Tag: गणपती विसर्जन

  • Ganpati visarjan : प्रशासनाचे दुर्लक्ष, गणेश विसर्जन सोहळा शांततेत

    Ganpati visarjan : प्रशासनाचे दुर्लक्ष, गणेश विसर्जन सोहळा शांततेत

    Ganpati visarjan (गुरू गुरनुले) मूल – गणपती बाप्पा मोरया, पुढल्या वर्षी लवकर या म्हणत शहरातील गणपती विसर्जन दरवर्षी प्रमाणे याही वर्षी शांततेत पार पडले. परंतू प्रशासनाच्या दुर्लक्षामूळे गांधी चौकात निर्माण झालेल्या तीन मंडपामूळे वाहतुकी सोबतचं ध्वनी प्रदुषणाचा नाहक त्रास गणेश भक्तांना नागरीकांना सहन करावा लागला.

    महत्वाचे – ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्रातून भाजपतर्फे पाल यांची दावेदारी


    Ganpati visarjan बुधवारी रात्री शहरातील ३२ सार्वजनिक गणेश मंडळाने गणेश विसर्जनाच्या शोभायात्रा काढून बस स्थानक लगतच्या तलावात श्री गणेशाला निरोप दिला व पुढल्या वर्षी लवकर या अशी आराधना केली. गणेश विसर्जनाचे निमित्याने स्थानिक पोलीस प्रशासनाने शांतता समितीच्या सभेत साार्वजनिक गणेश मंडळांना शांतता व सुव्यवस्था राखण्यासोबतचं शासनाने दिलेल्या ध्वनी आणि प्रकाश प्रदुषणाचे नियम पाळण्याचे निर्देश दिले. परंतु एकाही गणेश मंडळाने शांतता समितीच्या सभेत दिलेल्या निर्देशाचे पालन केल्याचे दिसून आले नाही. प्रमाणाच्या बाहेर डि.जे. वाजत होते तर लेझर लाईटच्या वापरावर बंदी असतांना लेझर लाईटच्या प्रखर प्रकाशात युवा पिढी नाचत होती.

    शोभायात्रे दरम्यान स्थानिक गांधी चौक आणि शोभायात्रेच्या मुख्य मार्गावर गणेश भक्तांची, नागरीकांची प्रचंड गर्दी असतानाही सार्वजनिक गणेश मंडळाचे पदाधिकारी कुठलाही अनुचित प्रकार न करता किंवा अपघाताची भिती न बाळगता पोलीस अधिकारी आणि कर्मचा-यांसमोर बिनधास्त फटाक्यांची आतिषबाजी करतांना दिसले. गणेश विसर्जनाचे दिवशी दरवर्षी स्थानिक गांधी चौकात प्रशासनाच्या वतीने नियंत्रण ठेवणे अधिका-यांना सोईचे व्हावे म्हणून मंडप उभारण्यांत येत होते. मंडप उभारण्याची परवानगी द्यावी यासाठी न.प.प्रशासनाला पत्रही दिले होते. मात्र प्रशासनाने मंडप न उभारण्याचा निर्णय घेतल्याने भाजप राजकिय पक्षाने परवानगी न घेताच मंडप उभारले. त्यामुळे आपणही का, मागे राहायचे म्हणून त्याचं मंडपाला लागूनच लगेच महाविकास आघाडी तर्फे कांग्रेस व शिवसेना (ऊबाठा) यांनी देखील मंडप उभारले. विधानसभेची निवडणुकीची चाहूल लागल्याची संधी साधून प्रचाराचाही श्री. गणेशा केल्याचे दिसून आले. (Ganapti visarjan)

    विसर्जनाकरीता येणा-या नागरीकांसमोर शक्ती प्रदर्शन करीण्याकरीता भाजपा, काॅंग्रेस आणि शिवसेनेच्या वतीने गांधी चौकात वेगवेगळे तीन मंडप उभारले होते. भाजपाच्या मंडपात जिल्हयाचे पालकमंत्री तथा क्षेत्राचे आ. सुधीर मुनगंटीवार समर्थकांसह उपस्थित होते.व लक्की. ड्र्lचे बक्षीस वितरण केले. तर महाविकास आघाडी व संतोष सिंह रावत मित्र परिवार तर्फे उभारलेल्या मंडपात सी.डी.सी.सी. बँकेचे अध्यक्ष संतोषसिंह रावत, घनश्याम मुलचंदानी आपल्या असंख्य पदाधिकाऱ्यांसह मंचावर होते.सोबत शिवसेना जिल्हा प्रमुख संदीप गि-हे ( उबाठा )हे सुद्धा होते.व रावत मित्र परीवरांतर्फे आयोजित सर्व गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांचा शाल श्रीफळ सन्मानचिन्ह देऊन सन्मान केला.आणि घरगुती गणपती स्पर्धेत विजेत्या स्पर्धकांना रोख बक्षेस दिले. तर लागूनच शिवसेना गटाच्या मंडपातून शिवसेना जिल्हाप्रमुख संदीप गि-हे आपआपल्या समर्थकांसह उपस्थित् राहून गणेश भक्तांना शुभेच्छा देत होते. (Ganpati visarjan)

    Ganpati visarjan उभारण्यांत आलेल्या राजकिय पक्षांच्या तीनही मंडपामध्यें कर्कश आणि मोठया आवाजात भोंगे व साऊंड वाजविल्या जात असल्याने गांधी चौकात ध्वनी प्रदुषणाची गंभीर समस्या निर्माण झाली होती. हया सर्व घटना कायदयाचे उल्लंघन करून घडत असतांना प्रशासनाला मात्र नाईलाजाने बघ्याची भुमीका घेतल्याने त्यांचे नशीब चांगले की, काहीही गालबोट लागले नाही हे विशेष, याविषयी नागरिकात आश्चर्य व्यक्त करण्यांत येत आहे. गणपतीचे दर्शन घेण्याकरिता तालुक्यातील व नगरातील हजारोच्या संख्येने गणेश भक्तांची रीघ होती.

  • चंद्रपुरात सकाळी ८ वाजता अखेरच्या मुर्तीचे विसर्जन

    News34 chandrapur

    चंद्रपूर – गेल्या १० दिवसांपासून मोठय़ा भक्ति भावाने सुरू असलेल्या सार्वजनिक गणेशोत्सवासह घरोघरी बसलेल्या गणरायाला अनंत चतुर्दशीच्या दिवशी निरोप देण्यात आला.

     

    मोठ्या १२२ मोठ्या मूर्तींसह विसर्जनाच्या दिवसापर्यंत एकूण ६७५६ गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात आले. चंद्रपूर शहर महानगरपालिका, पोलीस विभाग,जिल्हा प्रशासन यांच्या योग्य नियोजनाद्वारे सोहळा पार पडला. यादरम्यान मनपातर्फे पहाट होण्यापूर्वीच शहरातील मुख्य रस्त्यांची सफाई करण्यात येऊन शहर स्वच्छ करण्यात आले.

     

    विसर्जन सोहळ्यास सहभागी होणारी अनेक मंडळे, लाखोंच्या संख्येने सहभागी होणारी गर्दी, खाद्यान्न पदार्थांचे स्टॉल्स यामुळे शहरात मोठ्या प्रमाणात कचरा निर्माण होतो विशेषतः रस्त्यावर पडलेल्या कागदी प्लेटस ज्या गर्दीच्या चालण्याने रस्त्याशी इतक्या मिसळतात की त्यांना अक्षरशः खरडुन काढावे लागते. मनपा स्वच्छता कर्मचारी इतक्या वक्तशीर स्वच्छतेचे काम करतात की सकाळी निघालेल्या नागरीकांना कळणार सुद्धा नाही की रात्री इतका कचरा या रस्त्यावर होता.
    यंदाही सकाळी ६ पूर्वीच सर्व रहदारीचे मार्ग स्वच्छ करण्यात आले होते.

     

    विसर्जन स्थळावर १२२ मोठ्या सार्वजनिक गणेश मुर्तींचे विसर्जन करण्यात आले यातील अखेरच्या मुर्तीचे विसर्जन करण्यास सकाळी ८ वाजले होते. यादरम्यान क्रेनद्वारे उचलुन रीतसर विसर्जन करण्यात आले.आपत्ती व्यवस्थापन चमुने पुर्ण वेळ तैनात राहुन मोठे सर्च लाईट, फायर अँड रेस्क्यु व्हेइकल, पावर बोट,लाईफ जॅकेट लाईफ सेव्हींग ट्युब्ज इत्यादी व्यवस्था सज्ज ठेवल्याने कुठेही अनुचित घटना घडली नाही. ईरई नदी काठावर विसर्जनासाठी ६ घाट उभारण्यात आल्याने कुठेही गर्दी झाली नाही.

    ईरई धरणातून पाणी सोडण्याची व्यवस्था प्रशासनाच्या मार्फत केली गेली असल्याने नदीपात्रात मोठ्या मुर्तीच्या विसर्जनास अडचण गेली नाही. मनपा अधिकारी व कर्मचारी यांनी पुर्ण उपस्थीत राहुन विसर्जन सोहळा व्यवस्थीत पार पडेल याची खात्री केली. सार्वजनिक गणेश मंडळ,पोलीस प्रशासन,जिल्हा प्रशासन व नागरीकांनी विसर्जन सोहळा यशस्वी पार पाडण्यास सहकार्य केले याबद्दल मनपा प्रशासनाने आभार व्यक्त केले.