Tag: गणपती बाप्पा मोरया

  • Festival of Ganesh Chaturthi । चंद्रपूर जिल्ह्यातील राजकीय पुढाऱ्यांच्या घरी श्री चे आगमन

    Festival of Ganesh Chaturthi

    गणेशोत्सव 2025 : २,५०० पोलीस दल सज्ज – जिल्ह्यातील सुरक्षा व्यवस्था कडक

    Festival of Ganesh Chaturthi (२७ ऑगस्ट २०२५) : चंद्रपूर – आज देशात विविध ठिकाणी गणरायाचे जल्लोषात आगमन झाले असून चंद्रपूर जिल्ह्यात एकूण १४ हजार ८३१ गणेश मूर्तीची स्थापना करण्यात आली आहे. यामध्ये खाजगी व घरगुती १२ हजार ९७५ गणेश मूर्ती, सार्वजनिक गणेश मूर्ती स्थापना लहान मंडळ ८७३, मोठे मंडळ ६१३ तर एक गाव एक गणपती ३७६, जिल्ह्यातील एकूण सार्वजनिक गणेश मूर्ती १ हजार ८४७ ठिकाणी विराजमान झाली आहे. गणेशोत्सव काळात जिल्ह्यात अप्रिय घटना घडू नये यासाठी २ हजार ५०० पोलीस अधिकारी, अंमलदार महिला/पोलीस सह १ हजार होमगार्ड्स पुढील ११ दिवस कर्तव्य बजावणार आहे. police deployment Chandrapur 2500 officers

    दारू दुकानाविरोधात २८ ऑगस्ट रोजी बेमुदत आमरण उपोषण

    चंद्रपूर जिल्ह्याच्या खासदार प्रतिभा धानोरकर, आमदार व माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार व आमदार किशोर जोरगेवार यांच्या निवासस्थानी आज गणरायाचे आगमन करण्यात आले आहे. Ganpati peace prayers Chandrapur leaders

    महाराष्ट्र सदैव सुजलाम्-सुफलाम् राहो

    माजी मंत्री व आमदार मुनगंटीवार यांनी सहकुटुंब श्रीगणेशाची प्रतिष्ठापना करून पूजन केले. ‘श्री’च्या आगमनाने संपूर्ण घर भक्तिभावाच्या दिव्य लहरींनी न्हाऊन निघाले. महाराष्ट्रातील शेतकरी, शेतमजूर, दीन-दुर्बल व पीडित जनतेच्या कल्याणासाठी अखंड सेवा करण्याची शक्ती लाभो. महाराष्ट्र सदैव सुजलाम्-सुफलाम् राहो, अशी प्रार्थना श्री गणरायाच्या चरणी मुनगंटीवार यांनी केली.

    गणेश चतुर्थीच्या शुभ मुहूर्तावर, खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या हस्ते वरोरा येथील त्यांच्या जनसंपर्क कार्यालयात गणपती बाप्पाची विधिवत स्थापना करण्यात आली. यावेळी पारंपारिक पद्धतीने पूजा-अर्चा करून बाप्पाचे पूजन करण्यात आले. या मंगलमय प्रसंगी खासदार प्रतिभा धानोरकर यांच्यासोबत मानस धानोरकर आणि पार्थ धानोरकर उपस्थित होते, ज्यामुळे या सोहळ्याला कौटुंबिक आणि उत्साहाचे स्वरूप आले होते.

    नागरिकांच्या आयुष्यात आनंदाची भरभराट होवो

    गणेश चतुर्थीच्या पावन दिवशी आमदार किशोर जोरगेवार यांच्या राजमाता निवासस्थानी गणरायाचे मंगल आगमन झाले. यावर्षीचे हे ९५ वे वर्ष असून, जोरगेवार कुटुंबीयांनी १९३० पासून ही परंपरा जपली आहे. आता त्यांच्या चौथ्या पिढीने ही पवित्र परंपरा पुढे नेली आहे.

    सकाळी शुभ मुहूर्तावर संपूर्ण कुटुंबासह गणरायाची प्राणप्रतिष्ठा करून शास्त्रोक्त विधी-विधानानुसार पूजा-अर्चा करण्यात आली. गणेशाच्या मंगलमय आगमनाने घरात आनंद, उत्साह आणि सकारात्मक ऊर्जा नांदू दे, अशी प्रार्थना सर्वांनी केली.

    या पावन प्रसंगी आमदार किशोर जोरगेवार यांनी गणरायाच्या चरणी सर्व शेतकऱ्यांना भरपूर पिके, चांगले उत्पन्न, निसर्गाची साथ आणि सुरक्षित भविष्य मिळावे, तसेचसर्व नागरिकांच्या जीवनात सुख-समृद्धी, आरोग्य, धनधान्य आणि आनंदाची भरभराट होवो अशी प्रार्थना केली

  • मुंबई येथील कलावंतांचा संगीतमय सांस्‍कृतिक कार्यक्रम चंद्रपुरात मोठ्या उत्साहात संपन्न

    मुंबई येथील कलावंतांचा संगीतमय सांस्‍कृतिक कार्यक्रम चंद्रपुरात मोठ्या उत्साहात संपन्न

    News34 chandrapur

    चंद्रपूर: ‘गणपती बाप्पा मोरया’ असा जयघोष केल्यानंतर आपल्यामध्ये ऊर्जा संचारते. पण हा जयघोष केवळ एका सणापुरता मर्यादित नसून त्यामध्ये जात-पात-धर्म विरहित समाजाचे वर्णन आपल्याला बघायला मिळते. लोकमान्य टिळकांनी ज्या भावनेतून घरातील गणेशपुजा सार्वजनिक स्वरुपात सुरू केली, त्या राष्ट्रभक्तीच्या भावनेनेही जात-पात-धर्माची बंधने मोडून काढली होती. आपणही याच भावनेतून हा उत्सव दरवर्षी साजरा करावा आणि याचे स्वरुप अधिक मोठे करावे, असे आवाहन राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याच पालकमंत्री ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी केले.

     

    चंद्रपूर जिल्ह्यासाठी आयोजित गणेशोत्सव स्पर्धेचा पुरस्कार वितरण व संगीतमय सांस्‍कृतिक कार्यक्रम सोहळा क्लब ग्राऊंड येथे आयोजित करण्यात आला. त्यावेळी ना. श्री. मुनगंटीवार बोलत होते. या कार्यक्रमाला भाजपा जिल्हाध्यक्ष हरीश शर्मा, महानगराचे जिल्हाध्यक्ष राहुल पावडे, वनविकास महामंडळाचे माजी अध्यक्ष चंदनसिंह चंदेल, गुरूदेव सेवा मंडळाचे लक्ष्मणराव गमे, ब्रिजभूषण पाझारे, सुभाष कासनगोट्टुवार, काशी सिंग, समीर केने, प्रविण मोहुर्ले, नंदू रणदिवे, किशोर कापगते, प्रभाकर भोयर, चंदू आष्‍टनकर, चंदू मारगोनवार, सूरज पेदुलवार, प्रज्वलंत कडू आदी भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

     

    पुरस्कार विजेत्या गणेश मंडळांचे त्यांनी अभिनंदन केले. याशिवाय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या भजन स्पर्धेतील विजेत्यांचेही त्यांनी अभिनंदन केले. या कार्यक्रमात ‘बेबस’ चित्रपटाच्या जाहिरात फलकाचे अनावरणही ना. श्री. मुनगंटीवार यांच्या हस्ते झाले. गणराज रंगी नाचतो’ या मुंबई येथील ५० कलावंतांच्‍या भव्‍य संगीतमय सांस्‍कृतिक कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

     

    ना. श्री. मुनगंटीवार म्हणाले, ‘सांस्कृतिक कार्यमंत्री म्हणून गेल्यावर्षी मी पहिल्यांदा गणेश उत्सवाची राज्यस्तरीय स्पर्धा आयोजित केली. यावर्षीही या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. चंद्रपूर, मुल, बल्‍लारपूर इथे भाजपच्या वतीने हे आयोजन करण्याचे आवाहन केले होते. त्याला उत्तम प्रतिसाद मिळाला. गणेशोत्सव हा आनंदाचा सण आहे. या सणाला प्रत्येकाच्या चेहऱ्यावर अनमोल भाव बघायला मिळतात. एक सूर, एक गीत प्रत्येकाच्या ओठांवर असते. त्यावेळी जात-पात-धर्म बघितला जात नाही. चंद्रपूरमध्ये याच भावनेतून हा उत्सव साजरा होत असतो. इथे गणेशोत्सव साजरा होतो तेव्हा सगळ्या धर्मांचे लोक सहभागी होतात, याचा मला अभिमान आहे.’ चंद्रपूरचा नागरिक म्हणून देशासाठी आपण या जिल्ह्याचे योगदान देऊ शकलो, याचा अभिमान असल्याचेही ना. श्री. मुनगंटीवार म्हणाले.

     

    ‘भारत-पाकिस्तानच्या सीमेवर छत्रपती शिवाजी महाराजांचा पाकिस्तानच्या दिशेने तलवार घेऊन उभा असलेल्या पुतळ्याचे अनावरण करण्याचे भाग्य मला लाभले. त्या क्षणाला माझे उर अभिमानाने भरून आला होता. छत्रपती शिवाजी महाराजांच्या वाघनखांसाठी लंडनमध्ये जाऊन करार केला तेव्हा चंद्रपूरचा आवाज जगात गौरवाने पोहोचविल्याचा अभिमान वाटला. आता २२ जानेवारीला देशगौरव, युगपुरुष पंतप्रधान नरेंद्रजी मोदी अयोध्येतील प्रभू रामाच्या मंदिराची पुजा करतील तेव्हा त्या मंदिराच्या प्रत्येक दाराचे लाकूड चंद्रपूरचे असेल, याचा प्रत्येक चंद्रपूरकराला अभिमान वाटेल. एवढेच नव्हे तर लोकशाहीचे मंदिर असलेल्या संसद भवनात प्रवेश करताना देशातील प्रत्येक खासदाराला चंद्रपूरच्या लाकडाने तयार झालेल्या मंदिरातून जावे लागेल, ही बाब देखील तेवढीच अभिमानाची आहे,’ असेही ना. श्री. मुनगंटीवार म्हणाले.

     

    राक्षसीवृत्तीचा विरोध

    ‘५ नोव्हेंबर २०२२ ला माझ्याकडे एक फाईल आली. त्यामध्ये अफजल खानाच्या कबरीचे उदात्तीकरण सुरू आहे आणि त्याठिकाणी अतिक्रमण झाले आहे, असे नमूद होते. दोन हजार पोलिसांच्या सुरक्षेत महाशिवप्रताप दिनाला हे अतिक्रमण आम्ही हटवले. हा धर्माचा विरोध नव्हता तर विचारांचा, राक्षसीवृत्तीचा विरोध होता. कारण भारताचा जवान अब्दूल हमीद, माजी राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दूल कलाम यांना आम्ही कधीही धर्माच्या नजरेतून बघितले नाही. आम्ही कबरीचे अतिक्रमण हटवले. आम्ही अफजलखानाचा विरोध करतो म्हणजे धर्माचा विरोध करतो असे नाही,’ असे ना. श्री. मुनगंटीवार यांनी म्हटले.

     

    रत्नजडित छत्र, पालखी अन् पुतळा

     

    ‘राज्याभिषेक होण्यापूर्वी प्रतापगडच्या भवानी मातेच्या मंदिरात छत्रपती शिवाजी महाराज गेले होते. तिथे त्यांनी एक रत्नजडीत छत्र भवानी मातेला चढवले. नंतर त्याची लूट झाली. पण पुन्हा चांदीचे छत्र बसविण्याचे भाग्य आपल्याला लाभले. महाराजांच्या राज्याभिषेकाची शोभायात्रा निघते तेव्हा पालखीही निघते. ही पालखी सुद्धा जीर्ण झाली होती. ती आपण चंद्रपूरच्या वतीने साठ किलो चांदीची पालखी दिली. पुढील दोनशे वर्षे राज्याभिषेकाची शोभायात्रा त्याच पालखीतूनच निघणार आहे याचा अभिमान आहे,’ असे ना. श्री. मुनगंटीवार म्हणाले. पोंभूर्णा येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यासाठी महाराजांचे वंशज छत्रपती उदयनराजे भोसले आणि महाराणा प्रताप यांच्या वंशजांना आमंत्रित केले जाणार आहे, अशी माहितीही ना. श्री. मुनगंटीवार यांनी दिली. ‘जाणता राजा’ या महानाट्याचा प्रयोगही चंद्रपुरात होणार असल्याचे ते म्हणाले.

     

    क्रीडा स्पर्धा आणि कृषी प्रदर्शन

    २७ डिसेंबरला ५ वाजता विसापूरच्या स्टेडियमवर पहिल्यांदाच राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धा होत आहे. मुख्यमंत्री श्री. एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस यावेळी उपस्थित राहणार आहेत. २८ राज्य आणि ८ केंद्र शासित प्रदेशातील ३ हजार खेळाडू या स्पर्धेत सहभागी होतील.

     

    या स्पर्धेतील खेळाडूंना प्रोत्साहन देण्याचे काम चंद्रपूरकरांनी करावे, असे आवाहन ना. श्री. मुनगंटीवार यांनी केले. त्याचवेळी ३ ते ७ जानेवारी या कालावधीत चांदा क्लब ग्राउंडवर विदर्भातील सर्वांत मोठे कृषी प्रदर्शन, पशू व मत्स्यसंवर्धन प्रदर्शन होणार असल्याचेही त्यांनी सांगितले. चंद्रपूरमधील पुरातन मंदिरांसाठी निधी देण्याची घोषणा आपण अलीकडेच केल्याचे त्यांनी सांगितले. चंद्रपूरमध्ये आकाराला येत असलेले आंतरराष्ट्रीय दर्जाचे बॉटनिकल गार्डन, मोरवा येथे तयार सुरू होत असलेला फ्लाईंग क्लब याचाही ना. श्री. मुनगंटीवार यांनी आवर्जून उल्लेख केला.

  • चंद्रपुरात सकाळी ८ वाजता अखेरच्या मुर्तीचे विसर्जन

    News34 chandrapur

    चंद्रपूर – गेल्या १० दिवसांपासून मोठय़ा भक्ति भावाने सुरू असलेल्या सार्वजनिक गणेशोत्सवासह घरोघरी बसलेल्या गणरायाला अनंत चतुर्दशीच्या दिवशी निरोप देण्यात आला.

     

    मोठ्या १२२ मोठ्या मूर्तींसह विसर्जनाच्या दिवसापर्यंत एकूण ६७५६ गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात आले. चंद्रपूर शहर महानगरपालिका, पोलीस विभाग,जिल्हा प्रशासन यांच्या योग्य नियोजनाद्वारे सोहळा पार पडला. यादरम्यान मनपातर्फे पहाट होण्यापूर्वीच शहरातील मुख्य रस्त्यांची सफाई करण्यात येऊन शहर स्वच्छ करण्यात आले.

     

    विसर्जन सोहळ्यास सहभागी होणारी अनेक मंडळे, लाखोंच्या संख्येने सहभागी होणारी गर्दी, खाद्यान्न पदार्थांचे स्टॉल्स यामुळे शहरात मोठ्या प्रमाणात कचरा निर्माण होतो विशेषतः रस्त्यावर पडलेल्या कागदी प्लेटस ज्या गर्दीच्या चालण्याने रस्त्याशी इतक्या मिसळतात की त्यांना अक्षरशः खरडुन काढावे लागते. मनपा स्वच्छता कर्मचारी इतक्या वक्तशीर स्वच्छतेचे काम करतात की सकाळी निघालेल्या नागरीकांना कळणार सुद्धा नाही की रात्री इतका कचरा या रस्त्यावर होता.
    यंदाही सकाळी ६ पूर्वीच सर्व रहदारीचे मार्ग स्वच्छ करण्यात आले होते.

     

    विसर्जन स्थळावर १२२ मोठ्या सार्वजनिक गणेश मुर्तींचे विसर्जन करण्यात आले यातील अखेरच्या मुर्तीचे विसर्जन करण्यास सकाळी ८ वाजले होते. यादरम्यान क्रेनद्वारे उचलुन रीतसर विसर्जन करण्यात आले.आपत्ती व्यवस्थापन चमुने पुर्ण वेळ तैनात राहुन मोठे सर्च लाईट, फायर अँड रेस्क्यु व्हेइकल, पावर बोट,लाईफ जॅकेट लाईफ सेव्हींग ट्युब्ज इत्यादी व्यवस्था सज्ज ठेवल्याने कुठेही अनुचित घटना घडली नाही. ईरई नदी काठावर विसर्जनासाठी ६ घाट उभारण्यात आल्याने कुठेही गर्दी झाली नाही.

    ईरई धरणातून पाणी सोडण्याची व्यवस्था प्रशासनाच्या मार्फत केली गेली असल्याने नदीपात्रात मोठ्या मुर्तीच्या विसर्जनास अडचण गेली नाही. मनपा अधिकारी व कर्मचारी यांनी पुर्ण उपस्थीत राहुन विसर्जन सोहळा व्यवस्थीत पार पडेल याची खात्री केली. सार्वजनिक गणेश मंडळ,पोलीस प्रशासन,जिल्हा प्रशासन व नागरीकांनी विसर्जन सोहळा यशस्वी पार पाडण्यास सहकार्य केले याबद्दल मनपा प्रशासनाने आभार व्यक्त केले.

  • चंद्रपुरातील डिजीटल मीडियाच्या महालाईव्ह ला दर्शकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

    News34 chandrapur

    चंद्रपूर – दरवर्षी मोठ्या उत्साहात पार पडणाऱ्या चंद्रपुरातील श्री गणेश विसर्जन सोहळ्यात यंदा एक नवा प्रयोग बघायला मिळाला. MI Power Bank 20 हजार MAH चे पॉवर बँक फक्त 2149 रुपयात

     

    आजपर्यंत नागरिकांनी राजकीय पक्षाची युती बघितली मात्र प्रथमच चंद्रपुरातील अग्रगण्य डिजिटल मीडिया मधील 4 News पोर्टल व Youtube चॅनेल ने महायुती करीत श्री गणेश विसर्जन सोहळ्याचे थेट प्रक्षेपण केले. JBL चे हेडफोन फक्त 600 रुपयात त्वरा करा

     

    आधी हे थेट प्रक्षेपण होणार कसे असा प्रश्न अनेकांना पडला होता, कारण आजच्या आधुनिक युगात अनेक नवे बदल झाले आहे, स्थानिक वृत्त वाहिनी यांचं प्रस्थापित नेटवर्क सध्या सुरू आहे, शहरातील विविध जागेवर केबल टाकून या वाहिन्या थेट प्रक्षेपण करतात मात्र यावेळी डिजिटल मीडियाने नवा प्रयोग करीत वायरलेस थेट प्रक्षेपण करीत चंद्रपूरकरांची मने जिंकली आहे.

     

    चंद्रपुरातील अग्रगण्य डिजिटल मीडिया मधील News34, पार्थशर समाचार, DIG News व Mh24x7 यांनी थेट प्रक्षेपणात येणाऱ्या अडचणींचा अभ्यास करीत वायरलेस प्रक्षेपणाचे उत्कृष्ट कार्य केले, व हे काम चंद्रपुरात प्रथमच केल्याचा बहुमान चंद्रपुरातील डिजिटल मीडियाने प्राप्त केला आहे.

     

    चंद्रपुरातील डिजिटल मीडियाने 28 सप्टेंबर ला सकाळपासून थेट प्रक्षेपणाची सुरुवात केली, हजारो नागरिकांनी चंद्रपुरातील श्री गणेश विसर्जनाचा सोहळा एकाचवेळी 4 चॅनेल वर बघितला, चंद्रपूर व अन्य जिल्ह्यातील वाचक वर्गाचे News34 चे संचालक संपादक प्रकाश हांडे, पार्थशर समाचार चे संपादक राजेश नायडू, DIG News चे संपादक गणेश अडलूर व Mh24x7 चे आकाश नामेवार व तरन्नुम शेख यांनी आभार मानले आहे.