Tag: घंटागाडी कामगार

  • sanitation workers rights violation Chandrapur । कामगार रडतायत… व्यवस्था मौन!, घंटागाडी कामगारांचा आक्रोश, आप’ उतरली मैदानात!

    sanitation workers rights violation Chandrapur

    sanitation workers rights violation Chandrapur : १० जुलै चंद्रपूर – चंद्रपूर : शहराच्या स्वच्छतेसाठी महानगरपालिकेच्या वतीने कचरा संकलनाचे काम अर्बन एन्व्हायरो मॅनेजमेंट या खाजगी संस्थेला सोपविण्यात आले आहे. या अंतर्गत अनेक वर्षे प्रामाणिक सेवा करणाऱ्या घंटागाडी कामगारांना अलीकडे कोणतीही पूर्वसूचना न देता आणि कोणतेही स्पष्ट कारण न देता कामावरून कमी करण्यात आले आहे. ही बाब केवळ अन्यायकारकच नव्हे, तर मानवी हक्कांच्या विरोधात आहे.

    पाणी कराची वसुली करण्यासाठी चंद्रपुरात येणार वॉर्ड सखी

    असे असताना कंपनी व्यवस्थापकांकडून कामगारांशी सातत्याने गैरवर्तन, मेडिकल सुट्टी नाकारणे, कामाच्या सुरक्षिततेची कोणतीही हमी न देणे यासारख्या गंभीर तक्रारी समोर येत आहेत. यामुळे कामगारांमध्ये अस्वस्थता, असुरक्षितता आणि असंतोष वाढत चालला आहे. Chandrapur municipal contract worker dispute

    या अन्यायाविरोधात आज आम आदमी पार्टी चंद्रपूरच्या वतीने मा. महानगरपालिका आयुक्त व कामगार सहायक आयुक्त चंद्रपूर यांना निवेदन देण्यात आले.

    या निवेदनात खालील ठाम मागण्या करण्यात आल्या:

    🔹 अन्यायाने कामावरून कमी केलेल्या कामगारांची तात्काळ चौकशी करण्यात यावी.

    🔹 पीडित कामगारांना १५ दिवसांच्या आत पुन्हा सेवेत बहाल करण्यात यावे.

    🔹 कंपनीच्या मनमानी कारभारावर महानगरपालिकेने लक्ष घालावे.

    🔹 कामगारांना त्यांच्या हक्काचे संरक्षण मिळावे.

    जर वरील मागण्या मान्य झाल्या नाहीत, तर आम आदमी पार्टीच्या वतीने घंटागाडी कामगार आणि त्यांच्या कुटुंबियांना सोबत घेऊन तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा यावेळी देण्यात आला.

  • आयुक्तांनी शब्द पाळला नाही, डेड लाईन संपली

    News34 chandrapur

    चंद्रपूर : शहरातील महानगरपालिका मध्ये घंटागाडी स्वच्छता कर्मचारी म्हणुन कार्यरत कंत्राटी कामगारांना सुरू झालेले वाढीव वेतन कंत्राटदार बदलताच वेतन कमी करन्यात आल्याने कामगारांनी याचा तीव्र रोष व्यक्त करत धम्मचक्र अनुप्रवर्तन दिनाच्या तोंडावर काम बंद आंदोलन सुरू केले होते.

     

    ज्यामध्ये शासनाच्या नियमानुसार किमान वेतन तसेच कामगारांच्या सुरक्षा संदर्भात विविध विषयांना घेऊन आंदोलन केले गेले. सदर आंदोलन वेळीं मनपाचे आयुक्त यांनी कामगार सहायक आयुक्त यांच्या सूचनेवरून कामगारांच्या मागण्या लेखी स्वरूपात मान्य केल्या होत्या त्यानंतर कामगारांनी आपले आंदोलन मागे घेत मनपा प्रशासना समोर धम्मपरिनिर्वाण दिनानिमित्त दिक्षा भूमीवर उद्भवणाऱ्या स्वच्छतेचा प्रश्न मार्गी लागला.

     

    परंतू आयुक्तांनी किमान वेतन संदर्भात दिलेला शब्द पाळला नाही. त्यामुळे कामगारांत रोष व्यक्त होत असून कामगारांनी दिलेली दिनांक 04/11/2023 ची डेड लाईन संपलेली असल्याने आता दिनांक 06/11/2023 पासून परत काम बंद आंदोलन केले जाणार असल्याचे कामगार युनियन अध्यक्ष रतन गायकवाड यांनी सांगितले आहे.

  • कामगारांनो संप मागे घ्या – आयुक्त पालिवाल यांचे आवाहन

    News34 chandrapur

    चंद्रपूर : कचरा संकलन आणि वाहतुक या कामांवर काम करणारे कामगार 6 ऑक्टोबरपासून संपावर गेले आहेत. यामुळे सणासुदीच्या काळात चंद्रपूर शहरातील नागरिकांची गैरसोय होत आहे. कचरा संकलनाच्या माध्यमातून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या कामगारांवर उपासमारीची पाळी येण्याची शक्यता आहे. आपल्या कुटुंबाचे भविष्य बघता कामगारांनी हे संप मागे घ्यावे, असे आवाहन मनपा प्रशासनाने केले.

    कचरा संकलन करणाऱ्या कामगारांनी पुकारलेला संप मागे घेण्यात यावा, यासाठी महानगरपालिका प्रशासनाने त्यांच्या मागण्या मान्य केल्याबाबत चे पत्र दिले आहे. त्यांच्या मागण्यांमध्ये जुन्या वेतन आश्वासनांचे पालन करणे, 30 मजुरांना पुन्हा नोकरीवर घेणे आणि वेतन चिट्ण्या नियमित देणे यांचा समावेश आहे.
    १०/१०/२०२३ रोजी उपायुक्त यांचे कक्षात सकारात्मक चर्चा झाली आहे.

     

    झालेल्या चर्चेनुसार संदर्भ पत्राच्या अनुषंगाने खालील मागण्या मान्य करण्यात येत आहे. १) जुने कंत्राटदार सेंटर फॉर डेव्हलपमेन्ट कम्युनिकेशन, जयपुर ब्रान्च नागपूर याप्रमाणे वेतन तात्काळ प्रभावाने लागू करून पुढील काळाकरीता देण्यात येईल. जुन्या वेतन आश्वासनांचे पालन करून कामगारांना नवीन वेतन देण्यात येईल. 30 मजुरांना पुन्हा नोकरीवर घेण्यात येईल आणि वेतन चिट्ण्या नियमित देण्यात येतील, असे देखील मान्य करण्याचे आश्वासन देण्यात येत आहे.
    कामगारांनी संप मागे घेऊन 12 ऑक्टोबरपासून नियमित कचरा संकलन सुरू करावे, असे आवाहन मनपा आयुक्त विपिन पालीवाल यांनी केले आहे.

     

    मागील 6 दिवसापासून सुरू असलेल्या कामगारांच्या कामबंद आंदोलनातील महत्वाची मागणी म्हणजे कामगारांना किमान वेतन कायद्यानुसार वेतन देण्यात यावे, मनपा दालनात अधिकाऱ्यांशी झालेल्या चर्चेत सदर मागणी पूर्ण करण्यात आली आहे.

     

    सुरू असलेला संप कामगार परत घेणार या याविषयी श्री संत गाडगेबाबा असंघटित कामगार संघटनेचे अध्यक्ष रतन गायकवाड यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.

  • चंद्रपूर शहरातील कचरा संकलन 2 दिवसापासून ठप्प

    News34 chandrapur

    चंद्रपूर – मागील 5 दिवसापासून चंद्रपूर मनपा अंतर्गत काम करणाऱ्या घंटागाडी कामगारांचे कामबंद आंदोलनाने आज आक्रमक पवित्रा घेतला, कचरा संकलन करणाऱ्या वाहन मेंटनन्स कार्यालयापुढे घंटागाडी कामगारांनी ठिय्या आंदोलन सुरू केले.

     

    हक्काच्या किमान वेतनासाठी कामगार आपली लढाई लढत आहे, विशेष म्हणजे मागील 5 दिवसापासून स्थानिक आमदार व मंत्री यांनी कामगारांच्या आंदोलनाची दखल घेतलेली नाही, हे विशेष.

     

    कामगारांच्या कामबंद आंदोलनामुळे शहरातील कचरा संकलन मागील 2 दिवसापासून बंद आहे, शहरात दुर्गंधीचे वातावरण पसरत आहे, यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही, कामगारांच्या आंदोलनाचा लवकरात लवकर तोडगा निघावा यासाठी भूमिपुत्र ब्रिगेडच्या सदस्यांनी मनपा अधिकाऱ्यांची भेट घेतली.

     

    भूमिपुत्र ब्रिगेड संघटनेतर्फे डॉ. अभिलाषा गावतुरे यांनी मनपाला निवेदन सादर केले, ज्यामध्ये संपावर बसलेले कामगार यांच्या आंदोलनावर तात्काळ तोडगा काढण्यात यावा जेणेकरून शहरात कचरा संकलनाला सुरुवात होईल, आंदोलनामुळे शहरात दुर्गंधीचे साम्राज्य पसरले आहे, यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही.

     

    घंटागाडी कामगारांचे आंदोलन सुरू राहिले तर शहरातील नागरिक आपल्या घरातील कचरा चंद्रपूर मनपा कार्यालयात टाकल्याशिवाय राहणार नाही असा इशारा सुद्धा डॉ.गावतुरे यांनी यावेळी दिला आहे.

    मनपा अधिकाऱ्यांना निवेदन देतेवेळी छाया सोनूले, संगीता पेटकुले, काळूबाई चौधरी, आदींची उपस्थिती होती.

     

    कामगारांच्या हक्काच्या मागणीवर मनपा प्रशासन डोळेझाक करीत आहे ही गंभीर बाब असून त्यांची मागणी रास्त आहे, कामगारांना न्याय मिळायला हवा अशी प्रतिक्रिया डॉ.अभिलाषा गावतुरे यांनी यावेळी दिली.

  • चंद्रपुरात घंटागाडी कामगारांचे आंदोलन पेटले

    News34 chandrapur

    चंद्रपूर – केंद्र शासनातर्फे चंद्रपूर मनपाला स्वच्छता वर्गात पुरस्कार दिल्या गेला होता मात्र यामागे महत्वाची भूमिका बजावणाऱ्या घंटागाडी कामगारांना हक्काच्या किमान वेतनासाठी आंदोलन करावे लागत आहे.

     

    शहर स्वच्छ रहावे यासाठी संपूर्ण दिवस शहरातील कचरा संकलन करण्याचे मोलाचे कार्य घंटागाडी कामगार करतात मात्र या कामाचा मोबदला म्हणून त्यांना किमान वेतन दिल्या जात नाही, कंत्राटदार बदलला व नव्या कंत्राटदाराने कामगारांच्या किमान वेतनावर डल्ला मारण्याचे काम केले.

     

    आम्हाला किमान वेतन द्या या मागणीसाठी संत गाडगेबाबा असंघटित कामगार संघटनेने अनेकदा पाठपुरावा केला मात्र त्यांच्या मागणीकडे मनपा व संबंधित कंत्राटदाराने पूर्णतः दुर्लक्ष केल्याने 6 ऑक्टोबर पासून घंटागाडी कामगारांनी कामबंद आंदोलन सुरू केले.

    मागील 5 दिवसापासून सुरू असलेले कामबंद आंदोलन मनपाद्वारे दडपण्याचा प्रयत्न केला गेला, कामगार कामावर येत नसल्याने शहरातील कचरा संकलन ढासळले, कंत्राटदाराने यावर शक्कल लढवीत कामगारांची पर्यायी व्यवस्था केली.

     

    ही बाब कामबंद आंदोलकांना कळताच त्यांनी सरळ कचरा संकलन वाहन मेंटनन्स कार्यालयापुढे 10 ऑक्टोबर ला सकाळपासून ठिय्या आंदोलन सुरू केले, आमच्या मागण्या पूर्ण करा अन्यथा आम्ही मागे हटणार नाही अशी भूमिका कामगारांनी घेतली आहे.

     

    मनपा द्वारे आता या ठिकाणी बैठक घ्या आम्ही आता हटणार नाही, हा आमच्या हक्काचा लढा आहे, अशी निर्णायक भूमिका घंटागाडी कामगारांनी घेतल्याने मनपा आता काय भूमिका घेणार याकडे कामगार संघटनांचे लक्ष लागले आहे.

  • चंद्रपुरात किमान वेतनासाठी घंटागाडी कामगारांची लढाई

    News34 chandrapur

    चंद्रपूर – चंद्रपूर महानगरपालिकेत घंटागाडी कामगार किमान वेतनासाठी रस्त्यावर उतरले आहे, मागील 2 दिवसापासून पालिकेसमोर घंटागाडी कामगार आंदोलन करीत आहे, त्यांच्या आंदोलनाची दखल मंत्री, आमदार व स्वतः मनपाने घेतलेली नाही.

     

    संत गाडगेबाबा असंघटित कामगार संघटनेतर्फे सदर कामबंद आंदोलन करण्यात येत आहे, वर्ष 2021 पासून कामगारांना किमान वेतन नुसार पगार देण्यात येत होता, त्यानंतर सफाई चे कंत्राट दुसऱ्या कंत्राटदारा कडे गेल्याने किमान वेतनात मोठी तफावत निर्माण झाली.

     

    एका कामगारांच्या मागे तब्बल 200 ते 300 रुपये म्हणजेच महिन्याला 6 हजार रुपये कमी मिळायला लागले, याबाबत काही महिन्यांपूर्वी कामगार संघटनेतर्फे आंदोलन पुकारत कामबंद करण्याचा इशारा देण्यात आला होता, त्यावेळी आश्वासन देत आंदोलन मिटले.

     

    मात्र कामगारांच्या किमान वेतनावर कंत्राटदार काहीही बोलायला तयार नाही, जितका पगार मिळत आहे घ्या अन्यथा कामावरून कमी व्हा अशी धमकी त्यांना देत आहे, कंत्राटदारांच्या अन्यायाला कंटाळून संत गाडगेबाबा असंघटित कामगार संघटनेचे अध्यक्ष रतन गायकवाड यांनी सर्व बाबी समजून घेत आंदोलनाचे हत्यार उपसले आहे.

     

    6 ऑक्टोम्बर पासून कामगार संघटनेमार्फत कामबंद आंदोलन सुरू आहे, जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होणार नाही तोपर्यंत आंदोलनातून माघार घेणार नाही अशी भूमिका कामगारांनी घेतली आहे. या आंदोलनात 300 कामगार सामील झाले आहे.