Tag: चंद्रपूर गुन्हेगारी

  • youth arrested with weapons Chandrapur । चंद्रपुरात दहशत थांबेना, १९ वर्षीय युवकांकडून तलवार, कोयता व चाकू जप्त

    youth arrested with weapons Chandrapur

    youth arrested with weapons Chandrapur : चंद्रपूर (२९ सप्टेंबर २०२५) – चंद्रपूर शहरात दहशतीच्या नावाखाली तरुणाईने उच्छाद मांडला आहे, शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीत तरुणाईच्या उंबरठ्यावर असलेली मुले हातात शस्त्र घेऊन दहशत माजविण्याचा प्रयत्न करीत असून या मुलांना खाकीचा धाक आहे कि नाही यावर आता प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

    सुट्टीच्या दिवशी चंद्रपुरात लाचखोरी

    काही दिवसांपूर्वी महाकाली मंदिर परिसर तर गणेश विसर्जन पूर्वी रामाला तलाव परिसर व महात्मा फुले चौक बाबुपेठ मध्ये युवक हातात शस्त्र घेऊन नागरिकांना धमकाविण्याचे काम करीत परिसरात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करून राहिले आहे.

    तलवार, कोयता व चाकू जप्त

    असाच एक प्रयत्न २८ सप्टेंबर रोजी बाबुपेठ मधील अटलबिहारी गार्डनजवळ १९ वर्षीय मुलगा धारदार हत्यार घेऊन परिसरात दहशत निर्माण करीत होता, याबाबत शहर पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी बाबुपेठ गाठत त्या मुलाचा माज उतरवीत त्याला थेट अटक केली. आरोपी १९ वर्षीय हरी पप्पू गोस्वामी राहणार सोनामाता मंदिरच्या मागे बाबुपेठ वार्ड याच्या राहत्या घरी पोलिसांनी झडती घेतली असता त्याठिकाणी ३ लोखंडी धारदार हत्यार १ तलवार, १ कोयता व पात्याचा चाकू सह ५ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. पोलिसांनी आरोपी हरी गोस्वामी वर भारतीय शस्त्र अधिनियम प्रमाणे गुन्हा दाखल केला. crime news today Chandrapur

    सदरची यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे, पोलीस उपविभागीय अधिकारी सुधाकर यादव यांच्या मार्गदर्शनात शार पोलीस निरीक्षक निशिकांत रामटेके यांच्या नेतृत्वात सपोनि राजेंद्र सोनवणे, पोउपनि दत्तात्रय कोलटें, पोउपनि विलास निकोडे, पोलीस कर्मचारी लक्ष्मण रामटेके, संजय धोटे, सचिन बोरकर, जावेद सिद्दीकी, निकेश ढेंगे, भावना रामटेके, कपूरचंद खरवार, रुपेश पराते, योगेश पिदूरकर, निलेश ढोक, विक्रम मेश्राम, प्रफुल भैसारे, सारिका गौरकार व दीपिका झिंगरे यांनी केली.

  • stabbing case reported in Chandrapur । चंद्रपूरात भरदिवसा जीवघेणा हल्ला – मित्राला वाचवायला गेलेल्या युवकावर चाकूने वार!

    stabbing case reported in Chandrapur

    stabbing case reported in Chandrapur : चंद्रपूर – चंद्रपूर जिल्हा गुन्हेगारीचे हब बनू पाहत आहे, मागील २ महिन्यात जिल्हाभरात गंभीर घटना घडल्या त्यानंतरसुद्धा गुन्ह्याची मालिका सुरूच आहे, या मालिकेत चंद्रपूर शहरात दिवसाढवळ्या चाकू चालला. प्रेम प्रकरणातून एकावर दोघांनी हल्ला केला, मात्र मित्राला वाचविण्याकरिता आलेल्या मित्रावर दोघांनी मिळून चाकू हल्ला केला या हल्ल्यात युवक गंभीर जखमी झाला. रामनगर पोलिसांनी या प्रकरणी दोघांना अटक केली आहे.

    चंद्रपूर भाजपचे राजकीय स्टंट

    मध्यस्ती करणे पडले महागात

    २५ जून रोजी शहरातील वन अकॅडमी समोरील भागात अंश उर्फ अनिष पंढरीनाथ वालकोंडे व आर्यन संतोष रामटेके दोघेही राहणार बाबुपेठ हे एका युवकाला मारहाण करीत होते तितक्यात मित्राला वाचविण्याकरिता मध्ये आलेला २३ वर्षीय श्रेयश दामोधर पिल्लारे राहणार इंदिरानगर याने दोघांना बाजूला सारले मात्र श्रेयश मध्ये का आला म्हणून दोघांनी त्याच्यावर चाकूने वार केले. youth crime recent case

    या हल्ल्यात श्रेयश च्या हाताला गंभीर दुखापत झाली, ते दोघे इतक्यावर थांबले नाही तर त्यांनी पुन्हा चाकूने वार करण्याचा प्रयत्न केला मात्र काही युवकांनी दोघांना पकडत बाजूला केले, नागरिकांनी अंश व आर्यन ला पकडून ठेवत रामनगर पोलिसांना याबाबत माहिती दिली.

    पोलीस घटनास्थळी दाखल झाली, पोलिसांनी अंश व आर्यन ला ताब्यात घेत जखमी श्रेयश पिल्लारे ला तात्काळ जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. सदर हल्ला हा प्रेम प्रकरणाच्या वादातून झाला अशी माहिती पुढे आली आहे. रामनगर पोलिसांनी अंश वालकोंडे व आर्यन रामटेके यांच्यावर कलम १०९, ११५ (२), १५ (२), ३ (५) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक आसिफराज शेख यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे.

  • A gang of money grabbers : चंद्रपूर पोलिसांच्या जाळ्यात अडकली पैसे लुटणारी महिलांची टोळी

    A gang of money grabbers : चंद्रपूर पोलिसांच्या जाळ्यात अडकली पैसे लुटणारी महिलांची टोळी

    News34 chandrapur

    चंद्रपूर – नागरिक बँकेत पैसे काढण्याकरिता जातात मात्र पैसे काढल्यावर आपल्या आजू-बाजूच्या लोकांवर आपण लक्ष देत नाही ती संधी साधून आपल्या पैश्यावर डल्ला मारला जातो, असाच प्रकार चंद्रपुरात घडला, पोलिसांनी सदर प्रकरणी मोठी कारवाई करीत महिलांच्या टोळीला अटक केली आहे. chandrapur crime news

     

    6 फेब्रुवारीला विठ्ठल मंदिर वार्डात राहणारे 79 वर्षीय रमेश बाटवे हे पेन्शन चे पैसे काढण्याकरिता शहरातील कस्तुरबा रोड येथील स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये गेले, त्यांनी 20 हजाराची रक्कम बँकेतून काढत जवळ असलेल्या कापडी थैलीत ठेवली.
    मात्र थोड्या वेळानी पैसे चेक केले असता थैलीत पैसे आढळून आले नाही, थैली खालच्या बाजूने कापल्या अवस्थेत होती.

     

     

    तसेच पठाणपुरा निवासी सौ.मीराबाई गिरडकर यांनी सुद्धा सदर बँकेतून 10 हजार रुपये काढले होते तेसुद्धा त्याचप्रमाणे म्हणजेच थैली कापून चोरले होते.

    स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये 2 नागरिकांचे तब्बल 30 हजार रुपये कुणीतरी अज्ञाताने चोरले याबाबत फिर्याद चंद्रपूर शहर पोलिस स्टेशनमध्ये नोंदविण्यात आली. A gang of women who steal money

     

     

    पोलिसांनी बँकेतील सीसीटीव्ही चेक केला असता काही महिला फिर्यादी यांच्या सभोवताल आढळून आल्या, त्यामधील एक महिला ही थैली कापायची तर दुसरी महिला थैलीतील रक्कम काढायची, बँकेत नेहमी गर्दी असल्याने चोरीचा प्रकार लक्षात आलं नाही.

     

     

    मात्र त्याचदिवशी 6 फेब्रुवारीला भद्रावती येथे सुद्धा पिशवीतून 10 हजार रुपये चोरी करण्यात आले होते, एकाच दिवशी 2 शहरात हा प्रकार घडल्याने पोलिसांनी तपासाला गती दिली.

     

    पोलिसांनी बँक व परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली असता त्यामध्ये 4 महिला आढळून आल्या, गोपनीय माहिती व सखोल तपास केल्यावर पोलिसांनी या प्रकरणात 4 महिलांना अटक केली.

     

     

    यामध्ये 30 वर्षीय बिजली सिद्दुलाल सिसोदिया, 40 वर्षीय भोलीबाई रघुवीरसिंह सिसोदिया,21 वर्षीय राधिका प्रल्हादसिंग सिसोदिया तिघे राहणार दुलखेडी, तालुका नसींगड जिल्हा राजगड मध्यप्रदेश, 40 वर्षीय कालिबाई दिलावर सिसोदिया राहणार कडीया ता. पाचोर जि. राजगड राज्य – मध्यप्रदेश येथील असल्याची माहिती पोलिसांना मिळाली, सदर चारही आरोपीवर इतर जिल्ह्यात सुद्धा गुन्हे दाखल आहे. आरोपिकडून पोलिसांनी चोरी केलेले 40 हजार रुपये जप्त केले आहे.
    आरोपी महिलांनी आधी चंद्रपूर व त्यानंतर भद्रावती येथे चोरी केली, विशेष म्हणजे बँक मध्ये गेल्यावर आरोपी महिला नागरिकांच्या हालचालीवर लक्ष द्यायचे, त्यांची फेस रीड करीत महिला गुन्हा करायच्या हे विशेष.

     

     

    चंद्रपूर शहर पोलिसांच्या सतर्कतेने मोठा गुन्हा उघडकीस आला आहे, सदरची यशस्वी कारवाई पोलीस अधिक्षक मुम्मका सुदर्शन , अपर पोलीस अधिक्षक रिना जनबंधु , उपविभागिय पोलीस अधिकारी, सुधाकर यादव यांचे मार्गदर्शनाखाली प्रभारी अधिकारी सपोनि. रमीज मुलानी, सपोनि. मंगेश भोंगाडे, पोउपनि शरिफ शेख, विलास निकोडे,, महेंद्र बेसरकर, जयंता चुनारकर, संतोष पंडीत, सचिन बोरकर, , निलेश मुडे, म पो हवा भावना रामटेके, चेतन गज्जलवार, इम्रान खान, संतोष कावळे, दिलीप कुसराम, रूपेश रणदिवे, रूपेश पराते, मंगेश मालेकर, शाहाबाज सैयद यांनी केलेली आहे. पुढील तपास जयंता चुनारकर करीत आहे.

  • IPS Transfer : चंद्रपूर जिल्ह्यात अनेक वर्षांनी पोलीस अधीक्षक पदी आयपीएस अधिकाऱ्यांची एंट्री

    IPS Transfer : चंद्रपूर जिल्ह्यात अनेक वर्षांनी पोलीस अधीक्षक पदी आयपीएस अधिकाऱ्यांची एंट्री

    News34 chandrapur

    चंद्रपूर – जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था पूर्णपणे वाऱ्यावर गेली आहे, त्यांतच चंद्रपूर जिल्ह्यात प्रोमोटेड पोलीस अधीक्षक आले, मात्र आता अनेक वर्षांनी जिल्ह्यात तरुण IPS ची एंट्री होणार आहे. IPS transfer

     

    गृह विभागाने आज राज्यातील अनेक IPS अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश काढले त्यामध्ये चंद्रपूर पोलीस अधीक्षक रविंद्र परदेशी यांची बदली परभणी जिल्ह्यात झाली, आता चंद्रपूर जिल्ह्यात नागपूर शहर उपायुक्त मुमक्का सुदर्शन यांची वर्णी लागली आहे. Chandrapur ips transfer

     

    मागील पोलीस अधीक्षकांचा कार्यकाळ बघता जिल्ह्यात गुन्हेगारी मोठया प्रमाणात गुन्हेगारी वाढली, गोळीबार, खून व संघटित गुन्हेगारीने जिल्ह्यात डोकं वर काढलं आहे, अनेक पोलीस अधीक्षकांनी यावर नियंत्रण करण्याचा प्रयत्न केला मात्र आजही सर्व अनियंत्रित आहे, अश्यात चंद्रपूर जिल्ह्यात आयपीएस अधिकारी मुमक्का सुदर्शन यांची एंट्री होत आहे.

  • MCOCA Act : शिवा वझरकर हत्याकांड चंद्रपूर, VIP ट्रिटमेंट आणि मोक्का

    MCOCA Act : शिवा वझरकर हत्याकांड चंद्रपूर, VIP ट्रिटमेंट आणि मोक्का

    News34 chandrapur

    चंद्रपूर – 25 जानेवारीला युवासेना शहर प्रमुख शिवा वझरकर यांची धारदार शस्त्राने निर्घृण हत्या करण्यात आली होती.
    शिवा च्या हत्येनंतर सरकारनगर परिसरात काही काळ तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती, पोलिसांनी वेळेवर त्या परिस्थितीवर नियंत्रण मिळविले. Justice for shiva wazarkar

     

    एक क्षुल्लक वाद आणि त्या वादातून शिवा वर 8 जणांनी हल्ला केला, आधी पोटात चाकू खुपसला नंतर त्याला लाथा-बुक्क्यांनी मारहाण करण्यात आली, नागरिकांनी त्याला रुग्णालयात नेले मात्र तोवर शिवा चा मृत्यू झाला होता.

     

    शिवा च्या पोटात चाकू खुपसणारा सेवानिवृत्त पोलीस कर्मचाऱ्यांचा मुलगा हिमांशू कुमरे होय, चाकू चा वार झाल्यावर शिवा जमिनीवर कोसळला त्यावेळी त्याला लाथा-बुक्क्यांनी मारहाण करणारे स्वप्नील काशीकर, रिजवान पठाण, चैतन्य आसकर, नाजीर खान, रोहित पितरकर, सुमित दाते अन्सार खान हे होते.

     

     

    पोलिसांनी या प्रकरणी सर्व 8 आरोपीना अटक केली आहे, हिमांशू ने शिवा ला तुझ्या वडिलांची औकात काय? 300 रुपये रोजीने जाणारा तुझा बाप असे हिनवले होते, त्या कारणावरून हे हत्याकांड घडले. Shivsena chandrapur

     

     

    मात्र ज्याप्रकारे हे हत्याकांड घडलं त्यावरून सर्व नियोजनबद्ध पध्दतीने कट रचून घटना घडविण्यात आली असा आरोप शिवा च्या कुटुंबानी केला आहे.

     

    शिवा च्या कुटुंबाची पालकमंत्री मुनगंटीवार, आमदार किशोर जोरगेवार यांनी भेट घेत आरोपीवर कठोर कारवाईचे आश्वासन दिले होते, सर्व आरोपीवर मोक्का कायद्यांतर्गत कारवाई करण्याची मागणी होत आहे.

     

    29 जानेवारीला शहरातील प्रियदर्शिनी इंदिरा गांधी चौक येथे शिवा ला सर्वपक्षीय श्रद्धांजली देण्यात आली, यावेळी आरोपीना फाशी ची शिक्षा व्हायला पाहिजे अशी मागणी करण्यात आली.

     

    घटनाक्रम काय?

    25 जानेवारीला शिवा च्या मोबाईल वर हिमांशू ने कॉल करीत त्याच्या वडीलाविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केले, आणि वाद चिघळला, शिवा याबाबत हिमांशू ला जाब विचारण्यासाठी गेला, सरकार नगर येथील शिवसेना प्रणित वाहतूक सेनेचा माजी पदाधिकारी स्वप्नील काशीकर याच्या कार्यालयासमोर वाद सुरू झाला.

     

    हिमांशु ने तब्बल 20 ते 40 युवकांचा घोळका जमवून ठेवला होता, शिवा आपल्या काही सहकाऱ्यासोबत त्याठिकाणी हिमांशू ला जाब विचारायला गेला, आधी बाचाबाची त्यांनतर शिवा ने हिमांशू च्या कानाखाली लावली आणि लगेच हिमांशू ने धारदार चाकूने शिवा वर हल्ला केला, या हल्ल्यात शिवा ठार झाला.

     

    पोलिसांनी ताबडतोब कारवाई करीत 8 आरोपीना अटक केली, मात्र पोलीस कस्टडी मध्ये असताना पोलिसांनी आपली मैत्री कायम ठेवत आरोपीना VIP ट्रीटमेंट दिली, ही बाब वरिष्ठांना कळताच त्यांनी तात्काळ काही कर्मचाऱ्यांची तडकाफडकी बदली केली.

     

    Vip ट्रीटमेंट ही आरोपीसाठी काही नवी नव्हती, याआधी स्वपिल काशीकर ने गोंडपीपरी येथील कुलथा नदीच्या घाटावर स्थानिक सरपंच व तंटामुक्त समिती अध्यक्ष सहित गावकऱ्यांना मारहाण केली होती, त्यावेळी स्वप्नील काशीकर व इतर आरोपीवर एट्रोसिटी व प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी विविध कलम दाखल झाले होते, विशेष बाब म्हणजे गोंडपीपरी चे तत्कालीन ठाणेदार यांच्याशी त्यावेळी सम्पर्क साधला असता त्यांनी सांगितले की स्वप्नील काशीकर हा फरार आहे, आम्ही त्याच्या मागावर असून लवकर तो पोलीस कस्टडी मध्ये असेल असे सांगितले होते, मात्र आरोपी काशीकर याचा मोबाईल तेव्हा सुरू होता, पण तो पोलिसांच्या हाती लागला नाही आणि सदर गंभीर गुन्ह्यात तो महिन्याभरात जामिनावर बाहेर आला होता.

     

    काशीकर याची पोलिसांसोबत चांगलीच मैत्री होती, याबाबत News34 कडे पुरावे सुद्धा उपलब्ध आहे.

    गंभीर गुन्ह्यात आरोपी सहज सुटतो, सामान्य नागरीक अश्या गुन्ह्यात अडकल्यावर त्याला आत गेल्याशिवाय पर्याय नाही, मात्र काहींचा अपवाद वगळता.

     

    जर काशीकर या गंभीर गुन्ह्यात जामिनावर बाहेर आला नसता तर आज हे हत्याकांड कदाचित घडले नसते.

    यामध्ये दोष द्यायचा कुणाला? ज्याप्रकारे आज राजकीय क्षेत्रात गुंड पक्षप्रवेश करीत आहे, त्या पद्धतीने आज संघटित गुन्हेगारी घडत आहे, भाई ने बोल दिया तो काम करना पडेगा अशी अवस्था आज तरुणाईची झाली आहे.

     

    मागचा पुढचा विचार न करता तरुणाई काहीपण करायला तयार असते ही सुरुवात काही वर्षांपूर्वी चंद्रपुरात सुरू झाली होती व आजही ती सुरूच आहे. आज शिवाच्या मारेकऱ्यावर मोक्का कायद्याअंतर्गत कारवाई व्हावी अशी मागणी सर्वपक्षीय नेत्यांनी मागणी केली मात्र या नेत्यांनी कधीतरी शहरात वाढत असलेल्या संघटित गुन्हेगारीला विरोध केला काय? यावर सामान्य नागरिकांना एकदा तरी विचार करायला हवा.

     

    शिवा च्या मारेकऱ्यांवर मोक्का अंतर्गत कारवाई करा अशी मागणी होत आहे, मात्र तो कायदा काय आहे हे आपण जाणून घेऊया…

    टाडा’ या कायद्याच्या धर्तीवर 1999 मध्ये महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी प्रतिबंधक कायदा (Maharashtra Control of Organised Crime Act) म्हणजेच ‘मोक्का’ कायदा बनवलाय.

    हा कायद्याचा वापर कधी केला जातो?

    गुन्हेगारी पार्श्वभूमी तयार करणाऱ्या आरोपीला पोलीसांकडून प्रथम समज दिली जाते. पण या संधीचा आरोपीने गैरफायदा घेतला तर तो पोलिसांच्या रेकॅार्डवर येतो. आरोपीवर अटकेची तसच नंतर तडीपारीचीही कारवाई होते. अशा आरोपींना अटक केली जाते. तरीसुद्धा आरोपीमध्ये सुधारणा न झाल्यास त्यावर तडीपारीची कारवाई केली जाते. यानंतरही आरोपीमध्ये जर सुधारणा होत नसेल तर, अशावेळी पोलीसांना मोक्का अंतर्गत कारावाई करण्याचा अधिकार देण्यात आला आहे.

     

    मोक्का कधी लावला जातो?

    गुन्हेगारी पार्श्वभूमी तयार करणाऱ्या आरोपीला पोलीसांकडून प्रथम समज दिली जाते. पण या संधीचा आरोपीने गैरफायदा घेतला तर तो पोलिसांच्या रेकॅार्डवर येतो. आरोपीवर अटकेची तसच नंतर तडीपारीचीही कारवाई होते. अशा आरोपींना अटक केली जाते. तरीसुद्धा आरोपीमध्ये सुधारणा न झाल्यास त्यावर तडीपारीची कारवाई केली जाते. यानंतरही आरोपीमध्ये जर सुधारणा होत नसेल तर, अशावेळी पोलीसांना मोक्का अंतर्गत कारावाई करण्याचा अधिकार देण्यात आला आहे.

    कोणावर मोक्काची कारवाई होते ?

    हफ्ता वसुली, खंडणीसाठी अपहार, सुपारी देणे, खून, खंडणी, अंमली पदार्थांची तस्करी यांच्यासारखे संघटीत गुन्हे करणाऱ्या टोळ्यांवर मोक्का लावला जातो. मोक्का लावण्यासाठी गु्न्हेगारांची दोन किंवा अधिक लोकांची टोळी असावी लागते. टोळीतील एकट्या गुन्हेगाराने किंवा टोळीतील अनेकांनी गुन्हा केलेला असावा लागतो. तसंच अटक केलेल्या आरोपींपैकी एकावर गेल्या 10 वर्षात दोन गुन्ह्यात आरोपपत्र सादर झालेलं असणं बंधनकारक आहे. पोलीसांना आरोपपत्र सादर करण्यासाठी सहा महिन्यांची मुदत वाढवून मिळते. या काद्यान्वये गुन्हेगाराला लवकर जामीन नसल्यामुळे अनेक गुंड वर्षानुवर्षे तुरुंगात राहतात आणि त्यामुळे त्यांची सुटका होईपर्यंत त्यांची संघटित टोळी मोडकळीस आलेली असते.

    मर्डर, खंडणी, 307, दरोडा, खंडणीचा प्रयत्न, घुसखोरी आणि तत्सम गुन्हे करणाऱ्या गुन्हेगारांचा मागील दहा वर्षाचा इतिहास असणे कारवाईसाठी अवश्यक आहे. ज्यात दोन किंवा दोनपेक्षा अधिक गुन्हे दाखल असणे आणि पूर्वी तीन किंवा त्याहून जास्त शिक्षा झालेली असणे. अशा गुन्हेगारांवर मोक्काअंतर्गत कारवाई होऊ शकते. त्याचबरोबर जे गुन्हेगार आणि गुन्हेगारी टोळ्या ज्यांचा हिंसाचार, आर्थिक फायद्यासाठी जे गुन्हा करतात अशा गुन्हेगारांवरती महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी प्रतिबंधक कायद्याअंतर्गत कारवाई केली जाते.

    शिक्षा काय?

    मोक्का लागल्यास आरोपीला अटकपूर्व जामीन मिळवता येत नाही. भारतीय दंड विदान संहीतेच्या लावलेल्या कलमांखाली जेवढी शिक्षा असेल तीच सिक्षा मोक्काच्या कलम 3 (1) नुसार देता येईल. ही सिक्षा किमान 5 वर्षे ते जन्मठेपेपर्यंत राहते. त्याचबरोबर किमान दंड हा पाच लाखांपर्यांतचा असतो. तसंच दोषींची मालमत्ता जप्त करण्याचीही तरतूद या कायद्यात आहे. संघटीत गुन्हेगारी करुन जर आर्थिक फायदा घेतला जात असेल कींवा टोळी तयार करुन जर गुन्हेगरी करत असाल तर त्या संदर्भात मोक्काची तरतूद केली आहे.

  • Shiva Wazarkar Murder : शिवा वझरकर च्या मारेकऱ्यांवर मोक्का लावा – सर्वपक्षीय नेत्यांची मागणी

    Shiva Wazarkar Murder : शिवा वझरकर च्या मारेकऱ्यांवर मोक्का लावा – सर्वपक्षीय नेत्यांची मागणी

    News34 chandrapur

    चंद्रपूर – 25 जानेवारीला शहरातील सरकारनगर भागात ठाकरे गटाचे युवासेना शहर प्रमुख शिवा वझरकर यांची धारदार शस्त्राने निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती. पोलिसांनी या प्रकरणात 8 आरोपीना अटक केली होती.

     

    त्यानंतर शहरात तणावाची स्थिती निर्माण झाली, पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी 28 जानेवारीला वझरकर कुटुंबाची भेट घेतली होती, त्यावेळी वझरकर कुटुंबानी आरोपीवर मोक्का लावण्याची मागणी केली, यावर पालकमंत्री मुनगंटीवार यांनी पोलीस प्रशासनाला उचित कारवाई करण्याचे निर्देश दिले होते.

     

    आज प्रियदर्शिनी इंदिरा गांधी चौकात स्व.शिवा वझरकर याना सर्वपक्षीय श्रद्धांजली देण्यात आले, हजारो युवकांनी यावेळी शिवाच्या प्रतिमेसमोर मेणबत्ती पेटवत श्रद्धांजली दिली.

     

    यावेळी ठाकरे गटाचे शिवसेना जिल्हाप्रमुख संदीप गिर्हे यांनी माहिती दिली की आरोपीवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली नाही तर आम्ही अधिक तीव्र आंदोलन करणार, आज आम्ही शांत पध्दतीने आंदोलन करीत आहो जर प्रशासनाने आमच्या मागणीवर दुर्लक्ष केले तर आम्ही चंद्रपूर जिल्हा बंद पाडू असा इशारा गिर्हे यांनी यावेळी दिला.

     

     

    आयोजित श्रद्धांजली कार्यक्रमात अजित पवार गटाचे राष्ट्रवादी कांग्रेस जिल्हाध्यक्ष नितीन भटारकर, युवासेना जिल्हाप्रमुख विक्रांत सहारे, कांग्रेस इंटक जिल्हाध्यक्ष प्रशांत भारती, शिंदे गट शिवसेना महिला जिल्हाप्रमुख प्रतिमा ठाकूर, महानगरप्रमुख भरत गुप्ता आदींची उपस्थिती होती.

  • थांब तुझा गेम करतो, आणि उलट त्याचाचं झाला गेम

    थांब तुझा गेम करतो, आणि उलट त्याचाचं झाला गेम

    News34 chandrapur

    चंद्रपूर/बल्लारपूर – क्षुल्लक वाद हा कधी मोठ्या गुन्ह्याचं कारण ठरणार हे सांगता येत नाही मात्र चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील विसापूर येथे असाच एक जुना वाद उफाळला आणि त्या वादात एकाची हत्या झाली.

     

    23 जानेवारीला विसापूर येथील 40 वर्षीय सचिन वंगणे याची अज्ञात इसमाने धारदार शस्त्राने पोटावर वार करीत हत्या करण्यात केली, याबाबत मृतकाच्या भावाने बल्लारपूर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली, बल्लारपूर पोलिसांनी कलम 302, 452 अंतर्गत गुन्हा दाखल केला.

     

    सदर प्रकरणी पोलीस अधीक्षक रविंद्र परदेशी यांनी गुन्ह्याची गंभीरता बघता तात्काळ हत्या प्रकरणाचा उलगडा करण्याचे आदेश दिले, बल्लारपूर पोलीस व चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेने संयुक्त तपास करीत 2 पथक तयार केले. सचिन ची हत्या करणारा त्याचा शेजारी 37 वर्षीय विठ्ठल उर्फ डेंनी डबरे निघाला. पोलिसांनी त्याला 24 तासाच्या आत अटक केली.

     

    प्रकरण नेमकं काय होत?

     

    सचिन व विठ्ठल यामध्ये जुना वाद होता, जेव्हा जेव्हा मृतक सचिन ला विठ्ठल दिसायचा त्यावेळी थांब तुझा गेम करतो अशी धमकी सचिन हा विठ्ठल ला द्यायचा, असं अनेकदा घडले, घटनेच्या दिवशी सुद्धा सचिन याने विठ्ठल ला धमकी देत तू इथेच थांब आज तुझा गेम करतो अशी धमकी देत घरून चाकू आणला, दोघांचा वाद झाला त्यानंतर विठ्ठल ने त्या चाकूने उलट सचिन वर वार केला, यामध्ये सचिन याचा जागीच मृत्यू झाला.

     

    असा मिळाला आरोपी

    सचिन ची हत्या केल्यावर आरोपी विठ्ठल ने पळ काढला नाही तो निवांत घरी होता, गावात अनेकांना माहीत होतं की विठ्ठल आणि सचिन या दोघांचा वाद सुरू होता, मात्र त्यावर कुणी बोलायला तयार नव्हते, विशेष म्हणजे पोलिसांनी विठठल ला संदेहाच्या आधारे चौकशीसाठी बोलावले होते, स्थानिक गुन्हे शाखा व बल्लारपूर पोलिसांच्या पथकाने गोपनीय माहिती काढत या खुनाचा उलगडा केला.

     

    सदरची कारवाई पोलीस अधीक्षक रवींद्र परदेशी, अप्पर पोलीस अधीक्षक रिना जनबंधु, उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली बल्लारपूर पोलीस निरीक्षक उमेश पाटील, स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक महेश कोंडावार, सपोनि रमेश तळी, सपोनि विकास गायकवाड, सपोनि प्राची राजूरकर, पोउपनी वर्षा नैताम, रणविजय ठाकूर, यशवंत कुमरे, बाबा नैताम, संतोष दांडेवार, अनुप डांगे, मिलिंद चव्हाण, जमिर पठाण, नितेश महात्मे, श्रीनिवास वाभीटकर, प्रसनजीत डोरलीकर, प्रकाश मडावी व प्रसाद धुलगंडे यांनी केली.

     

  • विजयादशमीला चंद्रपुरात हत्या

    News34 chandrapur

    चंद्रपूर – विजयादशमीला चंद्रपुरातील नगीनाबाग मध्ये पत्नीने पतीची हत्या केल्याची घटना उघडकीस आली. रामनगर पोलिसांनी हत्याकांडात 3 आरोपीना अटक केली आहे.

    नगिना बाग प्रभागात राहणारे 52 वर्षीय नीलकंठ चौधरी असे मृतकाचे नाव आहे, आरोपी मध्ये मृतकाची पत्नी, मुलगी व मेव्हण्याचा समावेश आहे.

     

    विजयादशमी ला सकाळी 8 वाजता मंगला चौधरी यांना भेटण्यासाठी त्यांचा भाऊ विलास लटारु शेंडे रा. सुशी दाबगाव तालुका मूल वरून आला होता, घरी आल्यावर नीलकंठ चौधरी यांनी विलास ला अश्लील शब्दात शिवीगाळी करीत भांडण सुरू केले, वाद वाढत गेला, वादाचे रूपांतर हाणामारीत झाले.

    त्यावेळी मुलगी शिल्पा ने लोखंडी रॉड व मंगला यांनी बांबू ने नीलकंठ यांच्या डोक्यावर वार केला, ही नेहमीची कटकट आहे, याला मारून टाका असे उदगार विलास ने काढले असता नीलकंठ चा जबर मारहाणीत मृत्यू झाला.

     

    याबाबत रामनगर पोलिसांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत आरोपीला अटक केली.

    यावेळी तपास अधिकारी स्वप्नील गोपाले यांनी माहिती दिली की मृतक नीलकंठ मजुरीचे काम करायचा, त्याला दारूचे व्यसन असल्याने तो नेहमी कुटुंबासोबत भांडण व पत्नी मंगला ला मारहाण करायचा, पत्नी कडील नातेवाईक घरी आले की त्यांना नीलकंठ हाकलून लावायचा, या नित्याच्या त्रासाला कंटाळून पत्नी, मुलगी व मेव्हण्याने नीलकंठ ची हत्या केली.

    याबाबत तिघांवर कलम 302 अंतर्गत गुन्हा दाखल करीत अटक करण्यात आली असून पुढील तपास रामनगर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक स्वप्नील गोपाले करीत आहे.