Tag: चंद्रपूर जिल्हा परिषद

  • Chandrapur Zilla Parishad student scheme 2025 । 💰 दरमहा 10 हजार विद्यावेतन! चंद्रपूर जिल्हा परिषदेची योजना

    Chandrapur Zilla Parishad student scheme 2025

    Chandrapur Zilla Parishad student scheme 2025 : चंद्रपूर, दि. 21 (News३४) : चंद्रपूर जिल्हा परिषदेच्या ग्रामीण भागातील निवडक गुणवंत आणि होतकरु मागासवर्गीय (SC / ST /VJ/NT) विद्यार्थ्यांकरीता सन 2022-23 पासून ‘कमवा व शिका’ योजनेअंतर्गत जिल्हा परिषदेच्या विविध विभागामध्ये पदवी शिक्षण पूर्ण करण्याची संधी मिळत आहे. यंदाच्या वर्षापासून सुद्धा काही होतकरू मागासवर्गीय विद्यार्थ्यांना तीन वर्षासाठी ‘डिजिटल आणि एआय सुलभक’ (Digital and Al Facilitator) म्हणून प्रशासकीय काम करण्याची संधी मिळणार आहे. earn while learn scheme for students

    दारू विक्रेते ते मजूर चंद्रपूर जिल्ह्यातील बोगस पत्रकार

    या कार्यानुभवावर आधारित दूरस्थ पदवी अभ्यासक्रमामध्ये शिक्षण घेत असताना विद्यार्थ्यांना 3 वर्षे एखाद्या कार्यालयामध्ये पूर्णवेळ इंटर्नशिप करणे बंधनकारक असते. ही तीन वर्षाची इंटर्नशिप गरजू पात्र विद्यार्थ्यांना देऊन, त्यांना केलेल्या कामाच्या बदल्यात विद्यावेतन देणारी ‘कमवा व शिका’ ही नाविन्यपूर्ण योजना यंदाच्या वित्तीय वर्षापासून पुन्हा एकदा चंद्रपूर जिल्हा परिषदेतर्फे राबविली जाणार आहे.

    १० हजार रुपये विद्यावेतन

    सदर योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना त्यांनी केलेल्या कामापोटी पहिल्या वर्षी 8 हजार रुपये, दुसऱ्या वर्षी 9 हजार आणि शेवटच्या वर्षासाठी 10 हजार रुपये इतके विद्यावेतन प्रत्येक महिन्यासाठी अदा केले जाईल. सदर योजनेमध्ये सलग तीन वर्षे समाधानकारकरित्या केलेले काम आणि स्वयंअध्ययन यातून तिसऱ्या वर्षाच्या शेवटी इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाची बीबीए म्हणजेच Bachelor in Business Administration ही पदवी आणि तीन वर्षे काम केल्याचे चंद्रपूर जिल्हा परिषदेच्या वतीने कार्यानुभवाचे प्रमाणपत्र असा विद्यार्थ्यांचा दुहेरी फायदा होणार आहे. तसेच 12 वी नंतरचे पदवीचे, स्पर्धात्मक युगामध्ये पुढे जाऊन कामाला येऊ शकणारे कार्याधारीत शिक्षण हे स्वतःच्या मेहनतीच्या कमाईवर करता येणार आहे. digital internship for backward class students

    चंद्रपूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील 18 ते 25 वयोगटातील नुकत्याच बारावी पास झालेल्या, संगणक आणि विशेषतः कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (एआय) टूल्स चा प्रभावी वापर करता येणाऱ्या गुणवंत व होतकरू मागासवर्गीय (अनुसूचित जाती / अनुसूचित जमाती / विमुक्त जाती / भटक्या जमाती) विद्यार्थ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंग यांनी केले आहे.

    इच्छुक असलेल्या विद्यार्थ्यांना अर्ज करण्याची अंतिम मुदत ही 24 जुलै 2025 अशी असून त्यासाठी https://tinyurl.com/cndzpibba२०२५ ही ऑनलाईन लिंक चंद्रपूर जिल्हा परिषद यांच्या वतीने उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.

  • parent teacher meeting in ZP schools । जिल्हा परिषद चंद्रपूरचा नाविन्यपूर्ण उपक्रम

    parent teacher meeting in ZP schools

    parent teacher meeting in ZP schools : चंद्रपूर, दि. 12 : आपल्या पाल्याच्या प्रगतीचा आढावा घेण्याचा अधिकार प्रत्येक पालकांना आहे. विद्यार्थी शिक्षक व पालक यांच्यात समन्वय राहण्यासाठी पालकसभा अतिशय महत्त्वपूर्ण आहे. त्या अनुषंगाने आता जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये परीक्षा झाल्यावर एका आठवड्यात पालक सभा आयोजित करण्यात येणार आहे.

    चंद्रपूर महानगरपालिकेत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर

    मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा प्रकल्प सनियंत्रण कक्षाची सभा नुकतीच संपन्न झाली. या सभेत जिल्ह्यातील शैक्षणिक सद्यस्थितीचा आढावा घेण्यात आला. यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) नूतन सावंत, शिक्षणाधिकारी अश्विनी केळकर, राजेश पाताळे,  जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य डॉ. विनित मत्ते, अधिव्याख्याता वैशाली येगलोपवार, उपशिक्षणाधिकारी विशाल देशमुख, गटशिक्षणाधिकारी व सर्व विषय सहायक उपस्थित होते.

    एका आठवड्यात पालकसभा

    पालक, शिक्षक व विद्यार्थी यांच्यात समन्वय रहावा व पालकांना आपल्या पाल्याची प्रगती व अडथळे यांची माहिती व्हावी, यासाठी संपूर्ण जिल्ह्यात परीक्षा झाल्यावर एका आठवड्यात पालकसभांचे आयोजन करावे, अशा सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दिल्या. शाळेत घेण्यात येणाऱ्या चाचण्यांमध्ये विद्यार्थ्यांनी मिळविलेले गुण पालकसभेत पेपर दाखवून देण्यात येणार आहे. या पालकसभा 31 ऑगस्ट व 31 नोव्हेंबर 2025 तसेच 31 जानेवारी व 31 एप्रिल 2026 ला घेण्यात येणार आहे. parent teacher coordination for student progress

    पालक सभा वर्ग स्तरावर आयोजित करण्यात येईल. प्रत्येक तालुक्यातील गटशिक्षणाधिकारी आपल्या तालुक्यात होणाऱ्या पालकसभांचे नियोजन करतील. संपूर्ण जिल्ह्यातील पालकसभेत सुसूत्रता राहावी, यासाठी जिल्हा स्तरावर सूचनापत्रक निर्गमित करण्यात येईल. पालक सभेचे आयोजन प्रभावी पद्धतीने होत आहे किंवा नाही हे पाहण्यासाठी जिल्हा, तालुका व केंद्र स्तरावरील प्रशासकीय यंत्रणेच्या भेटीचे नियोजन करण्यात येईल, अशी माहितीही बैठकीत देण्यात आली.

  • Pulkit Singh CEO Chandrapur visit । मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंग यांचा जिवती दौरा; विकासकामांचा घेतला आढावा

    Pulkit Singh CEO Chandrapur visit

    Pulkit Singh CEO Chandrapur visit : चंद्रपुर जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिह यांनी नुकताच जिवती तालुक्याचा दौरा केलेला असुन, क्षेत्रीय भेटीदरम्यान जिवती तालुक्यातील विविध गावांना भेटी देवुन विविध विकास कामांची पाहणी केली आहे. Rural development in Chandrapur

    चंद्रपुरातील राम बाग वाचवा, नागरिकांचा पुढाकार

    महिला बचत गटांना मार्गदर्शन

    मुख्य कार्यकारी अधिकारी  पुलकित सिह यांनी जिवती तालुक्यातील भेटी दरम्यान ग्रामपंचायत पाटण येथील आदर्श आपले सरकार सेवा केंद्रास भेट देऊन, उत्पन्नाचा दाखला वितरण करण्यात आले. व  महिला बचत गटांना कर्ज मंजुरी प्रमाणपत्र देऊन उपस्थितांना मार्गदर्शन केले.

    मॉडेल आरोग्य केंद्राला भेट

    उमेदचे प्रकल्प संचालक गिरीष धायगुडे यांच्या हस्ते मौजा शेणगाव येथे दिड महिन्यापूर्वी घरकुलाचे भूमिपूजन करण्यात आले होते. अशा पूर्ण झालेल्या घरकुलाची पाहणी करण्यात आली. मॉडेल प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट देवुन, येथिल सोई सुविधांची पाहणी करण्यात आली. मॉडेल जिल्हा परिषद हायस्कूलची पाहणी करून, विद्यार्थी व शिक्षकांना मार्गदर्शन करण्यात आले.

    वृक्षारोपण

    पीटीगुडा नं 1 येथे ऑक्सिजन पार्क, नरेगा अंतर्गत बंधारा बांधकाम , सार्वजनिक कंपोष्टपिट च्या कामांची पाहणी केली. गावात मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिह यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. टेकमांडवा येथे उपआरोग्य केंद्राला भेट दिली . येथील आरोग्य विषयक सेवांची माहिती जाणुन घेतली व यंत्रणेतील अधिकारी व कर्मचा-यांना योग्य ते निर्देश देण्यात आले. जिल्हा परिषदच्या शाळेस भेट देऊन, विद्यार्थींशी हितगुज केली.  Gram panchayat inspection Chandrapur

    पंचायत समिती जिवती येथिल सभागृहात विविध विभागाचे अधिकारी व ग्रामपंचायत अधिकारी यांचा विविध विकास कामांचा  आढावा  घेऊन गाव स्तरावरील विकास कामे वेळेत पुर्ण करण्याचे यावेळी उपस्थितांना निर्देश दिले. मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिह यांच्या जिवती तालुक्यातील क्षेत्रीय भेटी दरम्यान उमेदचे प्रकल्प संचालक गिरीष धायगुडे ,जिवती पंचायत समितीचे गटविकास अधिकारी लक्ष्मीनारायन दोडके व तालुका यंत्रणेतील  अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

  • Chandrapur political situation । आता रंगत येणार! चंद्रपुरात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका; राजकीय पक्षांची मोर्चेबांधणी सुरू!

    Chandrapur political situation

    Chandrapur political situation : येत्या ४ महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थेबाबत निवडणूक कार्यक्रम जाहीर करा असा आदेश आज सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी सुरु केली आहे. आजची राजकीय परिस्थिती वेगळी असल्याने एकाच पक्षाचे झालेले २ भाग या निवडणुकीत रंगत आणणार आहे. मागील ३ वर्षांपासून चंद्रपूर जिल्ह्यातील महानगरपालिका व जिल्हा परिषद व नगरपालिका मध्ये प्रशासक बसल्याने निवडणूका आरक्षण मुळे लांबणीवर गेली होती. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाने निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला आहे. Political parties Chandrapur municipal corporation election

    चंद्रपूर ॲक्शन मोडमध्ये! शालेय वाहतुकीतील धोके टाळण्यासाठी कडक उपाययोजना!

    चंद्रपूर जिल्ह्यात १ महानगरपालिका, जिल्हा परिषद, ८ नगरपालिका व १५ पंचायत समित्या आहे.

    चंद्रपूर महानगरपालिकेत पक्षीय बलाबल मध्ये भाजपची आघाडी होती, १७ प्रभागात ६६ नगरसेवकांची सदस्य संख्या असलेल्या महानगरपालिकेत भाजप ३६, कांग्रेस १२, राष्ट्रवादी कांग्रेस २, शिवसेना २ , बसपा ८, मनसे २ व अपक्ष ४ अशी सदस्यसंख्या होती. राज्यातील राजकीय उलथापूलथीमध्ये नगरसेवक विविध पक्षात दाखल झाले आहे. Chandrapur district council election political analysis

    चंद्रपूर जिल्हा परिषद एकूण जागा ५६, पक्षीय बलाबल भाजप ३३, कांग्रेस २० इतर ३.

    चंद्रपूर जिल्ह्यात एकूण नगरपालिका ८ आहे ज्यामध्ये बल्लारपूर, राजुरा, वरोरा, भद्रावती, चिमूर,मूल,ब्रह्मपुरी व नव्याने घुग्गुस नगरपालिकेचा समावेश झाला आहे. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत ५ भाजप तर १ जागेवर कांग्रेसचे विजय झाला असून भाजपसाठी सध्याची परिस्थिती अनुकूल आहे. चंद्रपूर महानगरात नागरिक पाणी समस्येने त्रस्त असून यावर अजूनही तोडगा निघालेला नाही त्यामुळे चंद्रपुरात निवडणूक अटीतटीची होणार अशी चिन्हे आहे.

    राजकीय स्थिती

    चंद्रपूर शहरात भाजपची सध्याची परिस्थिती बिकट अवस्थेत आहे, भाजपच्या २ आमदारांमध्ये विधानसभा क्षेत्रावरून कोल्ड वार सुरु आहे, मात्र आमदार किशोर जोरगेवार भाजपची नैया पार लावणार अशी चित्रे आहे. चंद्रपुरात अमृत व भूमिगत गटार योजनेच्या खोदकामावरून नागरिक प्रचंड नाराज आहे. रस्ते बनल्यावर वारंवार ते खोदल्या जात असून वाहतुकीची समस्या बिकट परिस्थितीमध्ये जात आहे त्यामुळे धुळीचे प्रदूषण मोठ्या प्रमाणात वाढत आहे.

    शिवसेना व राष्ट्रवादी कांग्रेस चे विभाजन झाल्यावर पाहल्यांदा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत दोन्ही शिवसेना व राष्ट्रवादी आमने सामने येणार, विशेष बाब म्हणजे या दोन्ही पक्षाची परिस्थिती जिल्ह्यात पूर्णतः मजबूत नाही..परिस्थिती जैसे थे आहे.

  • बालरोग तज्ञ संघटना चंद्रपूर शाखेतर्फे विवेक जॉन्सन यांचं अभिनंदन

    बालरोग तज्ञ संघटना चंद्रपूर शाखेतर्फे विवेक जॉन्सन यांचं अभिनंदन

    News34 chandrapur

    चंद्रपूर – महाराष्ट्र राज्य बालहक्क संरक्षण आयोग, महिला व बाल विकास विभाग सीसीडीटी आणि युनिसेफ यांच्या संयुक्त विद्यमाने देण्यात येणारा बालस्नेही पुरस्कार 2023 चे मानकरी चंद्रपूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन यांना मुंबई येथील भव्य अशा कार्यक्रमात प्रदान करण्यात आला.

     

    महाराष्ट्रातील बालकांचा सर्वांगीण विकास व बालहक्क संरक्षण तसेच त्यांची सुरक्षा, आरोग्य इत्यादी महत्त्वपूर्ण विषयावर अनेक प्रशासकीय यंत्रणा व स्वयंसेवी संस्था सकारात्मक पद्धतीने मुलाचे कार्य पार पाडत आहेत.

     

    हे काम यशस्वीरित्या करणाऱ्या अधिकाऱ्यांना बालस्नेही पुरस्काराने सन्मानित करण्यात येतं. यन्दा पुरस्कारासाठी चंद्रपूर जिल्ह्यातील विवेक जॉन्सन यांची उत्कृष्ट मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून निवड करण्यात आली.

    त्यांच्या याच कार्याची दखल घेऊन बालरोग तज्ञ संघटना चंद्रपूर शाखा च्या वतीने डॉ अभिलाषा गावतुरे, डॉ वैंकट पंगा तसेच डॉ सीमा शर्मा, डॉक्टर अश्विनी भारत, डॉ सरताज शेख, डॉ देवेंद्र लाडे यांनी स्मृतिचिन्ह देऊन विवेक जॉन्सन यांचे अभिनंदन केले व त्यांच्या पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या. बालरोग तज्ञ संघटना चंद्रपूर नेहमीच आपल्या चांगल्या कामात आपल्या सोबत राहील व सहकार्य करेल अशी ग्वाही सुद्धा डॉ गावतुरे यानीं यावेळी दिली.

  • चंद्रपूर जिल्हापरिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन यांना ‘बाल स्नेही’ पुरस्कार प्रदान

    चंद्रपूर जिल्हापरिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन यांना ‘बाल स्नेही’ पुरस्कार प्रदान

    News34 chandrapur

    चंद्रपूर : महाराष्ट्र राज्य बालहक्क संरक्षण आयोग, महिला व बालविकास विभाग, सी.सी.डी.टी. आणि युनिसेफ यांच्या संयुक्त विद्यमाने देण्यात येणारा ‘बालस्नेही’ पुरस्कार – 2023, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन यांना मुंबई येथील यशवंतराव चव्हाण सभागृहात प्रदान करण्यात आला.

     

    महिला व बाल विकास विभागाच्या मंत्री अदिती तटकरे यांच्या हस्ते श्री. जॉन्सन यांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. यावेळी महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाच्या अध्यक्षा सुशिबेन शाह, महिला व बाल विकास विभागाचे आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे (भा.प्र.से) व इतर मान्यवर उपस्थित होते.

     

    महाराष्ट्र राज्यातील बालकांचा सर्वांगीण विकास व बाल हक्क संरक्षण, त्यांची सुरक्षा, आरोग्य इत्यादी महत्वपूर्ण विषयावर अनेक प्रशासकीय यंत्रणा जसे बालगृह, बालकल्याण समिती, ई-यंत्रणा व स्वयंसेवी संस्था सकारात्मक पध्दतीने मोलाचे कार्य पार पाडत आहेत. हे काम करणारे अधिकारी / कर्मचारी व संस्थांना बालस्नेही पुरस्काराने सन्मानित करण्यासाठी 22 नोव्हेंबर 2023 रोजी मुंबई येथील यशंवतराव चव्हाण सभागृहात राज्यस्तरीय पुरस्कार वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. सदर पुरस्कारासाठी आपल्या जिल्हयातील विवेक जॉन्सन यांची उत्कृष्ट मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून निवड करण्यात आली.

  • 19 नोव्हेंबरला गावा-गावात जागतिक शौचालय दिन साजरा करा – सीईओ विवेक जॉन्सन

    19 नोव्हेंबरला गावा-गावात जागतिक शौचालय दिन साजरा करा – सीईओ विवेक जॉन्सन

    News34 chandrapur

    चंद्रपुर – दरवर्षी ”19 नोव्हेंबर ” हा जागतीक शौचालय दिन म्हणुन साजरा केला जात असुन, यावर्षी सुद्धा चंद्रपुर जिल्ह्यातील गावा-गावात विविध उपक्रमांचे आयोजन करुन, जागतिक शौचालय दिनाचे आयोजन करण्याचे आवाहन जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉनसन यांनी केले आहे. त्यानुसार  19 नोव्हेंबर ला गावा-गावात शौचालय दिन आयोजित केल्या जाणार आहे.

     

              स्वच्छतेचे जिवनात फ़ार महत्व असुन,स्वच्छतेच्या सवयी अंगवळणी असल्यास 80 टक्के आजार नाहिसे होतात. याचाच एक भाग म्हणुन , गावस्तरावर स्वच्छते विषयी गाव स्तरावर जनजागरण व्हावे व प्रत्येकाला स्वच्छतेचे मह्त्व कळावे .यासाठी  19 नोव्हेंबर हा दिवस जगात जागतिक शौचालय दिन म्हणुन साजरा करण्यात येत आहे.

     

    चंद्रपुर जिल्हा शाश्वत स्वच्छते च्या अनुषंगाने मार्गक्रमण करित असुन, जिल्हातील गावा-गावात शौचालय दिनाचे आयोजन करुन, सभा,गृहभेटी, लोककलावंताचे कार्यक्रम, स्वच्छता फ़ेरी,मार्गदर्शन सभा अशा विविध कार्यक्रमा द्वारा गावस्तरावर स्वच्छतेचे वातावरण निर्माण करुन, जनमानसाच्या मना-मनात स्वच्छतेचे मह्त्व वृध्दीगत करण्यात येणार आहे.

     

    या अनुषंगाने 19 नोव्हेंबर ला जागतिक शौचालय दिनाचे गावस्तरावर भव्य आयोजन करुन, गावस्तरावर विविध उपक्रमातुन ग्रामस्थांना शाश्वत स्वच्छते विषयी अभिप्रेरित करावे. असे आवाहन जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉनसन यांनी केले आहे.

    शौचालय दिनाला जागतीक पातळीवर महत्व प्राप्त झालेले असुन, सुरक्षित आरोग्या करीता स्वच्छता खुप महत्वाची आहे. चंद्रपुर जिल्ह्यातील गावा – गावात शाश्वत स्वच्छता निर्माण होण्यासाठी ग्रामस्थांनी सामाजिक कर्तव्य म्हणुन समोर यावे.

    –         विवेक जॉनसन, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद चंद्रपुर.

  • दारूच्या नशेत झिंगाट असलेले शिक्षक जेव्हा शाळेत येतात

    News34 chandrapur गुरू गुरनुले

    मुल – मुल तालुक्यातील मौजा जूनासुरला येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत सेवेत असणारा शिक्षक जी एन. कुळमेथे हा शिक्षक चक्क दारू ढोसून कर्तव्यावर आला असल्याचे प्रत्यक्ष शाळा व्यवस्थापन समितीला आढळून आले. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक शाळेत उपस्थित नव्हते. असे भेट देनाऱ्यानी सांगितले.

     

    याबाबतची माहिती मुल पंच्यायत समितीचे गट विकास अधिकारी यांना मोबाईल वर देण्यात आली असून दारूच्या नशेत असणाऱ्या शिक्षकाला पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले असून ज्ञान दानाचे कार्य करणारा शिक्षक लहान विद्यार्थ्यांना काय घडवणार आणि विद्यार्थी सुद्धा अशा शिक्षकाकडून कोणत्या ज्ञानाची अपेक्षा करणार अशी चर्चा गावकऱ्यांमध्ये केली जात असून पोलिस व प्रशासन काय कारवाई करते याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.

     

    याबाबत गट विकास अधिकारी यांनी केंद्र प्रमुख व शिक्षण विस्तार अधिकारी यांना चौकशी करीता पाठविले असून चौकशी अहवाल प्राप्त होताच प्रशासकीय कारवाई करण्यात येईल असे सांगितले.