Tag: ऑपरेशन सिंदूर

  • Tiranga Yatra in Ballarpur । ‘मिशन सिंदूर’च्या यशानंतर बल्लारपूरमध्ये ७ किमी तिरंगा रॅली!

    Tiranga Yatra in Ballarpur

    Tiranga Yatra in Ballarpur : बल्लारपूर – देशाच्या सुरक्षेसाठी प्राण पणाला लावून भूदल, नौदल आणि वायुसेनेतील जवान सेवा करतात. देशावर कुठल्याही आतंकवादी दृष्ट प्रवृत्तींना चोख प्रत्त्युत्तर देण्यासाठी आपले जवान सदैव सज्ज असतात. या जवानांच्या समर्पित सेवेमुळेच देश सुरक्षित आहे, असे गौरवोद्गार राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी काढले.

    खासदार धानोरकर यांच्या पाठपुराव्याने बससेवा पूर्ववत

    ‘मिशन सिंदूर’च्या यशानंतर भारतीय सैन्याच्या सन्मानार्थ बल्लारपूर शहरात सात किलोमिटर लांब तिरंगा यात्रा काढण्यात आली. या यात्रेच्या शुभारंभाप्रसंगी आ.श्री. सुधीर मुनगंटीवार बोलत होते. Sudhir Mungantiwar speech today

    देशभक्तीने दुमदुमले बल्लारपूर

    बल्लारपूर येथील काटा गेट डब्लूसीएल येथून तिरंगा यात्रेला सुरुवात झाली. तिरंगा यात्रेदरम्यान बल्लारपूर शहर ‘भारत माता की जय’ आणि ‘वंदे मातरम्’ च्या जयघोषाने दुमदुमले. सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी,सर्वधर्मीय समाज बांधव आणि आबालवृद्ध नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

    sudhir mungantiwar speech today

    बल्लारपूरच्या रस्त्यांवर आज राष्ट्रध्वज तिरंगा हातात घेऊन देशभक्तीचा जनसागर उसळला. काटा गेटपासून सुरू झालेल्या भव्य तिरंगा रॅलीत सर्व सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी, सर्वधर्मीय बांधव आणि मोठ्या संख्येने आबालवृद्ध नागरिक ‘वंदे मातरम्’ आणि ‘भारत माता की जय’च्या घोषात उत्स्फूर्तपणे सहभागी झाले. काटा गेट डब्लू.सी.एल येथून सुरुवात झालेली तिरंगा यात्रा महात्मा गांधी चौक-गोल पुलिया- डॉ आंबेडकर चौक मार्गे नवीन मुख्य बसस्थानक येथे पोहोचली व येथे यात्रेचे समापन झाले. Indian Army appreciation rally

    रॅलीत लहान ते वृद्धांचा सहभाग

    प्रारंभी आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर, राष्ट्रपिता महात्मा गांधी व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून अभिवादन केले. हातात राष्ट्रध्वज, घोषणांनी आसमंत दुमदुमवणारे तरुण, महिलांची सक्रिय उपस्थिती, विद्यार्थ्यांचा उत्साही सहभाग हे या यात्रेचे विशेष आकर्षण ठरले. ‘भारत माता की जय’, ‘वंदे मातरम्’, ‘जय जवान’ अशा घोषणांनी वातावरण भारावून गेले. तिरंगा यात्रेच्या माध्यमातून नागरिकांनी देशभक्तीचे दर्शन घडवले. लहानग्यांपासून तर वृद्धांपर्यंत प्रत्येकाने या यात्रेत सहभाग घेतला.

    Powered by myUpchar

    ही फक्त यात्रा नव्हे, तर आपल्या शुरवीर भारतीय सैनिकांप्रती कृतज्ञता आहे . देशासाठी आयुष्य अर्पण करणाऱ्या प्रत्येक सैनिकांच्या पाठिशी संपूर्ण देश खंबीरपणे उभा आहे, याची प्रचिती तिरंगा यात्रा देते, असेही यावेळी आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार म्हणाले.

    माजी सैनिकांचा सत्कार

    श्री.पांडुरंग हेमके, वीर पत्नी संगीताताई इंगळे, श्री सहदेव रामटेके, माजी सैनिक विजय शेंडे, मनोज ठेंगणे, हवालदार वीर बहादुर सिंग, जगदीश सिंग,मनोज यादव, श्री विश्वेश्वर सरोज, जन बहादुर सिंग सरोज आदी माजी सैनिकांचा सत्कार आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते करण्यात आला.

    सर्वधर्मीय गुरूंचा सत्कार

    भंतेजी भागीरथ, अल्ताफ भाई, मनीषजी महाराज, सादिक जवेरी, सुनील पास्टर, दलजीत सिंह कलसी आदी सर्व धर्मीय गुरुंचा सत्कार आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते करण्यात आला.

  • Tiranga Rally । ‘ऑपरेशन सिंदूर’च्या यशानंतर देशप्रेमाचा महासागर — चंद्रपूरमध्ये भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन!

    Tiranga Rally

    Tiranga Rally : चंद्रपूर – ‘ऑपरेशन सिंदूर’च्या यशानंतर (indian army) भारतीय सैन्याच्या शौर्य, धैर्य आणि बलिदानाला मानवंदना देण्यासाठी नॅशनल सेक्युटीसाठी नागरिक या उपक्रमा अंतर्गत आमदार किशोर जोरगेवार यांच्या संयोजनातून चंद्रपूर शहरात भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. ही रॅली शनिवार दिनांक 17 मे रोजी सायंकाळी 5 वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून प्रारंभ होणार असून, देशप्रेमी नागरिकांनी मोठ्या संख्येने यात सहभागी होण्याचे आवाहन आमदार जोरगेवार यांनी आयोजित पत्रकार परिषदेतून केले. Indian army bravery celebration rally

    त्या नरभक्षक वाघिणीचा बछडा अखेर जेरबंद

       सदर पत्रकार परिषदेला ओबीसी नेते अशोक जिवतोडे, दशरथसिंह ठाकूर, तुषार सोम, माजी महापौर अंजली घोटेकर, प्रकाश देवतळे, माजी नगर सेवक बलराम डोडाणी, सुभाष कासनगोट्टूवार, वंदना हातगावकर, सविता दंढारे आदींची उपस्थिती होती.

    लष्कराच्या शौर्याला सलाम करण्यासाठी सामील व्हा

    पत्रकार परिषदेत बोलताना आमदार किशोर जोरगेवार म्हणाले की, जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय लष्कराने ‘ऑपरेशन सिंदूर’च्या माध्यमातून पाकिस्तानला ठोस आणि चोख प्रत्युत्तर दिले. या कारवाईमध्ये पाकिस्तानातील अनेक दहशतवादी तळ उद्ध्वस्त करण्यात आले असून, संपूर्ण देशवासीयांच्या मनात गर्व आणि अभिमानाची लहर उसळली आहे. या पराक्रमाची साक्ष देणाऱ्या आणि लष्कराच्या शौर्याला मानाचा मुजरा करणाऱ्या तिरंगा रॅलीचे आयोजन चंद्रपूरमध्ये (chandrapur) करण्यात आले आहे.

    ही रॅली केवळ एक मिरवणूक न राहता, ती देशप्रेम, राष्ट्रीय एकता आणि भारतीय लष्कराविषयी कृतज्ञता व्यक्त करणारे प्रभावी माध्यम ठरणार आहे. प्रत्येकाच्या हातात तिरंगा आणि मनात मातृभूमीबद्दलचा अभिमान असावा, हीच या रॅलीमागची भावना असल्याचे आमदार जोरगेवार यांनी स्पष्ट केले.

    Powered by myUpchar

    रॅलीची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून होईल. यानंतर ही रॅली गांधी चौक, जटपूरा गेट मार्गे पुन्हा छत्रपती शिवाजी महाराज चौकात परत येईल आणि तेथे रॅलीचा समारोप करण्यात येईल. रॅली दरम्यान देशभक्तीपर घोषणांनी शहरात देशप्रेमाचे वातावरण निर्माण होणार आहे. तरुणाईचा, महिला मंडळांचा, विविध शैक्षणिक संस्था, स्वयंसेवी संस्था आणि चंद्रपूरकर नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग या रॅलीला ऐतिहासिक स्वरूप प्राप्त करून देईल, असा विश्वास आमदार जोरगेवार यांनी व्यक्त केला. या देशभक्तीपूर्ण रॅलीत सहभागी होऊन आपल्या लष्कराच्या शौर्याला अभिवादन करण्यासाठी सर्व नागरिकांनी या प्रेरणादायी उपक्रमात भाग घ्यावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

  • Hansraj Ahir Operation Sindoor । ऑपरेशन सिंदूर: चंद्रपूरमधून हंसराज अहीर यांचे भारताच्या विजयाचे कौतुक! 🚨

    Hansraj Ahir Operation Sindoor

    Hansraj Ahir Operation Sindoor : चंद्रपूर: पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा ‘‘ऑपरेशन  सिंदुर’’ सर्जिकल स्ट्राईक करुन  भारताने बदला घेत पाकिस्तान व दहशतवादी संघटनांना सडेतोेड उत्तर दिल्याबद्दल पुर्व केंद्रीय गृहराज्यमंत्री तथा राष्ट्रीय  मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर यांनी  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील सरकार व तिन्ही सैन्यदलांचे अभिंनदन करुन याविशेष कामगीरीवर गर्व व्यक्त केला आहे. Hansraj Ahir on surgical strike

    चंद्रपूर जिल्ह्यात पोलिसांना न घाबरणारे सट्टेबाज, वाचा बातमी

    हिशोब चुकता


    कोटली, मुज्जफराबाद व बहावलपुर सह 9 आतंकी तळांना लक्ष्य करीत एअर स्ट्राईक द्वारे शेकडो आतंकवाद्यांचा खातमा करुन भारताने आपल्या भगिनींच्या पुसल्या गेलेल्या कुंकवाचा हिशेब चुकता केला. दहशतवादी संघटनांनी पुन्हा पुन्हा भारताच्या सीमांकडे करड्या नजरेने बघण्याचे धाडस करु नये अन्यथा जगाच्या नकाशावरुनच पुसुन टाकू हा पाकिस्तानला दि. 07 मे रोजी पहाटे केलेल्या सर्जिकल स्ट्राईक मधुन दिलेला थेट इशाराच आहे.


    ‘‘देश प्रथम’’ ही मा. नरेंद्र मोदीजींची निती व स्पष्ट  भुमिका आहे. देशाविरुद्ध रचल्या जाणारे कोणतेही कट कारस्थान सहन केले जाणार नाही, त्याची किंमत वसुल करण्याची धमक मोदी सरकारची आहे. आमचे सैन्यदल यासाठी सक्षम आहेत. हेच या सर्जिकल स्ट्राईक ने पुन्हा एकदा दाखवून दिले. अत्यंत नियोजनबध्द व मानवीय दृश्टीकोनाचा परिचय देत पाकिस्तानी नागरीक व तेथील सैन्यदलास इजा न पोहचविता भारताने दहशतवादाविरुध्द केलेला सर्जिकल स्ट्राईक हा भारताचा ऐतिहासिक विजय असल्याचे पुर्व केंद्रीय गृहराज्यमंत्री अहीर यांनी म्हटले आहे.