , कॉलरी वॉर्ड,तसेच अलीशान मंगल कार्यालय ते आझाद वॉर्ड कडे जाणारा मार्ग हे तिन्ही मार्गावर तलावाचे स्वरूप निर्माण झाले त्यामुळे वाहतूक पूर्णतः विस्कळीत झाली . कॉलरी वॉर्ड मध्ये वरोरा साजा च्या तलाठी व महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांनी
    आपल्या जबाबदारीचे भान ठेऊन परिस्थितीची पाहणी केली असल्याची माहिती आहे.

    राजुरा शहरालगतचा बामणवाडा परिसर अक्षरशः पाण्याखाली! कालपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने स्नेहदीप नगर, स्टेला मॅरीस स्कूल आणि बामणवाडातील आजूबाजूच्या वस्त्यांमध्ये हाहाकार माजला आहे. परिसरात जिकडे तिकडे पाणीच पाणी, रस्ते चिखलमय झाले, शाळेत जाणाऱ्या लहान मुलांना , नागरिकांना जीव धोक्यात घालावा लागत आहे.


    यामागे फक्त पाऊसच नाही तर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि प्रशासनाचा निष्काळजी व नियोजनशून्य कारभार हेही तितकेच जबाबदार आहेत. राष्ट्रीय महामार्ग एन.एच. ९३०(ड) च्या बांधकामामुळे पावसाळ्यात पाणी नैसर्गिक प्रवाहाऐवजी थेट वस्त्यांकडे वळते. चुकीचे ड्रेनेज, बंद नाले आणि बामणवाडा तलावाचे अयोग्य खोलीकरण यांनी परिस्थितीचे रूपांतर आपत्तीमध्ये केले आहे.

    राजुरा तालुका बंद असलेली मार्ग

    टेम्बुरवाही ते विरूर स्टे. रस्ता अतिवृष्टी व सततच्या पाण्यामुळे बंद, मानोली बूज या गावात जाणारा रस्ता बंद, सुमठाना या गावात जाणारा रस्ता बंद व निर्ली ते धाडशी जाणारा रस्ता बंद. rain impact road closures

    कोरपना तालुक्यातील स्थिती

    शिवनारंडा ते कढोली, कढोली ते आवारपूर, नारंडा ते लोणी रस्ते बंद.

    इरई धरणाचे दोन दरवाजे उघडले

    जिल्ह्यात सुरु असलेल्या पावसामुळे इरई धरणाच्या पातळीमध्ये वाढ झाल्याने धरणाचे क्रमांक १ व ७ हे दरवाजे ०.२५ मीटर ने उघडण्यात आले आहे. नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क रहावे असे आवाहन. Erai dam gate opening Chandrapur

  • Chandrapur Gambling Club Police Raid । मनोरंजनाच्या नावावर चालतो जुगार, चंद्रपूर पोलिसांनी केली कारवाई

    Chandrapur Gambling Club Police Raid

    Chandrapur Gambling Club Police Raid : चंद्रपूर – चंद्रपूर जिल्ह्याच्या सीमावर्ती भागात अनेक मनोरंजन क्लब सुरु झाले आहे, या क्लब मध्ये मनोरंजनाच्या नावावर जुगार खेळल्या जात आहे. ९ ऑगस्ट रोजी स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूरचे पथक व उप पोलीस स्टेशन लाठी मधील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी पोडसा येथील सार्वजनिक ठिकाण मनोरंजन क्लब मध्ये धाडसत्र कारवाई केली.

    पेव्हर्स चोरी प्रकरणात पालिकेची कारवाई

    राजीव समाधान मल्टीपरपज सोसायटी द्वारा चालविण्यात येणाऱ्या मनोरंजन क्लब मध्ये जुगार सुरु असल्याची माहिती पोलिसांना मिळाली, माहितीच्या आधारे मनोरंजन क्लब मध्ये पोलिसांनी कारवाई केली असता त्या क्लब मध्ये ताश पत्ते, कॉइन सह डीव्हीआर रजिस्टर सहित ३ हजार ४५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. Gambling Club

    मनोरंजन नव्हे तर जुगार क्लब

    मनोरंजन क्लब चे चालक महेश्वर गोपाल नायक अजमेरा राहणार चिंताकुंडा, तालुका शिरपूर जिल्हा आसिफाबाद याने संयोजक सोबत संगनमत करीत परवाना अटींचे उल्लंघन करीत मनोरंजनाच्या नावाखाली जुगार सुरु केला. पोलीस स्टेशन लाठी येथे चालक, संयोजक व जुगार खेळणारे सदस्य सह अपप्रेरणा देणारे आरोपीविरुद्ध विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.

    चंद्रपूर पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले कि अश्या प्रकारच्या कोणत्याही क्लब मध्ये जुगार सुरु असल्यास त्वरित जवळचे पोलीस स्टेशन, किंवा पोलीस नियंत्रण कक्ष मधील ११२ वर संपर्क करीत माहिती द्यावी.

  • police operations in chandrapur district । देशी कट्टा, तलवार सहित अवैध धारदार शस्त्रे जप्त, चंद्रपूर गुन्हेगारीचा नवा हॉटस्पॉट?

    police operations in chandrapur district

    police operations in chandrapur district : चंद्रपूर – चंद्रपूर जिल्हा हा गुन्हेगारीचा हब बनू पाहत आहे, सध्या नवे भाई म्हणून अल्पवयीन मुले पुढे येत आहे, जिल्ह्यात घडणाऱ्या प्रत्येक गुन्ह्यात अल्पवयीन मुलांचा समावेश वाढत असून हि पोलीस विभागासाठी भविष्यात मोठी डोकेदुखी निर्माण होणार अशी शक्यता आहे. चंद्रपूर पोलीस विभागाने जिल्ह्यात देशी कट्टा, तलवार व धारदार शस्त्रे जप्त केले असून सदरची कारवाई घुग्गुस, मूल व राजुरा पोलीस स्टेशनच्या हद्दीत करण्यात आली आहे.

    मूल पोलीस स्टेशनच्या हद्दीत नेमकं काय घडलं?

    २६ जुलै रोजी रात्री ८.३० च्या सुमारास गुन्हे शोध पथकाला चंद्रपूर – मुल रोडवर, VP बियर शॉपी समोर नामे शोहेब पठाण, वय – २३ वर्षे, व एक १७ वर्षीय विधी संघर्ष बालक हे त्यांचे ताब्यातील TVS jupiter मॉपेड वाहन डिक्की मध्ये धारधार शस्त्र ठेवून लोकांमध्ये दहशत निर्माण करण्याचे उद्देशाने व गंभीर दखलपात्र गुन्हा करण्याच्या उद्देशाने बेकायदेशीररित्या मिळून आले. त्यांचे विरुद्ध कलम ४,२५ Arms act, ३(५) BNS अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी शोहेब पठाण यास अटक करण्यात आली आहे. youth gang violence trends

    घुग्गुस पोलीस स्टेशनच्या हद्दीत देशी कट्टा

    २६ जुलै रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शास्त्रीनगर परिसरात गावठी बनावटीचा कट्टा सह एक जिवंत काडतूस जप्त केले. या धाडीत २५ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल मिळून आला. घुग्गुस मधील वार्ड क्रमांक ५ शास्त्रीनगर मध्ये स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने माहितीच्या आधारे कारवाई केली. या कारवाईत २८ वर्षीय सोनूलाल उर्फ नन्नू कैथल या युवकांकडून देशी कट्टा व एक जिवंत काडतूस जप्त करण्यात आले. Chandrapur Police Are Seizing Illegal Arms

    चंद्रपूर पोलिसांनी युवकाला केली अमानुष मारहाण, गंभीर आरोप

    सदरची कारवाई पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या नेतृत्वात पोउपनि विनोद भुरले, सुनील गौरकार, पोलीस कर्मचारी सुभाष गोहोकार, रजनीकांत पुठ्ठावार, सतीश अवथरे, दीपक डोंगरे, इम्रान खान, किशोर वाकाटे व हिरालाल गुप्ता यांनी केली.

    राजुरा पोलीस स्टेशनच्या हद्दीत रेल्वे वसाहत समोरील परिसरात सोनिया नगर मध्ये १९ वर्षीय युवकांकडून लोखंडी तलवार जप्त करण्यात आली. आरोपीवर राजुरा पोलिसांनी भारतीय हत्यार कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

    Somayya institute of technology

    चुनाभट्टी वॉर्ड राजुरा मध्ये राहणारा १९ वर्षीय अकिब नासिर खान या युवकाने स्वतःजवळ ८१ सेंटीमीटर लांबी ची लोखंडी तळावर ठेवली होती, मात्र काही गुन्हा घडण्यापूर्वी राजुरा पोलिसांनी छापामार कारवाई करीत तलवार जप्त केली. illegal weapons seizure

    सदरची कारवाई पोलीस निरीक्षक सुमित परतेकी यांच्या नेतृत्वात पोउपनि भीष्मराज सोरते, पोलीस कर्मचारी किशोर तुमराम, विक्की निर्वाण, रामेश्वर चहारे, शफिक शेख, महेश बोलगोडवार, शरद राठोड, आनंद मोरे, बालाजी यामलवार, अविनाश बांबोळे व राजीव दुबे यांनी केली.

  • district collector visit news today । शासकीय योजनांची अंमलबजावणी किती प्रभावी? जिल्हाधिकाऱ्यांचा प्रत्यक्ष पाहणी दौरा

    district collector visit news today

    district collector visit news today : चंद्रपूर – राज्य शासनाने वरिष्ठ अधिका-यांना फिल्डवर जाऊन विकास कामांच्या प्रगतीचा आढावा तसेच नागरिकांच्या अडीअडचणी जाणून घेण्याचे निर्देश दिले आहेत. या अनुषंगाने जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी आज (दि.3) वरोरा तालुक्यातील विविध विकास कामांना भेट देऊन सदर कामांची पाहणी केली.

    पाहणी दरम्यान जिल्हाधिकारी श्री. गौडा यांनी विकास कामांच्या प्रगतीचे टप्पे व अडचणी आदीबाबत अधिकारी व नागरिकांशी संवाद साधून मार्गदर्शन केले. तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाद्वारे बांधण्यात येत असलेले महिला बचत गटाच्या वस्तू विक्री शॉपिंग मॉलला भेट दिली. रोजगार हमी योजनेतून वरोरा तालुक्यातील सालोरी येन्सा येथील प्रगतशील शेतकरी यांच्या रेशीम उत्पादन व मलबेरी प्लांटेशन केंद्र,  कॅम्पा निधीतून वन विभागद्वारे टेमुर्डा येथे राबविण्यात येणारे चारा गवत विकास प्रकल्प, नगर परिषद वरोरा व अंबुजा फाउंडेशन यांच्याद्वारे करण्यात येत असलेले वरोरा शहरातील गांधी सागर तलाव खोलीकरण कामाची पाहणी पाहणी केली. village level government project monitoring

    यावेळी जिल्हाधिका-यांसोबत उपविभागीय अधिकारी अतुल जटाळे, तहसीलदार योगेश कौटकर, नगर परिषद मुख्याधिकारी विशाखा शेळकी, कनिष्ठ अभियंता श्री. खणके, वन परिक्षेत्र अधिकारी श्री. शेंडे , मंडळ कृषी अधिकारी श्री. काळे व इतर अधिकारी उपस्थित होते.

    village level government project monitoring

    ट्र्क चालकाला आली फिट आणि घडला भीषण अपघात, १ ठार २ जखमी

    भद्रावती तालुक्याला सुध्दा भेट

    जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी भद्रावती तालुक्यातील कार्यकारी सहकारी संस्था येथे भेट दिली. तसेच पळसगाव येथील पूर पूर्व परिस्थितीची पाहणी करून नागरिकांशी चर्चा केली. भद्रावती तालुक्यातील मौजा कुचना येथील जिल्हा परिषद शाळेची यावेळी त्यांनी पाहणी केली.

  • tendu leaves season danger । 8 दिवसांत 8 मृत्यू… चंद्रपूरच्या जंगलात तेंदूपत्ता म्हणजे मृत्यूची टांगती तलवार!

    tendu leaves season danger

    tendu leaves season danger : चंद्रपूर – चंद्रपूर जिल्ह्यात आठवडाभरात ८ नागरिकांची वाघाने शिकार केल्याची घटना घडली असून आतापर्यंत मानव वन्यजीव संघर्षात २१ नागरिकांचा बळी गेला आहे. सध्या जिल्ह्यात तेंदूपत्ता हंगाम सुरु झाल्याने ग्रामीण भागातील नागरिक जंगलाकडे कूच करू लागले मात्र वाघाचा वावर मोठ्या प्रमाणात वाढल्याने मानव वन्यजीव संघर्ष टोकाला पोहचला आहे. मे महिन्यात ८ नागरिकांची वाघाने शिकार केल्याने ग्रामीण भागात चांगलीच दहशत निर्माण झाली आहे. tiger attack in chandrapur today

    देशी कट्टा व जिवंत काडतूस सहित २४ वर्षीय युवकाला अटक

    १८ मे रोजी जिल्ह्यातील नागभीड व मूल तालुक्यात वाघाच्या हल्ल्यात दोघांचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. पहिल्या घटनेत नागभीड तालुक्यातील ६३ वर्षीय मारुती नक्तू शेंडे हे पत्नीसोबत तळोधी रेंजमधील आलेवाही बीटमधील वनक्षेत्रात कंम्पार्टमेन्ट क्रमांक ६५७ मध्ये तेंदूपत्ता संकलनासाठी गेले होते. त्यावेळी दबा धरून बसलेल्या वाघाने मारुतीवर हल्ला चढविला अचानक झालेल्या या हल्ल्यात मारुती यांच्या पत्नीने गाव गाठत नागरिकांना माहिती दिली, नागरिक घटनास्थळी दाखल झाले असता मारुतीच्या डोक्यावर वाघाने गंभीर घाव केले होते. गावकर्यांनी तात्काळ मारुतीला सिंदेवाही ग्रामीण रुग्णालयात दाखल केले मात्र उपचारादरम्यान मारुतीचा मृत्यू झाला. tiger attack in chandrapur today

    Powered by myUpchar

    दुसऱ्या घटनेत मूल तालुक्यातील भांदुर्णी गावातील ७० वर्षीय ऋषी झुंगाजी पेंदोर हे जंगलात बकऱ्यासाठी चारा आणायला शनिवारी १७ मे रोजी जंगलात गेले होते, रात्र झाल्यावर ते घरी परतले नसल्याने कुटुंबीयांनी त्यांचा शोध घेतला, याबाबत वनविभागाला माहिती देण्यात आली, १८ मे रोजी वनविभागाने जंगलात पेंदोर यांचा शोध घेतला असता वनविभागाच्या कंपार्टमेंट क्रमांक १००८ मध्ये ऋषी पेंदोर यांच्या शरीराचे अवयव आढळून आले, संपूर्ण शरीर वाघाने खाल्ल्याने डोक्याचा भाग व हात शिल्लक होता. ऋषी हा मानसिक रोगी असल्याची माहिती मिळाली आहे. याआधी १२ मे रोजी भांदुर्णी मध्ये भूमिका दीपक भेंडारे या महिलेवर वाघाने हल्ला करीत ठार केले होते. tiger conflict in rural india

    ५ दिवसात ६ महिलांचा मृत्यू

    १० मे रोजी सिंदेवाही वनपरिक्षेत्रातील मेंढा माल मध्ये तेंदूपत्ता संकलन करण्यासाठी गेलेल्या ६५ वर्षीय कांताजी बुधाजी चौधरी, ३० वर्षीय शुभांगी मनोज चौधरी व ५० वर्षीय रेखा शालिक शेंडे यांचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाला होता. ११ मे रोजी मूल तालुक्यातील नागाळा गावात ६५ वर्षीय विमल बुधाजी शेंडे, १२ मे रोजी मूल तालुक्यातील भांदुर्णी गावातील भूमेश्वरी दीपक भेंडारे, १४ मे रोजी चिमूर तालुक्यातील पळसगाव वनपरिक्षेत्रात ५४ वर्षीय कचराबाई अरुण भरडे यांचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाला होता. सदर सर्व महिला तेंदूपत्ता संकलन करण्यासाठी जंगलात गेल्या होत्या. villager killed by tiger in forest

    वाघ तुमच्यामुळे वाढले तर बंदोबस्त करा – आमदार विजय वडेट्टीवार

    चंद्रपूर जिल्ह्यात ८ दिवसात ८ नागरिकांना वाघाने हल्ला करीत ठार केले, मात्र वनविभाग यावर अजूनही उपाययोजना करताना दिसत नाही, जिल्ह्याचे पालकमंत्री व वनमंत्री यांनी यावर तातडीने उपाययोजना करावी अशी मागणी केली आहे. सुधीर मुनगंटीवार वनमंत्री असताना त्यांनी वारंवार वाघांची संख्या वाढल्याने आमच्यामुळे वाघ वाढले असा गवगवा केला मात्र आज वाघामुळे नागरिक दहशतीमध्ये आहे तर त्यांनी त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी पुढाकार घ्यायला हवा, वाघांना अधिवास कमी पडत आहे, ताडोबा बफर व कोर झोन मध्ये वाघांची संख्या वाढल्याने उर्वरित वाघांचा वनविभागाने बंदोबस्त करायला हवा. जर वनविभागाने वाघांचा बंदोबस्त केला नाहीतर आता वाघाच्या हल्ल्यात मृत पावलेल्या नागरिकांचे मृतदेह वनविभागाच्या कार्यालयापुढे ठेवणार, जोपर्यंत वाघांचा बंदोबस्त होणार नाही तोपर्यंत आम्ही मृतदेह उचलणार नाही हा आमचा वनविभागाला इशारा आहे. tiger attack in chandrapur today

    वनविभागाने केले आवाहन

    जिल्ह्यात तेंदूपत्ता हंगाम सुरू आहे. यंदा जिल्ह्यात एकूण 75 तेंदूपत्ता घटकांपैकी 70 घटकांमध्ये संकलनाचे कार्य सुरू आहे. या कार्यातून दरवर्षी सुमारे 35 हजारांपेक्षा अधिक कुटुंबांना रोजगार मिळतो.

    जिल्ह्यातील वनक्षेत्रांमध्ये वाघांचा मोठ्या प्रमाणात वावर असल्यामुळे तेंदूपत्ता संकलन दरम्यान खबरदारी घेणे अत्यावश्यक आहे. वनविभागामार्फत यासाठी विशेष जनजागृती मोहिमा, विशेष पथकांची नियुक्ती व विविध उपाययोजना करण्यात येत आहेत.

    दूपत्ता हंगाम – 2025 दरम्यान मे महिन्यात वाघाच्या हल्ल्यांमध्ये ८ व्यक्तींचा दुर्दैवी मृत्यू झाल्यामुळे वनविभागाकडून तेंदूपत्ता संकलन करणाऱ्या ग्रामस्थांना खालील सुरक्षा उपाय काटेकोरपणे पाळण्याचे आवाहन करण्यात येत आहे. tiger attack in chandrapur today

    • 1. वाघाच्या अधिवास असलेल्या वनक्षेत्रात प्रवेश टाळावा.
    • 2. संकलनासाठी केवळ नजीकच्या गावातील व्यक्तींनाच परवानगी द्यावी.
    • 3. सकाळी 8 वाजता पूर्वी जंगलात प्रवेश करू नये व संध्याकाळी 5 वाजता पूर्वीच जंगलातून बाहेर पडावे.
    • 4. एकट्याने जंगलात जाऊ नये. समूहानेच वनविभागाच्या देखरेखीखाली संकलन करावे.
    • 5. प्राथमिक बचाव दल, कंत्राटदारांचे अग्निशमन कर्मचारी व वनक्षेत्रीय कर्मचाऱ्यांनी संकलन करणाऱ्यांवर लक्ष ठेवावे व वाघाचा वावर आढळल्यास तत्काळ सतर्क करावे.
    • 6. संकलन दरम्यान पुरवण्यात आलेला मानवी मुखवटा डोक्याच्या मागील भागात घालावा.
    • 7. वाघाची चाहूल लागल्यास त्वरित मागे फिरावे व वनविभागाला माहिती द्यावी.

    वरील सूचनांचे काटेकोरपणे पालन करून आपली व आपल्या सहकाऱ्यांची सुरक्षितता सुनिश्चित करावी, असे आवाहन चंद्रपूर वनवृत्ताचे मुख्य वनसंरक्षक डॉ. जितेंद्र रामगावकर यांनी केले आहे..

  • wildlife conflict । चंद्रपूर पुन्हा हादरलं! तीन दिवसांत वाघाचे ५ बळी

    wildlife conflict

    wildlife conflict : मूल – लग्न होऊन मुलगी सासरी गेली. त्यानंतर काही वर्षांनी ती वडिलांकडे घरी आली. वडिलांच्या घरी संसार सुरू असताना आज सोमवारी ( 12 मे) आई वडील काका काकू व पतीसह तेंदूपत्ता तोडण्यासाठी भादुर्णाच्या जंगलात गेली. तेंदुपत्ता तोडत असतानाच पतीच्या समोरच वाघाने अचानक विवाहितेवर हल्ला चढविला आणि ती जागीच ठार झाली. ही घटना आज सोमवारी सकाळी साडेसात वाजताच्या सुमारास मूल तालुक्यातील भादुर्णा बिटातील 793 मध्ये घडली. भूमिका दिपक भेंडारे असे विवाहतेचे नाव आहे. घटनेनंतर मृतदेह उचलण्यास पुस्तकाच्या कुटुंबीयांनी नकार दिल्याने त्यांना पुढे स्थिती निर्माण झाली होती. त्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी येऊन मृतक महिलेच्या कुटुंबीयांची व नागरिकांनी समजून काढल्याने मृतदेह उचलण्यात आला. tiger kills woman in front of husband in chandrapur

    आमदार जोरगेवार उतरले रामबाग मैदानाच्या खड्ड्यात


    मूल तालुक्यातील भादुर्णा येथील भाऊजी गावतुरे यांची मुलगी भूमिका हिचा विवाह केवाडा (पेठ) येथील दिपक भेंडारे सोबत झाला होता. काही वर्ष सासरी राहीली. त्यानंतर ती वडीलाकडे भादुर्णा येथे राहायला आली होती. येथेच स्वतःच्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी पती-पत्नी मिळेल ते काम करीत होते. latest tiger attack in buffer zone india

    पतीसमोर वाघाने भूमिका ला केले ठार


    आज सोमवारी सकाळी भादुर्णा जंगलात तेंदुपत्ता तोडण्यासाठी आई, वडील, काका, काकू आणि पत्तीसह बफर क्षेत्रातील भादुर्णा बिटातील 793 मध्ये विवाहिता सकाळी साडेसात वाजताच्या सुमारास गेली होती. जंगलात तेंदुपत्ता तोडत असतानाच त्याच परिसरात दबा धरून बसलेल्या वाघाने विवाहितेवर अचानक हल्ला केला. हल्ल्यात ती जागीच ठार झाली. वाघाने हल्ला केला तेव्हा काही अंतरावर असलेल्या आई, वडील आणि पतीने आरडाओरड करून तिचा जीव वाचविण्याचा प्रयत्न केला. वाघ पळन गेला,परंतु वाघाच्या हल्ल्यात पती समोरच विवाहितेचा जीव गेला.

    नागरिकांचा रोष

    सदर घटनेची माहिती गावकऱ्यांना देण्यात आली. गावकरी घटनास्थळी दाखल झाले. वनविभागाला माहिती देण्यात आली. घटनास्थळी वनविभागाचे आणि पोलीस प्रशासनाचे अधिकारी दाखल झाले. कालच नागाळा येथे एका वृद्ध महिलेचा वाघाने जीव घेतल्याने प्रचंड दहशत पसरलेली आहे. त्यामुळे नागरिकांनी वन विभागाच्या विरोधात प्रचंड संताप व्यक्त केला. जोपर्यंत वाघाचा बंदोबस्त होत नाही तोपर्यंत मृतदेहाला हात लावू देणार नाही आणि मृतदेह उचलणार नाही अशी भूमिका गावकऱ्यांनी घेतली त्यामुळे तणावपूर्ण स्थिती निर्माण झाली. forest department fails to stop tiger attacks

    लगेच वरिष्ठांना पाचारण पाचारण करण्यात आले. मृतक कुटुंबियांच्या आणि नागरिकांची समजूत घातली. बंदोबस्त करण्यासाठी तातडीने पावले उचलले जातील, अशी हमी दिली. तसेच पुस्तकाच्या कुटुंबीयांना तातडीने रोग पन्नास हजाराची आर्थिक मदत केली. एक तासापर्यंत घटनास्थळी तणाव होण्यासाठी निर्माण झाली होती. मात्र वरिष्ठांनी नागरिकांचे समजून घेतल्याने तनाव पूर्ण वातावरण निवळले. त्यानंतर पोलीस व वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी मृतदेहाची पाहणी करून पंचनामा केला. त्यानंतर शव उत्तरीय तपासणीकरीता मूल उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले.

    ३ दिवसात ५ महिलांची शिकार


    काल रविवारी याच मूल तालुक्यात नागाळा येथील एका वृद्ध महिला व शनिवारी मूल तालुक्याला लागून असलेल्या सिंदेवाही तालुक्यातील मेंढा माल गावातील एकाचवेळी तीन महिलांना वाघाने ठार केल्याची थरारक घटना ही ताजीच आहे. तीन दिवसातील वाघाच्या हल्ल्यातील आजचा पाचवा बळी आहे. मुल आणि सिंदेवाही तालुक्यात दोन दिवसात पाच जणांचा बळी गेल्याने वाघाची प्रचंड दहशत पसरली आहे. वाघाचा बंदोबस्त करण्याची नागरिक जोरदार मागणी करीत आहेत, परंतु वन विभाग मात्र बंदोबस्त करण्यास अपयशी ठरत आहे.

  • Pulkit Singh CEO Chandrapur visit । मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंग यांचा जिवती दौरा; विकासकामांचा घेतला आढावा

    Pulkit Singh CEO Chandrapur visit

    Pulkit Singh CEO Chandrapur visit : चंद्रपुर जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिह यांनी नुकताच जिवती तालुक्याचा दौरा केलेला असुन, क्षेत्रीय भेटीदरम्यान जिवती तालुक्यातील विविध गावांना भेटी देवुन विविध विकास कामांची पाहणी केली आहे. Rural development in Chandrapur

    चंद्रपुरातील राम बाग वाचवा, नागरिकांचा पुढाकार

    महिला बचत गटांना मार्गदर्शन

    मुख्य कार्यकारी अधिकारी  पुलकित सिह यांनी जिवती तालुक्यातील भेटी दरम्यान ग्रामपंचायत पाटण येथील आदर्श आपले सरकार सेवा केंद्रास भेट देऊन, उत्पन्नाचा दाखला वितरण करण्यात आले. व  महिला बचत गटांना कर्ज मंजुरी प्रमाणपत्र देऊन उपस्थितांना मार्गदर्शन केले.

    मॉडेल आरोग्य केंद्राला भेट

    उमेदचे प्रकल्प संचालक गिरीष धायगुडे यांच्या हस्ते मौजा शेणगाव येथे दिड महिन्यापूर्वी घरकुलाचे भूमिपूजन करण्यात आले होते. अशा पूर्ण झालेल्या घरकुलाची पाहणी करण्यात आली. मॉडेल प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट देवुन, येथिल सोई सुविधांची पाहणी करण्यात आली. मॉडेल जिल्हा परिषद हायस्कूलची पाहणी करून, विद्यार्थी व शिक्षकांना मार्गदर्शन करण्यात आले.

    वृक्षारोपण

    पीटीगुडा नं 1 येथे ऑक्सिजन पार्क, नरेगा अंतर्गत बंधारा बांधकाम , सार्वजनिक कंपोष्टपिट च्या कामांची पाहणी केली. गावात मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिह यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. टेकमांडवा येथे उपआरोग्य केंद्राला भेट दिली . येथील आरोग्य विषयक सेवांची माहिती जाणुन घेतली व यंत्रणेतील अधिकारी व कर्मचा-यांना योग्य ते निर्देश देण्यात आले. जिल्हा परिषदच्या शाळेस भेट देऊन, विद्यार्थींशी हितगुज केली.  Gram panchayat inspection Chandrapur

    पंचायत समिती जिवती येथिल सभागृहात विविध विभागाचे अधिकारी व ग्रामपंचायत अधिकारी यांचा विविध विकास कामांचा  आढावा  घेऊन गाव स्तरावरील विकास कामे वेळेत पुर्ण करण्याचे यावेळी उपस्थितांना निर्देश दिले. मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिह यांच्या जिवती तालुक्यातील क्षेत्रीय भेटी दरम्यान उमेदचे प्रकल्प संचालक गिरीष धायगुडे ,जिवती पंचायत समितीचे गटविकास अधिकारी लक्ष्मीनारायन दोडके व तालुका यंत्रणेतील  अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

  • Child marriage chandrapur : चंद्रपूर जिल्ह्यातील या तालुक्यात सर्वाधिक बालविवाह

    Child marriage chandrapur : चंद्रपूर जिल्ह्यातील या तालुक्यात सर्वाधिक बालविवाह

    Child marriage chandrapur पालकांच्या समुपदेशाने जिल्ह्यात एकाच दिवशी दोन बालविवाह रोखण्यात चाईल्ड हेल्पलाईन आणि जिल्हा बालसंरक्षण कक्षाला यश प्राप्त झाले. विशेष म्हणजे जिवती तालुक्यातील 5 बालविवाह यावर्षी यंत्रणेनी थांबविले आहे.

     

    चंद्रपूरपासून दूर अंतरावर असलेल्या जिवती तालुक्यातील गावांमध्ये बालविवाह होत असल्याची गोपनीय माहिती चाईल्ड हेल्पलाईन च्या 1098 क्रमांकावर मिळाली. जिल्हा महिला व बालविकास अधिकारी चंद्रपूर आणि जिल्हा बाल संरक्षण अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यवाहीला सुरुवात करण्यात आली. सर्वप्रथम दोनही बालिका अल्पवयीन असल्याचा पुरावा सहाय्यक संरक्षण अधिकारी परविन शेख, अंगणवाडी सेविका व सुपरवायजर यांच्या मदतीने प्राप्त करण्यात आला.

    अवश्य वाचा : कंगना राणावतच्या कानशिलात लगावणारी कुलविंदर कौर कोण आहे?

    Child marriage chandrapur यानंतर चाइल्ड हेल्पलाईन आणि जिल्हा बाल संरक्षण कक्षाचे कर्मचारी दोन्ही बालिकेच्या बालविवाह होत असलेल्या गावात पोहचले व ग्रामीण बाल संरक्षण समिती सदस्यांच्या मदतीने दोन्ही बालविवाह थांबविले.

    महत्त्वाचे : जातवैधता प्रमाणपत्रासाठी लागणार हे पुरावे

    दोन्ही अल्पवयीन बालिकांच्या कुटुंबाकडून बालविवाह करणार नसल्याचे शपथपत्र लिहून घेण्यात आले. या संपूर्ण कारवाही दरम्यान जिल्हा महिला व बालविकास अधिकारी दिपक बानाईत, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी अजय साखरकर, चाईल्ड हेल्पलाईनचे अभिषेक मोहुर्ले, प्रकल्प समन्वयक प्रदिप वैरागडे, सुपरवायझर अंकुश उराडे,  किरण बोहरा आणि जिल्हा बाल संरक्षण कक्षाच्या हर्षा वऱ्हाटे  यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.

  • Hema malini : चंद्रपुरातील ताडोबा महोत्सवात हेमा मालिनीचे आगमन

    Hema malini : चंद्रपुरातील ताडोबा महोत्सवात हेमा मालिनीचे आगमन

    Hema malini चंद्रपूर – चंद्रपुरात सुरू असलेल्या 3 दिवसीय ताडोबा महोत्सवाच्या शेवटच्या दिवशी सिनेअभिनेत्री हेमा मालिनी यांचे गंगा नृत्य नाटिका सादरीकरणासाठी 3 मार्चला चंद्रपुरात आगमन झाले.

    Hema malini 1 मार्चपासून वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या संकल्पनेतून आयोजित ताडोबा महोत्सवाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे.

    पालकांनो लक्ष द्या : 8 महिन्याच्या बाळाने गिळली काजळ ची डबी

    यावेळी हेमा मालिनी यांनी पत्रकार परिषदेला संबोधित करीत वनाचे संरक्षण हे आपले कर्तव्य आहे अशी बाब त्यांनी यावेळी व्यक्त केली.

    सोबतच त्यांना लोकसभा निवडणुकीची मथुरा येथून तिसऱ्यांदा उमेदवारी मिळाल्याबद्दल त्यांनी पंतप्रधान मोदी यांचे आभार मानले आहे. 3 दिवस चालणाऱ्या ताडोबा महोत्सवात बॉलीवूड अभिनेत्री हेमा मालिनी या गंगा नृत्य करणार आहे, नदीचे रक्षण कसे करावे, त्यासाठी काय उपाययोजना असाव्या याबाबत गंगा नाटिका मध्ये नृत्याद्वारे संपूर्ण विश्लेषण प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे. 3 दिवसीय ताडोबा महोत्सवात विविध कार्यक्रमांची मेजवानीचा आस्वाद चंद्रपूर वासीयांना मिळणार आहे, पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या संकल्पनेतून 3 दिवसीय ताडोबा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. चंद्रपूरच्या वाघांची विशेषतः व त्यांची ओळख जगाला व्हावी हा या कार्यक्रमा मागचा उद्देश्य आहे, ताडोबा महोत्सवाचा प्रचार प्रसार सध्या जोमात सुरू असून यासाठी सौंदर्य स्पर्धा विजेत्यांनी आपल्या देशात ताडोबा अभयारण्याचा प्रचार सुरू केला असून त्या माध्यमातून जगाच्या कानाकोपऱ्यात ताडोबाचा वाघ काय आहे? किती संख्या वाघांची आहे याबाबत परदेशी पर्यटकांना सुद्धा संखोल माहिती मिळणार.

  • District Drug Store :प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते चंद्रपूर जिल्हा औषधी भांडार चे लोकार्पण

    District Drug Store :प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते चंद्रपूर जिल्हा औषधी भांडार चे लोकार्पण

    News34 chandrapur

    चंद्रपूर – देशातील विविध आरोग्य सेवा, पायाभुत सुविधा प्रकल्पाची पायाभरणी अंतर्गत आरोग्य विभागाच्या वतीने जिल्हा औषधी भांडारच्या (District Drug Store) नवीन इमारतीचे लोकार्पण मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन यांच्या हस्ते करण्यात आले.

     

    यावेळी सहायक संचालक (आरोग्यसेवा) डॉ. आनंद गडीकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. महादेव चिंचोळे,  जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अशोक कटारे, सावलीचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. बंडू रामटेके, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य डॉ. मंगेश गुलवाडे, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. भास्कर सोनारकर, नर्सिंग कॉलेजच्या प्राचार्य पुष्पा पोडे उपस्थित होत्या.

     

    यावेळी बोलतांना मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन म्हणाले, चंद्रपूर येथे नवीन औषध भांडाराचे तसेच तडाली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील अधिकारी – कर्मचारी यांच्या निवासस्थानाचे लोकार्पण करण्यात आले आहे. जिल्ह्यात 65 प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्र आहेत. यात औषधींचा साठा ठेवण्यासाठी जागा उपलब्ध नव्हती. या भांडाराच्या माध्यमातून एक चांगले औषध भांडार जिल्ह्यासाठी उपलब्ध झाले आहे. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून ग्रामीण भागात चांगली आरोग्य सेवा देण्यासाठी सातत्याने प्रयत्न करण्यात येत आहे. stockpile of medicines

     

    पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या संकल्पनेतून जिल्ह्यात आरोग्याच्या पायाभूत सुविधा, विस्तारीकरण, स्मार्ट पी.एच.सी. निर्माण करण्यात येत आहे. शहरातील खाजगी रुग्णालयाच्या धर्तीवर ग्रामीण भागात आरोग्याच्या सेवा उपलब्ध होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. Medical services

     

    डॉ. मंगेश गुलवाडे म्हणाले, पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आरोग्याच्या अत्याधुनिक सुविधा सर्वांपर्यंत पोहचविण्याचा संकल्प केला आहे. चंद्रपूर जिल्हा महाराष्ट्रात आरोग्याच्या बाबतीत अग्रेसर राहावा, यासाठी पालकमंत्री सदैव प्रयत्नशील आहेत, असे ते म्हणाले.

     

    तत्पूर्वी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांच्या हस्ते दूरदृष्यप्रणालीद्वारे देशातील विविध आरोग्य सेवा, पायाभुत सुविधा प्रकल्पाची पायाभरणी / लोकार्पण करण्यात आले. यावेळी चंद्रपूर येथे मान्यवरांच्या हस्ते फित कापून जिल्हा औषधी भांडारच्या नवीन इमारतीचे उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अशोक कटारे यांनी तर आभार राकेश नाकोडे यांनी मानले. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने आरोग्य विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

     

    नवीन औषधी भांडारमधील सुविधा : नवीन औषधी भांडार मध्ये औषधी साठवणुकीची जास्त क्षमता, मार्गदर्शक सुचनांप्रमाणे औषधाची व्यवस्था, औषधाप्रमाणे खोलीचे तापमान नियंत्रण, पी.एच.सी. व इतर ठिकाणी औषधी साठा वाहतुकीची सोय, फायर फायटींग डिटेक्शन सिस्टीम, पाण्याची सुविधा, शौचालयाची सोय, कोल्ड स्टोरेज रूम, किडे, वाळवी, साप आदींपासून औषधीचे संरक्षण आदी सुविधा येथे करण्यात आल्या आहेत.

     

    जिल्हा औषध भांडार मुळे ग्रामीण भागातील आरोग्य संस्थांना औषध पुरवठा करण्याकरीता लागणा-या औषधांचा साठा करण्यास व व्यवस्थित जतन करून वितरीत करण्यास मदत होणार आहे.