Tag: कायदा व सुव्यवस्था

  • Chandrapur peace committee meeting decisions । 🛑 चंद्रपूर जिल्ह्यातील आगामी सण ‘निर्विघ्न’ होणार! शांतता समितीच्या बैठकीत महत्वाचे निर्णय

    Chandrapur peace committee meeting decisions

    Chandrapur peace committee meeting decisions : चंद्रपूर : आगामी दोन – तीन दिवसांत जिल्ह्यात आषाढी एकादशी आणि मोहर्रम तसेच पुढील महिन्यांपासून गणेशोत्सव व इतर सणांना सुरवात होणार आहे. या दरम्यान जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी तसेच सर्वधर्मीय सण शांततेत पार पाडण्यासाठी प्रशासनाला आपल्या सर्वांच्या सहकार्याची गरज आहे, असे आवाहन अपर जिल्हाधिकारी नितीन व्यवहारे यांनी केले.

    चंद्रपुरात मोठा आर्थिक घोटाळा


    नियोजन भवन येथे जिल्हास्तरीय शांतता समितीच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी अतिरिक्त पोलिस अधिक्षक ईश्वर कातकाडे, सहायक पोलिस अधिक्षक नियोमी साटम, मनपा आयुक्त विपीन पालीवाल, उपमुख्‍ कार्यकारी अधिकारी गिरीश धायगुडे उपस्थित होते.

    प्रत्येकच नागरिक हा विना वर्दीतील पोलिस आहे, असे सांगून अपर जिल्हाधिकारी श्री. व्यवहारे म्हणाले, सर्वांनी आपापल्या कर्तव्याची जाणीव ठेवावी. सोशल मिडीयावर येणा-या अफवांवर विश्वास ठेवू नये. मोहर्रम आणि एकादशी एकत्रित येत असून ग्रामीण स्तरावर जिल्हा परिषद प्रशासनाने संबंधितांना योग्य निर्देश द्यावेत. मोकाट जनावरे, रस्त्यावरील खड्डे याबाबत स्थानिक स्वराज्य संस्था, सा. बा. विभागाने विशेष देणे गरजेचे आहे. peace committee meeting updates

    सण उत्सवाच्या कालावधीत वीज पुरवठा अखंडीत सुरू राहील, याची महाविरतण कंपनीने काळजी घ्यावी. या कालावधीत मद्यविक्रीचा साठा अचानक वाढणार नाही, यासाठी उत्पादन शुल्क विभागाने तपासणी करावी. प्रादेशिक परिवहन अधिकारी व पोलिस विभागाने वाहतूक व्यवस्थेचे योग्य नियेाजन करावे. तसेच आरोग्य विभागाने फिरते वैद्यकीय पथक, पुरेसा औषधीसाठी ठेवावा, अशा सुचना त्यांनी दिल्या.

    अफवांबाबत सर्वांनी अलर्ट राहावे : अतिरिक्त पोलिस अधिक्षक कातकाडे

    सोशल मिडीयाबाबत सर्वांनी दक्ष राहणे गरजेचे असून कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. कृत्रिम बुध्दिमत्तेच्या माध्यमातून आजकाल बनावट पोस्ट करणे शक्य असून, असे आढळल्यास त्वरीत सायबर पोलिस स्टेशनसोबत संपर्क करावा. शांतता राखणे ही प्रत्येकाचीच जबाबदारी आहे. सण आणि उत्सवादरम्यान पुरेसा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात येईल. ध्वनी प्रदुषणाबाबत डीजे ऑपरेटर्सची बैठक घेऊन मर्यादेचे पालन करण्याचे त्यांना सांगितले जाईल. उल्लंघन केल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल. चंद्रपूर जिल्ह्यातील आगामी सण उत्सव शांततेत पार पडतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. how local administration handles festival season security

    यावेळी मनपा आयुक्त विपीन पालीवाल यांनीसुध्दा मनोगत व्यक्त केले. तसेच शांतता समितीच्या उपस्थित सदस्यांनी सुचना केल्या. कार्यक्रमाचे संचालन मंगला घागी यांनी केले. बैठकीला उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, उपविभागीय पोलिस अधिकारी, मुख्याधिकारी, पोलिस पाटील आदी उपस्थित होते.

  • Law and order : 18 जुलै पर्यंत चंद्रपूर जिल्ह्यात कलम 36 लागू

    Law and order : 18 जुलै पर्यंत चंद्रपूर जिल्ह्यात कलम 36 लागू

    Law and order मोहरम हा उत्सव मुस्लीम धर्मीय व काही प्रमाणात हिंदु समाजातर्फे साजरा करण्यात येतो. जिल्ह्यात 16 व 17 जुलै रोजी मोठया प्रमाणात मिरवणुका व धार्मिक कार्यक्रम साजरे करण्यात येणार असल्याने जिल्हयात  कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने तसेच आषाढी एकादशी निमित्त 18 जुलै च्या मध्यरात्रीपर्यंत कलम 36 चे पोटकलम अ ते फ लागू करण्यात आले आहे.

    महत्त्वाचे : चंद्रपूर पोलीस दलातील पोलीस शिपायाने उचलले टोकाचे पाऊल

    मुंबई पोलिस कायद्यान्वये खालील नमुद केल्याप्रमाणे जिल्हा पोलिस अधिक्षक मुम्मका सुदर्शन यांनी सार्वजनिक ठिकाणी वागणुकीबाबत, वाद्य वाजविणेबाबत, सभेचे आयोजन,  मिरवणुक काढण्याबाबत व मिरवणकीचे मार्ग निश्चित करणेबाबत, लाऊडस्पिकर वापरण्याबाबत योग्य निर्बंध व निर्देश देण्याचे अधिकार चंद्रपूर जिल्हयातील सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना प्रदान केले आहे.

    मिरवणुक  व सभेच्या ठिकाणी त्यातील लोकांचे  वागणुकीबाबत योग्य निर्देश देण्याचे अधिकार,  मिरवणुकीचा रस्ता व वेळ निर्धारित करणे तसेच धार्मिक पुजा स्थानाचे जवळ लोकांचे वागणुकीचे निर्बंध घालण्याचे अधिकार, मिरवणुकीस बाधा होणार नाही याबाबतचे आदेश तसेच धार्मिक पुजा स्थानांचे जवळ लोकांचे वागणुकीबर निर्बंध घालण्याचे अधिकार, लाऊडस्पिकर वाजविण्याबर निर्बंध तसेच मर्यादा घालण्याचे अधिकार, कलम 33 ,35,37, ते 40,42,43, व 45 देण्यात आले आहेत.

    Law and order सदर आदेश लागू असताना सभा, मिरवणुक वाद्य वाजविणे, लाऊडस्पिकर वाजविणे, मिरवणुकीत नारे लावणे, मिरवणुकीचा रस्ता व वेळ निर्धारित करण्यासाठी संबंधित ठाणेअंमलदार यांची परवानगी घेण्यात यावी. सर्व बाबतीत पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी तसेच त्यांचेपेक्षा कनिष्ठ दर्जाचे सर्व पोलीस अधिकारी यांनी दिलेल्या निर्देशाचे पालन करावे. सदरआदेश 18 जुलैच्या मध्यरात्री पर्यंत अंमलात राहील, असेही आदेशात नमुद आहे.

  • चंद्रपूर जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने कलम 36 लागू

    News34 chandrapur

    चंद्रपूर  : जिल्ह्यात 15 व 16 ऑक्टोबर रोजी धम्मचक्र अनुप्रवर्तन दिन, तसेच दि. 15 ते 27 ऑक्टोबर 2023 पर्यंत नवरात्रोत्सव (दसरा,रावणदहन/पुजापाठ, कोजागिरी, धम्मचक्र अनुप्रवर्तन दिन) तसेच दि. 21 ऑक्टोबर 2023 रोजी क्रांतीवीर बाबूराव पुलेश्वर शेडमाके यांचा पुण्यतिथी कार्यक्रम साजरा करण्यात येत आहे. त्यादृष्टीने जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी म्हणून दि. 15 ऑक्टोबरच्या रात्री 12 वाजतापासून ते 29 ऑक्टोबर रोजी रात्री 12 वाजेपर्यंतच्या कालावधीत महाराष्ट्र पोलिस अधिनियम 1951 चे कलम 36 लागू करण्यात येत आहे.

     

    या कालावधीत सार्वजनिक शांततेला व सुव्यवस्थेला बाधा पोहोचू नये, तसेच सार्वजनिक ठिकाणी वागणुकीबाबत, वाद्य वाजविण्याबाबत,सभेचे आयोजन व मिरवणूक काढण्याबाबत, त्याठिकाणी रस्ते निश्चित करण्याबाबत, लाऊड स्पीकर वापरण्याबाबत योग्य निर्बंध व निर्देश देण्याचे अधिकार चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व पोलिस ठाणे प्रभारी अधिकारी यांना प्रदान करण्यात येत आहे, असे जिल्हा पोलीस अधीक्षक रविंद्रसिंह परदेशी यांनी कळविले आहे.

     

    हे आहेत पोलिस ठाणे प्रभारी अधिकाऱ्यांचे अधिकार

    मिरवणूक व सभेच्या ठिकाणी त्यातील लोकांच्या वागणुकीबाबत योग्य निर्देश देण्याचे अधिकार, मिरवणुकीचा रस्ता व वेळ निर्धारित करणे तसेच धार्मिक पूजास्थानाच्या जवळ लोकांच्या वागणुकीस निर्बंध घालण्याचे अधिकार, मिरवणुकीस बाधा होणार नाही याबाबतचे आदेश तसेच धार्मिक पूजास्थळी लोकांच्या वागणुकीवर निर्बंध घालण्याचे अधिकार, सार्वजनिक रस्त्यावर तसेच सार्वजनिक ठिकाणी वाद्य वाजवणे, गाणी गाणे, ढोल ताशे वाजविणे आदी निर्बंध घालण्याचे अधिकार, रस्ते व इतर सर्व सार्वजनिक ठिकाणी सुव्यवस्था ठेवण्यासाठी निर्देश देण्याचे अधिकार, सार्वजनिक ठिकाणी, रस्त्यावर लाऊड स्पीकर वाजविण्यावर निर्बंध तसेच मर्यादा घालण्याचे अधिकार, तसेच कलम 33, 35,37 ते 40,42,43 व 45 मुंबई पोलिस अधिनियमान्वये काढण्यात आलेल्या आदेशाची अंमलबजावणी करण्याचे व सूचना देण्याचे अधिकार प्रदान करण्यात येत आहे.

     

    सदर आदेश लागू असतांना सभा, मिरवणुकीत वाद्य वाजवणे, लाऊड स्पीकर वाजविणे, मिरवणुकीत नारे लावणे, मिरवणुकीचा रस्ता व वेळ निर्धारित करण्यासाठी संबंधित ठाणे अंमलदार यांची परवानगी घ्यावी. सर्व बाबतीत पोलिस ठाणे प्रभारी अधिकारी तसेच त्यांच्यापेक्षा कनिष्ठ दर्जाचे सर्व पोलिस अधिकारी यांनी दिलेल्या निर्देशांचे पालन करावे. सदर आदेश दि. 15 ऑक्टोबरचे रात्री 12 वाजेपासुन ते दि. 29 ऑक्टोबर 2023 च्या रात्री 12 वाजेपर्यंत अंमलात राहील,असे पोलीस अधिक्षक रविंद्रसिंह परदेशी यांनी निर्गमित केलेल्या आदेशात नमूद आहे.

  • बल्लारपुर पोलिसांचा रूट मार्च

    News34 chandrapur रमेश निषाद

    बल्लारपुर रमेश निषाद

    दिनांक 23 सितंबर रोजी पोलीस स्टेशन बल्लारपूर येथील गणेश विसर्जन ईद-ए-मिलाद सन उत्सव दरम्यान सार्वजनिक शांतता राहावी कसलाही अनुचित प्रकार घडू नये याकरिता सकाळी 11:35 वाजता पासून पोलीस स्टेशन बल्लारपूर येथील अधिकारी कर्मचारी होमगार्ड एसआरपीएफ प्लाटून यांचे सह पोलीस स्टेशन बल्लारपूर ते आंबेडकर पुतळा, जुना बस स्टॉप, गोर्शिया मझिद .डॉ रजनी हजारे हॉस्पिटल, नवीन बस स्टॉप, गणपती वार्ड ,गोल पुलिया, विसर्जन घाट व विसर्जन रोड नी जामा मस्जिद ,मदिना मझीद, सात नल पोलीस चौकी पर्यंत रोड मार्च करण्यात आला.

     

    रोड मार्चमध्ये पोलीस स्टेशन बल्लारशा येथील पो नी पाटिल, सपोणी रासकर पोउपनी शाह, सलीम शेख, नैताम मॅडम, ४४ कर्मचारी 4 महिला तसेच होमगार्ड 29, 6महिला होमगार्ड एस आर पी एफ प्लाटून चे ए1 अधिकारी psi दाबेराव 22 कर्मचारी असे रोड मार्च मध्ये हजर होते.

     

    सदरचा रोड मार्ग हा एक वाजता पोलीस चौकी वस्ती विभाग येथे विसर्जन करण्यात आला सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांना पाण्याची व्यवस्था करण्यात आली यावेळी सर्वत्र शांतता राहिली.

  • चंद्रपूर जिल्ह्यात कलम 36 लागू

    News34 chandrapur

    चंद्रपूर  : जिल्ह्यात 14 सप्टेंबर 2023 रोजी पोळा, 15 सप्टेंबर रोजी तान्हा पोळा, तसेच दि. 19 सप्टेंबर पासून गणेशोत्सवास सुरुवात होत आहे. त्यासोबतच अनंत चतुर्दशी व ईद-ए-मिलाद हे महत्वाचे धार्मिक सण/ उत्सव 28 सप्टेंबर रोजी म्हणजेच एकाच दिवशी येत असल्याने त्यादृष्टीने कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी म्हणून दि. 13 सप्टेंबरच्या रात्री 12 वाजतापासून ते दि. 17 सप्टेंबरच्या रात्री 12 वाजेपर्यंतच्या कालावधीत तसेच दि. 19 सप्टेंबरच्या रात्री 12 वाजतापासून ते दि. 1 ऑक्टोंबर 2023 च्या रात्री 12 वाजेपर्यंतच्या कालावधीत महाराष्ट्र पोलिस अधिनियम 1951 चे कलम 36 लागू करण्यात आले आहे.

     

    या कालावधीत सार्वजनिक शांततेला व सुव्यवस्थेला बाधा पोहोचू नये, तसेच सार्वजनिक ठिकाणी वागणुकीबाबत, वाद्य वाजविण्याबाबत, सभेचे आयोजन व मिरवणूक काढण्याबाबत, त्याठिकाणी रस्ते निश्चित करण्याबाबत, लाऊड स्पीकर वापरण्याबाबत योग्य निर्बंध व निर्देश देण्याचे अधिकार चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व पोलिस ठाणे प्रभारी अधिकारी यांना प्रदान करण्यात येत आहे, असे जिल्हा पोलीस अधीक्षक रविंद्रसिंह परदेशी यांनी कळविले आहे.

     

    हे आहेत पोलिस ठाणे प्रभारी अधिकाऱ्यांचे अधिकार:

    मिरवणूक व सभेच्या ठिकाणी त्यातील लोकांच्या वागणुकीबाबत योग्य निर्देश देण्याचे अधिकार, मिरवणुकीचा रस्ता व वेळ निर्धारित करणे तसेच धार्मिक पूजास्थानाच्या जवळ लोकांच्या वागणुकीस निर्बंध घालण्याचे अधिकार, मिरवणुकीस बाधा होणार नाही याबाबतचे आदेश तसेच धार्मिक पूजास्थळी लोकांच्या वागणुकीवर निर्बंध घालण्याचे अधिकार, सार्वजनिक रस्त्यावर तसेच सार्वजनिक ठिकाणी वाद्य वाजवणे, गाणी गाणे, ढोल ताशे वाजविणे आदी निर्बंध घालण्याचे अधिकार, रस्ते व इतर सर्व सार्वजनिक ठिकाणी सुव्यवस्था ठेवण्यासाठी निर्देश देण्याचे अधिकार, सार्वजनिक ठिकाणी, रस्त्यावर लाऊड स्पीकर वाजविण्यावर निर्बंध तसेच मर्यादा घालण्याचे अधिकार, तसेच कलम 33, 35,37 ते 40,42,43 व 45 मुंबई पोलिस अधिनियमान्वये काढण्यात आलेल्या आदेशाची अंमलबजावणी करण्याचे व सूचना देण्याचे अधिकार प्रदान करण्यात येत आहे.

     

    सदर आदेश लागू असतांना सभा, मिरवणुकीत वाद्य वाजवणे, लाऊड स्पीकर वाजविणे, मिरवणुकीत नारे लावणे, मिरवणुकीचा रस्ता व वेळ निर्धारित करण्यासाठी संबंधित ठाणे अंमलदार यांची परवानगी घ्यावी.

     

    सर्व बाबतीत पोलिस ठाणे प्रभारी अधिकारी तसेच त्यांच्यापेक्षा कनिष्ठ दर्जाचे सर्व पोलिस अधिकारी यांनी दिलेल्या निर्देशांचे पालन करावे. सदर आदेश दि. 13 सप्टेंबरचे रात्री 12 वाजेपासुन दि. 17 सप्टेंबर 2023 च्या रात्री 12 वाजेपर्यंत तर दि. 19 सप्टेंबरचे रात्री 12 वाजेपासुन ते दि. 1 ऑक्टोंबर 2023 च्या रात्री 12 वाजेपर्यंतच्या कालावधीपर्यंत अंमलात राहील. असे पोलीस अधिक्षक रविंद्रसिंह परदेशी यांनी कळविले आहे.