Tag: गोंडवाना विद्यापीठ

  • Gondwana University carry on policy update । 📢 “गोंडवाना विद्यापीठात ‘कॅरी ऑन’ धोरणावर चर्चा, सिनेट सदस्यांचा आग्रह

    Gondwana University carry on policy update

    Gondwana University carry on policy update : चंद्रपूर – गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली अंतर्गत सलग्नित महाविद्यालयात शिकणाऱ्या बी. ए. ,बी एस सी, बी कॉम इत्यादी अभ्यासक्रमातील अनेक विद्यार्थी मागील सत्रामध्ये काही विषयात नापास झालेत. नवीन शैक्षणिक धोरण मागील सत्रापासून लागू केले आहे. त्यामुळे सुरुवातीला अनेक दिवस त्याचा अभ्यासक्रमांचा सिलॅबस व अभ्यास साहित्य उपलब्ध होऊ न शकल्यामुळे निकालामध्ये मोठ्या प्रमाणावर घट झालेली आहे. academic year loss due to new education policy

    चंद्रपुरात अमृता फडणवीस यांच्या हस्ते भव्य रुद्राभिषेक

    मात्र याचा फटका विद्यार्थ्यांना पुढील वर्षात प्रवेश घेताना बसत आहे. अनेक विद्यार्थी अंतिम वर्षाच्या प्रवेशापासून वंचित राहणार आहे. काही महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी गोंडवाना विद्यापीठाचे सिनेट सदस्य प्रा. निलेश बेलखेडे व प्रा. डॉ. दिलीप चौधरी यांच्याशी संपर्क साधून सदर बाब लक्षात आणून दिली.

    विद्यार्थ्यांचा गंभीर प्रश्न लक्षात घेऊन दोन्ही सिनेट सदस्यांनी तत्काळ गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे यांच्याशी संपर्क साधला व विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी विशेष बाब म्हणून यावर्षी सगळ्या विद्यार्थ्यांना सरसकट कॅरी ऑन लागू करावे अशा पद्धतीची विनंती केली.

    तोडगा निघणार

    कुलगुरूंनी सकारात्मक निर्णय घेऊ, सदरचा निर्णय हा अकॅडमिक कौन्सिलच्या अंतर्गत येत असल्यामुळे पुढील महिन्यात होणाऱ्या अकॅडमी कौन्सिलच्या बैठकीमध्ये सदर विषय ठेवून त्यावर निश्चितपणे विद्यार्थी हिताच्या दृष्टीने काहीतरी तोडगा काढू असे आश्वासित केलेले आहे.

    Somayya institute of technology

    त्यामुळे येणाऱ्या अकॅडमी कौन्सिलच्या बैठकीत विद्यार्थ्यांना कॅरी ऑन लागू करून त्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये याची विद्यापीठाने काळजी घ्यावी. अशा स्वरूपाची मागणी दोन्ही सिनेट सदस्यांकडून विद्यापीठाकडे करण्यात आली आहे.

  • gondwana university chandrapur sub center । 🚀 चंद्रपूरच्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी! गोंडवाना विद्यापीठ उपकेंद्राला मान्यता!

    gondwana university chandrapur sub center

    gondwana university chandrapur sub center :  मुंबई : राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूर जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीचा ध्यास घेतला आहे. त्यादृष्टीने त्यांनी सर्वच क्षेत्रांच्या विकासासाठी सातत्याने प्रयत्न केले आणि त्यात त्यांना यशही आले आहे. शिक्षण क्षेत्राच्या विकासालाही त्यांच्या प्रयत्नांमुळेच गती मिळणार आहे. यासंदर्भातील एक मोठा निर्णय अलीकडेच झाला. आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे गोंडवाना विद्यापीठ गडचिरोलीचे चंद्रपूर जिल्ह्यातील उपकेंद्र चंद्रपूर शहरात सुरू करण्यासह मुल शहरात नवीन शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय स्थापन करण्याच्या प्रस्तावाला देखील मंजुरी मिळाली आहे. chandrapur university sub centre gadchiroli expansion

    विदर्भातील युवकांचे भविष्य उज्वल करण्यासाठी व शिक्षण क्षेत्रात भरीव प्रगती साधण्यासाठी चंद्रपूर जिल्ह्यातील या दोन महत्त्वपूर्ण मागण्यांवर सकारात्मक पाऊल पडले आहे. या संदर्भातील बैठक अलीकडेच उच्च व तंत्रशिक्षण मंत्री श्री. चंद्रकांतदादा पाटील यांच्या अध्यक्षतेत मुंबईतील सुवर्णगड या शासकीय निवासस्थानी पार पडली. या बैठकीस आ.सुधीर मुनगंटीवार यांची प्रमूख उपस्थिती होती. यासोबत उच्च शिक्षण विभागाचे वरिष्ठ अधिकारी, गोंडवाना विद्यापीठाचे पदाधिकारी तसेच विविध यंत्रणांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

    अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांना प्रदेशात शिक्षण घेण्यासाठी शिष्यवृत्ती योजना जाहीर

    गोंडवाना विद्यापीठाच्या उपकेंद्रासाठी तब्बल ४१४ कोटीं

    या बैठकीत दोन्ही विषयांवर सकारात्मक चर्चा झाली असून, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री श्री. चंद्रकांतदादा पाटील यांनी दोन्ही प्रस्तावांना त्वरित कार्यवाहीसाठी स्पष्ट निर्देश दिले आहेत. विशेष म्हणजे, गोंडवाना विद्यापीठाच्या उपकेंद्रासाठी तब्बल ४१४ कोटींच्या प्रस्तावाला प्रशासकीय मान्यता देण्याचा ऐतिहासिक निर्णय या बैठकीत घेण्यात आला आहे. हा प्रस्ताव पुढील प्रक्रियेसाठी उच्चस्तरीय समितीकडे पाठविण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

    आ. सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील युवकांना दर्जेदार उच्च शिक्षणाची सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून पाठपुरावा केला. त्यांच्या दूरदृष्टीमुळेच जिल्ह्यातील युवकांना आता शिक्षणाच्या नव्या संधी उपलब्ध होणार आहेत. यामुळे रोजगारक्षम शिक्षणाचे दालन खुले होईल आणि जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचा शिक्षणाचा स्तर भक्कमपणे उंचावणार आहे, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

    चंद्रपूरच्या शिक्षण विकासाच्या दिशेने टाकलेले हे पाऊल युवकांच्या प्रगतीचा नवा अध्याय लिहणारे ठरणार आहे, असा विश्वास नागरीकांमध्ये व्यक्त करण्यात येत आहे.

  • University of Gondwana : नाट्यशास्त्र विभागाशी संबंधित पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू करा – निलेश बेलखेडे

    University of Gondwana : नाट्यशास्त्र विभागाशी संबंधित पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू करा – निलेश बेलखेडे

    News34 chandrapur

    चंद्रपूर – चंद्रपूर आणि गडचिरोली हे दोन्ही जिल्हे सांस्कृतिक दृष्टीने सम्पन्न जिल्हे आहेत. झाडीपट्टी रंगभूमी या दोन्ही जिल्ह्यात विखुरलेली आहे शिवाय शेजारच्या गोंदिया व भंडारा जिल्ह्यात देखील झाडीपट्टी रंगभूमीची नाटके सातत्याने होतात. याशिवाय चंद्रपूर जिल्ह्यात प्रायोगिक नाटकांची चळवळ सक्रिय आहे. राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालया द्वारे आयोजित राज्य नाटय स्पर्धा असो वा महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या कामगार राज्य नाटय स्पर्धा असो या जिल्ह्यातील नाटय कलावंत राज्य पातळीवर अग्रणी आहेत. University of Gondwana

     

     

    ही चळवळ पुढे नेण्यासाठी नव्या पिढीतील तरुण विद्यार्थी नाटय विषयक शिक्षण घेण्यासाठी इच्छुक व उत्सुक आहेत. मात्र आपल्या विद्यापीठात नाट्यशास्त्र विषयाचे पदविका, पदवी तसेच पदव्युत्तर अभ्यासक्रम उपलब्ध नसल्याने या विद्यार्थ्यांना नागपूर किंवा राज्यातील अन्य ठिकाणी जावे लागत आहे पर्यायाने आर्थिकदृष्ट्या कमकुवत विद्यार्थी या पासून वंचीत देखील राहत आहेत. Department of Drama

     

    नाट्यविषयक शिक्षण घेऊन या जिल्ह्यातील विद्यार्थी नाटय चळवळ अधिक समृद्ध करतील या दृष्टीने गोंडवाना विद्यापीठात नाट्यशास्त्र विषयाचे पदविका , पदवी तसेच पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू करावे याकरीता शिवसेना- उद्धव बाळासाहेब ठाकरे प्रणित युवासेनाच्या वतीने युवासेना चे पुर्व विदर्भाचे सचिव तथा गोंडवाना विद्यापीठ सिनेट सदस्य प्रा. निलेश बेलखेडे यांनी कुलगुरू डॉ. बोकारे यांना सविस्तर चर्चा करून निवेदनाद्वारे केली आहे.

     

    सदर विषय अत्यंत जिव्हाळ्याचा चंद्रपूर च्या मातीशी जुळलेला व महत्वपुर्ण असून यासंदर्भात पाठपुरावा करून लवकरात लवकर गोंडवाना विद्यापीठात सदर अभ्यासक्रम सुरू करण्यात येईल या साठी सकारात्मक भुमिका घेणार असे त्यांनी आश्वासित केले. यावेळी यासंदर्भात प्र कुलगुरू डॉ. कावळे यांच्याशी हि सदर विषयांवर चर्चा करण्यात आली. यावेळी गोंडवाना सिनेट सदस्य प्रा डॉ प्रविण जोगी यांची सुद्धा उपस्थिती होती.

  • गोंडवाना विद्यापीठातील विद्यार्थी जेवनाविना

    गोंडवाना विद्यापीठातील विद्यार्थी जेवनाविना

    News34 chandrapur

    चंद्रपूर/गडचिरोली – गोंडवाना विद्यापीठातील वसतिगृहात राहणारे विद्यार्थी गेले तीन-चार दिवसापासून जेवण न मिळाल्यामुळे उपाशी आहेत. जेवणासाठी आंदोलन करीत आहेत, कुलगुरू स्वतः त्यांना जाऊन विद्यार्थ्यांना भेटल्यावर त्यांनी विद्यार्थ्यांना विचारले की आपणापैकी कोण उपाशी आहेत त्यावेळी विद्यार्थ्यांनी जेवण न केल्याचे सांगितल्यावर देखील कुलगुरू डॉ प्रशांत बोकरे विचारणा करून उपाययोजना न करता निघून गेले यावरून कुलगुरू व विद्यापीठ प्रशासन विद्यार्थ्यांच्या प्रती किती गंभीर आहे हे दिसून येते. आज परत विद्यापीठ परिसरात विद्यार्थ्यांना आंदोलन करावं लागलं.

     

    त्यानंतर कुलगुरूंनी त्यांच्या जेवणाची तात्पुरती व्यवस्था करण्याबद्दल त्यांना आश्वासित केले आहेत. कुलगुरूंनी दिलेले आश्वासन ते पाळतील ही अपेक्षा आहे. परंतु हा प्रश्न तात्पुरत्या सोयीने सुटणार नाही. विद्यार्थ्यांना प्रवेश देताना जेवण, प्रवेश व हॉस्टेल तिन्ही मोफत राहील अशा पद्धतीची माहिती सांगण्यात आली आणि आता मात्र त्यांच्याकडून पैसे मागत असल्याबाबतची तक्रार विद्यार्थ्यांनी केलेली आहे. माननीय राष्ट्रपती महोदया विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभामध्ये आलेल्या असताना कुलगुरू यांनी राष्ट्रपतींच्या समक्ष जाहीरपणे बोलताना गोंडवाना विद्यापीठाच्या विद्यार्थ्याला एकही रुपया लागणार नाही असे उदगार काढलेले आहे. परंतु कुलगुरू बोललेले शब्द पाळत नाहीत असा वारंवार अनुभव येत आहे.

     

    अनेक विद्यार्थी कुलगुरूंच्या उदासीन धोरणामुळे शिक्षण सोडून जेवण मिळणार नाही म्हणून गावाला परत जात आहे. ही बाब विद्यापीठाच्या प्रतिष्ठेसाठी चांगली नाही.
    गोंडवाना विद्यापीठ विद्यार्थ्यांच्या हितासाठी आहे की कशासाठी हेच कळत नाही?. एकीकडे “विद्यापीठ आपल्या गावी” योजना सुरू केल्याची शाबासकी मिळविली जाते मात्र दुसरीकडे विद्यापीठातील विद्यार्थ्यांच्या जेवणाचा प्रश्न चार दिवसापासून सुटू शकत नाही.

     

    त्यामुळे या विद्यार्थ्यांच्या भोजनाची व्यवस्था लवकरात लवकर करावी, अन्यथा आम्हाला विद्यापीठात येऊन विद्यापीठाला विद्यार्थ्यांसह घेराव घालावा लागेल असा इशारा सिनेट सदस्य , प्रा. निलेश बेलखेडे,प्रा डॉ दिलीप चौधरी, डॉ. प्रवीण जोगी, डॉ. सतीश कन्नाके, डॉ. मिलिंद भगत, अजय लोंढे, दीपक धोपटे, यांनी दिला आहे.