Tag: चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँक

  • Ravindra Shinde BJP cdcc bank chairman । 🎯 फडणवीसांना वाढदिवसाचं खास गिफ्ट – CDCC बँकेत भाजपचा अध्यक्ष

    Ravindra Shinde BJP cdcc bank chairman

    काँग्रेसचा बालेकिल्ला ढासळला – CDCC बँकेवर भाजपचा झेंडा

    Ravindra Shinde BJP cdcc bank chairman : चंद्रपूर – चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्षपदी भाजपचे रवींद्र शिंदे तर उपाध्यक्ष पदावर संजय डोंगरे यांची निवड झाली आहे. बँकेवर भाजपचा अध्यक्ष हे मुख्यमंत्री फडणवीस यांना वाढदिवसाचं गिफ्ट आहे, अशी प्रतिक्रिया आमदार कीर्तिकुमार भांगडिया यांनी दिली.

    ताडोबा जंगलात सफारीला येताय, आता महिलांसाठी सुविधा केंद्र

    २२ जुलै रोजी मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाची निवडणूक होती, २१ संचालक असलेल्या बँकेत अध्यक्ष रवींद्र शिंदे व उपाध्यक्ष संजय डोंगरे हे निर्विरोध निवडून आले. यावेळी राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर, भाजप आमदार कीर्तिकुमार भांगडिया, आमदार किशोर जोरगेवार, आमदार करन देवतळे आदींची यावेळी उपस्थिती होती. Devendra Fadnavis birthday political gift BJP

    भ्रष्टाचाराच्या वेढ्यात अडकलेल्या मध्यवर्ती बँकेत काही महिन्यापूर्वी भरती प्रक्रियेत मोठा भ्रष्टाचार झाला असल्याचे आरोप करण्यात आले होते, सदर प्रकरण आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी अधिवेशनात लावून धरले होते, अखेर भरती प्रक्रियेची एसआयटी चौकशी ची घोषणा मुख्यमंत्री फडणवीस यांनी केली होती. तब्बल १३ वर्षांनी मध्यवर्ती बँकेत पार पडलेल्या निवडणुकीत २१ संचालक कांग्रेस व भाजप प्रणित निवडून आले मात्र दोन्ही पक्षांनी आपल्याकडे बहुमत असल्याचा दावा केला होता.

    एकावेळी भाजपात प्रवेशाने कांग्रेस गारद

    पण ऐनवेळी उबाठा शिवसेना जिल्हाप्रमुख रवींद्र शिंदे यांनी भाजपात प्रवेश घेत कांग्रेसचे सत्तेचे गणित बिघडवून टाकले आणि स्वतः अध्यक्षपदी विराजमान झाले, शिंदे यांच्या भाजप प्रवेशाने कांग्रेस पक्षाला मोठा धक्का हादरा बसला, विशेष म्हणजे यंदाच्या निवडणुकीत खासदार प्रतिभा धानोरकर या संचालक पदी निवडून आल्या होत्या. अनेक वर्षे कांग्रेसच्या ताब्यात असलेल्या मध्यवर्ती बँकेत प्रथमच भाजपने बाजी मारली. यावेळी आमदार भांगडिया यांनी मध्यवर्ती बँकेत भाजपचा अध्यक्ष हे आमचं त्यांना वाढदिवसाचं गिफ्ट आहे अशी प्रतिक्रिया दिली. Congress loses Chandrapur bank to BJP

    आज निर्विरोध निवडून आलेले अध्यक्ष शिंदे व उपाध्यक्ष डोंगरे यांच्या सत्कार कार्यक्रमात आमदार मुनगंटीवार व आमदार देवराव भोंगळे हे अनुपस्थित होते. जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणुकीची जबाबदारी जिल्ह्यातील ५ भाजप आमदार यांच्याकडे होती मात्र २ आमदारांनी यामध्ये सहभाग नोंदविला नाही अशी चर्चा भाजपात रंगली आहे. आमदार भांगडिया, आमदार जोरगेवार व आमदार देवतळे यांनी किल्ला लढवीत मध्यवर्ती बँकेत भाजपची सत्ता खेचून आणली. बँकेच्या यशामागील भाजपचे खरे किंगमेकर आमदार भांगडिया व जोरगेवार ठरले.

  • unopposed cooperative bank director election । 🏦 डॉ. अनिल वाढई यांचा निर्विरोध विजय! बँक संचालकपदावर अविरोध निवड

    unopposed cooperative bank director election

    unopposed cooperative bank director election : बल्लारपूर :- चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या होऊ घातलेल्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत तालुका अ गटातून बँकेचे विद्यमान सदस्य डॉ अनिल वाढई यांची अविरोध निवड झाली आहे.

    एअर इंडियाचे प्रवासी विमान कोसळले

    एकमेव अर्ज

    चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणुक २१ संचालक पदासाठी येणाऱ्या १० जुलै ला होणार आहे. त्यात ११ जून रोजी फॉर्म भरण्याची शेवटची मुदत होती. बल्लारपूर तालुक्यातील सेवा सहकारी अ गट मध्ये एकूण ७ सदस्य होते. डॉ अनिल वाढई यांचे एकमेव फॉर्म असल्याने ते अविरोध निवडून आले. डॉ.अनिल वाढई हे दुसऱ्यांदा बँकेत निवडून आले. Chandrapur district cooperative bank director win


    डॉ अनिल वाढई यांनी निवडणुकीत अविरोध निवडून आल्या बद्दल राजुरा चे माजी आमदार सुभाष धोटे, खासदार प्रतिभा धानोरकर, माजी विरोधी पक्षनेता आमदार विजय वडेट्टीवार, शिक्षक आमदार सुधाकर अडबाले, जिल्हा बँकेचे अध्यक्ष संतोष रावत, माजी अध्यक्ष शेखर धोटे यांचे आभार मानले.

    त्यांच्या अविरोध निवडून आल्याबद्दल कृषी उत्पन्न बाजार समिती ची संचालिका अलका अनिल वाढई, रामभाऊ टोंगे, मुरलीधर पाटील गौरकर, घनश्याम मुलचंदानी, नरेश मुंदडा, काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अब्दुल करीम, माजी गट नेते देवेंद्र आर्य, चंद्रकांत गुरु, डॉ सुनील कुलदीवार , डॉ अशोक घुंगुरुडकर, रमेश राजुरकर, घनश्याम उरकुडे, इस्माईल ढाकवाला, युवराज भासरकर यांनी अभिनंदन केले.

  • Cyber Scam CDCC Bank । चंद्रपूर सहकारी बँकेत २.९३ कोटींचा सायबर घोटाळा, फॉरेन्सिक चौकशी होणार – आमदार जोरगेवार यांचा पाठपुरावा

    Cyber Scam CDCC Bank

    Cyber Scam CDCC Bank : चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत तब्बल २.९३ कोटींचा सायबर घोटाळा झाल्याची धक्कादायक बाब समोर आल्यानंतर, या प्रकरणाची तातडीने फॉरेन्सिक चौकशी करून दोषींवर गुन्हा दाखल करण्याची मागणी आमदार किशोर जोरगेवार यांनी केली होती. याबबत त्यांनी पोलिस महासंचालकांना निवेदन सादर केले होते. या मागणीची दखल घेत पोलीस महासंचालकांनी तातडीने जिल्हा पोलिस अधीक्षकांना या प्रकरणाची चौकशी करून गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत. Cyber Fraud in Chandrapur

    आमदार खासदार भिडले श्रेयवादाच्या लढाईत

    दिनांक ७ ते १० फेब्रुवारी २०२५ दरम्यान चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सायबर हल्ल्यातील गैरव्यवहारामुळे एकूण ₹३.६० कोटींच्या व्यवहारात आर्थिक घोटाळा झाल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणात केवळ ₹९० लाखांची रक्कम परत मिळवण्यात पोलिसांना यश आले असून, उर्वरित २.९३ कोटींची रक्कम अद्यापही गहाळ आहे. यामध्ये बँकेचे अध्यक्ष, मुख्य कार्यकारी अधिकारी, आयटी विभागप्रमुख, संगणक सहाय्यक तसेच सायबर सिक्युरिटी पुरवठादार यांच्या संगनमताचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.

    न्याय प्रक्रियेचा अवमान । Cyber Scam CDCC Bank


                विशेष म्हणजे, बँकेने सायबर सुरक्षिततेसाठी तब्बल १०० कोटींचा खर्च दाखवूनही कोणतीही ठोस सुरक्षित व्यवस्था न ठेवता, विमा संरक्षणही घेतलेले नव्हते. इतकेच नव्हे, तर न्यायालयीन परवानगी न घेता ग्राहकांची रक्कम नफ्यातून परत करून बँकेने न्यायप्रक्रिया चाही अवमान केला आहे.

    police letter

    फॉरेन्सिक अहवाल दिशाभूल करणारा


             बँकेच्या आंतरर्गत समितीने तयार केलेला फॉरेन्सिक अहवाल अपुरा व दिशाभूल करणारा असल्याने, त्याची पुनर्तपासणी स्वतंत्र तज्ज्ञांमार्फत करण्यात यावी, अशीही मागणी आमदार किशोर जोरगेवार यांनी केली होती. या प्रकरणातील सर्वांगीण चौकशीसाठी विशेष तपास पथक नेमण्यात यावे, दोषींवर तातडीने कारवाई व्हावी, अशीही त्यांनी मागणी केली आहे. या सर्व मागण्यांची गांभीर्याने दखल घेत पोलिस महासंचालकांनी जिल्हा पोलिस अधीक्षकांना त्वरित चौकशी करून गुन्हा दाखल करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे या प्रकरणाची लवकरच सखोल चौकशी होणार असून, दोषींवर कठोर कारवाई होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

  • चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे टेस्ट ऑडिट होणार

    चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे टेस्ट ऑडिट होणार

    News34 chandrapur

    चंद्रपूर : जिल्हा मध्यवर्ती बँक चंद्रपूरच्या संदर्भात प्राप्त तक्रारीच्या अनुषंगाने चौकशी गतिमान पद्धतीनं पूर्ण केली जाईल आणि आवश्यकता असल्यास या बँकेचे टेस्ट ऑडिट सुद्धा केलं जाईल. त्याचा निर्णय साधारणतः एक महिन्याच्या आत मध्ये येईल आणि तो निर्णय आल्यानंतर पुढील कारवाई करू, असे आश्वासन राज्याचे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिले.

     

    नागपूर हिवाळी अधिवेशनाच्या विधिमंडळ सभागृहात आमदार प्रतिभाताई धानोकर यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधीवर उत्तर देताना सहकार मंत्री बोलत होते.

     

    आमदार प्रतिभाताई धानोरकर म्हणाल्या, जिल्हा बँक ही खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांना कर्ज देणारी आणि शेतकऱ्यांना अडी अडचणीच्या काळात सांभाळून घेणारी बँक आहे. मात्र, याला चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँक अपवाद आहे. सदर बँकेला 111 वर्षाचा इतिहास आहे .आजपर्यंत बँकेच्या नियमित निवडणुका होत होत्या. परंतु 2012 नंतर 2017 रोजी शासनाने निवडणूक घेणे अपेक्षित असताना, देखील आज 2023 पर्यंत निवडणुका झाल्या नाहीत. याचा फायदा घेऊन 2017 व 2023 या सहा वर्षाच्या काळातील बँकेतील काही संचालकांनी जो गैरवव्यवहाराचा कळस गाठला आहे. 2023 ला झालेल्या नोकर भरतीत भ्रष्टाचार झाल्याचे सिद्ध झाले. बँकेच्या सहा संचालकावर आणि पाच कर्मचाऱ्यावर गुन्हे देखील दाखल केलेले आहे, आणि सदर बँकेची प्रतिमा या प्रकरणामुळे मलिन झाली.

     

    2020 मध्ये देखील बँकेच्या काही कर्मचाऱ्यांनी आरोग्याचे कारण दाखवून पाल्यांना अनुकंपतत्वावर नोकरी दिली. तसेच खरेदी घोळ झाल्याने दोन संचालकांना म्हणजे एकूण सात संचालकावर गुन्हे दाखल झाले. या बँकेत गैरव्यवहार झाल्याचे महाराष्ट्र सरकारच्या सहकार विभागाला देखील माहित आहे. 3.97 कोटीची वसुली करता संचालकांना सहकार कायद्यांनुसर नोटीस देखील बजावल्या गेल्या. बँकेतील सीईओ कल्याणकर यांच्यावर दोन गुन्हे दाखल असताना संचालक मंडळाने परस्पर ठराव घेऊन अजूनही बँकेचा पदभार त्यांच्याकडे आहे. रिझर्व बँक व नाबार्ड यांच्या नियमानुसार गुन्हे दाखल असणाऱ्यांना नेमणूक दाखल करता येत नाही. परंतु रिझर्व बँक व नाबार्ड यांनी दिलेल्या फॉर्मेटमध्ये सीओवर असणाऱ्या दोन गुन्ह्याची माहिती ही सदर बँकेच्या संचालक मंडळांनी लपवली आणि रिझर्व बँक व नाबार्डची यांनी देखील फसवणूक केली. या संदर्भात देखील रामनगर पोलीस स्टेशन अंतर्गत गुन्हा दाखल आहे. परंतु त्यावर कुठलीही कारवाई त्या ठिकाणी झाली नाही.

    आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी आपल्या लक्षवेधी नोटमध्ये या बँकेत गेल्या सहा वर्षांत झालेल्या गैरव्यवहारांचा उल्लेख केला आहे. त्यात नोकर भरतीचा भ्रष्टाचार, कर्मचाऱ्यांना अनुकंपा तत्त्वावर नोकरी देणे, सीईओवर गुन्हे दाखल असतानाही त्यांची नेमणूक, बँकेचा एनपीए वाढणे, बँकेच्या किरायाच्या जागेवर शिष्यवृत्ती देण्यासाठी पैसे खर्च करणे, संगणक खरेदीसाठी जास्त पैसे खर्च करणे, शेतकरी भवनसाठी जास्त वेळ घेणे, शेतकऱ्यांच्या सहकार संस्थांना मतदानाचा अधिकार नाकारणे, शेतकरी कल्याण निधीचा वापर सर्रास करणे, यासारख्या बाबींचा समावेश आहे.

     

    सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील म्हणाले, “या बँकेच्या संदर्भात हायकोर्टाने दिलेला स्टे उठवण्यासाठी आम्ही प्रयत्न करू. त्यानंतर निवडणुका घेऊन नवीन संचालक मंडळ नेमले जाईल. त्यावेळी या सर्व बाबींची चौकशी करून कारवाई केली जाईल.”असे मंत्री म्हणाले.

    आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी वळसे पाटील यांना या प्रकरणी सखोल चौकशी करण्याची विनंती केली आहे.

  • बडतर्फ कर्मचाऱ्याच्या आत्महत्या प्रकरणात बँकेचे संचालक आणि अधिका-यांना विनाकारण गोवण्याचा प्रयत्न – संतोष रावत

    बडतर्फ कर्मचाऱ्याच्या आत्महत्या प्रकरणात बँकेचे संचालक आणि अधिका-यांना विनाकारण गोवण्याचा प्रयत्न – संतोष रावत

    News34 chandrapur गुरू गुरनुले

    मूल : चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे काही संचालक, अधिकारी आदींच्या त्रासामुळे बडतर्फ कर्मचाऱ्यांच्या आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा आरोप निराधार असल्याचे मत जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष संतोषसिंह रावत यांनी व्यक्त केले आहे.

     

    जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या मूल शाखेतील संचालक कक्षात स्थानिक पत्रकारांशी बोलताना बँकेचे अध्यक्ष संतोषसिंह रावत यांनी बालाजी नकटू उरकुडे यांच्या प्राप्त तक्रारीनुसार बँकेच्या अधिकाऱ्यामार्फत बँकेच्या मेंडकी शाखेची सखोल चौकशी करण्यात आली.

     

    चौकशीत 17 लाख 67 हजार 315 रूपये 65 पैश्याची अपरातफर झाल्याचे निष्पन्न झाले, त्या अनुषंगाने बँकेची विनंती व विभागीय सहनिबंधक सहकारी संस्था नागपूर यांचे आदेशानुसार जिल्हा विशेष लेखा परीक्षक साजन साखरे यांनी मेंडकी शाखेचे लेखा परीक्षण केल्यानंतर निदर्शनास आलेल्या अफरातफरी विषयी पोलीस स्टेशन ब्रह्मपुरी येथे तक्रार नोंदविली.

     

    प्राप्त तक्रारीवरून पोलीस स्टेशन ब्रह्मपुरी येथे कलम 420, 465, 466, 467 468, 471, 409, 34 भादविनुसार गुन्हा नोंदवून तपास सुरू केला. तपासांती रवींद्र भोयर, अमित राऊत, कल्पना मसराम, ए.पी. नागपुरे व एस बी शेंडे या कर्मचाऱ्यांविरुद्ध पुरावे सापडल्याने २१ सप्टेंबर २०२० रोजी त्यांना अटक केली.

     

    पोलिसांनी केलेल्या अटकेनंतर अमित राऊत यांनी पुढील कारवाई टाळण्यासाठी जामीनकरिता न्यायालयाला विनंती केली, परंतु अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश चंद्रपूर यांनी विड्रॉल स्लिप व व्हाँवचर लिस्ट नुसार अमित राऊत यांनी 3 लाख 89 हजार 11 रुपयाची अफरातफर केल्याचे निष्पन्न होत असल्याचे कारण नमुद करून अमित राऊत यांची जमानतीची विनंती फेटाळून लावली.

     

    अमित राऊत यांना पोलिसांनी 21 सप्टेंबर 2020 रोजी अटक केल्यानंतर 12 नोव्हेंबर 2020 रोजी ब्रह्मपुरी न्यायालयाने जमानत दिली तोपर्यंत अमित राऊत पोलीस व न्यायालयीन कोठडीत होते. कोणताही शासकीय अथवा निमशासकीय कर्मचारी 48 तासाचे वर पोलीस किंवा न्यायालयीन कोठडीत असल्यास त्यांचेविरूध्द नियमानुसार निलंबनाची कार्यवाही करण्यात यावी असे निर्देश आहेत.

     

    अमीत राऊत यांच्या कोठडीतील कार्यकाळ दीड महिन्याच्या वर होत असल्याने बँक प्रशासनाने नियमानुसार त्यांचे विरुद्ध निलंबनाची कार्यवाही केली, सेवानिवृत्त सहकार अधिकारी शिरभय्ये यांचे मार्फतीने विभागीय चौकशी करण्यात आल्यानंतर अमित राऊत दोषी असल्याचा निवाडा दिला. विभागीय चौकशी अंती दोषी असलेल्या कर्मचाऱ्यांसंबंधी 30 जून 2021 रोजी पार पडलेल्या बँकेच्या संचालक मंडळाच्या सभेत ठराव क्रमांक 21 नुसार दोषी कर्मचाऱ्यांना बडतर्फ करण्याची कार्यवाही करावी असे सर्वानुमाते ठरविण्यात आल्याने बँकेने दोषी कर्माचा-यांविरूध्द बडतर्फीची कारवाई केली.

     

    बडतर्फीच्या कारवाईनंतर अमित राऊत यांनी चंद्रपूर येथील कामगार न्यायालयात धाव घेतली, दरम्यान कामगार न्यायाधीश यांनी संपूर्ण प्रकरणाची चौकशी केल्यानंतर राऊत यांचे विरुद्ध झालेली चौकशी नैसर्गिक न्याय तत्त्वानुसार झाली असून चौकशी अधिकाऱ्याने दिलेला निवाडा कायदेशीर असल्याचा निर्णय 24 एप्रिल 2023 रोजी जाहीर केला. यामध्ये बँक प्रशासनाने कोणतीही गैरकृती केली नसून कोणत्याही कर्मचाऱ्यांविरुद्ध हेतू पुरस्सर कोणातीही कारवाई केली नाही.

     

    जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शेतकरी व सर्वसामान्यांची बँक असल्याने त्यांच्या ठेवी आणि विश्वास जपण्यासाठी कारवाई केली आहे. असे असताना काही मंडळी अमित राऊत यांच्या आत्महत्येच्या प्रयत्नात बँकेच्या काही संचालक व अधिकाऱ्यांना गोवण्याच्या प्रयत्न करीत आहेत, ही बाब अयोग्य व निराधार असल्याचा दावा बँकेचे अध्यक्ष संतोषसिंह रावत यांनी केला आहे.