accidental death due to electric wire
accidental death due to electric wire : कोरपना – तालुक्यातील सावलहिरा येथील एका शेतशिवारात जिवंत विद्युत तारांचा स्पर्श होऊन एका युवकाचा मृत्यू झाल्याची घटना बुधवार दिनांक २५ रोजी सकाळ अकरा वाजता च्या सुमारास घडली.
आनंद प्रफुल जोगी (१८) रा.सावलहिरा असे मृतकाचे नाव आहे. मंगळवारी झालेल्या वादळामुळे जगदीश धोटे यांच्या मालकीचे असलेल्या शेतात विद्युत खांब पडून विद्युत तारा लोंबकळत होत्या. प्रफुल जोगी यांनी धोटे यांचे शेत ठेके पद्धतीने केले असल्याने त्यांचा मुलगा आनंद हा बुधवारी सकाळी अकरा वाजता टीबन्या साठी गेला होता.
वर्ष 1975 ची आणीबाणी पुन्हा, चंद्रपुरात प्रदर्शन
विद्युत प्रवाह सुरू आणि
विद्युत तारा लोंबकळल्याची कालची घटना असल्याने विद्युत प्रवाह बंद करण्यात आला आहे असे समजून त्याने टीबन्याला सुरुवात केली. परंतु विद्युत प्रवाह सुरू असल्याने त्याच्या पायाला विजेचा जोरदार धक्का बसला. यातच तो त्यावर पडून त्याचा जिवंत ताराला चिपकून मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. याबाबतची माहिती पोलिसांना दिली. त्यांनी घटनास्थळी येऊन घटनेचा पंचनामा केला आहे. शव विच्छेदनसाठी मृतदेह ग्रामीण रुग्णालय कोरपणा येथे पाठवण्यात आला.
सदर घटनेचा तपास पोलिस करीत आहे. प्रफुल जोगी यांना आनंद हा एकुलता एक मुलगा असल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
