Tag: इको पार्क

  • eco park project in Chandrapur city । चंद्रपुरात जुन्या कोळसा खाणीचे रूपांतर होणार हरित स्वर्गात – पहा काय होणार बदल!

    eco park project in Chandrapur city

    सावनेरच्या धर्तीवर चंद्रपूरला मिळणार निसर्गसंपन्न ईको पार्क – आमदार जोरगेवार यांची संभावित जागेची पाहणी

    eco park project in Chandrapur city : चंद्रपूर (१७ जून २०२५) – शहरात पर्यावरणपूरक पर्यटन आणि नागरीकांसाठी निसर्गस्नेही जागा उपलब्ध व्हावी या हेतूने सावनेर येथील ईको पार्कच्या धर्तीवर चंद्रपूरमध्ये ईको पार्क उभारण्याच्या दृष्टीने आमदार किशोर जोरगेवार यांनी पुढाकार घेतला असून आज त्यांनी वेकोलीच्या अधिका-यांसह बैठक घेत संभावित ईको पार्क च्या जागेची पाहणी करत ईको पार्क साकारण्यासाठी शुक्ष्म नियोजन करत प्रक्रिया गतिशल करण्याचे निर्देश दिले आहे. restoration of coal mine areas for tourism

    चंद्रपुरातील रिसॉर्टमध्ये युवकांचा तांडव, व्यवस्थापकावर केला चाकू हल्ला

                   यावेळी वेकोलीचे योजना अधिकारी प्रिया शंकर विना, अमला खनन ऑफिसर उज्जल बोढे, लालपेठ उप क्षेत्रीय प्रबंधक मुस्ताक अहमद, पर्यवेक्षक अधिकारी शुक्ला, सुभाष ताजने, भारतीय जनता पार्टीचे महानगर अध्यक्ष सुभाष कासनगोट्टूवार, प्रदेश निमंत्रीत विशेष सदस्य तुषार सोम, माजी शहर अध्यक्ष दशरथसिंह ठाकूर, भाजप नेते प्रकाश देतवळे, बलराम डोडाणी, रवी गुरनुले, मनोज पाल, माजी नगर सेवक प्रदिप किरमे, अजय जयस्वाल, नामदेव डाहूले, अमोल शेंडे, रंजन ठाकुर, सुमित बेले आदिंची उपस्थिती होती.

    आमदार किशोर जोरगेवार यांनी नुकतीच नागपूर जिल्ह्यातील सावनेर येथील ईको पार्कला भेट देऊन तेथील यशस्वी मॉडेलची पाहणी केली होती. यावेळी संबंधित अधिकार्यांसोबत त्यांनी पार्कच्या रचना, संकल्पना आणि व्यवस्थापन यांचा सविस्तर अभ्यास केला. सावनेर ईको पार्कमध्ये साकारण्यात आलेली कोळसा खाणी विषयक वेकोलीची माहितीपर प्रदर्शनी, हरित पट्टे, जलाशय आणि पर्यावरण संवर्धनाची आधुनिक तंत्रे यांचा अनुभव घेऊन आमदार जोरगेवार यांनी चंद्रपूरमध्येही असेच आधुनिक आणि निसर्गाभिमुख ईको पार्क उभारण्याचा संकल्प व्यक्त केला आहे.

    दरम्यान, आज चंद्रपूर येथील वेकोलीच्या विश्रामगृहात झालेल्या बैठकीत त्यांनी वेकोली आणि इतर संबंधित अधिकार्यांसोबत सविस्तर चर्चा करत प्रारंभिक आराखडा तयार करण्याच्या सूचना दिल्या. या बैठकीत जमिनीची निवड, सविस्तर विकास आराखडा, पर्यावरणीय मानके आणि सार्वजनिक सहभाग यासंदर्भात विचारमंथन करण्यात आले. WCL land use for eco tourism in Chandrapur

    आमदार जोरगेवार यांनी केली पाहणी

     बैठकीनंतर आमदार किशोर जोरगेवार यांनी प्रत्यक्ष पाहणीसाठी शहरातील जमनजट्टी परिसरातील वेकोलिच्या मालकीच्या जागेची पाहणी केली. या भागातील रिवलबेल्ट कॉरी याचीही त्यांनी पाहणी केली. येथे जुनी खुली कोळसा खाण असून त्यात पावसाचे आणि नदीचे पाणी साचले आहे. हे निळ्या रंगाचे सुदर पाणी असून येथे नैसर्गिक जलसाठा निर्माण झाला आहे. त्यातून एक सुंदर निसर्गरम्य जलाशय तयार झाला आहे. WCL and government partnership for green projects

    परिसरात घनदाट वृक्षराजी, जलचर आणि पक्ष्यांचे अस्तित्व लक्षात घेता ही जागा नैसर्गिक ईको पार्कसाठी अत्यंत अनुकूल स्थान असल्याचे आमदार किशोर जोगरेवार यांनी म्हटले आहे. यावेळी आमदार जोरगेवार यांनी सदर जागा ईको पार्कसाठी लक्षात घेण्याच्या सूचना दिल्या असून तातडीने सविस्तर सर्वेक्षण व विकास आराखडा तयार करून सादर करण्याचे निर्देश अधिकार्यांना दिले. चंद्रपूर शहरात पर्यावरण आणि पर्यटन अंगांनी नागरिकांना लाभ देणारा हा प्रकल्प असून सर्व विभागाने प्रामाणीकपणे यात काम करत हे ईको पार्क प्रत्येक्षात साकार करावे असे यावेळी आमदार किशोर जोरगेवार म्हणाले.