Tag: खरीप हंगाम

  • armyworm attack in rice and cotton crops । लष्करी अळीने चंद्रपूरच्या शेतात उधळण – मदतीसाठी आ. मुनगंटीवारांचा पुढाकार

    armyworm attack in rice and cotton crops

    armyworm attack in rice and cotton crops : चंद्रपूर – चंद्रपूर जिल्ह्यात खरीप हंगामामध्ये धान व कापूस पिकांवर लष्करी अळीचा प्रादुर्भाव झाल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. लष्करी अळीमुळे बाधित झालेल्या जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना सरसकट नुकसानभरपाई देण्यात यावी, अशी ठाम मागणी राज्याचे माजी वने व सांस्कृतिक कार्य मंत्री आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी कृषी राज्यमंत्री श्री. आशिष जयस्वाल यांच्याकडे केली.

    चंद्रपुरात वनविभागाचे नियंत्रण कक्ष सुरु

    चंद्रपूर जिल्ह्यातील लष्करी अळीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांच्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर बुधवारी ४ जून रोजी मंत्रालयात राज्याचे कृषी राज्यमंत्री ना. श्री. आशिष जयस्वाल यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक पार पडली. यावेळी आ. सुधीर मुनगंटीवार, संबधित अधिकारी तसेच दूरदृश्य प्रणालीद्वारे चंद्रपूरचे जिल्हाधिकारी विनय गौडा व जिल्हा कृषी अधिकारी शंकर तोटावार आदिंची उपस्थिती होती. government relief scheme for farmers

    government relief for farmers

    ३७,००० हेक्टर क्षेत्र बाधित

    चंद्रपूर जिल्ह्यात खरीप हंगाम २०२४-२५ मध्ये सुमारे ३७,००० हेक्टर क्षेत्रावर लष्करी अळीमुळे पीक मोठ्या प्रमाणावर बाधित झाले आहे. या आपत्तीजन्य परिस्थितीचा सामना करत असलेल्या शेतकऱ्यांना तात्काळ आणि योग्य नुकसान भरपाई मिळावी, अशी ठाम मागणी राज्याचे माजी वने व सांस्कृतिक कार्यमंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी आढावा बैठकीत केली. लष्करी अळीमुळे हजारो शेतकऱ्यांचे संपूर्ण उत्पन्न संकटात आले. म्हणूनच संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांना सरसकट नुकसानभरपाई देण्यात यावी, अशी आग्रही मागणी आ. मुनगंटीवार यांनी केली.

    या आढावा बैठकीत कृषी राज्यमंत्री जयस्वाल यांनी आ. मुनगंटीवार यांच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत, लवकरच यासंदर्भातील प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर सादर करण्यात येईल, असे आश्वासन दिले. शेतकऱ्यांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे आहे. त्यांना न्याय मिळेल, याची आम्ही पूर्ण काळजी घेऊ, अशी ग्वाही कृषी राज्यमंत्र्यांनी दिली.

  • Authorized seed purchase Chandrapur farmers । खरीप 2025: चंद्रपूर शेतकऱ्यांनो, फसवणूक टाळा, अधिकृत बियाणे घ्या! 🌾

    Authorized seed purchase Chandrapur farmers

    Authorized seed purchase Chandrapur farmers : खरीप हंगामाला आता सुरवात होणार आहे. शेतक-यांच्या दृष्टीने हा अतिशय महत्वाचा हंगाम आहे. त्यामुळे कोणत्याही प्रकारची फसवणूक होऊ नये म्हणून जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी परवानाधारक विक्रेत्याकडून बियाणे, खते खरेदी करावेत. विक्रीचा परवाना असलेल्या कृषी सेवा केंद्रातूनच कृषी निविष्ठा खरेदी करावी, तसेच गावोगावी फिरणाऱ्या एजंटकडून कोणतेही बियाणे घेऊ नये, असे आवाहन कृषी जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार यांनी केले आहे. Kharif season farming tips Maharashtra 2025

    मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते चंद्रपूर जिल्हाधिकारी गौडा यांचा सत्कार

    आधी बियाणाची जात निवडा

    कृषी विभागाने म्हटले की, शेतक-यांनी प्रतीनुसार आणि पिकाच्या गरजेनुसार योग्य बियाण्याची जात निवडावी. याकरिता स्थानिक कृषी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. शेतकयांनी बियाण्यांच्या पॅकेटवर कंपनीचे नाव, लॉट नंबर, उत्पादन तारीख, अंतिम तारीख, वाणाचे नाव, उगवण क्षमतेची टक्केवारी आणि पाकिटावर छापलेले लेबल तपासावे. स्थानिक हवामान, बियाणे स्वच्छ, रोगमुक्त आणि एकसमान आकाराचे असावे. कचरा, खराब बियाणे किंवा  कीड नसावी. बियाण्याला बीजप्रक्रिया केली आहे का? असल्यास कोणत्या औषधाची केली आहे ते तपासा, नसल्यास कोणत्या औषधाची बीजप्रक्रिया करावी, याचा सल्ला कृषीतज्ज्ञांकडून घ्या. अंतिम तारीख पूर्ण झालेले बियाणे खरेदी करू नये, कारण त्याची उगवण क्षमता कमी असते. खरेदीचे अधिकृतचे पक्के बिल घ्या, जेणेकरून तक्रार असल्यास पुरावा मिळेल. Shankar Totawar farming advice

    बियाण्यांची गुणवत्ता टिकवा

                  हायब्रिड बियाणे घेतल्यास त्याच्या लागवडीसाठी विशेष काळजी आणि खते याची माहिती घ्या. खरेदी केलेले बियाणे कोरड्या आणि थंड ठिकाणी साठवा, जेणेकरून त्याची गुणवत्ता टिकेल. शक्य असल्यास स्थानिक कृषी अधिकारी किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेऊन बियाणे निवडा. विकत घेतलेल्या बियाण्याचे पाकीट आणि बिल जपून ठेवावे. विकत घेतलेल्या बियाणांची पाकिटे, अधिकृत बिल आणि थोडेफार बियाणे हंगाम संपेपर्यंत राखून ठेवावे. जेणेकरून तक्रार करावयाची झाल्यास पुरावे म्हणून ग्राह्य मानले जातात. Avoid fake seeds Kharif farming Chandrapur

    पेरणीच्या वेळेस बियाण्याची पिशवी शिलाई केलेल्या बाजूने न फोडता खालील बाजूने फोडावी. जेणेकरून पिशवीवरील टॅग व लेबल चांगले राहतील व ते टॅग आणि लेबल सांभाळून ठेवावे. या गोष्टींची काळजी घेतल्यास चांगल्या प्रतीचे बियाणे मिळेल आणि पिकाचे उत्पादन वाढेल.

    शेतकरी बांधवांनी स्वस्त बियाण्यांच्या अमिषाला बळी न पडता अधिकृत कृषी केंद्रातून बियाणे खरेदी करावेत. त्याची पावती घेऊन तो जपून ठेवावी. शेतकऱ्यांच्या बियाणेसंदर्भात तक्रारी असल्यास त्यांनी कृषी विभागाशी संपर्क साधावा, असे जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी शंकर तोटावार यांनी म्हटले आहे.