Irai dam gates opening alert villages : चंद्रपूर ११ सप्टेंबर २०२५ – काही दिवसांची विश्रांती घेतल्यावर चंद्रपूर जिल्ह्यात पावसाचे जोरदार पुनरागमन झाल्याने जिल्ह्यातील काही भाग हा अस्तव्यस्त झाला आहे. मागील ३ दिवसापासून चंद्रपूर जिल्ह्यात मुसळधार पावसाला सुरवात झाली. त्यामुळे वर्धा व इरई नदीचा जलस्तर वाढल्याने काही ठिकाणी पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली आहे.
ग्रामीण व शहरी भागात पावसाचा जोर वाढल्याने वर्धा नदीचा जलस्तर वाढल्याने चंद्रपूर-भोयेगाव मार्ग पूर्णतः बंद झाला, यामुळे या मार्गावरील वाहतूक बंद झाल्याने वाहनाच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. ११ सप्टेंबर रोजी दुपारपासून पावसाचा जोर वाढल्याने सदर मार्ग हा बंदच आहे. Chandrapur weather alert for rising river water levels
३ दिवसांपासून येत असलेल्या पावसाने इरई धरणाच्या पातळीत वाढ झाल्याने गुरुवारी ११ सप्टेंबर रोजी सकाळी इरई धरणाचे तीन दरवाजे ०.२५ मीटरने उघडण्यात आले होते. दुपारी पुन्हा दोन दरवाजे ०.२५ मीटरने उघडण्यात आले. धरण क्षेत्रात पावसाचा जोर वाढल्यास पुन्हा काही दरवाजे उघडण्यात येईल असे प्रशासनाच्या वतीने सूचित करण्यात आले आहे.
नागरिकांनो सतर्क रहा
इरई धरणाचे दरवाजे उघडण्यात आल्याने नदी काठावरील पद्मापूर, किटाळी, मासाळा, पडोली, यशवंतनगर, दाताला, आरवट, नांदगाव पोडे, भटाळी, वडोळी, चिचेली, कढोळी, पायली, खैरगाव, चांदसूरला, विचोडा बुजुर्ग, आंभोरा, लखमापूर, कोसारा, खुटाळा हडस्ती, चारवट, कवटी, चेक तिरवंजा, देवाळा, चोराळा, हिंगणाळा, चिंचोली, मिनगाव, वडगाव, चंद्रपूर, माना या गावातील नागरिकांनी सतर्क रहावे असा इशारा प्रशासनाच्या वतीने देण्यात आला आहे.
heavy rainfall chandrapur : चंद्रपूर – आठवडाभरानंतर चंद्रपूर जिल्ह्यात पावसाने जोरदार १३ ऑगस्ट रोजी जोरदार कमबॅक केले, रात्रीपासून सुरु झालेला मुसळधार पावसाने जिल्ह्यात अनेक ठिकाणी जनजीवन अस्तव्यस्त झाले होते. मागील २४ तासात चंद्रपूर जिल्ह्यात सरासरी १८.३ मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. जिल्ह्यातील राजुरा तालुक्यात अनेक मार्ग बंद झाले तर कोरपना तालुक्यात सुद्धा हीच परिस्थिती होती. जिल्ह्यात अनेक ठिकाणी पावसाचे पाणी घरात शिरले तर शाळेवर झाड कोसळल्याने विद्यार्थी किरकोळ जखमी झाले. यामध्ये कसलीही जीवितहानी झाली नाही.
शाळेवर कोसळले झाड
भद्रावती आयुध निर्मणी वसाहतीमध्ये शाळेचे वर्ग सुरू असताना शाळेच्या दोन इमारती मध्ये असलेल्या वृक्ष कोसळला त्याची एक फांदी वर्ग पाच च्या खोलीवर कोसळल्याने वर्गातील चार ते पाच विद्यार्थी किरकोळ जखमी झाल्याची घटना दिनांक 13 ला शहरातील आयुध निर्माण चांदा वसाहतीत घडली. किरकोळ जखमी झालेल्या विद्यार्थ्यांवर आयुध निर्माणी वसाहतीतील दवाखान्यात उपचार करण्यात आले. Chandrapur heavy rain August
केंद्रीय विद्यालयाचे काही वर्ग वसाहतीतील टाईप थ्री सेक्टर फोर या भागातील बंद असलेल्या जिल्हा परिषद शाळेच्या इमारतीत घेण्यात येत आहे. सदर शाळेच्या दोन इमारतीच्या मध्ये एक मोठे झाड आहे. आज सकाळपासून पाऊस येत असल्याने हे जीर्ण झाड कोसळले व त्याची एक मोठी फांदी वर्ग पाच च्या खोलीवर कोसळली. यामुळे सिमेंट ऍसबेसटास टिनाचे शेड तुटून त्याचे तुकडे खाली पडल्याने चार ते पाच विद्यार्थ्यांना किरकोळ इजा झाली. मात्र सर्व विद्यार्थी आपापल्या वर्गात असल्याने मोठा अनर्थ टळला.
वरोरा व परिसरात दडी मारलेल्या पावसाने आपली जोरदार हजेरी लावत जवळपास १२ ऑगस्ट चे रात्रौ आणि १३ ऑगस्ट ला दुपारी एक वाजेपर्यंत मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत केले.शहरातील पाणी वाहून नेणाऱ्या नाल्या ह्या पॅक केल्यामुळे वाहतुकीच्या रस्त्यांवर पाणी साचून अक्षरशः तलाव निर्माण झाले असल्याचे नागरिकांकडून बोलल्या जात आहे.त्यामुळे पूर्णतः जनजीवन विस्कळित झाले. heavy rainfall chandrapur
शहरातील शुभम मंगल कार्यालय व कर्मवीर शाळा या मध्यंतरी रस्त्यांवर , कॉलरी वॉर्ड,तसेच अलीशान मंगल कार्यालय ते आझाद वॉर्ड कडे जाणारा मार्ग हे तिन्ही मार्गावर तलावाचे स्वरूप निर्माण झाले त्यामुळे वाहतूक पूर्णतः विस्कळीत झाली . कॉलरी वॉर्ड मध्ये वरोरा साजा च्या तलाठी व महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांनी आपल्या जबाबदारीचे भान ठेऊन परिस्थितीची पाहणी केली असल्याची माहिती आहे.
राजुरा शहरालगतचा बामणवाडा परिसर अक्षरशः पाण्याखाली! कालपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने स्नेहदीप नगर, स्टेला मॅरीस स्कूल आणि बामणवाडातील आजूबाजूच्या वस्त्यांमध्ये हाहाकार माजला आहे. परिसरात जिकडे तिकडे पाणीच पाणी, रस्ते चिखलमय झाले, शाळेत जाणाऱ्या लहान मुलांना , नागरिकांना जीव धोक्यात घालावा लागत आहे.
यामागे फक्त पाऊसच नाही तर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि प्रशासनाचा निष्काळजी व नियोजनशून्य कारभार हेही तितकेच जबाबदार आहेत. राष्ट्रीय महामार्ग एन.एच. ९३०(ड) च्या बांधकामामुळे पावसाळ्यात पाणी नैसर्गिक प्रवाहाऐवजी थेट वस्त्यांकडे वळते. चुकीचे ड्रेनेज, बंद नाले आणि बामणवाडा तलावाचे अयोग्य खोलीकरण यांनी परिस्थितीचे रूपांतर आपत्तीमध्ये केले आहे.
राजुरा तालुका बंद असलेली मार्ग
टेम्बुरवाही ते विरूर स्टे. रस्ता अतिवृष्टी व सततच्या पाण्यामुळे बंद, मानोली बूज या गावात जाणारा रस्ता बंद, सुमठाना या गावात जाणारा रस्ता बंद व निर्ली ते धाडशी जाणारा रस्ता बंद. rain impact road closures
कोरपना तालुक्यातील स्थिती
शिवनारंडा ते कढोली, कढोली ते आवारपूर, नारंडा ते लोणी रस्ते बंद.
इरई धरणाचे दोन दरवाजे उघडले
जिल्ह्यात सुरु असलेल्या पावसामुळे इरई धरणाच्या पातळीमध्ये वाढ झाल्याने धरणाचे क्रमांक १ व ७ हे दरवाजे ०.२५ मीटर ने उघडण्यात आले आहे. नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क रहावे असे आवाहन. Erai dam gate opening Chandrapur