Tag: खाद्य विक्रेते

  • festival sweets food safety guidelines । 🧑‍🍳 सणासुदीला हॉटेल व्यवसायिकांसाठी 10 अन्नसुरक्षा मार्गदर्शक सूचना

    festival sweets food safety guidelines

    festival sweets food safety guidelines : चंद्रपूर, दि.14 : सणासुदीच्या कालावधीमध्ये जनतेकडून मिठाई व इतर अन्न पदार्थ जसे  खवा/ मावा, घी, रवा, मैदा, आटा, खाद्यतेल/वनस्पती इत्यादीची मागणी मोठ्या प्रमाणात केली जाते. त्याअनुषंगाने चंद्रपूर जिल्ह्यातील मिठाई उत्पादक/विक्रेते व हॉटेल व्यावसायिकांनी खालीलप्रमाणे दक्षता घ्यावी.

    चंद्रपुरातील तिरंगा रॅलीत युवकांचा उत्स्फूर्त सहभाग

               आस्थापनेचा परिसर हा पर्यावरणीय दृष्टीने व किटकापासून संरक्षित व स्वच्छ असावा. कच्चे अन्नपदार्थ परवानाधारक/नोंदणीधारक अन्न व्यावसायिकाकडून खरेदी करण्यात यावेत. अन्नपदार्थ तयार करण्यासाठी पिण्यायोग्य पाण्याचा वापर करावा. तसा अहवाल प्राप्त करून घ्यावा. तयार अन्न पदार्थ हे स्वच्छ व सुरक्षित ठिकाणीच व्यवस्थित झाकूण ठेवावेत. आजारी व्यक्तीने अन्न पदार्थ हाताळू नयेत. मिठाई तयार करतांना केवळ फूडग्रेड खाद्यरंगाचा अत्यल्प प्रमाणात वापर करावा. 

    वर्तमानपत्राचा वापर करू नका

    अन्न पदार्थ ग्राहकांना देताना, पॅकींग करताना वर्तमान पत्राचा वापर करू नये. बंगाली मिठाई ही 24 तासांच्या आत खाण्याबाबत ग्राहकांना स्पष्ट निर्देश देण्यात यावेत.  मिठाई बनवितांना तसेच हाताळणाऱ्या  व्यक्तींनी नेहमी डोक्यावर टोपी, मास्क, हातमोजे व स्वच्छ अॅप्रन वापरावे. मिठाईवर वापरला जाणारा सोनेरी व चांदीचा वर्ख योग्य दर्जाचे  व उच्च प्रतीचे असावे. मिठाई हाताळतांना हात वारंवार स्वच्छ धुवावे. FSSAI surveillance festival

    अन्न व्यवसायिकांनी त्यांच्या आस्थापनेचे पेस्ट कंट्रोल करून घ्यावे व त्याचा अभिलेख ठेवावा. आस्थापनेत कार्यरत अन्न हाताळणाऱ्या व्यक्तीची वैद्यकीय तपासणी करून घ्यावी व त्याचा अभिलेख ठेवावा. अन्न आस्थापनेत 25 कर्मचाऱ्यांच्या मागे 1असे अन्न सुरक्षा अधिकारी नियुक्त करावा. FSSAI sugar sweets safety festival

    चंद्रपूर जिल्ह्यातील मिठाई उत्पादक/विक्रेते व हॉटेल व्यावसाविकांनी वरीलप्रमाणे नमुद केलेल्या सर्व सूचनांचे पालन करावे. त्याचप्रमाणे सणासुदीच्या काळात मिठाई व इतर अन्न पदार्थाच्या सेवनामुळे विषबाधासारखी अप्रिय घटना घडणार नाही, याची सर्वांनी दक्षता घ्यावी. तसेच  अन्न पदार्थाच्या दर्जाविषयी ग्राहकांना कोणत्याही प्रकारची तकार असल्यास टोल फ्री  कमांक – १८०० २२२ ३६५ या क्रमांकावर कळवावे, असे आवाहन अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहायक आयुक्त प्र.अ. उमप यांनी केले आहे.