Tag: आर्थिक मदत

  • financial help for accident victim । अपघातग्रस्त आई, गरीब मुलगा आणि खासदाराची माणुसकी – हृदयाला भिडणारी कहाणी!

    financial help for accident victim

    financial help for accident victim : चंद्रपूर: चंद्रपूर येथील रेल्वे क्रॉसिंगजवळ काही दिवसांपूर्वी झालेल्या एका भीषण अपघातात रामकला रामचंद्र सिडाम रा. मुधोली ता. भद्रावती ही महिला गंभीर जखमी झाली. या अपघातात तिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून, मेंदूत रक्तस्राव झाल्याने तिची प्रकृती चिंताजनक बनली आहे. ही माहिती मिळताच खासदार प्रतिभा धानोरकर यांनी तात्काळ रामकलाला मदतीचा हात पुढे केला. त्यांच्या माध्यमातून सुयोग भोयर यांनी तिच्या मुलगा धर्माला आर्थिक मदत दिली आहे.

    चंद्रपुरात बायपास मार्गाची गरज – खासदार धानोरकर

    अपघातग्रस्त रामकला यांचा मुलगा धर्मा याची कौटुंबिक आणि आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे. तो सध्या चंद्रपूर येथे BSW च्या द्वितीय वर्षाचा विद्यार्थी आहे आणि शासकीय वसतिगृह क्रमांक २ मध्ये राहून शिक्षण घेत आहे. त्याच्या कुटुंबाकडे कोणतीही स्थावर मालमत्ता नाही.

    संघर्ष आणि अपघात

    २०१७ मध्ये धर्माचे वडील वारले असून, रामकला स्वतः मजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होत्या. एकीकडे स्वतःचे शिक्षण आणि दुसरीकडे आपल्या आईच्या उपचाराची आणि कुटुंबाची जबाबदारी, अशा दुहेरी परिस्थितीत धर्मा संघर्ष करत असतानाच हा दुर्दैवी अपघात घडला आहे.

    सध्या रामकलावर दीक्षित हॉस्पिटल, चंद्रपूर येथे उपचार सुरू आहेत. तिच्या उपचारासाठी मोठ्या आर्थिक मदतीची आवश्यकता असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. खासदार प्रतिभा धानोरकर यांनी तातडीने मदत करून माणुसकीचा आदर्श घालून दिला आहे. 

  • Pratibha Dhanorkars public service example । खऱ्या लोकसेवेचा अर्थ काय असतो?, असा असतो लोकप्रतिनिधी!

    Pratibha Dhanorkars public service example

    Pratibha Dhanorkars public service example : चंद्रपूर : बल्लारपूर रोडवरील एका अपघातग्रस्त पीयूष उमेश पेंदोर यांना, खासदार प्रतिभाताई धानोरकर यांच्या विशेष प्रयत्नातून एकात्मिक आदिवासी विकास विभागाकडून तात्काळ ५० हजार रुपयांची आर्थिक मदत मिळाली आहे.

    शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू, खासदाराने केली मदत

    खासदार प्रतिभाताई धानोरकर यांना पीयूष उमेश पेंदोर यांच्या अपघाताची माहिती मिळताच, त्यांनी जराही वेळ न घालवता प्रशासनाशी संपर्क साधला. पीयूष यांना लवकरात लवकर आर्थिक मदत मिळावी यासाठी त्यांनी पाठपुरावा केला. त्यांच्या या संवेदनशील आणि वेगवान कार्यवाहीमुळे एकात्मिक आदिवासी विकास विभागाने तातडीने दखल घेत पीयूष यांना ही मदत मंजूर केली. member of parliament helping accident victims

    त्या मदतीने आधार

    या मदतीमुळे पीयूष आणि त्यांच्या कुटुंबाला मोठा दिलासा मिळाला आहे. उपचारासाठी आवश्यक असलेल्या खर्चाची सोय झाल्याने त्यांना मोठा आधार मिळाला आहे. खासदार प्रतिभाताई धानोरकर यांनी नेहमीच सामान्य नागरिक आणि गरजूंच्या मदतीसाठी पुढाकार घेतला आहे, हे या घटनेतून पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.

    याप्रसंगी बोलताना खासदार प्रतिभाताई धानोरकर म्हणाल्या, “आपल्या लोकसभा क्षेत्रातील कोणताही नागरिक अडचणीत असेल तर त्याला मदत करणे हे आपले कर्तव्य आहे. एकात्मिक आदिवासी विकास विभागाच्या सहकार्याने या युवकाला वेळेत मदत मिळाली याचा मला खूप आनंद आहे. भविष्यातही नागरिकांच्या अडचणी सोडवण्यासाठी मी नेहमीच कटिबद्ध असेन.”

  • घोडाझरी तलावात बुडून मृत्युमुखी पडलेल्या चार युवकांच्या कुटुंबियांना मदतीचा हात

    घोडाझरी तलावात बुडून मृत्युमुखी पडलेल्या चार युवकांच्या कुटुंबियांना मदतीचा हात

    News34 chandrapur

    चंद्रपूर : घोडाझरी तलावात बुडून वरोरा तालुक्यातील चार युवकांचा दुर्दैवी मृत्यू झाला. हि घटना अतिशय वेदनादायी असून या कुटुंबियांना विशेष बाब तत्वावर मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून आर्थिक मदत करण्याची लोकहितकारी मागणी आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली होती. मुख्यमंत्र्यांनी तात्काळ संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश देत त्वरित निधी देण्याचे आदेश दिले. आज आमदार प्रतिभाताई धानोरकर यांच्याहस्ते मृतकाच्या कुटुंबियांना धनादेश दिले.

     

    वरोरा तालुक्यातील शेगाव येथील जहागिर गजानन झाडे, वय-27 वर्ष , मनिष भारत श्रीरामे, वय-32 वर्ष, चेतन भिमराव मांदाडे, वय- 21 वर्ष, संकेत प्रशांत मोडक, वय-25 वर्ष मौजा- गिरोला असे मृत युवकांची नावे आहेत.

     

    वरोरा तालुक्यातील शेगांव येथील 04 युवकांचा ब्रम्हपुरी तालुक्यातील घोडाझरी तलावात बुडून दु:खद मृत्यु झालेला होता. सदर प्रकरणात आर्थिक मदत आमदार प्रतिभाताई धानोरकर यांच्या हस्ते देण्यात आली. यावेळी वरोरा कृ ऊ बा माजी सभापती राजेंद्र चिकटे, वरोरा पं स. माजी उपसभापती विजय आत्राम, नायब तहसीलदार काळे, मंडळ अधिकारी अजय निखाडे, महादेव कोटकर, चंदूभाऊ जयस्वाल, संजय कोटकर, गोलू वाढई, ग्राप सदस्य शेगांव दिवाकर मेश्राम, प्रभाकर घोडमारे व शेगांव ग्रामस्त उपस्थित होते.

  • आणि त्या मृत युवकाच्या कुटुंबाला राजेश बेले यांनी दिला आधार

    आणि त्या मृत युवकाच्या कुटुंबाला राजेश बेले यांनी दिला आधार

    News34 chandrapur

    पोंभूर्णा :- तालुक्यातील देवाडा खुर्द येथे धान मळणी करीत असतांना अचानक थ्रेशर मशीनमध्ये दोन्ही पाय व कमरेखालचा भाग ओढल्या गेल्याने नितेश पिपरे या मजूराचा रविवारला मृत्यू झाला. आर्थिक स्थिती बेताची व कर्ता पुरुषाच्या मृत्यूने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला होता.दुर्दैवी मृत्यू पावलेल्या नितेश पिपरे (वय ३४) यांच्या कुटुंबाला सामाजिक कार्यकर्ते राजेश बेले यांनी आर्थिक मदत करुन कुटुंबाचे सांत्वन केले.

     

    नितेश पिपरे हा गरिब कुटुंबातील पण कर्तबगार मुलगा होता. तो मिळेल ते काम करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचा. वृद्ध आई-वडील, पत्नी व दोन चिमुकल्या मुली असा सुखी संसार सुरू होता.रविवारला मृतक नितेश हा मजुरीसाठी थ्रेशर मशीनवर गेला आणि त्याचा जीव गेला.घरची आर्थिक स्थिती बेताची.नितेशच्या पश्चात पत्नी,दोन चिमुकल्या मुली व वृद्ध आई- वडील असा परिवार आहे.

     

    कुटुंबातील कर्ता पुरुष गेल्याने परिवारावर दुःखाचा डोंगरच कोसळला.आर्थिक कोंडी सुरू झाली. अशावेळी चंद्रपूर येथील सामाजिक कार्यकर्ते राजेश बेले यांनी मृतक नितेशच्या कुटुंबीयांना सामाजिक उत्तरदायित्व म्हणून दहा हजार रुपयाची आर्थिक मदत केली व कुटुंबाचे सांत्वन केले.

     

    यावेळी मृतकाची पत्नी सुषमा पिपरे,वडिल बाबुराव पिपरे, सामाजिक कार्यकर्ते राजेश बेले,माजी उपसभापती ज्योती बुरांडे,सामाजिक कार्यकर्ते शैलेश जुमडे,सोनल धोपटे, कालिदास गव्हारे उपस्थित होती.

  • पालकमंत्री मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने त्या कुटुंबांना मिळाली आर्थिक मदत

    पालकमंत्री मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने त्या कुटुंबांना मिळाली आर्थिक मदत

    News34 chandrapur

    चंद्रपूर : सप्टेंबर महिन्यात बल्लारपूर बायपासवर ट्रक आणि ऑटोरिक्षाच्या भीषण अपघातात चार जणांचा मृत्यू झाला होता. या अपघातातील मृतांच्या कुटुंबियांना वने व सांस्कृतिक कार्य तथा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते २० लाख रुपयांच्या धनादेशांचे वितरण करण्यात आले. अपघातानंतर श्री. मुनगंटीवार यांनी पाठपुरावा करून मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून ही मदत मिळवून दिली. त्यामुळे घटनेनंतर अवघ्या दीड महिन्यांच्या आत मृतांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत मिळू शकली आहे.

     

    अपघातातील मृतांच्या कुटुंबियांना २० लाख रुपयांच्या धनादेशांचे वितरण करण्यात आले. यावेळी, राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे , कल्पना बगुलकर, महाराष्ट्र ऑटो रिक्षा चालक-मालक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र खांडेकर, जिल्हाध्यक्ष मधुकर राऊत आदी उपस्थित होते.

     

    27 सप्टेंबर 2023 रोजी बल्लारपूर बायपासवर ट्रक आणि ऑटोरिक्षा यांच्यात भीषण अपघात झाला. यात राजकला मोहुर्ले, इरफान खान (रा. बाबुपेठ, चंद्रपूर), अनुष्का खेरकर (रा. बल्लारपूर) आणि संगिता अनिल चहांदे (रा. साईनगर, गडचिरोली) या चार जणांचा मृत्यू झाला होता. यासंदर्भात श्री. मुनगंटीवार यांनी सातत्याने पाठपुरावा केला आणि दीड महिन्याच्या कालावधीत चारही मृतांच्या कुटुंबांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून प्रत्येकी पाच लाख रुपये याप्रमाणे एकूण 20 लाख रुपयांची मदत जाहीर झाली. मदत जाहीर झाल्यानंतर काही दिवसांतच धनादेश जारी करण्यात आले आणि सोमवारी पालकमंत्री श्री. मुनगंटीवार यांच्या हस्ते मृतांच्या कुटुंबियांना हे धनादेश सुपूर्दही करण्यात आले. कुटुंबातील सदस्य गमावल्याचे दुःख विसरणे शक्य नाही, पण मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून मदत मिळवून देत श्री. मुनगंटीवार यांनी संकटाच्या काळात दिलासा देण्याचे काम केले आहे, अशी भावना मृतांच्या कुटुंबियांनी व्यक्त केली.

     

    वीस दिवसांच्या आत घोषणा

    श्री. मुनगंटीवार यांच्या निर्देशांनंतर जिल्हा प्रशासनाने 25 ऑक्टोबर 2023 रोजी शासनाकडे अर्थ सहाय्याकरिता प्रस्ताव पाठविला. प्रस्ताव पाठविल्यानंतर ना. मुनगंटीवार यांनी विशेष लक्ष दिले आणि सातत्याने पाठपुरावा केला. त्यानंतर 20 दिवसांच्या आत मुख्यमंत्री सचिवालयाने मृतांच्या कायदेशीर वारसदारांना प्रत्येकी पाच लक्ष रुपये याप्रमाणे चारही कुटुंबांसाठी 20 लक्ष रुपये इतके अर्थसहाय्य मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून मंजूर केले..

  • त्या कुटुंबांना संतोष रावत यांनी केली आर्थिक मदत

    News34 chandrapur गुरू गुरनुले

    मुल – मुल तालुक्यातील मौजा चिचाला येथील शेतकरी मजूर महिला धान लागवडीच्या शेतात निंदणाचे आठ महिला काम करीत असतांना दिनांक १/१०/२०२३ रोजी दुपारी अचानक आकस्मिक वादळी वारा व पाऊस आल्याने विज अतिशय तीव्र गतीने कडाडली व महिला काम करीत होते त्याच शेतात वीज पडल्याने एक महिला सौ. चंद्रकला संजय वैरागडे वय (४५) ही जागीच गतप्राण झाली. व सौ.आशाताई रवींद्र बुरांडे वय(३५) गंभीर जखमी झाली. ही घटना घडल्याने चींचाला गावात दुःखाचे वातावरण पसरले.

    आर्थिक मदत
    मदतीचा धनादेश देताना

    वैरागडे कुटुंब पोरका झाल्याने गरीब शेतकरी कुटुंबाची फार मोठी हानी झाली. तर बुरांडे कुटुंबावर अचानक संकट आल्याने पत्नीच्या उपचारासाठी पतीला आर्थिक मदतीसाठी धावपळ करण्याची वेळ आल्याने दोन्ही कुटुंब आर्थिक संकटात सापडल्याची बातमी कांग्रेस नेते चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष तथा माजी जी.प.अध्यक्ष संतोष सिंह रावत यांनी चींचाडा येथे मृत्यू पावलेल्या वैरागडे कुटुंबियांच्या घरी जाऊन त्यांचे सांत्वन करुन त्यांना धीर दिला व स्वतःहा कडून रोख रुपये १० हजाराची आर्थिक मदत दिली. तसेच जखमी असलेल्या सौ.बुरांडे महिलेच्या घरी जाऊन त्यांचही विचारपुस केली.उपचाराबाबत त्यांना धीर दिला. आणि स्वतःहा कडून ५ हजाराची आर्थिक मदत त्यांना दिली. याप्रसंगी दोन्ही कुटुंब प्रमुख यांच्या हातात मदत दिली.

     

    याप्रसंगी कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती राकेश रत्नावार,उपसभापती राजेंद्र कन्नमवार,माजी सभापती व विद्यमान संचालक तथा माजी तालुका कांग्रेस कमिटीचे अध्यक्ष घनश्याम येनुरकर, कांग्रेस तालुका अध्यक्ष गुरु गुरनुले, आदर्श सहकारी खरेदी विक्री सोसायटीचे सभापती पुरुषोत्तम भुरसे, बाजार समिती माजी संचालक डॉ.पद्माकर लेनगुरे, ग्राम पंचायत उपसरपंच सूरज चलाख, माजी उपसरपंच यशवंत चलाख, तेजराज ठेमस्कर,जनार्दन आत्राम, सौराज इटकेलवार,सदस्य, दीपक मेश्राम सदस्य,वासुदेव बुरांडे सदस्य,बालाजी निकूरे,सुखदेव वासेकर,संजय टिकले आदी ग्रामस्थ व महिला उपस्थित होते.

  • त्या कुटुंबाला संतोष रावत यांनी केली आर्थिक मदत

    News34 chandrapur गुरू गुरनुले

    मूल – शेतामध्ये पाणी पाहण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्यावर दबा धरुन बसलेल्या वाघाने जागीच ठार केल्याची घटना शुक्रवारी सकाही सात वाजता दरम्यान मूल तालुक्यातील मौजा ताडाळा तुकूम, जुना सोमनाथ परिसरातील शेतशिवारात घडली. सुर्यभाव टिकले वय 55 वर्षे रा. चिचाळा हे आपल्या शेतात काम करीत असताना वाघाने हल्ला करून ठार केले.

    शेतकरी हा कुटुंबाचा आधार असतो.तोच गेला तर संपूर्ण कुटुंबच निराधार होतो ही दुर्दैवी घटना घडली.त्यांच्या मागे पत्नी कमलाबाई टिकले, मुले ईश्वर व रुपेश असा परिवार आहे.

     

    मूल तालुक्यातील यापूर्वीही चिचाळा येथे वाघानेच एका दिवशी दोघांचा बळी घेतल्याची घटना ताजीच आहे. शेतकरी सुर्यभान टिकले यांनी यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन करण्यासाठी काँग्रेसचे नेते सी.डी.सी.सी.बँकेचे अध्यक्ष व माजी जी.प.अध्यक्ष संतोष सिंह रावत हे मृतकाच्या घरी जाऊन कुटुंबीयांचे सांत्वन करुन स्वतःहा कडून दहा हजार रुपयाची आर्थिक मदत दिली.

     

    याप्रसंगी कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती राकेश रत्नावार, उपसभापती राजेंद्र कन्नमवार, तालुका काँग्रेसचे अध्यक्ष गुरु गुरनुले, माजी संचालक डॉ.पद्माकर लेनगुरे, आदर्श खरेदी विक्री सहकारी सोसायटीचे सभापती पुरुषोत्तम भुरसे, तेजराज ठेमस्कर, बालाजी निकूरे, चालदेव मांदाडे, बबलू गांडलेवार, मुन्ना मडावी, सूरज इतकेलवार, ग्रा. प सदश जनार्दन आत्राम, कृष्णाजी टिकले, सुभाष मंकीवार, अनुप लेंनगूरे, श्रीनिवास टिकले, उपसरपंच सूरज चलाख, पोलिस पाटील दुर्गे, माजी उपसरपंच यशवंत चलाख, पवन बलगेलवार आदी ग्रामस्थ उपस्थित होते. वाघाने शेतकऱ्यावर झडप घेवुन एफ.डी.सी.एम. ५२२ कक्षात त्याच्याच शेतात त्याचा घोट घेतल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

     

    याबाबत संतोष सिंह रावत यांनी कुटुंबियांसमोर वनविभागाचे अधिकारी सहाय्यक वनसंरक्षक आदेश शेडगे यांना मोबाईल वर बोलून वनविभागाकडून तात्काळ पूर्ण आर्थिक मदत द्यावी अशी मागणी केली. तसेच वन्य प्राणी वाघ,रानटी डुकरे शेतकऱ्यांच्या शेतीचे नुकसान करीत असल्याने त्याचाही बंदोबस्त करावा.व वणाला तारेचे कुंपण करावे अशी मागणी देखील याप्रसंगी केली.