tiger attack on cow
tiger attack on cow : कोरपना – चंद्रपूर जिल्ह्यातील कोरपना तालुक्यात वन्यप्राण्यांचा धोका वाढत असून, मांडवा गावाजवळील खडकी मार्गावर एका वाघाने गाईवर हल्ला केल्याची घटना घडली आहे. १३ ऑगस्ट रोजी दुपारी ३.३० च्या सुमारास ही घटना घडली. नामदेव लसंते यांची गाय चराईसाठी या परिसरात आली असताना दबा धरून बसलेल्या वाघाने तिच्या मानेवर हल्ला केला, ज्यामुळे ती गंभीर जखमी झाली.
बल्लारपुरातील अल्पवयीन मुलगा बेपत्ता
वाघाचा बंदोबस्त करा
गायीच्या किंकाळ्या ऐकून परिसरातील शेतकऱ्यांनी आरडाओरड केल्यावर वाघ जंगलाच्या दिशेने पळून गेला. या घटनेमुळे नागरिकांमध्ये मोठी दहशत पसरली आहे. गेल्या महिन्याभरापासून या वाघाने परिसरात अनेक जनावरांवर हल्ले केल्यामुळे ग्रामस्थांनी वन विभागाकडे तातडीने या वाघाचा बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे.

वन विभागाच्या माहितीनुसार, क्षेत्र सहायक कोरपना यांच्या मार्गदर्शनाखाली वनरक्षक निखिल गेडाम आणि कडेल यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला आहे. वन विभागाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले असून, वाघाच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी ट्रॅप कॅमेरे लावण्यात आले आहेत. नागरिकांनी काळजी घ्यावी आणि एकटे बाहेर पडणे टाळावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
