Tag: घरकुल योजना

  • Chandrapur free sand scheme news । घरकुल स्वप्न आता होणार साकार; चंद्रपूरमध्ये मोफत रेतीचे वितरण सुरू

    Chandrapur free sand scheme news

    Chandrapur free sand scheme news : चंद्रपूर – राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात राज्य सरकारने अनेक जनहिताचे निर्णय घेतले आहेत. या निर्णयांचा थेट लाभ सर्वसामान्य नागरिकांना मिळत आहे. राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी घरकुलासाठी शासन मोफत रेती देणार असल्याची घोषणा केली होती. आज ती घोषणा प्रत्यक्षात आली असून चंद्रपूर शहरातून याची सुरुवात होत असल्याचा आनंद आहे. शासनाच्या या निर्णयामुळे अनेक गरजू आणि गरीब कुटुंबांना आपले हक्काचे घर उभारताना मोठा दिलासा मिळणार आहे. सर्वसामान्य नागरिक हा शासनाच्या प्रत्येक योजनेचा केंद्रबिंदू आहे, असे आमदार किशोर जोरगेवार यांनी सांगितले.

    भावी वधूसमोर घेतला गळफास, चिमूर तालुका हादरला

    महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी घरकुलाच्या कामासाठी शासनातर्फे मोफत रेती उपलब्ध करून देण्यात येईल असे जाहीर केले होते. त्या पार्श्वभूमीवर चंद्रपूर शहरातून या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली आहे. आमदार किशोर जोरगेवार यांच्या उपस्थितीत वढा रेती घाटावरून लाभार्थ्यांना रेती वितरित करण्यात आली. एका लाभार्थ्याला पाच ब्रास प्रमाणे रेती दिली जात आहे. या कार्यक्रमात आमदार जोरगेवार यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून रेतीचे ट्रॅक्टर रवाना करण्यात आले. या प्रसंगी लाभार्थी नागरिकांना रेतीच्या टीपी चे ही वितरण करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. sand supply for government housing project

    sand supply for government housing project

    कार्यक्रमास महसूल विभागाचे उपविभागीय अधिकारी संजय पवार, तहसीलदार विजय पवार, नायब तहसीलदार खंडारे, संवर्ग विकास अधिकारी संगीता भांगडे, मंडळ अधिकारी प्रकाश दुर्वे, भाजप नेते प्रकाश देवतळे, वढा गावचे सरपंच किशोर वराडकर, माजी नगरसेवक सुभाष कासनगोट्टूवार, मनोज पाल, राकेश पिंपळकर, धनंजय नागरकर, खुटाळा येथील माजी उपसरपंच गुड्डू सिंग, धनराज हनुमंते, समीर भिवापूर यांची उपस्थिती होती. free sand for housing beneficiaries Maharashtra

    माझ्यासह अनेक आमदारांनी लक्ष वेधले

    या प्रसंगी बोलताना आमदार जोरगेवार म्हणाले की, घरकुलाचे अनुदान मिळाल्यानंतरही अनेक लाभार्थ्यांना बांधकाम साहित्याच्या वाढत्या किमतीमुळे अडचणी येतात. ही अडचण लक्षात घेऊन शासनाने मोफत रेती देण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या रेती घाटांचे लिलाव थांबलेले असल्याने घरकुल मंजूर होऊनही घराचे बांधकाम रखडले होते. त्यामुळे माझ्यासह अनेक आमदारांनी शासनाचे लक्ष वेधले होते. शासनाच्या या निर्णयामुळे अनेक कुटुंबांना दिलासा मिळणार आहे.

    Powered by myUpchar

    आजच्या कार्यक्रमात प्रत्येक लाभार्थ्याला पाच ब्रास प्रमाणे रेती दिली जात आहे. ही रेती शासनाच्या नियमानुसार आणि पारदर्शक पद्धतीने घाटावरून मोफत दिली जात आहे. या उपक्रमामुळे लाभार्थ्यांचा खर्च कमी होणार असून गरजू नागरिकांना मोठा आधार मिळणार आहे. शासनाची ही कृती म्हणजे गरजूंना मदतीचा हात देण्याचा एक चांगला उपक्रम आहे. आजचा दिवस चंद्रपूर जिल्ह्यासाठी महत्त्वाचा असून शासनाच्या घरकुल योजनेतून आपले घर उभारण्याचे स्वप्न पाहणाऱ्या अनेक कुटुंबांसाठी ही मोठी संधी आहे. free sand for housing beneficiaries Maharashtra

    ‘घरकुल योजना’ फक्त एका घरापुरती मर्यादित नाही, तर ती कुटुंबाचे भविष्य घडवते. स्वतःचे घर म्हणजे स्वाभिमान, सुरक्षितता आणि स्थैर्याचे प्रतीक आहे. घरकुल म्हणजे चार भिंती नव्हे, तर संपूर्ण कुटुंबाची स्वप्नपूर्ती आहे. त्यामुळे हे घर उभे राहण्यासाठी शासनाने आपली साथ देणे ही जबाबदारी आहे. शासन गरजूंच्या पाठीशी ठामपणे उभे आहे. असे यावेळी आमदार किशोर जोरगेवार म्हणाले. या उपक्रमाअंतर्गत चंद्रपूर तालुक्यातील १,१८३ लाभार्थ्यांना आठ रेती घाटांवरून एकूण ५,९१५ ब्राज  रेती दिली जाणार आहे. Chandrapur free sand scheme news

  • Gharkul Yojana subsidy update । घरकुल अनुदानात ५०,००० रुपयांची वाढ – सामान्य जनतेसाठी दिलासा!

    Gharkul Yojana subsidy update

    Gharkul Yojana subsidy update : सर्वांसाठी घरे या केंद्र सरकारच्या योजनेतून घरकुलाच्या लाभार्थ्यांना केंद्र व राज्य सरकार च्या माध्यमातून मिळणारे अनुदान अत्यल्प असल्याचे खासदार धानोरकर यांनी आमदार असतांना तसेच, लोकसभेत देखील मत व्यक्त केले होते.

    तर कामगारांना उष्माघाताचा धोका? हे उपाय एकदा वाचा

    घरकुलाच्या अनुदानात वाढ करण्याची मागणी त्यांनी विधानसभा तथा लोकसभेत केली होती. घरकुल अनुदानाच्या निधी वाढी संदर्भात त्यांच्या मागणीला यश प्राप्त झाले असून महाराष्ट्र राज्याच्या ग्राम विकास मंत्रालयाने या संदर्भात दि. 04 एप्रिल रोजी शासन निर्णय प्रसिध्द करुन समोरील टप्प्यातील घरकुलांना 50 हजार रुपये वाढीव निधी मंजुर केला आहे. Maharashtra PMAY-G subsidy increase

    या पैकी 35 हजार रुपये बांधकामाकरीता तर, 15 हजार रुपये हे सौर उर्जा यंत्र उभारणी करीता प्राप्त होणार आहे. खासदार धानोरकर यांनी या संदर्भात केंद्र व राज्य सरकारचे आभार मानले असून परंतु, सध्याची महागाई बघता 5 लक्ष रुपये एवढे अनुदान द्यावे असे देखिल मत व्यक्त केले.

    भविष्यात यासंदर्भात आपली मागणी रेटून धरण्याचे देखील सांगितले. खासदार धानोरकर यांच्या मागणीच्या यशामुळे सामान्य नागरीकांना थोड्याफार प्रमाणात का होइना, याचा फायदा होणार आहे. भविष्या या संदर्भात आपण घरकुल निधी वाढीची मागणी केंद्र सरकार कडे रेटून धरणार असल्याचे सांगितले.

  • Gharkul : विरोधीपक्ष नेते वडेट्टीवार यांच्या हस्ते 462 घरकूल लाभार्थ्यांना प्रमाणपत्राचे वितरण

    Gharkul : विरोधीपक्ष नेते वडेट्टीवार यांच्या हस्ते 462 घरकूल लाभार्थ्यांना प्रमाणपत्राचे वितरण

    Gharkul महान संत वाल्मीक ऋषी यांचा वारसा लाभलेल्या भोई समाजाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी तथा समाजातील विमुक्त जाती व भटक्या जमाती प्रवर्गातील दुर्बल घटक यांची अतिशय हलाखीची परिस्थिती व जिवनमान बघून यांचेकरिता महाविकास आघाडी सरकार काळात या खात्याचा मंत्री असतांना यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना कार्यान्वित केली. आज एकट्या ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्रात हजारोंच्या संख्येने लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळाला. ज्या थोर वाल्मीक ऋषींनी आपल्या रामायणातून संपूर्ण जगाला प्रभू रामचंद्र यांचे दर्शन घडवून दिले. अशा प्रामाणिक समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी आपण सर्वतोपरी सदैव प्रयत्न करणार असे प्रतिपादन राज्याचे विरोधी पक्षनेते तथा ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्र आमदार विजय वडेट्टीवार यांनी केले. ते ब्रम्हपुरी येथे आयोजित यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना अंतर्गत मंजूर घरकुल लाभार्थ्यांना प्रमाणपत्राचे वितरण कार्यक्रमात अध्यक्ष म्हणुन बोलत होते.

    योजना : माझी लाडकी बहीण योजनेचे 23 हजार अर्ज नामंजूर

    Gharkul यावेळी प्रामुख्याने मंचावर तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खेमराज तिडके, बाजार समितीचे सभापती प्रभाकर सेलोकर, माजी जि.प.सदस्य डॉ.राजेश कांबळे, जिल्हा काॅंग्रेस सचिव विलास विखार, शहर काँग्रेस अध्यक्ष हितेंद्र राऊत, माजी जि.प. सदस्या स्मिता पारधी, माजी पं.स.सदस्य थानेश्वर कायरकर, पं.स.गटविकास अधिकारी रवींद्र घुबडे, भोई समाज नेते डॉ. दिलीप शिवरकर, सीडीसीसी बॅक उपाध्यक्ष यशवंत दिघोरे, जिल्हा काॅग्रेस उपाध्यक्ष मोंटु पिलारे, युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सोनू नाकतोडे, माजी नगरसेवक डॉ. नितीन उराडे, महीला काँग्रेसच्या तालुकाध्यक्ष मंगला लोनबले, महीला काँग्रेसच्या शहराध्यक्षा योगिता आमले, कृउबा संचालक ब्रम्हदेव दिघोरे, भोई समाज नेते दिनानाथ वाघमारे, तालुका काँग्रेस उपाध्यक्ष नामदेव लांजेवार, काॅंग्रेसचे ज्येष्ठ नेते नानाजी तुपट, मिलींद भन्नारे, सुधीर शिवरकर, प्रामुख्याने उपस्थित होते.

    Gharkul पुढे बोलतांना विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार म्हणाले की, सिंदेवाही शहरातील मेश्राम कुटुंबाची व्यथा बघितल्यानंतर विमुक्त भटक्या जाती व जमातींकरिता विकास योजना आणण्याचा मी संकल्प केला. तर महाविकास आघाडी सरकार काळात मंत्री झाल्यानंतर यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना कार्यान्वित करून हजारोंच्या संख्येने राज्यातील लाभार्थ्यांना स्वप्नातील हक्काची घरे दिली. तर संपूर्ण राज्याच्या तुलनेत ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्रात ६३८१ कुटुंबांना या योजनेचा लाभ मिळालेला असून पुढील काळात एकही कुटुंब घरकुला पासून वंचित राहणार नाही. सोबतच ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्रात गोसेखुर्दचे आणि शेतीसाठी उपलब्ध करून देऊन या क्षेत्रात शेती समृद्ध क्रांती घडविली. मानवतेचे प्रेम हे सर्वश्रेष्ठ असून माणुसकी हीच जात सर्वात मोठी आहे. म्हणूनच मी मानव सेवेसाठी सदैव अग्रेसर राहून जनतेसाठी हिरीरीने काम करतो असेही ते यावेळी म्हणाले. तसेच इतर घरकुल योजनांमार्फत अनेक लाभार्थ्यांना देखील घरकुले मंजूर करून दिली. येत्या काळात आमची सत्ता येताच महागाईचा विचार करून घरकुलाच्या निधीत दुपटीने वाढ करत ३ लक्ष रुपये करू असे अभिवचन त्यांनी यावेळी उपस्थितांना दिले. यानंतर ब्रम्हपुरी तालुक्यातील एकूण  ४६२ घरकुल लाभार्थ्यांना मंजुरीचे प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राहूल मैंद ,तर प्रस्ताविक सुधीर शिवरकर यांनी केले. आयोजित कार्यक्रमास तालुका काँग्रेस कमिटी सर्व सेल पदाधिकारी,  ग्राम काँग्रेस कमिटी अध्यक्ष, ग्राम पातळीवरील सर्व सरपंच, ग्रामपंचायत पदाधिकारी, काँग्रेस कार्यकर्ते व हजारोंच्या संख्येने घरकुल लाभार्थी व नागरिक उपस्थित होते.

  • ज्यांचे मोठे घर त्यानाचं मिळाले घरकुल

    ज्यांचे मोठे घर त्यानाचं मिळाले घरकुल

    News34 chandrapur

    गुरू गुरनुले 

    मुल – केंद्र सरकार गरीब व गरजु लोकांना नमो घरकुल योजनेचा लाभ मिळावा यासाठी प्रयत्न करीत असताना माञ गावातील सरपंच यांनी चक्क नातेवाईक व धनधांडग्याना लाभ देण्याचा प्रयत्न चालविला असल्याचा आरोप सिंतळा येथील जनतेनी केला आहे.

     

    पंचायत समिती मूल अंतर्गत येणाऱ्या सिंतळा येथील गरीब व गरजू लोकांना नमो घरकुल योजनेचा लाभ मिळावा यासाठी अनेक पात्र असलेल्यानी प्रयत्न केला मात्र गेल्या अनेक वर्षांपासून सरपंच आपली मनमानी कारभार करून पात्र असलेल्या अनेकांना डावलून आपल्या नातेवाईक व आर्थिक दृष्टया सक्षम असेलल्या लोकांना घरकुल योजनेचा लाभ देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. गावात होणारी ग्रामसभा नाममात्र घेवुन कुठल्याही आपल्या मर्जीतील लाभ दिला जात आहे.

     

    त्यामुळे अनेक जण घरकुल योजनेपासुन वंचित होताना दिसत आहेत.तरी देखील तहकुब झालेल्या ग्रामसभेत सरपंच, सचिव व सदस्यांनी नमो घरकुल योजनेच्या यादीत हेराफेरी करून स्वतःच्या मर्जीतील लोकांचे नाव समाविष्ट केल्याचा आरोप ग्रामस्थांनानी केला आहे. गावात अनेक जणांचे पडके घरे असताना वेळोवेळी डावलण्याचा प्रयत्न सुरु आहे.

     

    याबाबत चौकशी करून खऱ्या लाभार्थीना घरकुल योजनेचा लाभ मिळवुन देण्याचा प्रयत्न करावा अशी आर्त हाक पंचायत समिती मूल चे गट विकास अधिकारी यांना दिलेल्या निवेदनातुन देण्यात आली असून या प्रकरणाची त्वरित चौकशी करावी अशी मागणी कांग्रेस नेते सी.डी.सी.सी बँकेचे अध्यक्ष संतोष शिंह रावत यांचे मार्गदर्शनात तालुका काँग्रेसचे माजी अध्यक्ष व बाजार समिती संचालक घनश्याम येनुरकर, तालुका अध्यक्ष गुरु गुरनुले, माजी सरपंच जनार्दन भूरसे, व गावातील अन्याय ग्रस्त नागरिक उपस्थित होते.

  • सावली तालुक्यातील 23 गावातील 873 नागरिकांच्या घरकुलाची स्वप्नपूर्ती होणार

    सावली तालुक्यातील 23 गावातील 873 नागरिकांच्या घरकुलाची स्वप्नपूर्ती होणार

    News34 chandrapur

    चंद्रपूर – महाविकास आघाडी सरकार काळात राज्याचे विद्यमान विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार हे इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे मंत्री असताना राज्यातील विमुक्त जाती व भटक्या जमाती दुर्बल घटकांसाठी यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत घरकुल योजना अमलात आणली. यामुळे मागासवर्गातील अनेक नागरिकांच्या घरकुलाचे स्वप्न पूर्ण झाले. मात्र अल्पावधीतच सरकार गेल्याने ब्रह्मपुरी मतदार संघातील सावली तालुक्यातील बहुतांश नागरिकांची घरकुलांची मागणी प्रलंबित होती. ही मागणी शासन दरबारी रेटून धरल्याने अखेर राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या प्रयत्नांचे फलित झाले असून सावली तालुक्यातील 23 गावातील 873 नागरिकांच्या घरकुलाचे स्वप्न पूर्ण होणार आहे.

     

    राज्यात विविध समाजासाठी समाजवार पद्धतीने घरकुल योजनांची शासनाने आखणी केली आहे. मात्र विमुक्त जाती व भटक्या जमाती या दुर्बल घटकांसाठी कुठलीही योजना महाविकास आघाडी सरकार स्थापनेपूर्वी कार्यरत नव्हती. या प्रवर्गासाठी राज्याचे तत्कालीन कॅबिनेट मंत्री तथा इतर मागास बहुजन कल्याण विभाग मंत्री तथा विद्यमान महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी आपल्या विकासात्मक दूरदृष्टी कोणातून विमुक्त जाती व भटक्या जमाती या प्रवर्गाला विकासाचे मुख्य प्रवाहात आणण्या हेतू व समाजातील गोरगरीब जनतेला हक्काचे घर मिळावे याकरिता यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना कार्यान्वित केली. या योजनेअंतर्गत पहिल्याच टप्प्यात ब्रह्मपुरी मतदार संघात जवळपास 3 हजार घरकुले मंजूर करण्यात आली. मात्र अडीच वर्षाचा काल लोटताच सरकार बदलले आणि अनेक लाभार्थ्यांना या योजनेपासून वंचित रहावे लागले.

     

    नागरिकांच्या मागणीचा विचार लक्षात घेत वंचित लाभार्थ्यांना न्याय मिळवून देणे हेतू विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी स्वस्त न बसता वारंवार शासन दरबारी मागणी रेटून धरल्याने अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश आले असून सावली तालुक्यातील कापसी, जिबगाव, लोंढोली, चांदली (बुज) बोरमाळा चीज बोडी हिरापूर उसेगाव पारडी कवटी चीचबोडी ,साखरी, घोडेवाही, चक पिरंजी, अंतरगाव चिंचोली, तांबेगडी मेंढा, सामदा ,मोखाडा खेडी, थेरगाव, बेलगाव, व्याहाड (बुज) या 23 गावातील लाभार्थ्यांना यशवंतराव चव्हाण घरकुल योजनेचा लाभ मिळणार असून त्यांच्या हक्काच्या घरकुलाचे स्वप्न पूर्ण होणार आहेत. राज्याचे विरोधी पक्षनेते तथा ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्र आमदार विजय वडेट्टीवार यांची शासन दरबारी धडपड व सावली तालुका काँग्रेस अध्यक्ष नितीन गोहने यांनी वेळोवेळी केलेला पाठपुरावा तसेच उपरोक्त लाभ घेणाऱ्या गावातील सरपंच ,ग्रामपंचायत सदस्य व काँग्रेस कार्यकर्ते यांनी घेतलेली मेहनत हे या यशाचे फलित असून सावली तालुक्यातील 873 लाभार्थ्यांना लवकरच घरकुल योजनेचा लाभ मिळणार असल्याने लाभार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.

  • चंद्रपूर मनपाच्या चांदा सिटी हेल्पलाईन वर तक्रारीचा डोंगर

    News34 chandrapur

    चंद्रपूर   – चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे मागील वर्षी करण्यात आलेल्या चांदा सिटी हेल्पलाईन ॲप तक्रार निवारण कार्यप्रणालीस उत्तम प्रतिसाद मिळाला असुन सदर ॲपवर आतापर्यंत विविध विषयांच्या ४१७२ तक्रारी प्राप्त झाल्या असुन यापैकी ४१५० तक्रारींचे निवारण करण्यात आले आहे.

     

    चंद्रपूर महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक विपीन पालीवाल यांनी पालिकेची सुत्रे हाती घेतल्यापासुन मनपाद्वारे देण्यात येणाऱ्या सेवा लोकभिमुख होण्याकडे लक्ष केंद्रित केले आहे. यापुर्वी नागरीकांच्या तक्रारी या पत्र स्वरूपात किंवा लोकप्रतिनिधींच्या माध्यमातुन प्रशासनास प्राप्त व्हायच्या व त्याचे निराकरण व्हावयास ही वेळ लागायचा. मात्र प्रशासनाचे कामकाज गतिमान व्हावे या दृष्टीने आयुक्तांच्या संकल्पनेतुन २५ ऑक्टोबर रोजी चांदा सिटी हेल्पलाईन ॲपची सुरवात करण्यात आली होती.

     

    या कार्यप्रणालीनुसार इंटरनेटच्या गुगल प्ले स्टोअरमधून चांदा सिटी हेल्पलाईन हे ॲप डाउनलोड केल्यानंतर किंवा टोल फ्री क्रमांक १८००-१२३-७९८० येथे संपर्क करून व ८५३०००६०६३ या व्हॉट्स ॲप क्रमांकावर तक्रार करता येते. तक्रारीत संबंधित परिसर, विभाग, तक्रार पाठवणाऱ्याचे नाव, मोबाइल नंबर, पत्ता, तक्रारीचे स्वरूप लिहून पाठवावे लागते. याच तक्रारीत गरज भासल्यास संबंधित तक्रारीचा फोटोही अपलोड करता येतो. चांदा सिटी हेल्पलाईन ॲपचे नाव व संपर्क क्रमांकांची प्रसिद्धी एसएमएस,फोन कॉल, ऑटो मायकिंग, सोशल मीडिया व इतर प्रसिद्धीमाध्यमांद्वारे मोठ्या प्रमाणात करून ज्यास्तीत ज्यास्त नागरीकांपर्यंत हे क्रमांक पोचविण्यात आले आहे.
    या ॲपवर स्वच्छता,समाज कल्याण -दिव्यांग,महिला व बालकल्याण,रमाई आवास योजना, प्रधानमंत्री आवास योजना, NULM, विद्युत व दिवाबत्ती, रेन वॉटर हार्वेस्टिंग, मोकाट जनावरे, बांधकाम,नगर रचना बिल्डींग परवाना, पाणी पुरवठा, कर, उद्यान, अवैध बांधकाम, अमृत योजना, अवैध होर्डिंग, अतिक्रमण, अग्निशमन व इतर नागरी सुविधांच्या दृष्टीने नागरीकांना तक्रार करता येते.तक्रार प्राप्त झाल्यानंतर ४८ तासांच्या आता निराकरण करण्याची जबाबदारी संबंधित विभागीय अधिकारी व संबंधित विभागप्रमुख यांच्यावर सोपविण्यात आली आहे.

     

    अधिकारी स्तरावर तक्रार निश्चित दिवसात मार्गी लागली नाही तर हीच तक्रार पुढे टप्प्याटप्प्याने वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे वर्ग होते. तक्रारींचे निराकरण कितपत झाले किंवा पेंडंसी आहे का ? याचा आढावा आयुक्तांद्वारे नियमित घेतला जात असल्याने संबंधित तक्रारी त्वरेने निकाली काढल्या जात आहेत.मनपाद्वारे देण्यात येणाऱ्या नागरी सुविधांबाबत कुठलीही तक्रार असल्यास चांदा सिटी हेल्पलाईन ॲपचा वापर करण्याचे आवाहन चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे करण्यात येत आहे.