Tag: गडचिरोली दारूबंदी

  • country liquor boxes seized by police । देशी दारूच्या पेट्या भरून गाडी जात होती, अचानक पोलिसांनी मारली धडक!

    country liquor boxes seized by police

    country liquor boxes seized by police : चंद्रपूर – चंद्रपूर जिल्ह्याच्या सीमेवरून दारूबंदी असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात दारूची अवैध वाहतूक होत असते, तस्कर दररोज दारूची वाहतूक करण्याकरिता वेगवेगळ्या वाहनांचा उपयोग करीत असतात, मात्र अश्याच एका दारू वाहतुकीचा प्रयत्न पाथरी पोलिसांनी हणून पाडला.

    पाथरी पोलिसांनी देशी दारूच्या २० बॉक्स असा एकूण १ लक्ष ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करीत एका आरोपीला अटक केली आहे. Chandrapur to Gadchiroli liquor smuggling

    चंद्रपुरात हवा बायपास मार्ग, खासदार धानोरकर यांचे गडकरींना पत्र

    गडचिरोली जिल्ह्यात दारूबंदी आहे, मात्र त्याठिकाणी अवैध दारूचा मोठा महापूर आहे, विशेष बाब म्हणजे त्याठिकाणी दारूची वाहतूक हि चंद्रपूर जिल्ह्यातील सीमावर्ती भागातून होत असते.

    गोपनीय माहिती आणि कारवाई

    २५ जून रोजी पाथरी पोलिसांना दारूची वाहतूक होणार असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती, त्याअनुषंगाने पोलिसांनी मौजा मेहा बूज गोसीखुर्द नरजवळील रोडवर नाकाबंदी केली असता काही वेळाने त्याठिकाणी एमएच २९-जे-०४४८ चारचाकी वाहन येताना दिसले, पोलिसांनी सदर वाहनाला थांबविता त्याची झडती घेतली असता त्यामध्ये देशी दारूच्या २ हजार बॉटल असे एकूण २० बॉक्स आढळले.

    पोलिसानिया या प्रकरणी वाहन चालक ४२ वर्षीय रमेश राजू ताडपल्लीवार राहणार अंतरंगाव टोला तालुका सावली यास अटक करून महाराष्ट्र दारूबंदी कायद्यांवये गुन्हा दाखल केला.

    सदरची यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक रीना जनबंधू, पोलीस उपविभागीय अधिकारी सुधाकर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली पाथरी पोलीस स्टेशनचे ठाणेदार सपोनि नितेश डोर्लीकर यांच्या नेतृत्वात पोउपनि खोब्रागडे, पोलीस कर्मचारी यशवंत कोसमशीले, बळीराम बारेकर, प्रवीण कोवे, अमित म्हस्के, गजेंद्र ढेंगळे, खेलेश कोरे व शोभना सुरे यांनी केली.