Tag: खड्ड्यात रस्ते

  • Pathetic condition of Chandrapur-Ghugus road । खड्ड्यांनी भरलेला चंद्रपूर-घुग्घुस रस्ता! टोल घेऊनही प्रशासन गप्प!

    Pathetic condition of Chandrapur-Ghugus road

    Pathetic condition of Chandrapur-Ghugus road : घुग्घुस, [२९ जुलै, २०२५]: चंद्रपूर-घुग्घुस मुख्य मार्गाची प्रचंड दुरवस्था झाली असून, जागोजागी पडलेल्या जीवघेण्या खड्ड्यांमुळे अपघातांची मालिका सुरूच आहे. या रस्त्यावर नियमित टोल वसुली केली जात असतानाही, रस्त्याची देखभाल आणि दुरुस्तीकडे टोल प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. नुकताच, १६ जुलै रोजी झालेल्या एका भीषण अपघातात आठ महिन्यांच्या चिमुकल्याचा बळी गेल्याने परिस्थितीचे गांभीर्य अधिकच वाढले आहे.

    चंद्रपुरात मेफेड्रोन पावडर सहित दोघांना अटक

    टोल वसुलीचा उद्देश फोल: नागरिकांना त्रास

    घुग्घुसजवळ, धानोरा फाटा परिसरात एक अधिकृत टोल नाका उभारण्यात आला आहे. या टोल नाक्याचा मूळ उद्देश प्रवाशांसाठी चांगल्या रस्त्यांची निर्मिती, योग्य देखभाल आणि आवश्यक सुविधा पुरवणे हा आहे. मात्र, सध्या हा मार्ग केवळ खड्ड्यांसाठी ओळखला जात आहे. मोठ्या प्रमाणात टोल आकारणी करूनही रस्त्याची अवस्था अत्यंत खराब असल्याने दुचाकी आणि चारचाकी वाहनांना अपघात होत आहेत. इतकेच नाही, तर मोठ्या वाहनांनाही या खड्ड्यांमुळे नुकसान सहन करावे लागत आहे. fix Ghuggus road before tol

    निष्पाप चिमुकल्याचा मृत्यू : टोल अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी

    गेल्या आठवड्यात, १६ जुलै रोजी रस्त्यावरील एका मोठ्या खड्ड्यामुळे एक दुचाकीस्वार अपघातग्रस्त झाला. या अपघातात केवळ आठ महिन्यांच्या निरागस बाळाला आपला जीव गमवावा लागला. या घटनेला टोल अधिकारी आणि त्यांच्या निष्काळजीपणाला जबाबदार धरले जात आहे. यापूर्वीही अनेक घटनांमध्ये नागरिकांना गंभीर दुखापती झाल्या आहेत, तर काही अपघातात निरपराध लोकांनी आपले प्राण गमावले आहेत. संतप्त नागरिकांनी टोल अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची आणि जोपर्यंत रस्त्याची पूर्णपणे दुरुस्ती होत नाही, तोपर्यंत टोल वसुली पूर्णपणे बंद करण्याची मागणी केली आहे. demand halt toll till road repair

    पालकमंत्र्यांच्या दौऱ्यापूर्वी केवळ ‘दिखावा’

    काही दिवसांपूर्वी जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. अशोक उईके यांच्या घुग्घुस दौऱ्याच्या नियोजित कार्यक्रमानिमित्त प्रशासन आणि ठेकेदारांनी अचानक सक्रियता दाखवली. त्यांच्या दौऱ्यापूर्वी बसस्थानक परिसर आणि चंद्रपूर-घुग्घुस महामार्गावरील खड्डे पावसाळ्यात तात्पुरत्या स्वरूपात गट्टू आणि गिट्टी टाकून बुजवण्यात आले. नागरिकांनी या तात्पुरत्या उपायाला केवळ ‘दिखावा’ असे संबोधले आहे. मोठ्या अधिकारी येण्यापूर्वीच व्यवस्था दुरुस्त करण्याचा प्रयत्न केला जातो, पण सामान्य जनतेला मात्र रोजच खराब रस्त्यांमुळे होणाऱ्या त्रासाचा आणि अपघातांचा सामना करावा लागतो, असे नागरिकांचे म्हणणे आहे. पालकमंत्र्यांसमोर तात्पुरती सारवासारव करण्याऐवजी, कायमस्वरूपी दुरुस्ती करून अपघातांना आळा घालण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

    कायमस्वरूपी उपायांची आणि भरपाईची मागणी

    स्थानिक रहिवासी आणि वाहनचालक नियमितपणे टोल कर भरत असले तरी, त्यांना बदल्यात तुटलेले रस्ते आणि जीवघेणा धोका मिळत आहे. अनेकवेळा संबंधित विभागाला लेखी तक्रारी करूनही कोणतीही दखल घेतली गेली नाही, असे नागरिकांचे म्हणणे आहे. रस्त्याची दुरुस्ती होईपर्यंत टोल वसुली तात्काळ थांबवावी, अशी त्यांची मागणी आहे. यासोबतच, अपघातात जखमी झालेल्या आणि मृत व्यक्तींच्या कुटुंबीयांना नुकसानभरपाई मिळावी, टोल संचालन करणाऱ्या एजन्सीविरुद्ध कठोर प्रशासकीय कारवाई करावी आणि भविष्यात रस्त्यांची नियमित तपासणी करून तातडीने दुरुस्तीची व्यवस्था सुनिश्चित करावी, अशा मागण्याही नागरिकांनी केल्या आहेत. Chandrapur Ghuggus road accidents toll protest

    Somayya institute of technology

    रास्ता रोको आंदोलन: प्रशासनावर दबाव

    नारायण स्कूल परिसरात मुख्य रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे होणाऱ्या अपघातांविरोधात अनिल डोंगरे यांच्या नेतृत्वाखाली नागरिकांनी ‘रास्ता रोको’ आंदोलन केले. पदोली पोलिसांनी आयव्हीआरसीएल (टोल कंपनी) आणि आंदोलनकर्ते यांच्यात चर्चा घडवून आणल्यानंतर सुमारे २० मिनिटांनी आंदोलन मागे घेण्यात आले. या आंदोलनाने प्रशासनावर दबाव वाढला असून, आता तरी रस्त्याच्या दुरुस्तीसाठी ठोस पावले उचलली जातील का, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

  • why roads are so bad in Chandrapur । चंद्रपुरातील रस्त्यात ‘विकास” खड्ड्यास्वरूपात डोकावतोयं

    why roads are so bad in Chandrapur

    why roads are so bad in Chandrapur : चंद्रपूर – खनिज संपत्ती ने नटलेला चंद्रपूर, राज्यात औद्योगिक जिल्हा म्हणून चंद्रपूरची ओळख आहे, विशेष बाब म्हणजे या जिल्ह्याने राज्याला मुख्यमंत्री, सह अनेक मंत्री दिले मात्र आजही हा जिल्हा उपेक्षित आहे. विकासाच्या नावावर नुसत्या बोंबा जिल्ह्यात कालांतरापासून सुरु आहे. शहर व ग्रामीण भागात अनेक अभियांत्रिकी कॉलेज आहे, मात्र त्या कॉलेजकडे जाणारा रस्ता हा पांदण रस्त्यापेक्षा हि खराब आहे.

    मुलींनी मंगळसूत्र विकलं, मात्र तरी झाली फसवणूक, चंद्रपुरातील धक्कादायक प्रकार

    शेतात जाण्यासाठी बनलेला पांदण रस्ता तरी चांगला असतो मात्र शहरात पायदळ किंवा वाहनाने आपल्याला जायचे असल्यास रस्त्याच्या मधोमध असलेले खड्डे आपल्याला चुकवीत जावे लागते. हि आपल्यासाठी व आपण निवडून दिलेले जनप्रतिनिधी साठी एक लाजिरवाणी बाब आहे. pothole problems in Chandrapur city

    हे मार्ग पांदण रस्त्यापेक्षाही खराब….

    बागला चौक आताचा शहीद हेमंत करकरे चौक ते लालपेठ कडे जाणारा मार्ग, बंगाली कॅम्प ते बस स्थानक, बंगाली कॅम्प ते जुनोना चौक, जटपुरा गेट ते गिरनार चौक या मार्गावरील काही ठिकाणी रस्ता खोल गेला आहे, ज्यावरून वाहन चालविताना नागरिकांना चांगलीच कसरत करावी लागते. शहराकडे येणारे मार्ग अत्यंत बिकट परिस्थितीचे आहे.

    शहरात अमृत योजनेच्या कामामुळे अनेक मार्ग बेजार झाले, अनेक मार्गावर मोठे खड्डे पडले, काही सामाजिक संघटनांनी यावर आंदोलन केले, त्यांनतर प्रशासनाने अखेर रस्ते बनवायला सुरुवात केली, रस्ते बनवून महिना उलटल्यावर पाऊस पडला आणि नवनिर्मित रस्त्यावरील विकास हा खड्ड्याच्या स्वरूपात बाहेर पडला. why newly constructed roads break in rain

    यावर विशेष बाब म्हणजे इंजिनिअर यांना काम वाटपात दुजाभाव केल्या जातो यावरून सार्वजनिक बांधकाम विभागात हाणामारी चा प्रकार सुद्धा घडला होता, याबाबत पोलीस स्टेशनमध्ये तक्रारीही देण्यात आल्या होत्या. म्हणजे इंजिनिअर हे कामासाठी भांडतात, त्यांना काम मिळण्यात दुजाभाव होतो, आणि काम मिळाल्यावर निकृष्ट दर्जाचे काम पूर्ण करीत ते बाजूला होतात.

    जनतेमध्ये हिंमत कधी येणार?

    चंद्रपुरातील जनता रस्त्यावरील खड्ड्यापायी वैतागून गेली आहे, मात्र आवाज उचलण्याची त्यांच्यात हिंमत नाही, अशी अवस्था जर इतर जिल्ह्यात जसे पश्चिम महाराष्ट्र भागात झाली असती तर सामान्य नागरिक जनप्रतिनिधी यांना जाब विचारून कामे पूर्णत्वास आणतो, मात्र चंद्रपुरातील सुजाण नागरिकांमध्ये अशी हिंमत कधी येणार देव जाणे. कारण जनता हि राजकीय पक्षासोबत जुडलेली असतात, कुणाला काय म्हणावं काय करावं हे कळत नसेल कदाचित.

    Somayya institute of technology

    म्हणून म्हणतात ना ५०० में बिक जाओगे तो ऐसी सडक पाओगे…अशी अवस्था आपली झालेली आहे. दरवर्षी या खड्ड्यामुळे अनेक नागरिक अपघाताला बळी पडते, मात्र गेंड्याची कातडी असलेले जनप्रतिनिधी यांना याचा काही एक फरक पडत नाही.

  • Pothole free roads : रस्त्यात खड्डे, पालकमंत्री मुनगंटीवार यांनी अधिकाऱ्यांना धरले धारेवर

    Pothole free roads : रस्त्यात खड्डे, पालकमंत्री मुनगंटीवार यांनी अधिकाऱ्यांना धरले धारेवर

    Pothole free roads गेल्‍या काही दिवसांपासून जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पाऊस पडत आहे. त्‍यामुळे संपूर्ण जिल्ह्यात रस्त्यांवर खड्डे पडले असून अपघातांची शक्‍यता वाढली आहे. या पार्श्‍वभूमीवर राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्‍स्‍य व्‍यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी बैठकीचे आयोजन केले. या बैठकीत पालकमंत्री श्री. मुनगंटीवार यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरत जिल्ह्यातील रस्ते तातडीने खड्डेमुक्त करण्याचे निर्देश दिले.

    समाजकारण : स्वखर्चातून गंगापूर गावात लावला आरो, शिवसेना जिल्हाप्रमुख संदीप गिर्हे यांचा पुढाकार

    या बैठकीला अतिरिक्‍त जिल्‍हाधिकारी श्रीकांत देशपांडे, उपजिल्‍हाधिकारी दगडू कुंभार, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिक्षक अभियंता अरूण गाडेगोणे, कार्यकारी अभियंता मुकेश टांगले व सुनील कुंभे, मनपा आयुक्‍त विपीन पालीवाल, राष्ट्रीय महामार्गाचे कार्यकारी अभियंता श्री. बोबडे, जिल्‍हा परिषदेचे कार्यकारी अभियंता श्री. पेंदे, मुख्‍य अभियंता विजय बोरीकर व संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

    Pothole free roads या बैठकीत श्री. मुनगंटीवार यांनी रस्‍त्‍यांवरील खड्डयांचा आढावा घेतला. जिल्‍हा परिषदेनुसार जिल्‍हयात ओडीआर व व्‍हीआर चे 6 हजार किमीचे रस्‍ते आहेत, ज्‍यापैकी 450 किमी रस्‍त्‍यांचे नुकसान झाले आहे. याच्या तात्‍पुरत्‍या दुरूस्‍तीसाठी 5 कोटी रू. तर स्‍थायी दुरूस्‍तीसाठी 115 कोटी रूपयांची गरज आहे. याकरिता राज्‍याच्‍या ग्रामविकास विभागाला ताबडतोब निधीची मागणी करावी असे आदेश पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले. सिडीवर्कचे 39 रस्‍ते खराब झाले आहे, ज्‍याकरिता 1 कोटी 10 लक्ष रूपये लागतील असे अधिका-यांनी सांगीतले. हा निधी जिल्‍हा नियोजन समितीतून घ्‍यावा, असेही निर्देश श्री. मुनगंटीवार यांनी दिले.

    जिल्‍हयात राष्ट्रीय महामार्गाच्‍या गडचिरोली विभागाच्‍या अखत्‍यारित चंद्रपूर जिल्‍हयात 219 किमी तर नागपूर विभागात चंद्रपूर जिल्‍हयात 50 किमी रस्‍ता आहे. या रस्‍त्‍यांवर मोठमोठे खड्डे पडले असून त्‍याची दुरूस्‍ती कंत्राटदारांकडून पावसाने उसंत घेतल्‍यास 7दिवसात करून घेतल्‍या जाईल, असे त्‍या विभागातर्फे सांगण्‍यात आले. तसेच श्री. मुनगंटीवार यांनी मुल रोडवरील चिचपल्‍ली गावाजवळ ड्रेनेज सिस्‍टीमसाठी नाल्‍या करण्‍याच्‍या कामात विलंब झाल्‍याबद्दल अधिका-यांना खडसावले. त्‍यावर अधिका-यांनी त्‍या कामाचे अंदाजपत्रक बनवून वरिष्‍ठ अधिका-यांकडे पाठविले असल्‍याची माहिती दिली. लवकरात लवकर हे काम पूर्ण करावे, असे निर्देश श्री. मुनगंटीवार यांनी याप्रसंगी दिले.

     सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिका-यांनी दिलेल्‍या माहितीनुसार जिल्‍हयात 686 किमीचे राज्‍य रस्‍ते आहेत ज्‍यापैकी 70 किमी चे रस्‍ते खराब झाले आहेत, तर जिल्‍हयात एमडीआर चे 2116 किमीचे रस्‍ते असून त्‍यापैकी 555 किमी चे रस्‍ते खराब झाले आहेत ज्‍यापैकी 70 टक्‍के काम हे डब्‍ल्‍युबीएम पध्‍दतीने करणार आहे. आमच्‍या विभागाकडे 17.57 कोटी रूपये वार्षीक देखभालीसाठी मंजूर झाले आहेत त्‍यापैकी 74 ठिकाणी 2.28 कोटी रूपये तात्‍पुरता खर्च करण्‍यासाठी घेणार आहोत. हे काम पावसाने उसंत घेतल्‍यावर 15 दिवसात पूर्ण करण्‍यात येईल.

    चंद्रपूर महानगरपालिकेच्‍या अधिका-यांच्‍या माहितीनुसार शहरात 600 किमीचे रस्‍ते आहेत. त्‍यापैकी 400 किमीचे रस्‍ते हे सिमेंटचे आहेत. सध्‍या रस्‍त्‍याच्‍या तात्‍पुरत्‍या दुरूस्‍तीसाठी 40 लाख रूपयांची तर स्‍थायी दुरूस्‍तीसाठी 2 कोटी रूपयांचे तरतूद आहे. पावसामुळे रस्त्यावर खड्डे पडले आहे अशा रस्त्यांना त्वरित दुरुस्ती करण्याचे आदेश श्री. मुनगंटीवार यांनी बैठकीत दिले.

    यावेळी बोलताना पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार म्‍हणाले, बागला चौक ते बाबुपेठ ब्रिज हा रस्‍ता अतिशय खराब झाला असून त्‍याच्‍यासह गावातील मुख्‍य रस्‍ते सिमेंटचे करावेत, ज्‍यामध्‍ये उत्‍तम लायटींग करावी. पालकमंत्री यांनी बेलसनी येथील रस्‍ता न झाल्‍याबद्दल तिव्र नाराजी व्‍यक्‍त केली. या बैठकीत अनेक पदाधिका-यांनी अनेक ठिकाणी रस्ते खराब आहे यासंदर्भात माहिती दिली. श्री. मुनगंटीवार यांनी ताबडतोब रस्ते दुरुस्त करण्याच्या अधिकारी यांना सूचना दिल्या.

     बैठकीला विविध विभागाचे अधिकारी यांच्यासह देवराव भोंगळे, राहूल पावडे, डॉ. मंगेश गुलवाडे, अमर बोडलावार, बंडू गौरकार उपस्थित होते.