Tag: आषाढी एकादशी

  • padayatra during ashadi ekadashi । 🚩 महाकाली ते वढा – विठ्ठल भक्तीने भारलेली पायदळ वारी; चंद्रपूर शहरात भक्तीचा महापूर!

    padayatra during ashadi ekadashi

    padayatra during ashadi ekadashi : चंद्रपूर, ता. ५ जुलै २०२५ – आषाढी एकादशीच्या पवित्रपर्वा निमित्ताने तीर्थक्षेत्र वढा (जि. चंद्रपूर) येथील विठ्ठल-रुक्माई मंदिराकडे पारंपरिक पायदळ वारीचे भव्य आयोजन करण्यात आले. या वारीची सुरुवात चंद्रपूर येथील महाकाली मंदिरापासून झाली.

    या पवित्र वारीचे स्वागत आदरणीय डॉ. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनाखाली, डॉ. मंगेश गुलवाडे यांच्या नेतृत्वात अत्यंत उत्साही व भक्तिमय वातावरणात करण्यात आले.

    चंद्रपूर शहरातील मार्गात मोठा बदल

    वारीच्या स्वागतासाठी प्रकाश धारणे, किरणताई बुटले,नम्रताताई आचार्य ठेमसकर, उमेश आष्टनकर, सचिन कोतपल्लीवार, रवी लोणकर, सोहम बुटले, अमित निरंजने, प्रवीण उरकुडे  आणि सुधीर भाऊ मित्र परिवाराच्या असंख्य सदस्यांनी सक्रिय सहभाग घेतला.

    या वारीचे नेतृत्व संत श्री चैतन्य महाराज करीत होते. तसेच शंकर वरारकर,  सरपंच किरण बांदुरकर, तनुश्री बांदलकर, बाळकृष्ण झाडे, शंकर वासेकर यांचे मोलाचे सहकार्य लाभले. pandharpur wari style in local villages

    घोड्याच्या तालमीत जयजयकार

    वारीदरम्यान पांडुरंग – रुक्मिणी – विठ्ठल यांच्या गजरामध्ये भक्तगण हरखून गेले. सर्व वारकऱ्यांसाठी अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात आली होती. जटपुरा गेट येथे रिंगण घालून घोड्याच्या तालमीत जयजयकार झाला आणि भक्तीमय वातावरणात सर्वांच्या चेहऱ्यावर विठ्ठलभक्तीचे तेज झळकत होते.

    संपूर्ण वारीत सुधीर भाऊ मित्र परिवारातर्फे वारकऱ्यांचे भरभरून स्वागत करण्यात आले आणि भक्तिमय, एकात्मतेने भारलेले वातावरण तयार झाले.या भक्ती, समर्पण आणि सामाजिक एकतेच्या प्रतीक असलेल्या पवित्र पायदळ वारीचे तीर्थक्षेत्र वढा येथे प्रस्थान झाल्याने आषाढी एकादशीचे औचित्य अधिक मंगलमय झाले.

  • Ballarpur to Solapur direct train । खासदार धानोरकरांचा पुढाकार! सोलापूर दर्शनासाठी आता थेट ट्रेनचा मार्ग मोकळा?

    Ballarpur to Solapur direct train

    Ballarpur to Solapur direct train : चंद्रपूर : खासदार प्रतिभाताई धानोरकर यांनी केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे बल्लारपूर ते सोलापूर अशी विशेष रेल्वे सेवा सुरू करण्याची मागणी केली आहे. या मागणीमागे चंद्रपूर जिल्ह्यातील नागरिकांना, विशेषतः भाविकांना, पंढरपूर येथील पवित्र तीर्थक्षेत्राचे दर्शन करणे सोपे व्हावे, हा मुख्य उद्देश आहे.

    चंद्रपूर जिल्ह्यातील धोकादायक पुलांचे ऑडिट करा – खासदार धानोरकर

    केंद्रीय रेल्वे मंत्र्यांना दिलेल्या पत्रात, खासदार प्रतिभाताई धानोरकर यांनी या भागासाठी सुधारित रेल्वे कनेक्टिव्हिटीची दीर्घकाळची गरज अधोरेखित केली. सध्या, चंद्रपूर आणि आसपासच्या परिसरातील रहिवाशांना भगवान विठ्ठलाचे प्रमुख धार्मिक केंद्र असलेल्या पंढरपूरला पोहोचताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. बल्लारपूर-सोलापूर विशेष रेल्वे सुरु झाल्यास प्रवाशांना दिलासा मिळून पर्यटना चालना मिळेल. Ashadhi Ekadashi special train from Ballarpur

    विशेष रेल्वे सुरु करा

    “चंद्रपूर जिल्ह्यातील हजारो भाविक आषाढी वारीनिमित्त पंढरपूरला दर्शनासाठी जाण्याची आतुरतेने वाट पाहत असतात,” असे खासदार प्रतिभाताई धानोरकर म्हणाल्या. “मात्र, थेट आणि सोयीस्कर रेल्वे सेवांच्या अभावामुळे ही यात्रा करणे कठीण होते. ही विशेष रेल्वे सुरु झाल्यास प्रवाशांचा प्रवास सुकर करणार नाही, तर पर्यटनाला प्रोत्साहन देईल आणि स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना देईल.”

    खासदार प्रतिभाताई धानोरकर यांनी यावर जोर दिला की, प्रस्तावित रेल्वे मार्ग बल्लारपूर आणि सोलापूर या महाराष्ट्रातील दोन महत्त्वाच्या शहरांदरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा फायदा देईल, कारण तो एक अत्यंत आवश्यक थेट दुवा प्रदान करेल. त्यांनी रेल्वे मंत्रालयाला या विनंतीचा त्वरित विचार करण्याचे आवाहन केले आहे. 

    चंद्रपूर जिल्ह्यातील नागरिकांनी खासदार प्रतिभाताई धानोरकर यांच्या या पुढाकाराचे स्वागत केले असून, केंद्रीय रेल्वे मंत्र्यांकडून त्वरित आणि सकारात्मक प्रतिसादाची अपेक्षा व्यक्त केली आहे.